Literature

श्रीसमर्थांचे अवतार कार्य

‘यो धर्माध्यनिवारणैकतरणिर्देदिप्यमानो महान् । साक्षात्धर्म मनोज्ञराम कमल्लामोदैकदिव्याकृतिः ॥ 

योऽभू च्छ्रीशिवराष्ट्रचको रहृदयानन्देन्दुभृच्छंकरः । रामाभिन्न विशालदासपदवीं श्री रामदासं भजे ॥

आपल्या श्रीसमर्थांचे पाळण्यातील नाव होते. त्यांना नारायण हे अन्वर्थक नाव  नारायण अंत स्फूर्तीने त्यांच्या आई-बापांनी ठेविले. श्री समर्थांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत व आईचे नाव राणूबाई’ होते. जन्म गोदावरीच्या पावनतिरी मौजे जांब, पराणे आंळ येथे शके १५३० साथ श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्ती ऐन मध्यान्हकाळी झाला. ‘ राजति वर्तुळशा त्यापरि जीवन को गागाराजधिराज अवतरला हो या जगदुद्धारा ॥ ही श्री रंगनाथ महाराजांची उक्ती या ठिकाणी आपोआपच आठवते व श्रीसमर्थ रामाचेच अवतार म्हणून श्री रंगनाथ स्वामीप्रमाणेच आम्हालाही वाटू लागते. ‘देवो भूत्वा देवं यजेत् ब्रह्मसन् ब्रह्माप्यति । इत्यादि वाक्यानुसार श्रीसमर्थांना पुढे त्यांच्या रामभक्तीमूळेच  श्री रामदास’ हे नाव प्राप्त ‘ तस्मिस्तज्जने भेदभावात्‘ या नारदसूक्ताप्रमाणे देव झाले अक्त एक म्हणण्याचे तत्व प्रगट होण्याकरताच की काय श्रीसमर्थ

रामदास श्री मारुतीरायाचे अवतारही म्हणून येतात. त्यांच्या ग्दास’ ह्या नावातही सर्वसमर्थ श्रीरामाचे अतुल सामर्थ्य प्रगट झाले असल्यामुळे त्यांना ‘ श्रीसमर्थ’ म्हणून लोक म्हणू लागले. श्रीरामांनी सुग्रोवाला हाताशी धरून वानराकरवी राक्षसांचा संहार करविल्याप्रमाणेच श्रीसमर्थांनी श्री शिवरायाला हाताशी घरून त्या बुटक्या मावळ्याकरवी धिप्पाड मोगलांचा करविला. अघटित कार्यानेच विभुतिमत्व प्रगट होते. नाश

‘धर्मस्थापनेचे नर । ते विष्णूचे अवतार । मागे झाले पुढे होणार | देखें ईश्वराचें ॥’ ह्या समर्थक्तीत आपल्या श्रीसमर्थाच्या अवताराचे रहस्य भरले आहे. श्रीसमर्थांच्या अवताराचे वैशिष्ट च सांगताना श्रीसमर्थ प्रतापात गिरिधर स्वामी आम्ही नावा अवतारे ऐकिली । ‘ म्हणून आपला अनुभव सांगून कोणत्याही अवतारात लग्नातून पळून जाण्याचे हे असामान्य अघटित कार्य झालेले ऐकिवात नाही, म्हणून श्रीसमर्थांचे एक अतुल सामथ्र्यं प्रगट करतात.

‘द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाहमंगली म्हणती । ते एक रामदासे अधिकले त्या सदा असो प्रणती ॥’

आजपर्यंत विवाहकाली उच्चारला जाणारा सावधान शब्द एका श्रीसमर्थांनीच खरा ऐकला व त्याचा अर्थ केला म्हणून कविवर्य मोरोपंत देखील थापली ग्वाही देतात. श्रीसमर्थांच्या अवतारातल्या अनेक आश्चर्यकारक सामर्थ्यपूर्ण अघटित कार्यापैकी है एक कार्य ऐकणान्यांना थक्क करून सोडते.

