Literature

श्रीसमर्थ चरित्राचे समालोचन

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान || कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा|

आज समर्थांच्या चरित्राचे थोडक्यात समालोचन करण्याचा प्रयत्न करू या. एका दिवसात संपूर्ण समर्थ चरित्राचे समालोचन करणे म्हणजे टिटविने समुद्र आटविण्यासारखेच ठरणार थोडेसे अमृत मरणापासून मुक्त करून अमरत्व देते त्याचप्रमाणे थोड्याशा वेळात केलेल्या समालोचनाने गुरुसेवा घडून, गुरुचरित्र समजावून घेवून, गुरुभक्ती वाढवून, चित्तशुद्धी करून, मोक्ष आणि सर्व प्रकारची सद्गुरुकृपा प्राप्त होईल यात तिळमात्र शंका नाही, ह्या दृष्टीने आपणात असलेली मक्ती, प्रेम यांच्या द्वारे गुरु चरित्राचे पवित्र श्रवण एकाग्रतेने करणे आवश्यक आहे.

ब्रह्म – क्षात्र- संपत्ती

समर्थांचा अवतार धर्म स्थापनेसाठीच झाला होता यात कोणतीच शंका नाही. घर्मस्थापनेकरिता असले पाहिजे. त्याशिवाय धर्मरक्षण किंवा राज्यशासन हातात धर्मोद्धार करणे अशक्य आहे. सुरवातीला ब्रह्मनिष्ठ संत आपला शिष्य असणान्या राजाला बोध करून व आपल्या ज्ञानयोग बळाने प्राप्त करून घेतलेल्या असामान्य सामर्थ्याच्या योगाने धर्मोद्धार करीत असत. ब्राह्मणांची अलौकिक संपत्ती व क्षत्रीयांची लौकिक संपत्ती ह्या दोन्ही एकत्र आल्याशिवाय धर्मोद्धार होणे शक्य नाही. इतिहासा दरूनही हेच सिद्ध होते. प्रभु रामचंद्राचे वसिष्ठ हे गुरु होते. श्रीकृष्णानाही गुरु होते व जनक राजालाही गुरु होते. अलिकडील ऐतिहासिक उदाहरणेही तेच दर्शवितात. ‘ गुरुबिन कौन बताये बाट ! ‘ सर्व प्रसिद्ध राजांना गुरु होतेच. विजयनगर साम्राज्य स्थापक हुवक-बुक्कांचे गुरु विद्यारण्य होते. त्यापूर्वी श्रीशंकराचार्यांच्या कालीही अशीच उदाहरणे आढळतात. बरेच राजे राजवाडे शंकराचार्यांचे शिष्य होते. श्रीशंकराचार्याकडून तत्वबोध प्राप्त करून घेऊन पुष्कळसे राजे धर्मसंस्थापनेत मग्न असत. त्याचप्रमाणे श्रीशिवाजी महाराजांचे गुरुही श्री समर्थ रामदास होत.

स्वप्नात श्रीसमर्थ दर्शन

चाफळ येथे मठ स्थापन केल्याची माहिती व वर्णन मी तुम्हास सांगितली आहे. तेथूनच श्रीसमर्थांनी जयदोद्धार कार्य

केले. मठात श्रीरामप्रभूंची स्थापना केली. भजन कीर्तने सुरू झाली. शिष्य संप्रदायही वाढू लागला. चाफळ हे गाव सातार्यापासून अंदाजे २५ मैल दूर आहे. श्रीशिवाजी महाराज साताऱ्यास होते.आतापावेतो श्रीशिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या दर्शनास आले नव्हते. आपल्या समजुतीप्रमाणे स्वतंत्र राज्य स्थापनेच्या प्रयत्नात ते होते.. आणि किल्लेही त्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते.

एके दिवशी श्रीशिवाजी महाराजांच्या स्वप्नात येऊन समर्थ ! बाळ, मी तुझ्यासाठीच आलो आहे. तुझ्याकडून राज्य स्थापना व त्यांचे रक्षण व्हावे यासाठीच माझा अवतार आहे. जवळ असूनही तू माझे दर्शन घेतले नाहीस. अजूनही माझ्याकडे येऊन माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलास तर सर्व काही साध्य होईल. हा घे प्रसाद ! ‘ असे म्हणून हातात प्रसाद देऊन आपले नाव सांगून अनुग्रह केला व अदृश्य झाले. नंतर स्वप्नातील गोष्ट ठेवून श्रीशिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना लक्षात ” आपल्या राज्यात ‘ रामदास’ ह्या नावाचे कोणी महात्मे आहेत काय ? असा प्रश्न केला. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. मंत्रीगणापैकी वरेचसे लोक त्यांचे शिष्यही झाले होते. त्यामुळे श्रीशिवाजी महाराजांनी विचारल्यावरोवर आनंदाने समर्थांची सर्व माहिती सांगून ‘मानवी प्रयत्नास दैवी सामर्थ्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांचे दर्शन घेणे आपले कर्तव्य होय. त्यांचा अनुग्रह आपणास झाल्यास आपल्या इष्ट कार्यास मदतच होईल. असे म्हणाले. त्यांचे म्हणणे श्रीशिवाजी महाराजांना पटून ते श्रीसमर्थ दर्शनास निघाले. चाफळपासून एक मैल अंतरावर श्रीमारुती मंदिर खाहे तेथे श्रीसमर्थांची व श्रीशिवाजी महाराजांची भेट श्री शिवाजी महाराजांचा अधिकार, त्यांचे ध्येय, झाली. त्यांचा धर्माभिमान इ. पाहून श्रीसमर्थांना फारच आनंद झाला. त्यांचा विनय, गांभीर्य, सत्यशीलता, स्वार्थत्यास इ. गुण पाहून श्रीसमर्थांना अत्यंत आनंद वाटला. सद्गुण पाहून त्यांच्यावर अनुग्रह करणे कोणास आवडणार नाही ? श्रीसमर्थांचे दिव्य तेज, शब्दमाधुर्य, त्यांच्या केवळ दर्शनाचेच मनावर परिणाम करणारे उन्नत तपोबल इत्यादि पाहताक्षणीच श्री शिवाजी महाराजांच्या मनात समर्थांविषयी पूज्यघाव निर्माण झाला. त्यांचे अलौकिक सामर्थ्य ही त्यांच्या ध्यानी आले. आपणास हेच गुरु योग्य होत अशी खूणगाठ बांधून त्यांच्या चरणी अनुग्रहासाठी प्रार्थना केली. हा सत्पात्र पुरुष असून राज्यस्थापना करील हे ज्ञानदृष्टीने ताडून मंत्रोपदेश करून समर्थांनी शिवाजी महाराजांवर अनुग्रह केला.

व्यवहार व तत्त्वज्ञानाची सांगड

तत्त्वज्ञानाशिवाय सामर्थ्य प्राप्त होत नाही व कार्यसिद्धीही होत नाही. यश प्राप्ती होत नाही. तसेच कितीही विद्या, वैभव, असले तरी जोपर्यंत निरहंकार वृत्ती नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. ज्या मनुष्यात समत्व रुजले आहे त्यालाच खरे सामर्थ्य प्राप्त होते. सद्विद्या, बुद्धी चातुर्य, दक्षता, धैर्य, सावधानता हे सर्वगुण एकत्र आल्याशिवाय जगदोद्वार होणे शक्य नाही. त्याखेरीज राज्यस्थापनेसारखा दुर्गम विचार सहजासहजी पूर्ण होत नाही. अर्जुनाला जे यश मिळाले त्याचा विचार करता तत्त्वज्ञानाच्या उपदेशामुळेच ते मिळाले असेच म्हणावे लागेल. युद्ध काळात अर्जुनास तत्त्वज्ञानाची आवश्यकता भासली. भीष्म द्रोणांच्या उदाहरणावरून परमात्मभक्तीबरोबर तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे असे लक्षात येते. निष्ठा, भक्ती, इत्यादींच्या जोडीस तत्त्वज्ञानाची नितांत आवश्यकता आहे म्हणूनच श्रीसमर्थांनी शिवाजी महाराजांना तत्त्वज्ञान व राजधर्म या दोन्हीची दीक्षा दिली. अत्यंत उत्साहाने पाद्यपूजादि कार्यक्रम पार पडले. सोन्याच्या मोहरांनी अभिषेक केला. त्या सर्व गुरु प्रसाद म्हणून सर्वांना मिळाव्या या भावनेने श्रीसमर्थांनी त्या बारी बाजूस फेकल्या. अजूनही ती नाणी काही ना काही अद्याप सापडतात; श्री शिवाजीराजे श्रीसमर्थांचे पट्टशिष्य होते. श्री शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर समर्थांनी कोणतेही कार्य पुढे केले नाही. कारण त्यांचा अवतार श्रीशिवाजी महाराजा पुरताच मुख्यत्वे होता असे त्यांचेच तोंडून उघड झाले आहे. शिवाजीनंतर एका वर्षातच श्रीसमर्थांचे कार्य संपले. श्रीशिवाजी हा त्यांचा उजवा हात होता. घोसमर्थांनी आपल्या संकल्पाप्रमाणे त्या घोश परिस्थितीत भारतात म्लेंच्छांचे संपूर्णपणे वर्चस्व असूनही आपल्या उज्वलतेने आपले इष्ट कार्य साधले. यं यं मनसा संवि भाति ! ह्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जी इच्छा निर्माण होते ती आपल्या सामर्थ्याने पूर्ण करण्याचे ज्ञानी लोकांमध्ये ‘संकल्प सिद्धी सामर्थ्य ‘ असते. म्हणूनच श्रीसमर्थांनी आपल्या संकल्पा नुसार राज्य व धर्म स्थापना योग्यप्रकारे केली. त्यासंबंधात आज थोडक्यात समालोचन करू या !

