Literature

श्रीसमर्थाचे मार्गदर्शन

श्रीसमर्थांनी श्रीरामचरिताचाच आदर्श ठेऊन ‘ श्रीदासबोधांत अनेक ठिकाणी कोठें विधिमुखानें तर कोठें निषेधमुखानें मार्गदर्शन केले आहे. प्रथम दशकांच्या ५ व्या समासांत सज्जनांची लक्षणे दिली आहेत.

संत आनंदाचें स्थळ | संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥ संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र । नातरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥ या दोन ओग्या श्रीरामाच्या आतां पर्यंतच्या वर्णनाला कशा तंतोतंत जुळतात तें पाहा. मनुष्याच्या आदर्श जीवनाचें येथें उद्घाटन आहे. पुढच्या ६ व्या समासांत सुद्धां आदर्श गुणाचे चित्र रेखाटलें आहे, आदर्श सज्जनांची ओळख पटविली आहे. हृदयीं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे । साहित्य बोलतां जैसे। भासती देवगुरु ॥ ६ ॥ जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टीसमोर | ब्रह्मांड नये ॥७॥ जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥ पुढच्या ७ व्या समासांत कवि वर्णनाच्या मिषानें आदर्श व्यक्तीचा ठसा लागोपाठच पुन्हां उमटविला आहे. अध्यात्मग्रंथांची खाणी । की हे बोलके चिंतामणी । नाना कामधेनूची दुभणी । वोळली श्रोतयांसी ॥ ५ ॥ कीं हे निरंजनाची खूण | की हे निर्गुणाची ओळखण । मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवि ॥ ८ ॥ कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो । कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११ ॥ ८ व्या समासांत सभासदांच्या निमित्तानें पुन्हां याचीच पुनरावृत्ति आहे. त्यांतीलहि कांहीं ओव्या बधूं. परमेश्वराचे गुणानुबाद । नाना निरूपणाचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें ॥ ५ ॥ कर्मशीळ आचारशीळ । दानशीळ धर्मशील । शुचिष्मंत पुण्यशीळ अंतर शुद्ध कृपाळु ॥८॥ भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळीचें ज्ञान । बहुश्रुत निरभिमान निरापेक्षी ॥ २८ ॥ शांति क्षमा दयाशीळ । पवित्र आणि सत्वशीळ । अंतरशुद्ध ज्ञानशीळ । ईश्वरी पुरुष ॥ १९॥ यांत काय नाही सर्व कांहीं आलें. श्रीरामाचेच हे सूत्रमय वर्णन झाले. यावरून अभ्यासावयाच्या लक्षणांचीहि दिशा उमगते

२ या दशकांतल्या प्रथम समासांत वंदून सद्गुरु चरण । करून रघुनाथ स्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण | बोलिजेल ॥ उपक्रम केला आहे. मूर्खलक्षण ( स. १), कुविद्या लक्षण (३) रजस्तमोगुणांचे लक्षण (५–६ ), पढतमूर्खाचें लक्षण (१०) हे सर्व समस जाणून या अवगुणांचा त्याग करावयाचा व याविरुद्ध सद्गुणांचा अभ्यास करावयाचा हा बडा येथे मिळतो. १८ व्या दशकाच्या ५ व्या समासांत व १९ व्या दशकाच्या ३ या समासांत करंटेपणाची लक्षणे कोणती ती जाणून त्यागण्याकरितां श्रीसमर्थांनी दिली आहेत. हा सर्व निषेधमुखाचा उपदेश आहे.

home-last-sec-img