पृथ्वी तस्य प्रभावाद्वहति दिननिशां यौवने यो हि शान्तः । भर यौवनावस्थेत विरक्त झालेल्या अशा पुरुष श्रेष्ठाच्या

पुण्यानेच पृथ्वी सर्व प्राण्यांना धारण करते असा ह्याचा अर्थ होतो. मोहाचे जाळे पसरीव स्ववश करून घेण्यासाठी हाडात माळ घेऊन पुढे उभे राहिलेल्या मूर्तीनंत मायेच्या, गुरफटून टाकणाच्या मोहजालाचे आवरण वाडकन् पार झुगारून देऊन श्रीसमयीवी आपल्या केवळ वारा वर्षाच्या वयातच लग्नातून पाय काढला, आपल्या हृदयाची साक्ष पटविली, आपली योग्यता जगाच्या निदर्शनास आणून दिली व पारमार्थिक उच्चतम संदेशाबरोबरच व्यक्तिपंचाने राष्ट्रप्रपंचाचा संकोच होत असल्या मुळे राष्ट्रप्रपचाकरिता व्यक्ति प्रपंचाचा समूळ त्याग आवश्यक असतो हे तत्त्वही आपल्या जीवनात प्रष्ट केले. अल्पवयातच विश्वत झालेल्या व व्यक्तिप्रपंच त्यागून राष्ट्रप्रपंच साधलेल्या श्रीमत् शंकरभगवत्पादादिकांची अनेक उदाहरणे आहेत. पण आपल्या मोहजालात अडकविण्याची प्रतिज्ञा करून पुढे उभ्या टाकलेल्या मायारूप वधूच्या पाशातून, लग्न समारंभातून, त्यातूनही अंतर्पाटाच्या वेळी आपले विश्वत हृदय कसाला लावून पहाण्याचे उदाहरण मात्र आजपबंतच्या इतिहासाव श्रीसमयीचेच आहे. ‘ वैराग्य हे भाग्य आमुच्या समर्थ स्वामींचे | तेणें करिता तारण झाले भक्तिज्ञानाचे ‘ तारण झाले असे गिरिधर स्वामी म्हणतात. ह्यावरून विषक्तीमुळेच भक्तिज्ञानाचा वैराग्य की समर्थ स्वामीचे भाग्य त्यामुळेच भक्तिज्ञानाचे प्रचार यशस्वी होतो, त्या व्यक्तिवही भक्तिज्ञान रुजते व त्याच्या संप्रदायातही ते अविच्छिन्न टिकून राहते. हा सिद्धांत ह्या विधानातून आपल्याला समजून घेता येईल.

आई, चिंता करितो विश्वाची ।’ असे आपल्या आईला दिलेले उत्तर सायं करून दाखविण्याकरिता श्रीसमर्थ ‘ सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परी तेथे भगवंताचे ।

अधिष्ठान पाहिजे ॥ ह्या आपल्या उक्तीप्रमाणे आचरणाचा घडा घालून देण्यास बाहेर पडले व थेट नाशिक क्षेत्रास येऊन पोहचले. तेथे एके ठिकाणीच बारा वर्षे तपात काढली.

‘तपसि सर्वं प्रतिष्ठितम् । तपस्त कि न सिद्धति ॥

तपात सर्व सामध्ये आहे. तपाने मिळविण्यास अशक्य असे काहीच नाही. हे विनवण्याकरताच श्री समर्थांनी तप केले. तणचे महत्व दर्शविणारे मनुस्मृतीतील पुढील श्लोक मनवीय आहेत.

‘ऋषयः संयतात्मानः फलमुला निलाशनः । तपसेव प्रपश्यन्ति त्रैलोक्यं सचराचरम् ॥ 

औषधान्यगदो विद्या देवीच विविधा स्थितीः । तपसैव प्रसिध्दयन्ति तपस्तेषां हि साधनम् ॥ 

यद्दुस्तरं यदुसयं यदुर्गंयच्च दुष्करम् । सर्व तुतपसा साध्यं तपोहि दुरतिक्रमम् ॥ ‘ 

प्रजापतिरिदं शास्त्रं तपसैवसृजत्प्रभुः । तयैववेदानृपयस्तपसा प्रतिपेरिरे ।

वाक्, मन, काय नियमाम्वित, जितेंद्रिय, फलमूळ वायु आहाचपच ऋषी तपाच्या योगानेच आपल्या ठिकाणाहून त्रैलोक्य अवलोकित असत. श्रीसमर्थांच्या संबंधानेही याचा पडताळा बेतो. कुठे धार्मिक सज्जनांचा छळ होत आहे हे संतपदृष्टीने समजून श्रीसमर्थ तिथे तिथे प्रगटलेल्या कथा बऱ्याच आहेत. एक दोन, अशी वरीच उदाहरणे आढळतात. श्रीसमर्थ परित्र वाचनाने सर्व प्रसंग समजून येतील. वायुवेगाने आकाशातून गेल्याचीही उदाहरणे आहेत. ! क्षणामाजि कायारूपे पालटावी । अकस्मात त्या भाविकां भेट द्यावी ।’ असे अनुभविक वर्णन तत्कालिन समर्थ शिष्यानी केले आहे.