म्लेच्छांचा छळ

अत्यंत विस्ताराने असलेले श्रीसमर्थांचे दिव्य चरित्र व त्यावरून दिसणारे दिव्य गुणांचे मूर्तस्वरूप थोडेसे तरी लक्ष्यात आहे. ह्यावरून त्यांच्या चरित्रदर्शनाने प्राप्त होणारे ‘ अभ्युदय निःश्रेयस’ सर्वांना मिळावे अशी माझी इच्छा आहे. श्रीसमर्थांनी त्याकाळी म्लेंच्छांना कसे वठणीवर आणले ते एक दोन उदाहरणांनी पाहू या! त्यांनी योगसामर्थ्याने मदांध म्लेंच्छांना वठणीवर आणले. सांगली जिल्ह्यात मिरज ह्या नावाचे गाव आहे. तेथे जयरामस्वामींची कथा चालू होती. त्यावेळी सर्वत्र म्लेंच्छांचे राज्य होते. आणि त्यांनी ठिकठिकाणी सुभेदार नेमले होते. मिरजेलाही दिलेरखान नावाचा सुभेदार होता. तो मध्यान्हरात्री गस्त घालण्यासाठी गावात हिंडत असे. साधारणत: पोलीस रात्रो गस्त घालण्याचे काम करतात. त्यावेळी एखादा चोर सापडल्यास त्याला पकडून ठाण्यावर हजर करतात. काही वेळा गावाच्या संरक्षणासाठी वरिष्ठ अधिकारीही जास्त काळजी घेण्याच्या दृष्टीने गस्त घालतात, त्याप्रमाणे हा सुभेदार रस्त घालण्यास निवाला असता त्यास कीर्तनाचा आवाज ऐकू आला. त्याने कुतुहलाने कीर्तनाच्या ठिकाणी येऊन दृश्य पाहिले. भगवत् संकीर्तनात भक्तीमुळे देहभान विसरून मग्न झालेले जयरामस्वामी व भक्तपण पाहून त्याला आश्चर्य वाटले. चकीत होऊन हा काय सांगतोय ? ‘ हे ऐकण्यासाठी उत्सुक होऊन कान देऊन ऐकत तो उभा राहिला. त्यावेळी जयरामस्वामी एकाग्रचिताने वर्णन करीत कीर्तनात दंग झाले होते. ‘ साधूसंतांनी जो मार्ग अवलं बिलातोच मार्ग आपण चोखाळल्यास आपणास निश्चितपणे परमात्म्याची प्राप्ती होईल. श्रीरामचंद्राचे दर्शन होईल. साधू संतच परमात्म्याचे दर्शन घडवून आणतील.’ हे वाक्य सुभेदाराच्या कानावर पडताच ते त्याने आपल्या नोंदवहीत लिहून ठेविले. खरे पाहिले तर तो तेथे त्रास देण्याच्या उद्देशानेच आला होता. तेथून तो तडक आपल्या घरी आला. रात्री त्याला झोपही आली नाही. उजाडल्याबरोबर त्या कीर्तनकारास बोलावून विचारतो, ‘ तुझे हे वचन खरे आहे की खोटे आहे. याची परीक्षा करून ते खोटे ठरले तर त्याला योग्य अशीच कडक शिक्षा करीन आणि जर त्याचे सामर्थ्य दृष्टोत्पत्तीस न आले तर त्यास धर्मांतर करावयास लावीन.’ असा विचार करता करताच रात्र संपून उजाडले. ताबडतोब शिपायास बोलावून, पालखी पाठवून जयरामस्वामींना बोलावणे पाठविले. जयरामस्वामींचे अजून स्नानही झाले नव्हते. समोरून येणारी पालखी त्यांनी पाहिली. तेव्हा म्लेंच्छ काहीतरी बाईट हेतूने हे सर्व करीत त्यांच्या ध्यानी आले. सज्जनपणाचा आव आणून युक्तीने आपले आहे असे कार्य साधणाच्या मूर्खाची ओळख त्यांना पूर्वीपासूनच होती. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यास आपले नुकसान होईल हेही ते जाणत होते. ‘ मुहमें राम और बगल में छूश ! ‘ ही म्हण सर्व दुष्टांना शोभण्यासारखीच आहे. तरीही जयरामस्वामींनी थोडा विचार केला. ‘ गेले तर कठीण न गेले तरी कठीण’ असे म्हणून श्रीसमर्थांचे ध्यान करीत करीत पालखीतून ते निघाले. सुभेदार दरवाजातच त्यांची वाट पहात उभा होता. त्यांना पाहिल्याबरोबर हस्तांदोलन करून शिष्याप्रमाणे वागून त्यांना सिंहासनावर बसविले. ‘ स्वामो माझ्या सुदैवानेच मी आपले कीर्तन ऐकले. पण मला पाहिजे तेवढा वेळ नव्हता. कानावर आलेले एकच वाक्य जसेच्या तसे लिहून घेऊन त्याचा खुलासा आपणाकडून करून घेण्यासाठी मी आपणास बोलावणे पाठविले. संतमहंताच्या मार्गाने त्याचे अनुकरण करून जाणान्यांना श्रीराम प्रभु प्रत्यक्ष दर्शन देतात असे जे म्हटलेत त्याचा अनुभव मला यावा अशी उत्कट इच्छा आहे. माझ्यावर अनुग्रह करून आपले म्हणणे खरे करून दाखवावे. कदाचित ते वाक्य खरे ठरले नाही तर आपण काही तरी खोटे नाटे सांगून समाज भुलवीत आहात म्हणून घोर अपराधी ठरून आपणास शिक्षा करणे हे आमचे कर्तव्यच ठरेल. इतकेच नव्हे तर ज्या धर्मात अशारीतीने निष्प्रयोजक मार्गदर्शन आहे, तो धर्म जनतेला हितकर नाही म्हणून सर्वांना माझ्या धर्माची दीक्षा द्यावी लागेल, तरी आपण आपले वचन खरे करून दाखवून मजवर अनुग्रह करावा’ अशी हात जोडून विनंती केली. त्यावेळी जयरामस्वामींनी थोडासा विचार करून श्रीसमर्थांना बोलावणे पाठविले. त्यांच्या गोपाळ’ नावाच्या शिष्याने ही सर्व हकीगत समर्थांना जाऊन सांगितली. तत्क्षणीच श्रीसमर्थ तेथून अदृश्य होऊन मिरजेच्या सुभेदार वाढचा तच प्रगट झाले आणि म्हणाले, ‘ जयराम ! हे काय ! तू येथे कशासाठी आलास ? ‘ जयनामस्वामींनी झालेली सर्व हकीगत सांगून पुढे काय करावयाचे यासाठी समर्थांच्या पायावर लोटांगण घातले. समर्थ हसून ‘एवढेच’ सज्जनांचा शब्द केव्हाही खोटा होणार नाही. तू जे सांगितलेस ते खरे आहे’ असे म्हणून सुभेदारास उद्देशून ‘ खानसाहेब, आमच्या मार्गाने आपण येणार ना ? ‘ असे म्हणताच तो ‘हो,’ बसे म्हणाला. ‘ तर चला’ असे म्हणून ते पुढे निघाले. वाडयाच्या दिंडी दरवाज्यास एक भोक होते. त्यावेळी अशा सर्व दरवाज्यांना बंदुकीची गोळी झाडण्यासाठी अशी व्यवस्था होती. श्रीसमर्थ आपले शरीर सूक्ष्म करून छिद्रातून बाहेर पडले आणि तेथे उभे राहून ‘जयराम ये’ असे म्हणताच जयरामस्वामीही त्याच मार्गाने बाहेर पडले.  खानसादेव, आपणही माझ ऐकता ना | आपणही ह्या मार्गाने या ! असे श्रीसमर्थांनी सांगितले. त्याला बोलणेही मुश्कील झाले. भयभीत होऊन त्याच्या सर्वांगास थरकाप सुटला. ‘ हे आपणास भस्म करून टाकतील.’ ह्या कल्पनेने तो ‘स्वामी ! माझी चूक झाली. झापले अघटित सामर्थ्य माझ्या लक्षात आले नाही. मला क्षमा करा !!’ अशी याचना करू लागला. त्यावेळी त्याच्यावर अनुग्रह करून तेथे मठ स्थापून त्यावर वेणाताईस मुख्य नेमून समर्थ तेथून निघाले.

यवनांचे दडपण

श्रीसमर्थांसारखी सामर्थ्यवान माणसेच धर्मोद्धार करू शकतात. त्याकाळी काही गुंड लोक जनतेचा अमानुष छळ करीत

असत. हैदराबाद परगण्यात इंदुरबोधन नावाचा जिल्हा आहे. तेथील सुभेदाराने ब्राह्मणांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने काही फ र्माने काढली, ‘हे पहा ! पाऊस न पडल्याने रखरखीत वातावरण झाले आहे. आपल्या वेदामध्ये पर्जन्यसूक्त आहे असे मी ऐकतो. त्याचे अनुष्ठान करून पाऊस पडेल अशी व्यवस्था करा. पर्जन्य सुक्त वेदामध्ये असल्याने वेद, धर्म व तुम्ही ब्राह्मण लोक या सर्वांनी त्याचा खरेपणा पटविला पाहिजे यदा कदाचित हे खरे ठरले नाही तर लोकांना फसविणान्या तुम्हा लोकांना जिवंत ठेवण्याचे कारणच काय ? म्हणून तुम्हाला मी सांगतो की, पाऊस पडला नाही तर तुमची सर्वांची मुंडकी छाटली जातील’ असे एक फर्मान काढले. गरीब ब्राह्मण काय करणार ? एकंदरीत वैदिकांचे जीवनच मुळी कष्टमय असते. एकीकडे दारिद्र्य त्यामळे प्रपंच पुरा पाडणे कठीण हा सर्व कलीयुगाचा प्रभाव आहे. विशेष निष्ठा असल्याशिवाय काहीच होत नाही. निष्ठेने अनुवंशिक प्रपंच चालविणे एक तपश्चर्याच ठरते. अद्यापही ग्रहह्यांतीसाठी व आपल्यावरील आपत्ती नाहीशी करण्यासाठी सामान्यजन ब्राह्मणाकडे जातातच. समाजाची दुःखे नष्ट करण्याचे सामथ्र्यं असलेला वर्ग म्हणजेच ब्राह्मण वर्ग होय. त्यांचा द्वेष करून कोणाचे कधीच कल्याण होत नाही. परंतु जगात त्यांचा द्वेष करणारा वर्ग फार मोठ्या संख्येने आहे. हे योग्य नाही व श्रेयस्करही नाही.

