Literature

श्री देवीस्तोत्रम्‌

(शिखरिणी वृत्तम)

श्री पराविद्यारुपां निगमवनशोभां स्मरहरां। परब्रह्माकारां
निजकरुणदृष्ट्याऽवनकराम्‌।।
कृपापाङगां शान्तां दिविजनगणसंसेव्यचरणां। चिदानन्दां देवीं
मुनिजननुतां नौमि सततम्‌।।1।।
‘यया तदक्षरमधिगम्यते सा परा विद्या ।’ (मुण्डकोपनिषद) ‘अध्यात्मविद्या विद्यानाम्‌।’ (भ.गीता) जिच्याद्वारे अविनाशी स्वरुपाची प्राप्ति होते तिला पराविद्या मळणतात. सर्व विद्यामध्यें अध्यात्मविद्याच परा म्हणजे श्रेष्ठ विद्या आहे जी पराविद्यारुप आहे, जी वेदरुपी सुंदर अशा वनाची अति मनोहर शोभा आहे, जी कामादि अज्ञानांधकारास नष्ट करणारी दिव्य ज्योति आहे, बर्फामध्यें फक्त पाणीच असतें त्याप्रमाणें जिच्या साकारतेंत पूर्णपरब्रह्मच भरलेलें आहे, जी स्वतःच्या करुणापूरित दृष्टीने शरणागतांचे संरक्षण करते, जिचे नेत्र नेहमीच कृपापरिपूर्ण आहेत, जी नेहमती नितांत शांत असते, जिचीं दिव्य पदकमलें देवगणांकडून नेहमी पूजिलीं जातात, अशा मुनिगणवंदित, चिदानंदरुप, स्वयंप्रकाशी देवीस मी आत्मैक्यतेच्या दृढभावनेने निरंतर नमस्कार करतो. ।।1।।

रमोमावाणीति त्रिविधमपि रुपं तव शुभे।
परब्रह्माकारं प्रकटयति सच्चिसुखपदैः।।
शिवे! स्मारं स्मारं तव विमलरुपं निजसुखं।
नये कालं मातः! श्रुतिमथिततत्वार्थकलितः।।2।।
अर्थ—— हे नित्यमंगले ! सरस्वती, रमा, उमा हीं तुंझी त्रिविधरुपे , सत्‌ चित्‌, सुख या पदत्रयांची द्योतक असल्याकारणानें त्यांच्या द्वारें तुझ ें ब्रह्मरुपच प्रकट होत आह.े हे आनंदरुपिणे! श्रुतिमथि तत्वार्थाच्या विचारद्वारा निजसुखमात्र अशा तुझ्‌या विशुद्धरुपाने वारंवार स्मरण करीत करीत या अज्ञानजनित जगतांत मी आपला समय कंठीत आहे. ।।2।।

न रुपं नो लिङ्‌गं श्रुतिषु गदितं ब्रह्मण इति।
परं स्वार्थाय त्वां मम जननि!’ स्ांबोध्य कलये।।
भवे! पुत्रस्नेहादवसिहि ममाशेयमखिला।
यथा मातृस्नेहो विदित इति नो ब्रह्म च तथा ।।3।।
ब्रह्मास कोणतेंच रुप नसतें व त्यास स्त्रीपुषादि लिंग भेदहि असत नाहीं. ब्रह्म स्त्रीपुरुषभेदरहित व अरुप असूनहि त्यास स्वार्थबुद्धीने आई या भावनेनें समजतो. माझ्‌या या भावनेनुसार ”आई” असे म्हणण्याचने, त्या रुपांतच तें ब्रह्म व्यामोहजनक अशा या ससारांत पुत्रस्नेहावश होऊन माझं े संरक्षण करील आशा या माझय्‌ ा भावनेंत लपलेली आहे. यथा यथोपासते तथैव भवति” ब्रह्माची ज्या भावनेनें उपासना केली जाते त्याप्रमाणें फळ मिळते, असे श्रुतिमातेचें म्हणणे आहे. आई अत्यंत प्रेमळ असून तिचे मुलांवर किती प्रेम असतें याचा अनुभव असल्यानें मातेच्या स्वरुपातच ब्रह्मोपासना करणें मला योग्य वाटतें. ब्रह्माच्या ठिकाणी मातेची भवना न ठेवल्यास तें निर्गुण, निर्विकल्प, अकार्य ब्रह्ममय रक्षण करील किंवा नाहीं याची मला शंका वाटते. ।।3।।