‘अचिन्त्य शक्तिमान्योगी नानारूपाणी धारयेत् । सहंरेच्च पुनस्तानि स्वेच्छया विजितेन्द्रियः ॥

तपानेच पूर्वीच्या ऋषींवी निरनिराळ्या औषधीचा शोध लाविला, आरोग्याची साधने ठायी पाडिली, वेद वेदांत समजून घेतला. दैवी स्थिती संपादिली, त्यांच्या अलोकिक अघटित अशा सर्व कार्यांचे मुख्य कारण एक तपच होते. तपानेच दुस्तर भवसागर ऋषी तरून गेले, दुष्प्राप्य अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतली. दुर्गम परमार्थ मार्ग चालून गेले, अनुरूप धारण करून दुर्गम अशा स्थळातून बाहेर पडले, दुष्कर अशी कार्य लीलेने पार पाडली. मृत मनुष्यानाही उठविले, सर्व काही सामथ्र्य तपाने प्राप्त होते, तपाने दुर्दम्य शक्ती लाभते. प्रजापतीचे देखील तपानेच वेदाना निर्माण केले, तपानेच वसिष्ठादी ऋषींनी मान्य ब्रह्मणात्मक वेदाची प्राप्ती करून घेतली असा ह्या इलोकांचा संक्षिप्त अर्थ आहे. श्रीसमर्थ मिरजेच्या सुभेदारास पठणीवर आणण्याकरिता एका बारक्या रंधातून किल्ल्याखाली आले आणि मग आपण आलेल्या मार्गाने त्याला खाली येण्यास सांगितले. सुभेदारगार झाला व अधिकाराचा मद टाकून श्रीसमर्थांना शरण आला. मुळातून ही गोष्ट वाचावी. तपःप्रभावाने वेदवेदांगाचे परिज्ञान स्वतः करून घेणे तर झालेच, श्रीसमर्थांनी अतिशूद्राला क्रमाक्रमाने ब्राह्मणत्व देऊन वासुदेवशाच्याबरोबर वाद करविण्यास लावून त्या महान यविष्ट शास्त्रयाचा गर्व घालविला. या अति शूद्राची समाधी चाफळला आहे. उत्सवात रथ तेथपर्यंत जातो.

‘ऋतं तपः सत्यं तपः श्रुतं तपो दमस्तपो दानं

तपो यज्ञं तपो भुर्भुवः सुवर्ष ह्येतदुपास्यैतत्तपः ।’

व्यावहारिक सत्याचे आविष्करण, पारमार्थिक सत्याचे निरूपण, वेदांत श्रवण, इंद्रियदमन, दान, यज्ञ, त्रैलोक्य सचराचर एकमेव आनंदघन सत्ता मात्र स्वयंप्रकाश ब्रह्मरूपच आहे. अशी उपासना हे सर्वही तपच म्हणून घेते.

‘सिद्धस्य यानि लक्षणानि तानि साधकस्य साधनानि,

सिद्धांच्या आंधवळणी पडलेले आचरण व लक्षण साधवांना मार्गदर्शक होऊन त्याचे ते साधन होऊन राहते. ‘ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्त देवेतरो जनः । श्रेष्ठाचेच सामान्यजन अनुकरण करतात. या नात्याने श्रीसमर्थांनी नाशिक-पंचवटी येथे बारा वर्षे तप आचरले. सूर्योदयाळा स्नानसंध्यादिक आटोपून नाभीप गोदानदीच्या पाण्यात बारा वाजेपर्यंत रोज उभे राहून त्रयोदशाक्षरी राममंत्राच्या तेरा कोटी खपाचे पुरश्चरण श्रीसमर्थांनी पूर्ण केले असे चरित्रावरून समजते. ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि । इत्यादि वाक्ये जपाचे महत्त्व दाखवितात.