सुभेदाराचे फर्मान ऐकलेल्या ब्राह्मणांनी तळघात उभे पाहून अन्न वज्यं करून पर्जन्यसूक्ताच्या जपास सुरुवात केली. काही चुकत नाही. अनुष्ठान करीत करीत मरण आले चालेल.’ या भावनेने जीवनाची आशा सोडून ते अनुष्ठानात मग्न झाले. त्यावेळी श्रीसमर्थही दररोज काही वेळ ध्यानस्थ बसून कोठे काही धर्म हानीचा प्रसंग ओढवला आहे काय ? विचार करून त्यांचे निवारण करीत असत. त्या दिवशी याचा प्रगट अनुष्ठानाचे दृश्य त्यांना दिसले ब्राह्मणंचे कष्ट पाहून त्यांच्या मनास फारच क्लेश झाले. व ते ताबडतोब त्या ठिकाणी येऊन झाले. तळयातील पाणी थंड, त्यात थंडीचे दिवस त्यामुळे सर्वांना कापरे भरून ते सर्व अस्वस्थ झाले. श्रीसमर्थांनी तेथे ‘घाबरू नका ‘वेदांमध्ये व ब्राह्मणात सामर्थ्य आहे यात कोणताच संदेह नाही. तुम्ही बाहेर या. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी त्यावर सांगितल्याप्रमाणे कबा. ‘ असे म्हणून त्या सर्वांना पाण्याबाहेर काढले. एका दगडावर श्रीमारुतीरायाचे चित्र काढून महारुद्राभिषेक करण्याची ब्राह्मणांना आज्ञा केली. महारुद्र प्रारंभ होऊन तो संपण्याच्या आतच आकाशात ढंग जमून सूर्य दिसेनासा झाला. आणि पुरेसा पाऊस पडून सर्व जमीन भिजली. त्यामुळे सुभेदाराचे मन द्रवले वेद, धर्म, ब्राह्मण यात सामर्थ्य आहे हे त्याच्या अनुभवास आले. मेण्यात बसून ब्राह्मणांच्या दर्शनास तो निघाला. आपल्या फर्मानाबद्दल क्षमा मागण्यासाठीच तो तेथे आला होता. पाऊस थांबताच अनुष्ठानही संपले होते. पाटपाणी करून सर्व ब्रह्मवृंद जेवणास वसले. कोणतेही सामान नसताना श्रीसमर्थांनी आपल्या तपोबळाने हे घडविले होते. जेवणानंतर आचमन करून ब्रह्मवृंद बसला असता सुभेदाय तेथे येऊन त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला आपले सामर्थ्य आज माझ्या अनुभवास आले. साक्षात परमेश्वराच्या मुखापासून ब्राह्मणांचा जन्म झाला. ही गोष्ट खरी आहे हे मला पटले. आता आपण सर्वजण पालखीत बसून नगरात चला. आपली मिरवणूक निघेल. पाऊस नसल्याने बाईट दिवस कंठीत असलेल्या ह्या देशास तुमच्यामुळे सुख प्राप्त झाले आहे. आपल्या सारख्यांच्या जन्मामुळे आम्ही कृतार्थ झालो. माझ्यावर दया करून आपण सर्वजण पालखीत वसा. माझ्या म्हणण्यास होकार देऊन माझी सेवा गोड करून घ्यावी.’ अशी त्याने हात जोडून प्रार्थना केली. त्यावेळी तेथे असलेल्या ब्रह्मवृंदाने श्रीसमर्थाकडे बोट दाखवून ‘ हे आमचे गुरु होत.’ असे म्हणाले. ‘वेदात सामर्थ्य असले तरीही अनुष्ठानात निष्ठा अवश्य असावी लागते. ती या महात्म्यात परिपूर्ण आहे. या गुरुमुळेच आजचा कार्यक्रम पूर्ण झाला. म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण करावे असेही ते म्हणाले. गुरूंच्या गौरवामुळे शिष्यांनाही अत्यानंद होत असतो. सुभेदाराने श्रीसमर्थांची मिरवणूक काढून त्याच्याकडून अनुग्रह घेतला. तेथे एक मठ स्थापन केला. अभिषेक संपल्यानंतर त्या दगडाची सुंदर अशी श्रीमारूतिरायाची मूर्ती तयार झाली. आणि त्याचे सुंदर असे मंदीर तयार करण्यात आले. आजही ती मूर्ती व मंदीर तेथे आहे.

अत्याचारास पायबंद

श्रीसमयं सज्जनगडी असता कोकणातील काही लोक तेथे आले. त्यांची ‘स्वामी, आमच्याकडे अमानुष छळ चालू आहे. त्या म्लेंच्छांना कोणीही बोलणारा नाही. ते आपल्या मनाप्रमाणे वागून अनाचार, अत्याचार व हिंसाचार त्यांनी सुरू केला आहे. ह्या सर्व गोष्टीमुळे आम्ही सर्व मरणार असे वाटू लागले आहे’ असे डोळ्यात आसवे आणून सांगितले. ते ऐकताच तत्क्षणी समर्थ अदृश्य होऊन कोकणात प्रष्ट झाले. तेथे एक भैरवाचे देऊळ होते. श्रीसमर्थ खूप रागावून हातात मोठा दगड घेवून एका भैरवासस उद्देशून ‘ हे देवा, जे लोक तुझी पूजा करतात ते संकटात असताना तू गप्प कसा ? वैवेद्य घेण्यास मात्र तू तयार असतो पण त्यांच्या सुखदुःखाकडे तुझे लक्ष नाही. त्यांचे रक्षण करण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. ‘ असे म्हणून तो दगड त्याच्य डोक्यावर ठेवला. त्यावेळी भैरवनाथ प्रगट झाले. त्यास समर्थ ‘ जा ! सुभेदाराकडे जाऊन त्याचे पोट दुखून तो गडवडा लोळेल असे कर आणि मी तीर्थ दिल्यानंतर त्याला सोडून दे.’ असे म्हणाले. ‘ठीक आहे तसेच करतो.’ असे म्हणून भैरवनाथ तेथून निघाले. सुभेदाराच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या त्यामुळे त्याचे वेदना वाढतच प्राण कासावीस होऊ लागले त्या वेदना कोणाही हकीम-वैद्यास नाहीशा करता आल्या नाहीत. प्रत्येक क्षणी होत्या. कमी होण्याची लक्षणे मुळीच दिसेनात. वेदना सहन न झाल्याने जो मला वाचवील त्याची मी आजन्म सेवा करीन’ असे तो म्हणाला. तेवढ्यात श्रीसमर्थ तेथे आले आणि झालंय ? इतके कण्हण्याचे कारण काय ? ‘ असा काय प्रश्न केला. त्यावर सुमेदार ‘ काय करू ? त्या व्याधीने पिडलो आहे. काय करावे ते सुचत नाही. आपल्या कृपेने जब मला बरे वाटले तर मी आपला दासानुदास होईन.’ असे दीनवाणीने काकुळती येऊन म्हणाला. ‘ठीक आहे’ असे म्हणून श्रीसमर्थांनी त्याला तीर्थ दिले. तीर्थ बेताच त्याचे पोट दुखण्याचे एकदम थांबले. त्यानंतर मात्र त्याने हिंदुधर्मियांचा छळ करण्याचे सोडून दिले. ‘ ब्राह्मणच माझे देव आहेत’ अशी कबुली दिली व धर्माप्रमाणे वागून नीति न्यायाने .मी वागेन ‘ असे श्रीसमर्थाना वचन दिले. तो श्रीसमर्थांचा शिष्यही बनला. अशा रोतीने त्याकाळी श्रीसमर्थ आपल्या अघटित साम र्थ्यांनी म्लेंच्छांना वठणीवर आणत.

मुसळाराम

श्रीसमर्थांच्या शिष्यातही काही विशेष सामर्थ्य होते. श्रीसमयीच्या आज्ञेनुसार वागून काही शिष्यांनी त्यांची कृपा संपादन केली होती. त्यापैकीच मुखळाराम नावाचा शिष्य होता. तो नेहमी खांद्यावर मुसळ घेऊन फिरत असे.

त्यामुळे त्यास हे नाव पडले होते. श्रीसमर्थांचे सर्वच शिष्य शरीराने सुदृढ होते. ते दररोज हजार पाचशे सूर्य नमस्कार घालीत. ते सर्व ब्रह्मचारीच होते. श्रीसमर्थांच्या शिष्याचे चित्र रेखाटावयाचे असेल तर एक लंगोटी, एक झोळी, हातात कुबडी असे रेखाटता येईल. मिळालेल्या मिक्षेने क्षुधानिवृती करून रात्रंदिवस धर्मजागृती करणे हे त्यांचे काम. एके दिवशी मुसळाराम एका ठिकाणी चालला असता काही यवंनांनी त्यांना घेरले. ‘ तू मुसलमान हो नाही तर आम्ही तुला सोडणार नाही. प्राणाची आशा असेल तर आमच्या म्हणण्यासारखे तुला दाबावे लागेल.’ असे निश्चयपूर्वक सांगून त्याला भीती दाखवू लागले. त्यावेळी तो म्हणाला, ठीक आहे. तुम्ही पुष्कळहण आहात. मी एकटा आहे. परंतु माझ्या सामर्थ्याची कल्पना तुम्हास नाही हे पहा ! तुम्ही सर्वजण एकत्र होऊन माझे हे मुसळ उचलून दाखवा, जर तुम्ही ते उचलून दाखविलेत तर मी तुमच्या धर्मात येईन. हे ऐकून ते सर्व मोठ्याने हसू लागले व हे हिंदु काय बावळट आहेत ? त्यांना काही अक्कलच नाही. हे पाहिलेस. आम्ही शेकडो लोक आहोत, आम्हास मुसळ उचलणे अशक्य आहे. काय ? काय हा याचा मूर्खपणा !’ असे म्हणत त्यांनी मुसळ हलविण्यास सुरुवात केली. पण ते मुसळ किंचितही हालले नाही. सीनशेपेक्षा जास्त लोकांनी त्यास दोर बांधून ओढण्याचा प्रयत्न केला पण ते मुखळ हलू शकले नाही. नंतर मुसळारामाने ते मुसळ सहजगत्या उचलून आपल्या खांद्यावर घेतले व म्हणाला, ‘ बोला आता ! तुम्ही हिंदु होता की मी मुसलमान झाले पाहिजे ? द्या उत्तर ।’ त्यावेळी ते मुसलमान ‘ तुम्हाला जिकडे जावयाचे तिकडे जा. आम्ही तुम्हाला अडवीत नाही’ असे म्हणाले.

