Literature

श्रीसमर्थांचा मुखप्रसाद

श्रीरामाचा उपदेश श्रवण केला. याचेच प्रतिबिंब श्रीसमर्थ रामदासांच्या उपदेशांतून पाहावयास मिळते. श्रीसमर्थांच्या मुखप्रसादाचे माधुर्य चाखत त्या शब्दांचे सौंदर्य पाहात, त्यांच्या हृदयसिंहासनावर ठाव देऊन बदव असलेल्या त्या मंगलमय प्रभु श्रीरामाच्या आनंदधन स्वरूपाचे दर्शन घेत अजून कांहीं वेळ इथेच काढू.

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांस आधार अखंड स्थितीचा निर्धार । श्रीमंत योगी ॥ १ ॥ परोपकाराचिया राशी अखंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्वासी । तुलणा कैंची ॥ २ ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि छत्रपति शक्ति पृष्ठभागीं ॥३॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥१॥ आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । सर्वज्ञपणे सुशीळ | सकळां ठायीं ॥ ५ ॥ धीर उदार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥ ६॥

श्रीरामाचेच हे वर्णन पुढें ठेऊन श्रीशिवाजीला श्रीसमर्थानी उपदेश केला व असेंच होण्याविषयीं आशीर्वाद दिला. देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण | हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली ॥ ” श्रीसमर्थ व श्रीशिव राय यांच्या पवित्र हृदयाचे हें सुंदर दृश्य आहे. त्यांचे बोल व क्रिया हृदयस्थ नारायणाच्या प्रेरणेनें  देवधर्मगोब्राह्मण’ यांच्या संरक्षणार्थ होत्या. अशीच आम्हां सर्वांनाहि त्या हृदयस्य नारायणाची प्रेरणा होऊन असेंच उत्कृष्ट कार्य आमंच्या हातूनहि जर होईल तर आम्ही किती भाग्यवान होऊं ! तीर्थक्षेत्रे मोडिलीं । ब्राह्मणस्थानें भ्रष्ट झालीं । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥ १ ॥ अगदीं अशीच स्थिति आज आली आहे.

एकवचनी एक बाण । एक पत्नी अभंग ठाण । अजिंक्य राक्षसां निर्वाण । कर्ता समर्थ एक ॥ २ ॥ धार्मिक पुण्य परायण । शांत लावण्य सुलक्षण । जेर्णे त्र्यंबक परम कठीण । भग्न केलें ॥ ३ ॥ जो लावण्याचा जनक । जो सौंदर्यांचा नायक । जो मार्तंड कुळदीपक । चातुर्य निधी ॥ ४ ॥ ऐसा राम राजीव नयन । साधुजनांचे भूषण ।

असें त्या प्रभु रामरायाचें ध्यान श्रीसमर्थांनी आमच्या हृदयांत ठसविलें आहे. या ठशाचा आम्ही योग्य उपयोग करून घ्यावा.

राम जीवाचा जिव्हाळा । राम मनाचा कोवळा । राम जाणे अंत: कळा । निजदासांची ॥ २४ ॥ राम पुण्य परायण राम त्रैलोक्याचा प्राण । रामें दास बिभीषण । चिरंजीव अक्षय केला ॥ २५ ॥ वैभ रावण राक्षस माजले । तेणें सकळ देव गांजले । ऐसें जाणूनि धांवर्णे केलें | वैकुंठाहूनि राघवें ॥ रामापायी अहिल्या शिळा | दिव्य रूप झाली बाळा । रामें गणिकेसी सोहळा । विमानाचा दाखविला ॥ राम खाय भिलणीचीं बोरें । रामप्रतापें वानरेश्वरें। राज्य केलें सहोदरें। गांजिला होता जो ॥ राम सुरवरांचा कोंबसा । राम मंडन सूर्यवंशा । रामजप भवानीशा । सप्रेम चित्त रामनामें ॥ राम सकळ प्राणिमात्रांचा । आणि कैवारी देवा ऋषी श्वरांचा । सारथि अडलियांचा । समया आपंगी ॥ श्रीराम जय राम जय जय राम । ऐसा कांहीं एक करूनियां नेम। जप कीजे तेणे आत्माराम । जोडेल नियमें ॥

सकळ विश्वजनांना आपलेपणा उत्पन्न करणारें कसें हें गोड वर्णन आहे. किती यानें आधार वाटतो ! चतुर्थमानांत श्रीसमर्थांनीं श्रीरामाचा तात्त्विक परिचय करून दिला

आहे. त्याचाहि थोडा अनुग्रह घेऊं.