नियमबद्ध आचरणाने अक्षरकोटी संख्यांक जप यथाविधी झाल्यास उपासना साक्षात्कार होऊन आणिमादी सिद्धी प्राप्त होतात. अशी आधारवचने आहेत. गायत्री मंत्राचे पुरश्चरण अक्षर लक्षानेच होते. श्रीसमर्थांच्या ठिकाणी ज्या आणिमादी सिद्धी दिसून येतात त्या ह्या जपानुष्ठानाने असे व्यावहारिक बाह्यदृष्ट्या सांगता येईल. अवतान्यांना जन्मतःच सिद्धी प्राप्त असतात. ही गोष्ट निराळी पुरश्चरणाच्या पूर्तीपूर्वीच बसक पंचक गावच्या मृत कुळकर्ण्याला उठविले त्याची श्रीसमर्थ चरित्रात गोष्ट आहे.

पुरश्चरणानंतर बारा वर्षे तीर्थाटन करून संपूर्ण भारत वर्षाचे तत्कालीन स्वरूप समजून घेतले. ठिकठिकाणी आपल्या अप्रतिम प्रतिथेने व तपोबलाने लोक जागृती घडवून आणली, साधुमंतातून एकवाक्यता निर्माण केली. रामरायाचे पवाडे गाऊन धर्म व नीतीचे शिक्षण समाजाला दिले. मारुतीरायांचा आदर्श तरुणापुढे ठेवून त्यांना कार्यदक्ष, सुदृढकाय, युद्धकुशल, सूक्ष्मबुद्धीचे धर्मप्रचारक आणि धर्मरक्षक बनविले, स्वधर्माभिमान जा केळा, आस्तिक्यबुद्धी निर्माण केली. ‘ज्याचे खावे त्याकरिता मरावे ।’ अशा भावनेने त्यावेळची जनता सोपळाचे जाच करूनही, धर्माविरुद्ध हालअपेष्टा सोसूनही त्यांच्या अत्याचारास बळी पडूनही स्वामी सेवकाचे नाते पत्करून गप्प बसे, अशावेळी ‘ जो अन्न देतो उदरासी । शरीर विकावे लागे त्यासी । मग जेणे घातले जन्मासी । त्यासी कैसे विसरावे ॥ एका उदरंभरा कारणे । नाना नीचाची सेवा करणे । नाना स्तुती आणि स्तवनें । मर्यादा धरावी || अहर्निशी ज्या भगवंता । ढकल जीवाची छापली चिता । मेघ वरुषे जयाची सत्ता सिंधू मर्यादा घरी | भूमी वरिली धराधरे । प्रण्ट होईजे दिनकरें। ऐसी सृष्टी सत्तामात्रे । चालवी जो कां ।। ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचे लाघव । जो सांभाळी सकळ जीव । कृपाळूपणे ॥ इत्यादी युक्तिवाद लढवून समाजाला श्रीसमर्थानी देवधर्माकडे वळविले. ‘ मारावे की मरावे । धर्मासाठी || म्हणून आपल्या तपोबलाचे नवजीवन समाजात ओतले. अखिल भारत वर्षात एकही हिंदु ठेवणार नाही ह्या औरंगजेबाच्या प्रतिज्ञेला माळा घातला. श्री शिवबाकरवी हिंदुपदपादशाहीची स्थापना केली. १५६६ पासूनच विशेषता कृष्णातीरीच श्रीसमर्थ राहू लागले. श्रीसमर्थांनी स्थापिलेल्यात अकराशे मुख्य मठ होते. येथील महंत श्रीसमर्थांच्या धर्मप्रचाराचे

मुख्य अधिकारी होते. उपमठ किती होते ? शिष्यप्रविष्यांची संख्या किती होती हे त्यावेळच्या शिष्यांनासुद्धा पूर्णपणे कळून आले नव्हते. भारतवर्षमर समर्थ शिष्याचे जाळे पसरले होते.  अयोध्येचा रक्तरंजित इतिहास’ ह्या पुस्तकात श्रीसमर्थ शिष्य विष्णुदासाने आपल्या हजारो शिष्यासह मोगल सैन्याला कित्येक वेळा पीटाळून लावून श्रीरामाच्या आयोध्येतील जन्मस्थानाचे रक्षण केल्याचा उल्लेख आहे. अफजलखान चढाई करून येत आहे अशा गुप्त अर्थाचे श्रीसमर्थ शिष्याकडून श्री शिवाजीछा पाठवले गेलेले पत्र प्रसिद्ध आहे. ‘ भक्त मंडळी भूमंडळी कोणे मोजिली ? एवढे म्हणूनच त्यावेळची शिष्यमंडळी मोकळी झाली. ‘