चाफळ मठावर हल्ला

एके दिवशी मुसलमानांनी एकत्र येऊन चाफळच्या मठास वेढा दिला. या मठात खूप संपत्ती आहे असे त्यांना वाटले. ती संपत्ती आपणास मिळावी म्हणूनच त्यांनी हा वेढा दिला होता. मध्यान्हरात्री खूप अंधार होता अशावेळी त्यांनी गडवड करण्यास सुरुवात केली. कोठे काय आहे ? याचा शोध सुरू झाला. आजु बाजूच्या लोकांना धाक दाखवीत त्यांनी श्रीराममंदीरात प्रवेश केला. ती गडबड ऐकून कल्याणस्वामी पुढे आले व झाडाची एक जाड फांदी घेऊन तिने मठातच एक रेखा ओढली. चाललेली गडबड श्री समर्थांना माहित नव्हती. ओढलेली रेषा पाहून ‘ ही काय गंमत आहे !’ असे म्हणून काहीजण ती रेषा ओलांडून झाले ते बांधळे झाले. त्यांना काहीच दिसेना. ह्या गोष्टीवरून श्रीसमर्थांच्या शिष्यातही सामर्थ्य होते हे उघड होते.

अहंकार निरसन

आपल्या शिष्यामध्ये अहंकार उत्पन्न होऊ नये यासाठी श्रीसमर्थ अत्यंत खबरदारी घेत. एकदा श्रीशिवाजी महाराजांना अहंकार झाल्याचे त्यांच्या लक्षात बाले त्यावेळी ‘सामनगड ‘ हा किल्ला बांधला जात होता. तेथे लाखो लोक कामाला होते. शक्यतो लवकर काम आटोपण्यासाठी श्रीशिवाजी महाराज तेथे जास्त लक्ष देत होते. पहाटेस उठून मुखमार्जनादि आटोपून थोडेसे ध्यान करून नंतर स्नान करावयाचे. स्नानानंतर अनुष्ठान संपवून बाराशे नमस्कार घालन ते फराळ करीत व मग इतर उद्योगात लक्ष घालीत. अशा रीतीने आपला नित्यनियम संभाळून सूर्यो दयाच्या सुमारास ते सामनगडाकडे येत तेथील कामगार त्यांना पाहून कार्यरत होत. प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून

काम करीत असे. हे सर्व पाहून आपल्यास असे लोक मिळाले म्हणूनच आपण यशस्वी झालो असे म्हणून स्वतःच्या धन्यतेत श्री शिवाजी महाराज गढून गेले.पणे ज्याला सकाळची भ्रांत नाहे. या लोकांना कामावर लावून पोसणे अथक्य आहे. पण आपण लाखो लोकावर प्रभुत्व गाजवितो. ह्या सर्वांचा राजा मीच बाहे. अशी भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाली. तसे म्हटले तर हा काही दुराभिमान नव्हे, तरीसुद्धा अहंकार हा विषासमानच. कारण अहंकार वाढत जाऊन त्याप्रमाणे काहीतरी करीत गेल्यास मनुष्याचे अकल्याणच होते.

त्यावेळी श्रीसमर्थ सज्जनगडी होते. श्रीशिवाजीच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. हे त्यांच्या लक्षात आले व ते सामान गडावर प्रगट झाले. काय शिवबा ! कसे काय काम चाललय चल आपण ते पाहू बसे म्हणून श्रीसम शिववास बरोबर घेतले. इकडे तिकडे पहात ठिकठिकाणी सूचना देत श्री शिवबा पुढे चालले होते. एके ठिकाणी रस्त्याच्या मध्यावर एक मोठा दगड पडला होता. तो पाहून ‘ अरे शिवबा! असा मोठा दगड मध्ये असणे चांगले नाही. तो तावडतोब फोडला पाहिजे. त्यामुळे रस्ता मोकळा होईल.’ अशी श्रीसमर्थांनी सूचना केली. श्री शिवाजी महाराजांनी ‘ठीक’ असे म्हणून कामगारांना बोलावून तो दगड फोडावयास सांगितले. त्यावेळी एक आश्चर्य कारक घटना घडली. त्या दगडाच्या मध्यात एक खळगा असून न्यात पाणी होते व एक बेडकीही होती. दगडाचे दोन तुकडे झाल्यावरोवर बेडकीने उडी मारली. हे पाहून श्रीमती ” शिववा ! काय तुझे स्वामित्व ? काय तुझे प्रभुत्व ? लोकांचा तू राजा आहे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु या बेडकीसही तू संरक्षण दिलेत. मोठी गंमत आहे बुवा! यति ईश्वरच आहेस.’ असा विनोद केला.

श्रीसमर्थ आज असे का म्हणतात ? ह्याचा विचार करीत असता माझ्या अहंकारास हे उत्तर असले पाहिजे असे श्री शिवाजी महाराजांच्या ध्यानात येऊन ‘स्वामी, आपण भक्ताभिमानी बाहात. भक्तांची अवनती होऊ नये, त्यांची धारंभिलेल्या कार्यात विघ्न उत्पन्न होऊ नये म्हणून अति दक्षतेने आपण पाहता, बसे म्हणून त्यांनी श्रीसमर्थांना लोटागंण घातले. तेव्हा समर्थ बाळ कितीही सामर्थ्य असले तरी अहंकार असू नये. अहंकाराने सर्वनाथ होतो. त्याकरिता प्रत्येकाने निरहंकारी असावे. परमात्माच सर्वांचे रक्षण करतो. अरण्यातील झाडांना कोणी पाणी घालतो काय ? मातेच्या पोटातील गर्भाचे पोषण कोण करतो ? पृथ्व्यादि पंच महाभूते कोणी निर्माण केली ? मनुष्यास डोळ्यांनी पहाणे, कानावी ऐकणे इत्यादी शक्ती कोणी दिली ? मनाचे सामथ्यं कोणामुळे ? सूर्य कोणामुळे प्रकाशतो ? चंद्र, तारे यांना प्रकाश कोण देतो ? अग्नि कोण प्रज्वलित करतो ? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘ परमात्मा’ हेच होय. म्हणून मीपणाचा अभिमान बाळग नकोस. अहंकारासारखा दुसरा शत्रू नाही. परमेश्वरास अहंकार सहन होत नाही. गुरु आणि देव यांच्या सेवेत धन्यता मानून वागल्यास ते अनुग्रह करतात’ असे ते म्हणाले.

वासुदेव शास्त्री नावाचे एक महान पंडित होते. त्यांना विद्येपेक्षा गर्वच जास्त होता. त्याकाली विद्वानाबरोबर वाद करून असेतुहिमाचल जय मिळवून विजयपत्र मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. समर्थावत जय मिळविल्यास सर्वावर जय मिळविल्यासारखे होईल असा विचार त्यांच्या मनात आला. समर्थावर जय मिळविल्यावर त्यांचा शिष्य शिवाजी राजा आपोआप आपला शिष्य होईल. ह्या आशेने वासुदेवशास्त्री शिवाजी राजांच्या दरबारी आले. त्यावेळी गागाभट्ट नावाचे राजगुरु होते. ते शिवाजीचे कुलपुरोहित. त्यांच्याकडून शिवाजीराजेंचा राज्याभिषेक झाला होता. ते काशीचे राहणारे होते व त्यांच्यापेक्षाही वासुदेव शास्त्री विद्वान होते. गागाभट्ट वासुदेवशास्त्री जेथे उतरले होते तिथे जाऊन म्हणाले– ‘ आपण मोठे विद्वान आहात. आपला पराजय कोणासही करता येणार नाही. तुम्ही समर्थांवर विजय मिळविल्यास शिवाजी तुमचा दासानुदास होईल.’

