Literature

श्री धेनूस्तोत्रम

पूर्वपिठिका-
श्रींची गोमातेबद्दल असणारी पूज्यश्रद्धा त्यांनी स्वतःच्या आश्रमात भव्य गोशाळा बांधून, तिची योग्यसुव्यवस्था ठेवून व स्वतः गोव्रती बनुन व्यक्त केली आहे हे सर्वश्रुत आहे. गाय ही तेहतीस कोटी देवतांचे वसतिस्थान असे आपण मानतो. म्हणजेच गायीची स्तुती-पूजादि केल्याने ओघानेच तेहतीस कोटी देवतांची स्तुती-पूजनादि केल्याचे आपणास श्रेय प्राप्त होते. देहारोग्य ऐश्वर्यादी लौकिकच नव्हे तर भक्ती ज्ञानादि पारलौकिक सुखही आपणास या कामधेनूच्या सेवेने घरबसल्या प्राप्त होऊ शकते. प्राचीन काळी राजाची सम्राटता, मानवाची श्रीमंती, आणि राष्ट्राची सुबत्ता गायीच्या खिल्लारांच्या संख्येवर अवलंबून असते. गाय हे धन समजले जाते. खेड्यातून ‘मजकडे खंडीभर लक्ष्मी आहे’ असे अभिमानाने सांगतात.
गोवत्सद्वादशी या दिवशी श्रींनी हेच सूत्र हातात काही न घेता जमिनीवर लिहून दाखवून सर्व आश्रमा वासियांस गोमातेची महत्ता पटवून दिली.

(वसन्ततिलका वृत्तम्)

मातर्नमामि चरणांस्तव पावनांश्च ।
संसारनावइतिय हृदभावभक्त्या ।।
पारं नायशु तवपुत्रमिमं सुरीत्या ।
संसारसिंधुतरणं हि तवाश्रेयण ।।१।।

हे माते ! ( सर्वांना ) पावन करणाऱ्या तुझ्या चरणांना मी वंदन करितो. तू संसारसागरातील नाव आहेस म्हणून तुझ्या या मुलाला अत्यंत भक्तिभावामुळेच चांगल्या रितीनें ताबडतोब ( संसारसागरातून ) पलीकडे ने कारण तुझ्या आश्रयामुळेच संसारसागर पार करता येतो. ।।१।।

देवाश्च देव्य इतिय निवसन्ति धेनौ ।
गोपूजनेन निखिलाश्च भवन्ति तृप्ताः ।।
आयुघृतं पय इदं भवतीह वीर्य ।
मात: स्तुतासी बहुधा श्रुतिभिस्त्वमित्थम् ।।२।।

देव-देवता गाईंमध्ये वास करीत असतात. म्हणून ते सर्व गोमातेच्या पूजनाने आनंदित होतात. तुझे तुप हे प्रत्यक्ष आयुष्य आहे व दूध हे वीर्य आहे अशाप्रकारे हे माते वेदांनी तुझी अनेक प्रकारे स्तुती केली आहे. ।।२।।

ओजो धृति: सुमतिरेवमतीवशान्तिर्ज्ञानं च
भक्तिरपि नित्यमदैन्यमेवम् ।।
मातस्त्वदीय पयसो घृततस्ततस्तद्
वांछंन्ति नित्यममरा: कीमुत्यान्यमर्त्या:।।३।।

हे माते ! देव तुझ्या दुधापासून आणि तुपापासून सामर्थ्य, धैर्य, सुबुद्धी, अत्यंतिक शान्ति, ज्ञान, भक्ती व नित्य सुस्थिती इत्यादी विविध गोष्टींची नेहमी इच्छा करतात. मग इतर मर्त्यां बद्दल काय सांगावे? ।।३।।

अग्निर्यथेंघनमिदं स्तुतपंचगव्यं
पापं तथा दहति सत्यमितीह मत्वा।।
मातः पिबन्ति खलु वेदरताश्च विप्राः
पुष्णासि पासि सकलान्परिशुद्धदेहा ।।४।।

ज्याप्रमाणे अग्नी सर्पण जाळतो त्याप्रमाणे ज्याची स्तुती केली आहे असे पंचगव्य खरोखर पापाचे दहन करते असा विचार करून हे माते ! या जगात वेदांत रमान होणारे ब्राम्हण त्या पंचगव्याचे प्राशन करतात व संपूर्ण शुद्ध देह असलेली तू त्या सर्वांचे रक्षण करतेस व पोषण करतेस ।।४।।

यं वर्णयन्ति निखिलाः श्रुतयः सदैव
ब्रम्हेति कृष्णभगवान् स हि देवदेव: ।।
सेवां तवेह कृतवान् किमु माद्रुशाश्च
किं वर्णयामि तव भाग्यमितो महात्म्यम् ।।५।।

जिचे सर्व वेद नेहमी ब्रह्म म्हणून वर्णन करतात व देवांचा देव भगवान श्रीकृष्ण यांनी ज्या तुझी सेवा केली आहे त्या तुझी माझ्यासारख्यांनी काय सेवा करावी? मी तुझे महात्म्य व भाग्य काय वर्णन करू? ।।५।।

(शालिनिवृत्तम्)

कुर्वन्सेवां प्रत्यहं भावभक्त्या स्तोत्रं धेनोर्यः पठेध्दर्षयुक्तः ।।
प्राप्य ज्ञानं भक्तिमैश्वर्यमेवं देहारोग्यं मोदते मोदते च ।।६।।

जो कोणी भक्तिभावाने दररोज गायीची सेवा करून अत्यंत आनंदित मनाने हे स्तोत्र पठण करील तो ज्ञानभक्ती ऐश्वर्य शारीरिक आरोग्य प्राप्त करून अत्यंत आनंदित होईल ।। ६।।

रचना :-श्रीधर स्वामी, गोवत्स द्वादशी रचनास्थल वरदपूर.

home-last-sec-img