पहिले वे हरिकीर्तन दूसरें तें राजकारण | तिसरे तें सावधपण । सर्व विषयी ॥’ अशी ही समर्थांची उपदेशत्रयी आहे. ह्या त्रिवेणी संगमाने श्रीसमर्थ चरित्र एक मोठे पावन क्षेत्र झाले आहे. आधि केले मग सांगितले’ असा हा समर्थ चरित्राचा बाणा आहे. आपण करूनि दाखवावे तरीच दुसन्यास सांगावें । ठाकेना तरी रहावें । भलेसें आपुले ठायीं || ‘ असे श्रीसमर्थ सांगतात. ‘आधी तें करावे कर्म कर्म मार्गे उपासना || उपासका सापडे ज्ञान । ज्ञाने मोक्षचि पावणें ॥ असा कर्म-उपासना-ज्ञानपर असणारा ह्यांचा उपदेश वेदाच्या कर्म, उपासना ज्ञानवर असणान्या शिकांडाची आठवण करून देतो. ‘ जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें । सवंधावे करावें || अशी यांची पोटांत शिरून सांगण्याची साधी सर्व संग्रहरुपाची उपदेशपद्धती आहे.

श्रीसमर्थ सर्वांना सावध, साक्षेपी, दक्ष करू इच्छितात. श्रीसमर्थांचा प्रारुधवादापेक्षा प्रयत्न वादावर जास्त भर आहे. ! रेखा तितकी पुसोनि जाते। हे तो प्रत्ययास येतें । डोळे झाकणी करावे तें। काय निमित्त । भाग्यासी काय उणें रे । यस्तावाचून राहिले । केल्याने होत आहे रे । आधीं केलेच पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बरें । इत्यादि प्रयत्नवादाची वाक्य चांगली परिणामकारक आहेत, ‘ करील व्याप तो भला । । अवगुणासि बहुत भाग्य कावळा | नसेल व्याप तो हळ | पडेल रे पळू पळु ॥ हें सकळगुणापासी यती । सगुण भाग्यश्री भोगिती दरिद्रप्राप्ती । यदर्थी संदेह नाही ॥ घालोनि बकलेचा पवाड | व्हावें ब्रह्मांडाहूनी जाड । तेथे कैचे आणले द्वाड । करंटपण ।। व्याप बाटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी व होती । देखत देखतां ।। उत्कट भव्य तेचि घ्यावें । पिळमिळीत अवघेचि टाकावें । मिस्पृहपणे विख्यात व्हावें || भूमंडळी | कीर्ति करून नाहीं गेले । ते उगीच आले गेले । शहाणे होऊन भुलले । काय सांगावे ।’ बाणखी काही उपदेशामृताचे पान करू या । अभ्यास वाढवावा । इहलोक पपत्रीचा । जाणते नेणते बाजी । शच।वें बहुतांपरी ।। कर्करों भुंकती श्वानें । तैसें वाक्य करूं नये । सर्वाशीं मृदु बोलावें । चालावें सर्व मान्यसें । गुण देखोनि लोधावे । वेधावें उत्तम गुणा ॥ जयाचें त्या रिती जाणें । धन्यतो जाणता गुणीं । अर्थ पुष्ट बरें गाणें । नाचणे समजुनिया | उगेचि मुंकणें खोटे ॥ गधडे भुंकती जसे । उमजणें समजणें थाधी । प्रवृत्ती निवृत्तीकडे | भाग्यश्री मोक्षश्री होते । विव विदरती । पुढें । अर्थ सर्वत्र शोधावा । रोधावा अापला मनु | लोक सर्वत्र बोधावा । यथातथ्य प्रचीतिने । ‘ श्रीसमर्थांची एकं कारावर मोठी करडी नजर होती. एकंकार गोलंकार करूचि नये’ असे त्यांचे निक्षून सांगणे आहे. भेदाभेद।ची दृष्टी कशी राखावी याबद्दल खालील निरूपण पाहू. भेदाभेद क्रिया देही । लावली हें सुटेचिना । जेथील विषयो तेथे विपरीत करितां नये ॥ समान देखणे आत्मा । समान करणे दया। धनिय विचारावें हैं मुख्य जाणती कळा | पुरुषानी श्री समर्थकथित लक्षणे योडीशी पाहू