दुसन्या दिवशी सकाळी शिवाजी महाराजांच्या दरबारात जाऊन वासुदेवशास्त्री म्हणाले ‘हे पहा | माझ्याशी वादविवाद करण्याचे सामथ्र्यं आपणात नाही.’ असे आपले राजपुरोहित गागाभट्ट यांनी कबूल केल्यामुळे त्यांच्याशी वादविवाद करण्याचे कारणच राहिले नाही. म्हणून समर्थाशीच वादविवाद करण्याचा माझा विचार आहे !” असे म्हणताच गागाभट्टांच्या तोंडचे पाणी पळाले. दरवारात वाद विवाद करून अपमान होण्याची पाळी येऊ नये म्हणूनच त्यांनी ही युक्ती केली होती. पण ती अंगाशी झाली. एकंदर प्रकार शिवाजी महाराजांच्या ध्यानी येऊन त्यांनी ह्या शास्त्रीबुवास समर्थ जेथे आहेत तेथे नेऊन पोहोचविले म्हणजे ते त्याला चांगलाच घडा देतील किंवा त्याच्या विद्वत्तेला योग्य मानही मिळेल असे मनात ठरविले व त्याप्रमाणे शास्त्रीबुवांना समर्थकडे घेऊन गेले. तेथे गेल्यावर शास्त्रीबुवांनी आपल्या स्वभावा प्रमाणे वादविवादास सुरवात केली. त्यावेळी श्रीसमर्थ मी काही पंडित नाही. पंडितानी पंडिताशी वादविवाद करावयाचा असतो. मी भगवंताचे नामस्मरण करून त्याच्या कृपेस पात्र झालेला एक मनुष्य आहे. तोच माझा उद्धार करील. मी एकांतात ध्यानस्य बसतो व जो काही  विचारील त्याला मला जे समजते ते सांगतो, असे परोपरीने म्हणाले. त्यांनी असे सांगितले तरी ते न ऐकता ‘वादविवाद  अशीही झालाच पाहिजे’ असा शास्त्रीबुवांनी हट्ट धरला. तुम्ही वाद विवाद करणार नसला तर मला विजयपत्र लिहून द्या. त्यांची मागणी केली. मग श्री समर्थांनी ह्याचे पर्वहरण केलेच पाहिजे यासाठी काहीतरी करणे जरूर आहे, नाही तर हा विद्वान गृहस्थ फुकट जाईल, असा विचार करून ‘बाळ, ते पहा तेथे कोण चाललय ? त्याच्याद्वारेच योग्य गोष्ट करता येईल असे आपल्या एका शिष्यास म्हणाले. त्यावेळी एक मोळीविषया चालला होता. त्यालाच त्या शिष्याने बोलावून आणले. त्याला समर्थांनी कोण आहेस ? केला. त्याने ‘ मी आपल्या मठाचा एक सेवक असून आपल्या कृपेने सुखी आहे’ असे सांगितले. समर्थ म्हणाले, मी सांगतो ते ऐकशील काय ? ” त्यावर तो म्हणाला ‘ होय. तुम्ही आमचे गुरुच आहात. ‘ठीक ‘ असे म्हणून श्रीसमर्थ कल्याणास म्हणाले, ‘एक रेघ घोढ’ आणि त्या मोळीविक्यास त्यानी रेघ ओलांडण्यास सांगितले. त्याला ‘ आता तू कोण आहेस?’ असा प्रश्न समर्थांनी विचारताच त्याने आता मी शुद्र आहे. मी अतिशूद्र जन्मात होतो ती रेघ ओलांडून मी शूद्र जन्मात आलो आहे.’ असे सांगितले. कल्याणास दुसरी रेघ ओढावयास सांगून ती त्या मोळीविक्यास ओलांडण्यास सांगून त्याला आता तू कोण बाहेस’ असा समर्थांनी प्रश्न करताच त्याने मी वैश्य आहे असे सांगितले, कल्याणास विसरी रेघ ओढावयास सांगून मोळी विक्यास ती ओलांडावयास सांगून आता तू कोण आहेस ? असे विचारताच त्याने मी क्षत्रीय आहे’ असे उत्तर दिले. त्याला पुन्हा एक रेच ओढून ही ओळगंडावयास सांगून ‘ आता तू कोच आहेस ?’ असा प्रश्न करताच ‘मी आता ब्राह्मण आहे. पण वेदाध्ययन झालेले नाही.’ असे त्याने उत्तर दिले. त्यावर पुन्हा एक रेच ओढावयास सांगाती सांगून आता तू कोण आहेस ?” असा प्रश्न करताच त्याने वेदघोष सुरू केला व सोवळे नेसून, भस्म चर्चूने, अंगावर उपरणे, हातात पळी पंचपात्र घेवून तो पुढे बाला. ‘तुझे नाव काय ?” असे त्यास विचारताच माझ नाव राममट मला चार वेद, पड्यास्त्रे, अठरा पुराणे मुखोद्गत आहेत.’ असे तो उत्तरला. ‘ठीक आहे. तू ह्या आलेल्या पंडिताबरोबर वाद-विवाद करशील काय ? असा प्रश्न करताच जशी आपली आज्ञा आपण सांगितले तर मी विवाद करीन. परंतु विद्या स्वतःच्या उद्धारासाठी मिळवावयाची असते. वादासाठी नाही असा जर गर्मिष्ठपणे वाद केला तर. ‘ विद्वांसो ब्रह्मराक्षसः |’ या वाक्या प्रमाणे ब्रह्मराक्षस व्हावे लागते. ‘ असे म्हणून रामभट समर्थांच्या अद्नेनुसारवादास उद्युक्त झाला. हा सर्व चमकार पाहून गर्भगळीत झालेले वासुदेवशास्त्री ‘ एकदा पाहून घेऊ या असे म्हणून पुढे सरसावले व वाद सुरू झाला शास्त्रीबुवांचे पांडित्य काही चालेना. त्यामुळे ते शरण आले. ‘ वादात मी हरलो तर मी माझी जीभ कापून देईन’ अशी त्यांची प्रतिज्ञा होती. ते पुरी करण्यास ते प्रवृत्त होताच, श्रीसमर्थ ‘ असे करणे योग्य नाही. असे म्हणून ‘स्वतःच्या उद्धाराकडे लक्ष दिले पाहिजे. अशा प्रकारे दुरण ओढवून घेऊन आपले अधःपतन ओढवून घेणे योग्य नाही. अशा प्रकारे मरण आल्यास कोणतीही चांगली गती मिळणार नाही, हे विचाराअंती आपणास पटेल. आपणास खरोखरच उपरती झाली असल्यास ज्ञानानुकुल वागावे !’ असेही म्हणाले. त्यानंतर मात्र शास्त्रीबुवांनी समर्थांचा अनुग्रह प्राप्त करून त्यांच्या सान्निध्यात ते साधना करू लागले.शुद्राला ब्राह्मण जन्मापर्यंत शुद्ध करून अशा प्रकारे पंडिताचा गर्व हरण केला. त्या शूद्राची समाधी अद्यापीही आहे. तो खरा गंधर्वच. परंतु काही चुकीमुळे इंद्राच्या शापाने त्यास अतिशूद्राचा जन्म मिळाला होता. बचापी रथोत्सवाच्या वेळी तेथे रथ थांबतो.

स्वामी सेवेची लक्षणे

एके दिवशी नित्याप्रमाणे संध्याकाळी श्रीसमर्थ गडाच्या कडेकडेने फिरावयास निघाले. मध्येच एका कड्याजवळ बसून काही शिष्यांशी कोणत्यातरी विषयावर बोलत असता त्यांची छाटी वान्याने अंगावरून उडाली. वे तत्क्षणीच कल्याणाच्या लक्षात येताच त्याने तिच्या वेगापेक्षा जास्त वेगाने कड्यावरून उडी मारून ती छाटी पकडली. त्याने उडी मारताच इतर शिष्यांना ‘ कल्याण आता मेला’ असे वाटून ते कल्याण मेला असे मोठ्याने ओरडू लागले. ‘कल्याण कधी मरणे शक्य आहे काय ? त्याचे नावच कल्याण.’ असे श्रीसमर्थ म्हणत असताच हातात छाटी घेऊन कल्याण श्रीसमर्थांच्या पुढे उभा राहिला. यावरून गुरुसेवेत शिष्य किती रत असतात, देहभान कसे विसरतात, प्राणाची पर्वाही करीत नाहीत हे ध्यानी येते. अशा शिष्यांचे रक्षण गुरुनाथ करतातच हे निःसंशय.

शिष्य परीक्षा

मठात वास्तव्य करून असलेल्या सर्व शिष्यातील प्रत्येक जण मीच शहाणा, मीच मोठा असे समजत असे. हे श्रीसमर्थांच्या घ्यावी येऊन ‘ठीक आहे. कोण मोठा आहे हे दाखविले पाहिजे. ‘ असे मनात ठरवून एके दिवशी रात्री त्यांचे दर्शन घेऊन सर्व शिष्यमंडळी निघून गेली असता आपल्या खोलीत बसलेल्या

व्यांपैकी एक चांगला पिकलेला वांबा श्रीसमर्थांनी आपल्या पोटरीवर बांधला व त्यांनी आपल्या पायाला गळू झाले बसल्याचा भास निर्माण केला. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य आपले आन्हिक उरकून श्रीसमर्थ दर्शनास आले त्यावेळी श्रीसमर्थ असा वेदना होत असल्याने मोठचाने कण्हत असल्याचे सर्वात आढळून आले. दार उघडून पाहताच श्रीसमर्थांची अवस्था कठीण दिसली. प्राण आता जातो की थोड्या वेळाने जातो अशी स्थिती असून देहभानावर नव्हते. त्या गळवाच्या दुःखाने ते तळमळत असतील यसे वाटून एक दोघेजण पुढे जाऊन त्यांनी ‘काय झाले ?’ असे श्रीसमर्थांना विचारले. श्रीसमर्थांना मोठे गळू झाले असून त्याच्या मुळेच असह्य वेदना असाव्यात असे त्यांना वाटले. ” आता काय करावे ? कोणी वैद्य बोलवावा की काय ? श्रीशिवाजीस पत्र लिहावे की काय ? काय ह्या असह्य यातना ? स्वामी! आम्ही काय केले पाहिजे ? तुम्ही सांगाल तसे आम्ही करतो ? ‘ असे म्हणताच श्रीसमर्थ म्हणाले ‘अरे, हे मोठे पळू आहे. हे ज्याला होते तो जिवंत राहू शकत नाही. त्याला कोणताच औषधोपचार लागू पडत नाही. पण यासाठी एक भयंकर उपाय आहे. एखादयाने आपल्या तोंडाने ह्या गळवातील नासके रक्त ओढून घेऊन ते तो पिऊन घेईल तर मात्र मी जिवंत राहीन. पण हे करणार कोण ? ठीक आहे. जाता जिवंत पाहून तरी काय करायचंय ?’ आणि कण्हत कण्हत ‘यापुढे एकमेकांशी न भांडता, मत्सय वगैरे न बाळगता आपापला उद्धार करून घ्या !’ असे म्हणाले. योगबळाने तेथे त्यांनी खूप दुर्गंधी पसरविली. तिच्यामुळे तेथे कोणीही थांबेना. शिष्यांपैकी कोणी तुळस आणण्यास कोणी फराळाचे तयार करण्यास तर कोणी पूजेसाठी म्हणून ही ना ती सबब सांगून बहुतेक सर्वजण बाहेर पळाले. त्या खोलीत कोणीही शिष्य थांवला नाही. इतक्यात कल्याण तेथे आले. ‘काय गडबड आहे ? आज मठास कशामुळे अवकळा माली ? श्रीसमर्थ कुठे आहेत ?’ अशी त्यांनी विचारणा केली. तेथे बाहेरच्या बाजूस काही शिष्य होते. त्यांनी श्रीसमर्थांना मोठे गळू झाले असून त्यामुळे ते त्या खोलीत कण्हत झोपले आहेत. किती झाले तरी आता त्यामुळे आता ते जास्त दिवस जगणे शक्य नाही असे आहे. तुम्ही एकदा डोळ्यांनी पाहून या !” असे सांगितले. तत्क्षणीच कल्याण पटतच जाऊन त्यांनी श्रीसमर्थांना साष्टांग नमस्कार घालून ‘स्वामी ! काय हकीकत आहे? एवढे कष्ट होण्याचे कारण काय ? त्यांचे निवारण करण्याचा उपाय नसल्यास मला सांगा !’ असे कळवळून म्हणाले. ‘बाळ, हे प्रारब्ध आहे व ते मला भोगलेच पाहिजे ह्या देहासाठी तू प्राण गमावण्यात काय स्वारस्य आहे ?” असे श्रीसमर्थानी सांगताच ‘स्वामी, आपल्यासाठीच हा माझा देह आहे. नाही तर ह्या देहाचा उपयोग काय ? आपल्यासारख्या साधू पुरुषांसाठी आमच्या सारख्यांच्या देहाची काय किंमत ?” असे कल्याण उद्गारताच वा कल्याणा ! मीच माझा भोग भोगून देहत्याग करतो.’ असे श्री समर्थ म्हणाले. पण कल्याणाचा हट्ट पाहून ठीक आहे तू म्हणतोस तर ही वरची पट्टी काढून टाक व गळूतील नास के रक्त तोंडाने शोषून घे.’ असे श्रीसमर्थानी म्हणताच कल्याणाने गळवा वरील कापड पट्टी काढून टाकून ते तोंडाने सर्व शोषून घेतले. तो आंब्याचा गोड रस चाखून त्याने स्वामी, असेच एखादे गळू आणखी कोठे आहे काय ?’ असा प्रश्न केला. त्यामुळे श्रीसमर्थांना हसू आले अशी समजूत व सर्व शिष्यांना म्हणाले, गुरूंना काही तरी झाले करून घेऊन तुम्ही सर्व माझ्यापासून दूर झालात पण कल्याणच शेवटी उपयोगी पडला ना ! अशी गुरुभक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्यांना काहीही कमी पडत नाही व त्यांच्यापेक्षा श्रेष्ठही कोणी नाही. अशा गुरुसेवेच्या प्रभावाने ज्ञान आणि सामर्थ्य प्राप्त होणे अत्यंत सुलभ होते. ‘ अशी जाणीव करून दिली.