राम तो जाणिजे आत्मा । सर्वांतरात्मा तो चि तो । त्रिलोक्य चालवीतो तो । आतां हि रोकडा पाहा ॥ १ ॥ देखवी ऐकवतो । चाखवी दाखवी सदा । बोलवी चालवीतो तो। देहपुरासि बर्तवी ॥ २ ॥ बहुदेही देहाकारें वर्ततो तो दिसोचना । कळतो तोचि तो त्याला । जाणतो आप आपणा || ३ ||

हें वर्णन वाचतांना ‘ शुकरहस्योपनिषदा’च्या ” प्रज्ञानं ब्रह्म ” यांवरील व येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च । स्वाद्वस्वादु विजा नाति तत्प्रज्ञानमुदीरितम् । चतुर्मुर्खेद्रदेवेषु मनुष्याश्वगवादिषु । चैतन्य मेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि ॥ या विवरणाची आठवण होते. श्रीसमर्थ हे श्रीरामाचे एकांतिक भक्त श्रीमारुतिरायांचे अवतार मारुतिराय तर श्रीराम भक्तांचे आचार्य. त्यांनी श्रीसमर्थरूपानें केलेला उपदेश आम्हांला प्रपंच -परमार्थी तारक आहे. श्रीरामकृपा प्रापक आहे यांत संशय नाही. प्रासंगिक उपदेशांत एके ठिकाणी प्रपंचा कारणे स्वभावें। बोलिलो मी” असे श्रीसमर्थ उद्गारले आहेत. ” प्रपंचीं जो शाहाणा । तो परमार्थ करील जाणा ॥ ” असें त्यांचेच वचन आहे. तेव्हां यापैकी कांही ओव्यांचे मनन करूं. या उपदेशां कुन रामाचाच स्वर ऐकू येईल.

सावधपणे प्रपंच केला । तेणें सुखाचे पावला । दीर्घ प्रयत्ने मांडला । कार्य भाग साधे ॥३॥ आधी मनुष्य ओळखावें। योग्य पाहून काम सांगावें । निकामी तरी ठेवावें। एकीकडे ॥ ४॥ पाहोन समजोन कार्य करणें । तेणें कदापि नृ ये उणें । कार्यकर्त्याच्या गुणे । कार्यभाग होतो ॥५॥ कार्यकर्ता प्रयत्नी जाड । कांहीं एक असला हेकाड । तरी समर्थपणें पाठवाड । केली पाहिजे ॥ ६ ॥ मनुष्य राजी राखणे हीं चि भाग्याची लक्षणें । कठीणपणे दुरी धरणें । कांहीं एक ॥ ८ ॥ समयीं मनुष्य कामा येतें । तया कारणे सोशिजे तें। न्याय सांडितां मग तें । सहजचि खोटें ॥ ९ ॥ न्याय सीमा उल्लंघूं नये । उल्लंधितां होतो अपाये । न्याये नसतां उपाये । होईल केचा ॥ १० ॥ उपाधीस जो कंटाळला । तो भाग्यापासून चेवला । समयीं धीर सांडिला । तोहि खोटा ॥ ११ ॥ संकटीं कंटाळों नये । करावे अत्यंत उपाये । तरी मग पाहतां काये । उणें आहे ॥ १२ ॥ बंध बांधावे नेटके | जेणें करितां चतुर तुके । ताब न होतां फिंके । कारभार होती ॥ १३ ॥

धुरेने युद्धासी जाणे । अशी नव्हेत की राजकारणे । धुराच करोनि! सोडणें । कित्येक लोक ।। १४ ।। 

किती अचूक आणि उदात्त असा हा उपदेश आहे आस्तिकते बद्दलची पुढची ओवी पाहा.

देव मात्र उच्छेदिला हे पाहून उगीच बसणाऱ्याला जित्या परीस मृत्यु भला ।  देवाचा उच्छेद म्हणजे आपुला स्वधर्म बुडविला । ऐसें समजावें ॥ १२ ॥ देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते । देवदास पावती फत्ते । यदर्थी संशय नाहीं ॥ १७ ॥ देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवावा की बुडबाबा । धर्मस्थापनेसाठीं ॥ राजधर्मातील या ओव्या श्रीशिवाजी राजाला व अमात्य वर्गाला श्रीसमर्थांनी उपदेशिल्या आहेत. यावरून देवधर्माचा त्यांना किती जाज्ज्वल्य अभिमान असावा हें व्यक्त होते. इथे श्रीकृष्णाच्या स्वधर्मे निधनं श्रेयः । या वचनाचीहि आठवण होते.

home-last-sec-img