* सांगणे नितान्यायाचे मानावे बहुतांपरो । सर्वमान्य तो शाखा प्रत्यये बोलतो खरें | न्यायअन्याय तो जाणे अन्याय न करी] कदा ॥ नीतिन्याय मिळो जाण । हो नि तो लोकसंग्रही अंतरें निवळं जाणे जाणे जया तथा परी घावे अंडरे लोका । बाह्यत्कारें घरेचिना ॥ कर्म उपासना राखे। नित्यानित्य विचारणा प्रबोध छावळा लोकीं । नेमस्त सुटका घडे ॥ पादनु तोचि तो एक बहु लोकासि सोडवी || * श्रीसमर्याची ज्ञानावरील निष्ठा पहा ।’ निंदु नको शास्त्र बिंदु नको वेद स्वानंद पावशील || श्रीसमर्थांचे ज्ञान व ब्रह्मज्ञान ह्या संबंधी काही निरूपण वधु | स्वरूपी आसक्ती याचे नव भक्ति | पहाठा विभक्ति । जेथे नाहीं । देहबुद्धीचे बज्ञान तथा नविज्ञान बोलिजे है || एकरूप झाले मक्ति आणि ज्ञान। बेराग्यही जाण एकरूप | बोलोनियां मुखे तैसी क्रिया करी । धन्य तो संसारी ब्रह्मज्ञानी । ब्रह्मज्ञानी मला वर्तणु केपासी । कोरड्या शब्दाशी कोष पुसें । कोण पुसे बापा ज्ञान हैं शाब्दिक क्रिया अमोलिक सत्य जाणा ॥

पापरूपी नर जाणावा साचार । करी एककार शब्दज्ञाने || सगुणाची सोय सांडू नये कदा। तिर्थक्षेत्रे सदा आवडावी ।। आचरावे कर्म ज्याचा जो स्वधर्म आणि नित्यनेम साधनाचा ॥

प्रत्यक्ष, प्रबोध, प्रयत्न ह्या त्रयीत श्रीसमर्थ चरिशचे अखिल श्रीसमर्थ ग्रंथ भांडाराचे सार उतरते. त्रयोदशाक्षरी श्रीराममंचाचे अनुष्ठान स्वतः करून श्रीसमर्थांनी अलोट सामर्थ्य मिळविले व चोखाळलेला आपला मार्ग इतरांनाही घालून दिला. त्यांच्या उपदेशाच्या काही ओव्या येथे देत आहे.

आताहि जयास वाटे भेटावें । रामे मज सोमाळित जावें । ऐसे दृढ घेतलें जीवें । तरी ऐका भीं सांगेन || श्रीराम जय राम जय जय राम । ऐसा काही करूनियांनेम । जप की जे तेणे आत्माराम । जोडेले नियमे ॥ “

एकवीस समासीमधील समास पंधरामधील ३६ व ३८ व्या ह्या बोव्या आहेत. मुळातून संपूर्ण समास वाचकांनी वाचावा.

श्रीसमर्थांनी आपल्या श्रीराम उपासने विषयी आपला अनुभव सांगितलेला चाहे तो पाहू

आमुचें कुळीं रघुनाथ | रघुनाथे आमचा परमार्थ । जो समर्थांचाहि समर्थ | देवा सोडवितां । त्याचे आम्ही सेवक जन । सेवे करितां झालें ज्ञान । तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल कीं । करी दुर्जनांचा संहार भक्तजनासी आधार ऐसा हा तो चमत्कार | रोकडा चाले | मनीं धरावें ते होते । विघ्न अवघेचि नासोन जातें । कृपा केळिया रघुनाथें । प्रचित येते ॥ रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्त्व बाढले । म्हणोनियां तुवां केले पाहिजे आधी ॥ एवढे सांगूनही पटलेल्यास श्रीसमर्थ काय सांगतात ते पाहू! हे तो आहे सप्रचित | वाणि तुज वाटेना प्रचित साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥ ‘ ज्ञान झाल्यावरही उपासना चालवावी असे श्रीसमर्थांचे सांगणे आहे. ‘निर्गुणी ज्ञान झाले । म्हणोनि सगुण अलक्ष्य केले वरी ते ज्ञातें नायविले । दोहींकडे || नाही प्रक्ति नाही ज्ञान मध्येचि पैसावळा अभियान । म्हणोनियां जपध्यान | सांडुचि नये ।। साँडिले सगुण भजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी । म्हणोनिया सगुण भजनासी । सांडूचि नये ॥