ब्रह्मरूपाचे वेड

अशाच प्रकारे शिष्यांची परीक्षा करण्याची दुसऱ्यादा वेळ आली. पहाटे चार वाजता ज्यावेळी भक्तमंडळी दर्शनास येत त्यावेळी कपाळास व सर्वांगास कुंकू फासून आणि नंगी तलवार हातात घेऊन अंगात आल्याप्रमाणे सर्वांना ढकलून देत व रागीट नजरेने पाहात, ‘तुम्हा सगळ्यांना आताच्या आता मारून टाकतो.’ असे म्हणून समर्थ नाचू लागले. त्यामुळे तेथे जमलेले शिष्य घाबरून गेले. व समर्थांना वेड लागलय !’ असे म्हणून पसार होऊन आपापल्या खोलीत दार बंद करून बसले. आरडाओरडा करीत नाचत, श्रीसमर्थ सज्जनगडावरून खाली उडी मारून ब्रह्मारण्याकडे पळत सुटले हे सर्व दृश्य शिष्य मंडळी खिडकीच्या फटीतून पाहात होती. समर्थ पुन्हा परत येतात की काय ? हे पहाण्यासाठी ते हळूहळू आपल्या खोलीतून बाहेर पडले. तेवढ्या वेळात समर्थ बरेच दूर गेले होते. इतक्यात कल्याण तेथे आले व सर्व शिष्यांच्या चेह-यावरील अवकळा पाहून त्यांनी ‘काय झाले ? तुमचा चेहरा का उतरला ? ‘ असे विचारले. तेव्हा शिष्य मंडळींनी समर्थाना वेड लागलय, वेडेचार करीत, उड्या मारीत त्यांनी गडावरून खाली एकदम उडी मारली. ते जिवंत आहेत की नाहीत हे कळणे कठीण.’ असे सांगितले. तेव्हा कल्याण ‘ छे ! वेड तुम्हाला लागलंय की समर्थांना लागलंय आणि मेले कोण तुम्ही का समर्थ ?’ एवढे म्हणून समर्थ ज्या रस्त्याने मारली पळत सुटले आणि समर्थांनी जेथून उडी तेथून उडी माइन समर्थांचा शोध करू लागले.दिली. अशा गुंडांना सामध्ये दाखविणेच योग्य असते. तसे केल्यास त्यांना वठणीवर आणणे कठीण होते.

अनुग्रह परत दिला

समर्थांच्या मठात रोज अन्नसंतर्पण होत होते. त्यामुळे काही लोकांना आपण येथेच राहावे असे वाटे. त्यास एक दरिद्री ब्राह्मण होता. दररोज पक्वाने व नवीन नवीन पदार्थ अनायासेच खावयास मिळतात ह्यासाठी तो समर्थांचा  शिष्य बनला, हे समर्थांच्या ध्यानी आले. ‘तू माझ्या बरोबर चल असे त्या नवीन शिष्यास सांगून ते बाहेर पडले. दोघेही बरोबर चालले. दुपार झाली तरीही कोठे थांबले नाहीत. अरेरे ! त्या दरिद्री ब्राह्मणाची आता काय गत होणार ! उन्हामुळे त्याला पाऊलही टाकवेना. तरीही समर्थ त्याला ‘चल, चल.’ असे म्हणत होते. त्यावेळी तो ब्राह्मण अरेरे, माझे दुर्देव अजून संपले नाही. काय हे कष्ट ? आता आपल्याच्याने पुढे चालवणार नाही व जाणार तरी कुठे ? पुढे रस्ताही दिसत नाही. मठात पोटभर खायला मिळेल ह्या भावनेने मी आलो पण वाट्याला आले भलतेच. ‘ असे म्हणून कण्हा कुंथत तो पाउले टाकीत होता. त्याला उद्देशून समर्थ म्हणाले ‘ हे पहा, गाव जवळ आलेय. तू गावात जावून भिक्षा आण व स्वयंपाक करून मला वाढ व जे शिल्लक राहील ते तू खा. हा काय ताप ! गावात कोठे तरी जेवावयास मिळेल को काय ते पाहू या ?” असे ब्राह्मण गावात गेला. म्हणून तो त्या दिवशी तेथे तुकाराम महाराज आले होते. त्या गावच्या सावकाराने त्यांच्या जेवणाची सोय केली होती. त्या ब्राह्मणास पाहताच ‘जेवायला चला’ असे म्हणून त्या सावकाराने त्यास जेवावयास नेले. ब्राह्मण मनातल्या मनाव ठीक झालं. त्या साधूची खोड मोडली पाहिजे. तो उपाशी राहूव मेला तरी हरकत नाही. आता परत जातो !’ असे म्हणून जेवण करून तेथेच राहिला. ब्राह्मण रोज यथेच्छ भोजन करून तुकाराम महाराजांच्या मुक्कामीच राहिला. त्यावेळी समर्थही अदृश्य होऊन तेथे येऊन राहिले. ब्राह्मण समाजाप्रमाणे राहिलो तर आपला गौरव होणार नाही हे जाणून तुकाराम महाराजांचा मंत्रोपदेश घेण्याकरिता त्यांची प्रार्थना केली. तुकाराम महाराजांनी ज्ञानदृष्टीने त्याच्या म्हणण्याचा विचार करून विचारले अगोदर तू कोणाकडून अनुग्रह घेतला होता ?” ब्राह्मण मनामध्ये हो उठाठेव ह्यांना काय करावयाची ? अनुग्रह मागितला तर देऊन टाकावयाचा. इतर गोष्टींशी यांचा काय संबंध आहे ?” असे म्हणाला. पण त्याला उत्तर देण्याखेरीज इतर मार्ग नव्हता. ठीक आहे. थोडक्यात सांगून टाकू जहा विचार करून रामदासांकडून एकदा अनुग्रह मिळालाय. पण आपले सामर्थ्य पाहून मी आपणास ही विनंती केलीय’ असे म्हणाला. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले ‘ठीक. पण एकदा ज्याला अनुग्रह मिळाला आहे. त्याला मी अनुग्रह देत नाही. तू तो अनुग्रह परत करून ये |’ हे ऐकून ब्राह्मण आनंदाने निवाला व मनात निरनिराळे विचार करीत, ज्याने उपदेश दिला त्यालाच धडा शिकवू असा विचार करीत समर्थ जेथे होते तेथे आला ग्रह वाईट असले की अशीच परिस्थिती होते व एके ठिकाणी बसून राहणे अशक्य होते. समर्थांचा अनुग्रह आपणास मानवणे शक्य नाही असे समजून आपण ‘आपला अनुग्रह परत घ्या’ असे तो समर्थात म्हणाला. ‘ठीक आहे. ह्या दगडावर थुंक’ त्याकरता त्या दगडावर ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र उमटून त्याची वाणी बंद झाली. तो तेथून तुकाराम महाराजांकडे परत झाला. त्याला बोलता येईना. त्यामुळे खुणेनेच तो ‘ अं अं उं उं असा उच्चार करीत हाताने नाहीची खूण करू लागला. त्याची ती स्थिती पाहून तुकाराम महाराजांना त्याची दया आलो व त्याला घेऊन समर्थाकड आले व म्हणाले- ‘हा गरीबाचा उद्धाद करावा. त्यावर समयीनो ‘ ठोक, त्यात काय विशेष आहे ! तो जये थुंकला आहे तेच त्याने चाटून घेतले पाहिजे.’ असे उत्तर दिले त्या ब्राह्मणाने तसे केल्यावर त्याला बोलता येऊ लागले. समर्थांचे सामर्थ्य त्याला समजून आल्याने तो त्यांचा एकनिष्ठ सेवक बनला.

पंढरपूर यात्रा

वारकरी मंडळी नेहमीच्या पद्धतीनुसार आषाढी एकादशीच्या यात्रेस निघाली होती. काहींनी पांडुरंग दर्शनाल येण्याबद्दल समर्थांना विचारले असता समर्थांनी ‘तेथे माझी उपास्य देवता प्रभु रामचंद्र नसल्याने मी तेथे येत नाही.’ असे उत्तर दिले. कसेही करून समर्थांना बोलावून घेतलेच पाहिजे असे पंढरी नाथांच्या मनात आले व ते ब्राह्मण वेशात समर्थांकडे आले. यावर्षी पंढरपुरी त्यांनी यावे म्हणून त्या ब्राह्मणाने समर्थांना खूप आग्रह केला जेये माझा राम नाही तेथे मी येत नाही ‘ हे त्यांनी उत्तर दिले. ‘आपण महाज्ञानी माहात तेव्हा असे कसे म्हणता ? राम सर्वत्र आहे हे तुम्ही जाणताच असे त्या ब्राह्मणाने म्हटले तेव्हा मात्र समर्थ स्तब्ध राहिले. नंतर श्रीसमर्थ ब्राह्मणाबरोबर पंढरपुरास निघाले. पंढरपुरी पोहोचताच तो ब्राह्मण गुप्त झाला श्रीसमर्थ विठ्ठलाच्या दर्शनास गेले असता त्यांना तेथे श्रीराम प्रभचेच दर्शन पडले व पंढरपूर अयोध्येसारखे दिसू लागले श्रीसमर्थांना पाहून सर्व संत मंडळींना शानंद वाटला.

