Literature

श्री गुरूनारायण स्तोत्रम्‌

(भुजङ्‌गप्रयातवृत्तम्‌)

तपस्वी प्रभुः पूर्णवैराग्यदीप्तो
निजानन्दसन्दोहतृप्तो वरेण्यः
चिदानन्दरूपेण राराजते यो
त्री लोकीगुरूं नौमि नारायणं तम्‌ ।।1।।
पूर्ण वैराग्याने झळकणारा तपस्वी असा प्रभू जो की आत्मानंदाचे दोहन करून संतृप्त असा आहे तो वरण करण्यास (अर्थात्‌ निवडण्यास, गुरू म्हणून मान्य करावा असा) योग्य आहे. तो अक्षय शाश्वत आनंदाने सुशोभित दिसतो. स्वर्ग, मृत्यु,पाताळ ह्या तिन्ही लोकांत जो गुरू म्हणून मान्य आहे त्या भगवान श्री नारायणाला मी वंदन करितो. ।।1।।

भवाब्धौ निमग्नान्विमूढांश्च दीनान्‌
चिदानन्दशुद्धाद्वयं ब्रम्ह सौख्यम्‌ ।
प्रबोधाय भूमापि योत्रावतीर्णः
त्री लोकीगुरूं नौमि नारायणं तम्‌ ।।2।।
ह्‌या संसारसागरांत जे मूढ गटांगळ्‌या खात आहेत त्यांना चिदानन्द सौख्य म्हणजेच ब्रम्हज्ञान अद्वयब्रम्हाचे ज्ञान करविणे साठी भूमा म्हणून जो प्रकट झाला त्या त्रिलोकीच्या सद्‌गरू नारायणाला मी वंदन करितो. ।।2।।

सृजानोरूतश्‌चोर्वशीनां समूहं
बभूवात्र यः शक्तिगर्वापहारी
महादृप्तकन्दर्पदर्पापहर्ता
त्री लोकीगुरूं नौमि नारायणं तम्‌ ।।3।।
उर्वशी आदि अप्सरांचा गर्व हरण करण्यासाठी तसेच कामदेवाचा दर्प हरण करण्यासाठी जो ह्‌या पृथ्वीतळावर श्री शंकर रूपाने अवतीर्ण झाला त्या त्रिलोकींच्या सद्‌गरू श्री नारायणाला मी वंदन करितो. ।।3।।

स्वलक्ष्मीं त्यजन्‌ दीनरक्षा कथं स्यात्‌
न भूयस्वशङ्‌कावृतो भक्तवृन्दः
तदर्थं य अस्ते कुबेरं गृहीत्वा
त्री लोकीगुरूं नौमि नारायणं तम्‌ ।।4।।
भक्तवृन्दाने शंका घेतली होती की स्वलक्ष्मीला सोडून हा परमेश्वर आपली दीनांची रक्षा काय करणार? (बळी राजा कडे हा द्वारपाल होवून राहीला) परंतु कुबेरला घेवून तो तेथे राहायला होता. त्या त्रिलोकींच्या गुरूचे मी चरणस्पर्श करितो. ।।4।।

निजेस्मिन्नमामेति सन्दर्शनाय
न लक्ष्म्यायुतो योत्र भक्तार्तिहन्ता
स्वरूपं विशन्तं परंब्रम्ह शान्तं
त्री लोकीगुरूं नौमि नारायणं तम्‌ ।।5।।
भक्तांचे दुःखदूर करण्यासाठी मी तसा नाही (उपरोक्त श्लोकांत म्हटल्या प्रमाणे)असे दाखविण्यासाठी स्वतःची पत्नी लक्ष्मी हिला सोडून तो येथे राहायला आणि आपल्या शांत परब्रम्ह स्वरूपांत तो तेथे अवतरला.त्या त्रिलोकींच्या गुरू नारायण ह्‌यास मी नमस्कार करितो. ।।5।।

गुरूनारायणस्तोत्रं यः पठेद्गक्तिसंयुतः ।
कामजित्सोत्र मुक्तश्च नारायणकृपावशात्‌ ।।6।।
जो गुरूनारायणाचे स्तोत्र भक्तियुक्त होवून पठण करील तो कामदेवास जिंकून मुक्त होवून नारायणाची कृपा संपादन करून यशस्वी होईल. ।।6।।

।। इति श्रीगुरूनारायणस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ।।

रचनास्थळ: कॉफी उद्यान, चिक्कमगळूरु
रचनाकाळ: मार्गशीर्ष शुध्द १५, पौर्णिमा, संवत्सर – १९४३
मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img