निष्काम भजनाचे महत्त्व श्रीसमर्थांच्या मुखातूनच ऐकून

घेऊ या । कामनेचे फळ हे निष्काम भजने अपवंत जोड फळ भगवंता कोणीकडे । महदांतर ॥ नाना फळे देवादाशी । आणि फळ अंतरी भगवंताशी । या कारण भगवंतासी । निष्काम भजावें । भक्तें जे मनी धरावें । तें देवें आपणचि करावें । जेथे वेगळे भावाने न लगे कदा || सक्त भगवंताचे ऐक्य म्हणजे त्या भक्ताच्या ठिकाणी केवढे सामध्ये येते ते सामर्थ्य एक होता काळासी नाटोपे सर्वथा । तेथें इतराची कोण कथा । कीटकन्यायें | भगवंतांचे सख्य इसे लाभेल याची चिंता सर्वांनाच बसते. श्रीसमर्थ ह्याला कोणता सांगतात ते पाहू. पहा | उपाय

‘ देवास जयाची प्रीति । आपण वर्ताव तेणेंचि रीती । तेणे गुणे भगवंती । सख्य घडे नेमस्त || सायुज्यमुक्तीचें निरूपण व अभेद मक्तीचे क्षण आपण श्रीसमर्थाकडूनच समजाऊन घेऊ. जात्मनिवेदनाचे अंती । जे कां घडली अभेद भक्ती | ये नाम सायुज्य मुक्ती । सत्य जाणावी || निर्गुणी जन्य असतां । तेणें होये सायुज्यता । सायुज्यतां म्हणजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ आत्मनिवेदनाउपरी ॥ निखळ वस्तु निरंतरी । आपण आत्मा अंतरी । बोध झाला ॥ त्या ब्रह्मबोधे ब्रह्मचि झाला । संसार खेद तो उडाळा । देहोशाब्धी टाकिला सावकाश

नर देहाचे महत्त्व, त्याची सार्थकता व पुनर्जन्मशहित्य ह्या विषयी श्रीसमर्थांनीच एकाच ओवीस सर्व काही सांगितले आहे. ती ओवी पाहू या । बहुताजन्माचे अंती । होय नवदेहाची प्राप्ती । येथे न होता थाने सद्गति । गर्भवास चुकेना ||

ज्ञानाळाच समर्थांनी उपासना म्हटले आहे. ‘उपासना म्हणजे ज्ञान । ज्ञाने पाविजे निरंजन | योषियांचे येणें रीती ॥

श्रीसद्गुरूंची आवश्यकता व त्यांची महिमा कशी आहे ते पहा ! सद्गुरुतीण ज्ञान कांही । सर्वथा होणार नाहीं । अज्ञान प्राणी प्रवाह चाहतच गेले || असो जयासी मोक्ष व्हावा । तेणें सद्गुरु करावा । सद्गुरुवीण मोक्ष पावावा । है कल्पांति न घडे ॥”

श्रीसमर्थाचे श्रीराम सद्गुरु होत. श्रीसमर्थांचा गुरु संप्रदाय आहे. श्रीसमर्थ संप्रदायात गुरुभक्तीलाच अग्रस्थान आहे. तें  गणेश शारदा सद्गुरु संत महंत मुनेश्वरूं । सर्वहि माझा उणें दासासी ॥ रघुवीरूं । सद्गुरुरूपें ।। साह्य आम्हासीं हनुमंत | आराध्यदेव श्री रघुनाथ । श्रीगुरु श्रीराम समर्थ काय आमुचा तो देव । एक गुरुराव । द्वैताचा तो ठाव । नाही जेथें ॥ गुरुने व्यापिले स्थिर आणि चर | पहा निर्विकार कोंदलासें ।। रामरामदास उभा तथा ठायी । माझे रामाबाई निराकार || इत्यादि वाक्यावरून स्पष्ट होते.