गुरुभक्तीची परीक्षा

येत ब्रह्मारण्यात एकदा श्रीसमर्थ वाघाच्या गहेत झोपले होते. दर गुरुवारी श्री शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या दर्शनास असत त्या दिवशी त्यांनी समर्थांचा खुप शोध केला. शेवटी वाघाच्या गुहेत समर्थांना पाहून आनंदित होऊन त्यांनी समर्थाना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा समर्थ कण्हत आहेत असे आढळून झाले ते ऐकून शिवाजी स मोठे आश्चर्य वाटले. भयभीत होऊन ‘स्वामी, काय झालय ?’ असे त्यांनी नम्रातेने विचारले * बाळ, आज असह्य पोट दुखते. त्या वेदनामूळे प्राण रहतो की जातो असे वाटू लागले आहे असे समर्थांनी उत्तर दिले तेंव्हा. महाराज, त्याला काही औषध असल्यास सांगा म्हणज मी सोय करतो’ असे शिवाजी ने म्हटले. त्यावर ‘बाळ, याला औषध आहे. पण ते प्राप्त करणे कठीण आहे? ‘ असे समर्थ उद्गारले. नंतर शिवाजीने ‘स्वामी, मला आज्ञा करा. कितीही कष्ट पडले तरी मी ते आणीन !” असे म्हणताच ‘वाचिणीचे दूध आणले तरच त्यामुळे मी जिवंत राहू शकेन. पण हे शक्य आहे का ? उगीच कशाला विचारतोस ?” असे समर्थ म्हणाले. तेव्हा  आपला आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर कोणतीही गोष्ट के हाही असाध्य नाही, मी ते आणतोच !’ असे म्हणून शिवाजो त्याच्या शोधाय निघाला. थोड्याच वेळात एक वाघीण आपल्या पिलासह येत असलेली दिसली. समर्थांचा जप करीत धैर्याने तो पुढे सरसावला. बाघीण रागावली व तिने शिवाजोस भिवविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिगजो, ‘अई, मी माझ्या गुरूच्या सेवेकरिताच तुझ्याकडे आलो आहे. गुरुसेवा प्रत्यर्थ देह गेला तरी हरकत नाही. परंतु सेवा पूर्ण झाल्यानंतर देह गेल्यास त्याचे सार्थक होईल. तुला आहारासाठी हा देहच पाहिजे असेलतर मी देईन. पण प्रथम तुझे दूध दे. कारण ते माझ्या गुरूंच्या आहारामाठी औषध आहे. ते देऊन मी खात्रीने परत येईन. हे मी अगदी खरे बोलतो साहे. मी कधीच लोटे सांगणार नाही. मला आता मारलेस तर मी धन्य होईन व तुझा आहारही होईल, पण गुरुसेवेत मात्र विघ्न येईल.’ असे म्हणत तो वाघिणीजवळ गेला. वाघीण तक्षणीच शांत आली. शिवाजीने तांब्याभर तिचे दूध काढले ‘ हा आता येतोच ‘ असे म्हणून निघाला. दोन पार पावले पुढे जातो न जातो तोच ‘जय जय रघुवीय समर्थ’ असा आवाजऐकू जाला. मागे वळून पहातात तो समर्थ उभे दिसले. इतर काहीही दिसले नाही. ‘बाळ तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी हे सांगितले होते. तेथे वाघीण म्हणून मीच बसलो होतो. तू योग्य शिष्य असल्याने तुझ्याकडून राज्यस्थापना होऊ शकली ! असे समर्थांनी म्हटल्यावर दोघेही सज्जनगडी जावयास निघाले. एकेदिवशी छत्रपती शिवाजी महाराजसैन्यास सह जात असता जवळच्याच अरण्यात समर्थ आहेत असे त्यांना समजले. धनापासेच समर्थ दर्शनाचा लाभ होईल अशा उत्सुकतेने ते तिकडे जावयास निघाले. दर्शन होताच साष्टांग नमस्कार पाठला. त्यावेळी शिवाजी महाराजांचा चेहरा उतरलेला पाहून त्यानी बाळ तुझे मुख म्यान का झाले?’ असा प्रश्न करून तहान लागली काय ? पाणी पाहिजे का ? ‘ असेही त्याना विचारले. शिवाजी महाराजांनी ‘होय’ असे उत्तर दिले. डोंगरात कोठेही पाणी नव्हते. ‘तुझ्या करता पाणी आणतो. असे म्हणून आपल्या कुबडीने एक दगड बाजूस सारला. त्याला घरपूर पाणी होते. शिवाजी महाराज व त्यांचे सैनिक ह्या सर्वांनी यथेच्छ पाणी पिऊन समर्थांची आज्ञा घेऊन त्यांच्या महात्म्याचे वर्णन करीत ते निघून गेले. आजही हे कुबडीतीर्थ प्रसिद्ध आहे.

डोंगरात जेवण

असेच एकदा शिवजी महाराज सैन्यासह निवाले असता श्री समर्थ जवळच आहेत असे समजल्याने ते त्यांच्याकडे निघाले. डोंगराच्या मध्यभागात श्रीसमर्थांना पाहून त्यांना नमस्कार करून जाण्यासाठी निरोप मागितला. ‘ही माध्यान्हाची वेळ आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी थोडावेळ थांबून जेवून जावे’ असे समर्थ म्हणाले व जेवणाची व्यवस्था कल्याणावर सोपविली. कल्याणाने ‘होय’ असे म्हणून सर्वांना स्नान करून येण्यास सांगितले. ह्यावेळी अशा या निचिड अरण्यात एवढया मंडळींना जेवण कसे मिळेल असा विचार शिवाजीच्या मनात आला. आज्ञेप्रमाणे स्नान करून येण्याचे आत एका मोठ्या गुहेत जातिधर्मास अनुसरून व्यवस्थितपणे पाने मांडलेइतकेच नव्हे तर प्रत्येक पनाजवल  स्वतंत्र लोटोमांडे, वाटी वगैरे असलेले आढळले. राजमोवास योग्य असे पंचपक्वान्नाचे जेवण झाले. जेवणानंतर सर्वास विडा सुपारी देण्यात आली या घटनेचे शिवाजीस मोठे आश्चर्य वाटले. आपला संशय दूर करण्यासाठी त्यांनी श्रीसमर्थना विचारले. त्यावेळी श्रीसमर्थ ‘ठीक आहे. ह्याचे उत्तर तुला तुकाराम महाराज देतील. आता तुम्ही निघा’ असे म्हणले. सर्वांना श्रीसमर्थाना नमस्कार करून ते सर्व आपापल्या कामास निघून गेले.

हा चमकार समजून घेण्यासाठी शिवाजी महाराजांची उत्सुकता द्विदुणित झाली. त्यामुळे तुकाराम महाराज असतील तेथे जाण्याचे त्यांनी ठरविले. सैन्यासह फिरत असता एके ठिकाणी जवळच तुकाराम महाराज बाहेत असे समजले. समर्थांच्या सूचनेनुसार तुकाराम महाराजांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा प्रबळ झाल्याने आलेली संधी घालवू नये अशा इच्छेने तेथून दूर असलेल्या देहू या गावी ते आले. त्यावेळी दुपारची वेळ झाली होती. तुकाराम महाराजांकडे भेटीची अज्ञा मिळविण्यासाठी आपला एक प्रधान पुढे पठविला प्रधानाने तुकाराम महाराजां कडे जाऊन विनयपूर्वक नमस्कार केला आणि नम्रपणे शिवाजो महाराजांचे म्हणणे सांगितले. ‘दुपा/रची वेळ असल्याने जेवण उरकून मगच भेट घेऊ. जेवणाची सर्व सिद्धता आहे.’ असे त्यांनी उत्तर दिले. प्रधानाने ही गोष्ट शिवाजी महाराजांना जाऊन सांगितली. तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात ‘एवढ्या लहानशा गावात आपल्या सर्व सैन्यास पुरेल इतके अन्नसाहित्य असध्याची शक्यता कमीच असा विचार करून कोणीतरी दोघांनी जावून प्रथम प्रसाद घेऊन यावे मग आपण दर्शनास जाऊ’ असे ते म्हणाले. ही मंडळी अद्याप का येत नाहीत ? उशीर झाला आहे बसे पाहून तुकाराम महाराजांनी आपल्या मुलास बोलावून ‘एक गवताचा भारा घेऊन जावून सर्व सेन्यातत सर्व घोड्यांना चारा घालून परत येताना सर्वात जेवण्यास घेवून ये असे सांगितले. तो तिकडे जाताय सर्व आश्चर्यचकित झाले व त्यांनी आपल्या हजारो घोड्यांना हा लहानसा यवताचा भारा का पुरेल’ असे जीत भीत विचारले. मुळाने ‘पुरेल तुमच्या सर्व घोड्यांना आवश्यक तेवढे गवत मी देईन.’ असे म्हणत सर्व घोड्यांना पुरेसे गवत देवूनही तो भारा जसाच्या तसा शिल्लक राहिला. ते पाहून शिवाजी महाराजांना मोठे आश्चर्य वाटले. मग सर्व मंडळी जेवणास निघाली. मोठा छानदार मंडर उमारण्यात येवून त्यात ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे जवणाची सोय केली होती. सर्वांचे जेवण झाले. हे पाहून शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटले व ते तुकाराम महाराजांना नमस्कार करून त्यांनी आपली शंका विचारून ‘मागे एकदा समइ असाच चमत्कार घडला असता, त्याबद्दल समर्थाना विचारले सवा त्यांनी आपले नाव सांगितले. आपणाकडून योग्य उत्तर मिळेल यासाठीच मी इकडे आलो. कृपया आपण माझ्या शंकेचे निरसन करावे.’ अशी सविनय विनंती केली. त्यावर तुकाराप महाराज म्हणाले, ‘हे गृहस्था | आम्ही दिसण्यात दरिद्री असलो तरी आमच्यात सर्व सामध्ये असते. परमेश्वर कृपेने आम्हास कशाचीही वाण नाही. माझ्यासारखा सामान्य भक्त असा असल्यानंतर प्रत्यक्ष मारुतीरायाचा अवतार असलेल्या श्रीसमर्थाबद्दल का संशय घेताय ? सामान्य माणसास शंका येऊ शकेल. परंतु तुझ्यासारख्यातही शंका यते हे विशेष आहे. समर्थ साक्षात मारूतीरायाचे अवतार बाहेव’ असे सांगून शिवाजी महाराजांचे शंकेचे निरसन केले.