त्रयाणां लिङगानां श्रुतिषु तव नामानि विमले! परं
मातृस्नेहादचिनवमिद वै स्वहितद्दम्‌ई।
यथा माता स्निह्येत्तदपि मयि ते प्रीतिरधिका।
न माता ब्रह्मैक्यं किल वितनुते त्वं न च तथा।।4।।
श्रुतींमध्ये पुरुष, स्त्री नपुंसक या तिन्ही लिंगातून ब्रह्मवाचक नांवे आली आहेत. मीहि माझ्‌या हितासाठी मातृस्नेहाच्या विशेषते मुळें या ठिकाणी स्त्रीलिंगी नांवच अत्यंत प्रेमाने निवडिले आहे. तूं या स्वरुपांतच ब्रह्माची सर्व लक्षणें धारण करीत असलीस तरीहि मातृभावाच्या विशेषतेमुळं े तूं जास्तच प्रेमळ वाटतेस आणि त्यामुळें आम्हा बालबुद्धी अज्ञानी जनांचे या भवदुःखसमुद्रांत निःसंशय रक्षण होईल. ब्रह्माचेच स्वय ं असं े हे रुप प्राप्त झाल्यानें त्याचा स्त्री देहाच्या पापयोनित्वाशीं कोणताच संबंध रहात नाहीं. तुझं े रुप नित्य विशुद्ध रहाणारेंच आहे. हे विमले ! तुझ्‌या यथार्थ ब्रह्मरुपांत माझी मातृभावना असली तरीहि मी तुला सामन्य स्त्री प्रमाणे मानीत नाहीं. सामान्य मातेच्या योग्यतेपेक्षां तुझी योग्यता अनंतपटीने अधिक आहे. सामान्य माता आपल्या खर्‌या हिताच्या दृष्टिने आपल्या वचनानें त्यास ब्रह्मबोध करीत नाहीं व त्यास ब्रह्मस्वरुपांत विलीनहि करीत नाहींसामान्य मातेचा जीवकोटींत अंतर्भाव होत असल्याने जीवभावाचेंच ती शिक्षण देते. तूं तशी नाहींस. तू स्वतः ब्रह्मरुप असल्याने मला ब्रह्मस्वरुपतेचा उपदेश देऊन, या संसार व्यामोहातून सोडवून, ब्रह्मरुपच करतेस, ”सर्वे देवाःदेवीमुपतथु”। काऽसित्वं महादेवी ?। साऽब्रवीदहं ब्रह्मरुपिणी।” (आथर्वणी श्रुतिः) सर्व देवगण देवीजवळ जाऊन त्यानी हे महादेवी! त्ूां कोण आहेस? असे विचारतांच देवीने ”मी ब्रह्मरुपीणी आहे.” असा आपला परिचय करुन दिला. मी ब्रह्मास आई समजण्यापूर्वीहि तें मातृभावाचें वैशिष्ठ्य जाणून, स्वयं एकवेळ मातृरुपांत प्रकट झालें होतें. असे श्रुतिमाता म्हणत असल्याने आतां त्यांत कोणतीहि चूक होण्याची शक्यता राहिली नाहीं.।।4।।

अपि ब्रह्मकारादपि च निजशक्तेर्विभवतः।
न मातस्त्वच्छ्रेष्ठं किमपि किल जाने स्फुटमिदम्‌।
यया शक्त्या कोऽपि प्रभवति च सा त्वं भवहरे।
त्वमेवैकं ब्रह्मस्वयमभिहिंतं भेदरहितम्‌।।5।।
हे माते! या देवीस्वरुपांत तूं ब्रह्मरुपहि आहेस आणि तुझ्‌या सर्वशक्तिरुपतेंत आणखी एक वैशिष्ठ्य आहे. कारण मजसारख्या अशक्तांस स्वरक्षणासाठीं तूं आधार आहेस असेच वाटते. आपल्या ब्रह्मरुपतेने व अतुल्य निजशक्तिमत्वाच्या अनंत वैभवानें हे माते ! तूं सर्वश्रेष्ठ आहेस तुझ्‌यापेक्षां कोणी श्रेष्ठ आहे असे मला माहित नाहीं हा माझा सर्वानुमत निर्धारित सिद्धांत आहे. कोणत्याहि शक्तीपेक्षां समर्थ अशी कोणती शक्ती असेल तर ती तूंच. हे भवहारिणी! जे स्वयं निजनित्यनिर्विकारतेनें या संसारभर व्याप्त आहे तेंच भेदरहित, निरतिशयानंदरुप अद्वितीय ब्रह्म तूंच आहेस. ।।5।।

सदेकं ते रुपं बहुविधतया वेदकथितं।
स्वभक्त्या सेवन्ते सकलजनसौख्यं वितनुषे।।
त्वमेका विश्वादौ त्वमिह सकलान्तर्बहिरपि।
त्मेवैका चान्ते सकलमुपसंहृत्य रमसे।।6।।
”एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति। एकं सन्तं बहुधा कल्पयन्ति।” भिन्न—भिन्न उपासकांसाठीं अनेक नामरुपाद्वारें विप्रगण ब्रह्मरुपांस दाखवितात. ब्रह्मरुप हे अद्वितीय असलं े तरी त्यांत बहुविध नामरुपाची कल्पना केली जाते, असें श्रुतिमातेचें म्हणणें आहे. हे विश्व मंगले! तुझ ें एकमेव रुपच श्रुतींनी अनेक रुपांत दर्शविलें आह.े त्यापैकीं एक किंवा सर्वरुपांत तूंच अभिव्यक्त होतेस, हे जाणून जे कोणी तुझी उपासना करतात त्या सर्वांना तूं ब्रह्मानंद प्रदान करतेस. सर्वांच्या पूर्वी तूंच होतीस व तुझ्‌या ब्रह्मरुपतेमुळें तू सर्व ठिकाणी अंतर्बाह्यव्यापून आहेस आणि शेवटी सर्वांचा आपल्या रुपांत अंतर्भाव करुन (उपसंहार करुन) तूं आपल्या एकमेवाद्वयं े ब्रह्म रुपांतच रहातेस. ”अहमेवास पूर्वं तु नान्यत्किञिचन्नगघिपा, हे पर्वतराज ! या सर्वापूर्वी मी एकटीच असून दूसरें कांहीहि नव्हते, इत्यादि तुझी वचने देवीगीतेत आहेस. ।।6।।

