Literature

श्रीसमर्थ रामदास स्तोत्रम्

आदर्शान्तरबिंबितं खलु यथा दृश्यं मूधैव स्फुटम्।
तद्वद्विश्वमिदं विभाति सकलं यस्मिन् परे बस्तुनि।।
चित्सामान्यसदेकतो न च कदा यस्मिन् विकारःक्वचित्।
तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवम्।।१।।
आरशात प्रतिभासित झालेले दृश्य हें ज्याप्रमाणे खरोखरच खोंटे असतें त्याप्रमाणें हे सर्व (नामरूपात्मक) विश्व ज्या सर्वश्रेष्ठ वस्तूमध्ये (म्हणजे परब्रह्मात) स्पष्टपणे मिथ्या दिसते व ज्याच्यामध्ये स्वसंवेद्यत्व, सर्वव्याकपत्व, सश्वर व एकत्व ह्या बाबतीत केव्हांहि व कोठेंहि विकार होत नाही त्या सच्चित्स्वरूप अत्यंत शुद्ध, कल्याणस्वरूप गुरुरामदासांना मी नमस्कार करितो.

बीजस्यान्तरवर्तिवृक्षसदृशं विश्वं यदेतन्महत्।
यस्यां सूक्ष्मतयाधितिष्ठति पुरा माया मृषा सा परम्।।
यञ्चाच्छादयतीव चित्रमिति तद्यत्सत्तया व्याकरोत्।
तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवम्।।२।।
बीजामध्ये असणाऱ्या वृक्षाप्रमाणेच हे विस्तृत जग (जगदुत्पत्तीच्या) पूर्वी जिच्यात सुक्ष्मरूपाने राहते ते अनिर्वचनीय माया पुन्हा (जगत् उत्पन्न करण्याच्या संकल्पानंतर) ज्याच्या अस्तित्वाचा आधार होऊन त्या (अव्यक्त जगाला) मिथ्या, (विविध नामरूपामुळे सर्वांना) आश्चर्य वाटणाऱ्या रूपामध्ये जणू काही आच्छादिते व अशाप्रकारे स्पष्ट करते त्या मायेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या त्या सच्चित्स्वरूप अत्यंत शुद्ध, कल्याणस्वरूप गुरुरामदासांना मी नमस्कार करितो.

सृष्ट्वाSध्यासत एव विश्वमखिलं जीवेशबंधादिकम्।
सा यस्मिन् किल भाति सूर्यकिरणे माया मृगांंभो यथा।।
यत्स्मृत्यैव पुनः स्वचेष्टितमिदं त्यक्त्वैत्यभावं स्वयम्।
तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवम्।।३।।
जीव, ईश, बंध इत्यादि भावनांनी युक्त असे अखिल विश्व आभासाने उत्त्पन्न करून ती माया, ज्याप्रमाणे सूर्यकिरणांत मृगजळाचा भास उत्पन्न होतो त्याप्रमाणे ज्यामध्ये खरोखर दिसते व ज्यांच्या स्मरणानेच आपण केलेले हे सर्व टाकून देऊन पुनः अभाव रूपांत माया जाते त्या सच्चित्स्वरूप अत्यंत शुद्ध, कल्याणस्वरूप गुरुरामदासांना मी नमस्कार करितो.

रज्वां सर्पविभासवद् वत मृषा मायेति यस्मिन् परे।
ब्रह्माहं निजवेदनेन ननु सा विद्येति संभाव्यते।।
जीवोSहन्त्विति भावनेन हि तथाSविद्येति च ख्यायते।
तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवम्।।४।।
मी ब्रह्म आहे या आत्मज्ञानाने मायेला खरोखर विद्या असें मानतात त्याचप्रमाणे मी जीव आहे या भावनेने तिला अविद्या म्हणतात, ज्याप्रमाणे दोरीच्या ठायी सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ ब्रह्माचे ठिकाणी ती मिथ्या आहे. अशा त्या सच्चित्स्वरूप अत्यंत शुद्ध, कल्याणस्वरूप गुरुरामदासांना मी नमस्कार करितो.

अन्यत्किंचन विद्यते नहि यतो यत्स्वात्मरूपं ध्रुवम्।
मायाकल्पितदेशकालकलना यस्मिन्न चित्रीकृता।।
अद्वैतामृतसौख्यसिंधुमगमद् धीर्यस्य बोधात्परम्।
तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवम्।।५।।
ज्या (परब्रह्मा) शिवाय दुसरे काहीच अस्तित्वात नाही व जें निश्चितपणे आत्मस्वरूप आहे, (मिथ्या) मायेमुळे मानल्या गेलेल्या देश, काल इत्यादी कल्पना ज्यामध्ये चित्रित झालेल्या नाहीत, ज्याच्या ज्ञानाने बुध्दी अद्वैत-अमृत-सौख्य सागराप्रत गेली आहे त्या सच्चित्स्वरूप अत्यंत शुद्ध, कल्याणस्वरूप गुरुरामदासांना मी नमस्कार करितो.

पंचरत्नात्मकमिदं स्तोत्रं पावनमुक्ततम्।
पठेद् गुरुमुखाच्छ्रुत्वा मुक्तिःस्वाद् गुर्वनुग्रहात्।।६।।
हे पंचरत्नात्मक पावन व उत्तम स्तोत्र गुरुमुखातून श्रवण करून जो म्हणेल त्याला गुरुकृपेने मोक्ष मिळेल.

।। इति श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य सद्गुरु भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्रीसमर्थरामदास स्तोत्रं संपूर्णम् ।।

home-last-sec-img