निरूपणाचेनि विचारे । क्रियाशुद्ध निर्धार पाविजे पद || परमार्थाचे जन्मस्थान । तेंचि सद्गुरु भजन । सद्गुरुभजने समाधान | म्हणोनि सद्गुरुभजन | जयास घडे तोचि अकस्मात वाणे ॥ धन्य । सद्गुरुवीण समाधान । आणीक नाही || सरली शब्दाची खटपट | ग्रंथाचा शेवट येथ सांगितले स्पष्ट । सद्गुरु भजन || ‘

गुरु भजनाचे नि आधारें |

श्रीसमर्थांचा स्वरूपसंप्रदाय होय. श्रीरामदास्य इलाध्यवाणे होते तें श्री समर्थांचींच कळविले आहे. ‘ काया वाचा आणि मनें । यथार्थ शमी मिळणें । तरीच श्लाघ्यवाणें । रामदास्य || काम क्रोध खंडणें । मद मत्सर दंडणें । तरीच रळाध्यवाणें । रामदास्य || परस्त्री नपुंसक होणें । परद्रव्य न पोसणें । तरीच इलाध्यवाणें । रामदास्य ।। जैसे मूर्ख बोलणें । तैसी क्रिया करणे |

तरीच श्लाघ्यवाणें । रामदास्य || माया निवर्तक ज्ञानें । शेयचि दें होणें । तरीच इलाध्यवाणें । रामदास्य | रामदास निर्गुणसुख । तरीच म्हणे । इलाध्यवाणें । रामदास्य || ‘ श्रीसमर्थांच्या विधानाप्रमाणे आम्हा सर्वांचे रामदास्य पूर्ण सफल होवो अशी मी बीसमर्थ चरणी प्रार्थना करतो.

ज्ञानाचे महत्त्व श्रीसमर्थांच्या मुखातूनच ऐकू. ‘नामा नाना दानें । नाना योग तीर्थाटनें । सर्वाहून कोटीगुणें । महिमा आत्मज्ञानाचा । ह्या ज्ञानमार्गाचा सर्वांनाच अधिकार आहे.  उंचवीच नाहीं परी । शयारंका एकचि सरी । झाला अथवा नारी । एकचि पद || श्रीसमर्थांनी केलेला युक्तिवाद कसा बाहे पुरुष आत्मज्ञान ठसण्याकरता पाहू ! पदार्थ आटती । आपणहि बुरे तत्त्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता | मुळीच आहे ॥ सृष्टीची नाही वार्ता तिथे मुळीच ऐक्यता | पिंड ब्रह्मांड पाहो जाता । दिसेल कैचे । ‘

श्रीसमर्थांचे अजातवादाच्या उच्च प्रतीचे तत्त्वज्ञान आहे. खालील बाक्यावरून स्पष्टपणे कळून येते. ‘ मिथ्या शब्दें कांहींच नाहीं । तेथें केले कोणी काई । करणें निर्गुणाच्या ठायी । हे ही अघटित ॥ एक परब्रह्म संचले । कदापि नाहीं विकारलें । त्यावेगळे घासलें । ते भ्रमरूप || भ्रमरूप विश्वस्वभावें । तेथे काय म्हप्पोनि सांगावें । निर्गुण ब्रह्मावेगळे आवधे । श्रमरूप ।। अरें जे झालेचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई ॥ वस्तु आपण एक । कैसी असती वेगळीक | तरी अनुभवाचा विवेक । बोलो येता सुखे । हे न बोलतां चि विवरिजे । विदरोन विरोन शहिजे । मग अबोलणेंचि साजे । तया महापुरुषाशी || बापण वस्तु मुळी एक। जैसा ज्ञानाचा विवेक । एथोनिया ज्ञान दशक | पूर्ण झाला ॥

श्रीसमथाँचा अंतिम संदेश पाहून एवढा लविलेळा लेख पूर्ण करू.’ माझी काया गेली खरें । परी मी आहे जगदाधारें । ऐका स्वहित उत्तरें । सांगेन ती । नका करूं खटपट । पाहा माझा ग्रंथ वीट || तेणे सायुज्याची वाट । ठायी पडे ॥ रहा देहाच्या विसरें । वर्तू नका वाईट वरे । तेणें सायुज्यवेचि द्वारें । चोजविती तुम्हांसी || रामोदामदास म्हणे | सदा स्वरूपी अनुसंधान । करा श्रीरामाचे ध्यान । अखंडित । ‘

‘ सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ॥ सर्वे भद्राणि पश्यन्तु माकश्चिदुःखमाप्नुयात् ।

home-last-sec-img