त्वमिन्द्रस्त्वं ब्रह्मा रविरपि च चन्द्रो हरिहरौ।
नरस्त्वं नारी त्वं सकलदिविजा देव्य इति यःहर।ै।
धृतिः प्रज्ञा मेधा मतिरपि गतिस्त्वं श्रुतिनुते!।
त्वमेवं यद्‌भूतं भवदिति भविष्यत्तदपि च ।।7।।
हे वेदवंदिते ! तूंच ब्रह्मा, तूंच विष्णु, तूंच शंकर, तूंच इंद्र, तूंच सूर्य, तूंच. चन्द्र तूंच सकल देव व सकल देवता आहेस हे अखिल स्त्रीपुरुष वस्तुतः तुझींच रुपें होत. धृति, प्रज्ञा, मेधा, बुध्दि ही सर्व तुझींच नावें आहेत. तूंच सर्वांची एकमेव व अंतिम गति आहेस. जें आज पावेतों झालें, तें आज होत आहे. व जें कांही भविष्यांत होणार आहे, तें सर्व तुंच एकमेव आहेस, ”अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदेवैः। अहं मित्रावरुणावुभौे बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमविश्वनावुभौ।। अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधाम्यहम्‌। विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि।” (देवी उपनिषत्‌) इत्यादि तुझ्‌या मुखांतून बाहेर पडलेल्या वचनांवरुन तुझें सर्वात्मरुप प्रकट होत असून मी त्याचाच अनुवाद केला आहे. ।।7।।

यथाब्धौ फेनः स्यात्त्वयि जगदिदं यज्जडमिति।
तरङगं : कल्लोलस्त्वयि जननि! च्ेाशोऽपर इमा।ै ।
यथाब्धिः स्यादेकस्त्रिभिरपि च रुपैर्भवनुदे!।
त्वमेका चिन्मात्रा सुखजलधिरेभिस्त्रिभिरपि ।।8।।
महासागरांतील फेस पाण्यापेक्षां निराळा वाटतो. त्याप्रमाणे हें नामरुपात्मक जगत्‌ तुझ्‌या चिन्महोदधींत तुझ्‌या ज्ञानरुपतेपेक्षां काहं ीस े निराळेंच वाटते. ईश—जीवांत ज्ञानाचा प्रादुर्भाव झाल्यानें हीं दोन्हीं समुद्रांतील तरंग— कल्लोळाप्रमाणें तुझ्‌या चिन्मात्रस्वरुपांत वाग्‌——व्यवहारमात्रेमध्यं े भिन्नताच दाखवितात. फसे , तरंग व कल्लोळ या तिन्ही रुपांत एकमेव समुद्रच ज्याप्रमाणे असतो त्याच प्रमाणे हें भवज्ञानविनाशिनी! जगत, जीव व ईश रुपामध्यं े तूंच एक अखंड चिन्मात्रसुखमहोदधि आहेस. तुझ्‌या अविकारी सच्चिदानंदरुपाशिवाय दूसरें कांहीहिं नाहीं. ”एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन।” हें सर्व तत्वतः एक सच्चिदानन्दैकरस परब्रह्मच आहे. खरें सांगायचें तर यांत थोडेंहि भिन्नत्व व न। नात्व मुळींच नाहीं असें श्रुतिमातेचें म्हणणें आहे. ।।8।।

देवीस्तोत्रमिदं पुण्यं पवित्रं भूवि पावनम।
पावयत्यखिलाञजीवान्‌ गंगेव किल सर्वदा।।9ं।।
हे पुण्यपवित्र देवीस्तोत्र या भूतलावर परम पावन असं े आह.े श्रीशंकराच्या जटेमधून वहाणार्‌या श्रीगंगाजलाप्रमाणे हें स्तोत्र सर्वांना खात्रींने पावन करतें.

श्रीसमर्थरामदासानुगृहीतरामपदपकञजभृङगायमानश्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचितं महाराष्ट्र भाषानुवादसहितं श्रीदेवीस्तोत्रं सम्पूर्णम।।

मराठी अनुवादक— सौे. नलिनी पाटील, इन्दूर

home-last-sec-img