Literature

श्री नृसिंह स्तोत्रम्

पूर्वपीठिका-

सायंकाळच्या आल्हाददायक हवेंत निसर्गाची मुग्ध करून सोडणारी रमणीय शोभा पहात पहात वरदपूर पर्वताच्या शिखरावरील कुटीसमोर श्री स्वामीजी सहज इकडे तिकडे फिरत होते. त्या वेळी श्रींचे प्रथम शिष्य श्री गणपतीमास्तर जवळच उभे होते. तेच सर्व व्यवस्था पहात असत. श्रींची दृष्टी पर्वताच्या पायथ्याकडे गेली. त्यावेळी उत्तरेकडील भागात एक पडकी इमारत दिसली. ‘हे काय आहे?’ अशी श्रींनी विचारणा करता, ‘ते एक नरसिंहाचे पडके देऊळ आहे. त्यात मूर्ती नाही व गेले ५०-६० वर्षांपेक्षा जास्त दिवसापासून पूजाहि होत नाही.’ अशी माहिती मिळाली. श्रींनी “ते देऊळ शक्य तो लवकर बांधून त्याठिकाणी श्रीनरसिंहाची रोज पूजा होईल असे करा.” अशी आज्ञा दिली. लवकरच ते देऊळ बांधून पूर्ण झाले. एका गृहस्थाने श्रीशंकराची पिंडी व श्री नरसिंहाची पंचधातूची छोटीशी मूर्ती पण आणून दिली. पुढे आलेल्या श्रीनरसिंहजयंतीस श्रींनी त्याची स्थापना केली. त्या मूर्तीवर केलेले हे स्तोत्र आहे.

(सुरनिम्नगा वृत्तम्)

भवनाशनैकसमुद्यमं करूणाकरं सुगुणालयं।
निजभक्ततारणरक्षणाय हिरण्यकश्यपुघातिनम्।।
भवमोहदारणकामनाशनदुःखवारणहेतुकं।
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम्।।१।।
(हे मानवा ! आपले कल्याण व्हावें असें तुला वाटत असेल तर) संसाराचा नाश करून मुक्त करणे हाच त्याचा उद्योग आहे. करुणासागर, गुणश्रेष्ठ, आपल्या भक्तांचे तारण व रक्षण यासाठी हिरण्यकश्यपू दैत्याचा नाश करणाऱ्या, प्रपंचमोह व काम नष्ट करणाऱ्या, दुःखनिवारण हाच प्रधान हेतू असलेल्या पवित्र, सुखसागर, अद्वितीय अशा नारसिंहाची भक्ति कर.

गुरू सार्वभौममर्घातकं मुनिसंस्तुतं सुरसेवितं।
अतिशांतिवारिधिमप्रमेयमनामयं श्रितरक्षणम्।।
भवमोक्षदं बहुशोभनं मुखपंकजं निजशांतिदं।
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम्।।२।।
तसेच सर्वश्रेष्ठ तारक गुरू, मुनींनी स्तविलेल्या, ज्याची सेवा देव करीत असलेल्या, समुद्राप्रमाणे शांत असणाऱ्या, दुर्जेय, अनुमान दुःखरहित आश्रितांचे रक्षण करणाऱ्या मुक्तिप्रद, अति सुंदर मुखकमलयुक्त, शांतिप्रद, पवित्र, सुखसागर, आनंदस्वरूप नारसिंहाची भक्ति कर.

निजरुपकं विततं शिवं सुविदर्शनायहितत्क्षणं।
अतिभक्तवत्सलरूपिणं किल दारुतः सुसमागतम्।।
अविनाशिनं निजतेजसं शुभकारकं बलरूपिणं।
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम्।।३।।
हे मानवा ! विशालरूप धारण करणाऱ्या, दर्शन होता क्षणींच कल्याणकारी, भक्तांविषयी दर्यादचित्त, दातृत्वयुक्त, अविनाशी, तेजस्वी, बलशाली, कल्याणप्रद, पवित्र, सुखसागर व सर्वश्रेष्ठ नारसिंहाची भक्ति कर.

अविकारिणं मधुभाषिणं भवतापहारणकोविंद।
सुजनैःसुकामितदायिनं निजभक्तहृत्सुविराजितम्।।
अतिबीरधीरपराक्रमोत्कटरूपिणं परमेश्वरं।
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम्।।४।।
हे मानवा ! अविकारी, मधुरभाषी, भवतापहारी, कुशल, सज्जनांचे मनोप्सित पूर्ण करणाऱ्या, आपल्या भक्तांच्या हृदयात विराजमान होणाऱ्या अतिवीर, धीर, पराक्रमी, उत्कट रुपधारी, परमेश्वर, पवित्र, सुखसागर अशा नारसिंहाची भक्ति कर.

जगतोSस्य कारणमेव सच्चिदनंतसौख्यमखंडितं।
सुविधायिमंगलविग्रहं तमसःपरं सुमहोज्वलम्।।
निजरुपमित्यतिसुंदरं खलुसंविभाव्य हृदिस्थितं।
भजपावनं सुखसागरं नरसिंहमद्वयरूपिणम्।।३।।
हे मानवा ! जगताचे कारण असणाऱ्या, अखंड, सत्य, ज्ञान, अनंत सौख्यस्वरूप, मंगल समृद्धिरूप देह असलेल्या, देदीप्यमान, अतिउज्वल, सुंदर, समजण्याजोगे, हृदयात वास करणारे असे रूप असलेल्या, पवित्र, सुखसागर ब्रह्मस्वरूप नारसिंहाची भक्ति कर.

पञ्चरत्नात्मकं स्तोत्रं श्रीनृसिंहस्य पावनम्।
ये पठंति मुदाभक्त्या जीवन्मुक्ता भवन्तिते।।६।।
श्री नारसिंहाचे पवित्र, पंचरत्नात्मकस्तोत्र जे भक्तीनें, श्रीधरस्वामिना विरचितं श्रीनरसिंहस्तोत्रं संपूर्णम्।।

रचनाकाळ: श्रीनृसिंहजन्मोत्सवः
रचनास्थळ: वरदपुरम

home-last-sec-img