ब्राह्मण दक्षिणा

कपिलाषष्टीचा योग जाला होता म्हणून भाहुलीच्या संगमावर श्रीसमर्थ एकटेच स्नानास गेले होते. जवळपासच्या पावातील सर्व ब्राह्मण, आजची पूर्ण पर्वणी असल्याने श्रीसमर्थ आज संगमावर येऊन आपणास योग्य अशो दक्षिणा देतील म्हणून तेथे जमले होते. ते सर्व समर्थांच्या जवळ येऊन त्यांना ‘ आम्हीम्ही संकल्प सांगतो ‘ असे म्हणाले समर्थांच्याजवळ पैसे नव्हते. तेव्हा बंधू हो ! तुम्ही आलात. हे ठीक झाले. पण माझ्याजवळ काही नाही व माझ्याबरोबर कोणालाही आणले नाही’ असे समर्थ म्हणाले. समर्थ आपली गंमत असे ब्राह्मणांना वाटले व म्हणाले हे काही का असेना आम्ही आज आपणास संकल्प सांगणारच !’ त्यांच्या मनात दक्षिणेचो आशा वर होतीच त्यांनी संकल्प सांगितल्यावर श्रीसमर्थांनो स्नान व इतर आन्हिक उरकून ते घरी जाण्यास निघाले. तेव्हा सर्व ब्राह्मण त्यांच्यासमोर येऊन स्वामी बाज पूर्वकाल आहे आम्हाला काही तरी दक्षिणा मिळाली पाहिजे. असे म्हणाले. त्यावर सज्जन हो | मी तर काही आपले नाही. आता तुम्हाला काय द्यावे बुवा’ असे समर्थ म्हणाले. तेन्हा ब्राह्मण आपण आपल्या हाताने जे काही चाल ती योग्य दक्षिणा आहे असे आम्ही समजू.’ असे म्हणाले. तेव्हा समर्थांनी नदीतील गोटे प्रत्येकास दिले. बरे, हे गोटे कशाला ? भावना ब्राह्मणांच्या मनात घेऊन गेली पण प्रत्यक्ष विचारण्याचे कोणातच धैर्य नहते. समर्थ राजगुरु असल्याने ब्राह्मण काही बोलले नाहीत. श्रीमर्थ तिथून निघून गेल्यावर काहींनी ते गोटे पाण्यात फेकून देऊन ते घरी गेले. त्यातील एक दोघांनी मात्र हा महात्म्याचा प्रसाद आहे. राहू असा विचार करून ते गोट घरी येऊन गेले. दुसऱ्या दिवशी गोटघांचे सोने झालेले त्यांना आढळत खाले. ते पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट इतरांनाही सांगितलो. ते ऐकल्यावर सर्वांना पश्चात्ताप झाला अत्यंत दुःखी झाले. मग ते सर्व एकत्र जमून आपापल्या डोक्यावर मोठमोठ दगड घेऊन समार्थान कडे आले. मुंग्यांच्या लांबलचक रांगेप्रमाणे यणारी ब्राह्मणाची रांग पाहून कल्याणाने ही शिक्षा तुम्हास कोणी केलो ? कशासाठी केली ? असे विचारले. त्यावेळी डोक्यावर दगड घेऊन बालेले सर्व म्हणाले, ‘ स्वामी, आध्ही दरिद्री दुर्देशने काल आम्ही आमच्या नशिबाने होणारा लाभ घालविला. माहुली चा  संगमावर श्री समर्थ यांनी आम्हाला गोटे दिले होते. काहींनी ते ठेवले तर काहींनी ते नदीत भिरकावून दिले. ज्यांनी ठेवून घेतले, त्या गोटयांचे साने झाले म्हणून ज्या दगडास समर्थ हात लावतीळ त्या दगडाचे सोने होते ह्या भावनेने आम्ही आणलेल्या दगडाला श्रीसमर्थांनी स्पर्श करावा या भावनेनेच आम्ही हे दवड घेऊन आलो आहोत. समर्थांचे त्या ब्रह्मणाकडे लक्ष्य गेले. ‘बंधूनो, तुम्हा सर्वांचे चेहरे उतरलेले दिसतात तेव्हा प्रथम जेऊन घ्या. नंतर पाहू |’ असे म्हणून काल पुण्यकाल असल्याने मी संगमावर दिलेल्या गोट्याचे सोने झाले. आता तुम्ही संगमावर जाऊन हे दगड फेकून द्य व येऊन जेवण करा’ असे म्हणाले. सर्व ब्राह्मणांना फडकडून मूक लागली होती. आपण जवलो नाही तर तेलही गेले व तूपही गेले अशी परिस्थिती होईल असे समजून त्यांनी दगड फकून देऊन ते जेवावयास आले. जेवणानंतर ‘स्वामी श्रामच्यावर थोड़ो घरी कृपा करा’ असे ब्राह्मण मंडळी म्हणाली. तेव्हा समर्थांनी, “ठीक आहे. जाता तुम्ही जा. उद्या वर जाऊन स्नान करा नदीत संगमावर बुडी मारून तुमच्या हातात येतील तेवढे गोट घेऊन घरी जा. घरी गेल्यावर त्याचे सोने होईल’ असे सांगितले व झाले ही तसेच

भोलाराम

उतार वयात श्रीसमर्थ पानसुपारीयुक्त विडा खात नसत. कारण श्रीरामाचे ध्यान करीत असता श्रीसीतामाई समर्थात म्हणाल्या ! तुम्ही मजकडे का पहात नाही ! त्यावेळी सीसमर्थांनी ‘ आपण मायारूपी आहात. आपणाकडे पाहिल्यास मला ब्रह्मरूप प्राप्ती कशी होईल ?’ असे उत्तर दिले. तेव्हा सीतामाई म्हणाल्या ‘ तसे नाही. मी समाधीरूप आहे. माझ्याच अनुग्रहाने धन प्राप्ती होत असते. माझ्याशिवाय बाह्यरूपाचा दिव्यानंद मिळणार नाही’ असे म्हणून कस्तुरी, केशर, वेलदोडा, पंचक, सुारो, चुना हे सर्व विडयाच्या पानात घालून त्याचा विडा करून, त्यास लावून तो समर्थांच्या हातात देऊन याचे जसजसे जास्त प्रमाणात सेवन करशील तसतसे समाधिसुख वाढत जाईल आणि तुला आनंद प्राप्त होईल असे सांगितले. त्या दिवसापासून समर्थ वडा खाऊ लागले. उतार वय असल्याने दातही नव्हते. त्यामुळे विडा कुटून देण्यासाठी मोलादाप नावाच्या शिष्याची योजना केली गेला. भोलाराम ठरलेल्या वेळी विडा कुटून देत असत. ते पाहून इतर शिष्यांना त्यांचा हेवा वाटू लागला व त्यांनी मत्सर बुद्धाने खलबत्ता लपवून ठेवला. कितीही शोधले तरी त्या दिवशी मोलाबामास खळवता सापडला नाही. ‘ठीक आहे. श्री समर्थ हे माझे आत्मस्वरूाच. अशी भावना करून त्याने आपले तोंड स्वच्छ धुतले व विडा तोंडात घालून तो सूर चर्वण केला व समर्थांना दिला, आज तर विडा फारच छान कुटला गेला’ असे म्हणत श्रीसमर्थांनी तो विडा खाल्ला. तर शिष्यांना मात्र त्या गोष्टीची किळस वालो. पण खरी गोष्ट समयांना सांगण्याचे धाडस कोणासही झाले नाही तेव्हा शिवाजी महाराजाची वाट पहात थांबले व शिवाजी महाराज येताच त्यांना सर्व हकीगत त्यांनी सांगितली. ती ऐकून शिवाजी महाराजांना राग आला. ‘ठीक ! योग्य ती व्यवस्था करतो. , घसे ते समर्थांच्या जवळ आले. ते का आले हे समर्थांच्या सहज ध्यानी आले. विडा खाण्यासाठी पाहिजे म्हणून त्यांनी भोलारामास बोलावताच तो झाला व त्याने विडा तयार करून हो कुटण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू केले. तेवढयातच समर्थ “शिवबा उशीर होतोय. झटकन खलबत्त्यासह विडा घऊन येण्यास सांय.’ असे म्हणाले. बाला भोळारास काय करतो हे पहावे जसे शिवाजीच्या मनात झाले आणि भोळारामाच्या जवळ घेऊन त्यांनी त्याला समर्थांची बाशा सांगितली. घोळारामाने उशीर न करता बापल्या कमरेस बसलेल्या तरवारीने जापले मुंडके छाटून ते शिवाजी महाराजांच्या हातात दिले. ते पाहून शिवाजीस कंपच सुटला. कापत कापतच येऊन त्यांची ते मुंड के समयापुढं ठेविले. हमत हसत समर्थांनी त्या मुंडक्याच्या तोंडातील विटा खाल्ला. व भाऊ | पहा वर. अशा मनुष्याने दिलेला साबुल घ्यावा की न घ्यावा है तूच सांग.’ असे म्हणाले. नंतर ते मुंडके घडावर ठेवताच भोलारामाचे शरीद पूर्ववत झाले.

घशा रीतीने समर्थांच्या चरित्रामध्ये अनेकानेक विविध घटना आहेत. या सर्व सांगायला आपल्याजवळ तितका वेळ नाही त्यामुळे अगदी थोडक्यात त्याचा परामर्श घेतला आहे. गुरुभक्तिपूर्वक त्या समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास समर्थांचे समर्थत्व आपणा सर्वांचे लक्षात येईल, असो.

तुम्हा सर्वांना सुबद्धी सुचून दिव्य जीवन कंठित असताना सुखरूप जीवन कठा असा आपणा सर्वांना माझा आशीर्वाद आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

home-last-sec-img