Literature

श्री बदरीनारायण स्तोत्र

यो नारायण आत्मरूप इति यज्जानाम्यहं तत्त्वतः
यस्मिन् सर्वमिदं प्रकल्पितमहो रज्ज्वां यथाहिर्वृथा।
मायायाविनिवर्तकं निजमहो ब्रह्मेति यः श्रूयते
नित्यं तं बदरीश्वरं गुरुवरं सच्चित्सुखं नौम्यहम्।।१।।

जो नारायण आत्मरूप (परब्रह्मरुप) आहे हे मी खरोखर जाणतों, ज्याप्रमाणे दोरीच्या ठिकाणी सर्पाची खोटी कल्पना केली जाते त्याप्रमाणे अहो! ज्याच्या ठिकाणी हे सर्व जग कल्पिले जाते, ज्यास मायेचा नाश करणारे आत्मतेज (ब्रह्म) असे म्हणतात त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ठ बदरीनाथांचे मी स्तवन करतो.

ब्रह्मैक्यं निजपावनं सुरुचिरं मायाविहीनं परं
ज्ञात्वा सर्वमतीत्य मायिकमिदं जीवेश-विश्वादिकम्।
यस्मिन्नित्यमहं जले जलमिव प्राप्यैकतां संस्थितः
नित्यं तं बदरीश्वरं गुरुवरं सच्चित्सुखं नौम्यहम्।।२।।

स्वतःला पावन करणारे , सुंदर, मायाहीन, सर्व असे ब्रह्मैक्य जाणून मायिक असे जीव, ईश्वर व विश्व इत्यादींच्या पलीकडे जाऊन ज्याप्रमाणे पाण्यात पाणी एकरुप होते त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये मी एकरुप होऊन राहिलो आहे त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ठ बदरीनाथांचे मी स्तवन करतो.

एकस्मिन् कथमीदृशं जगदिदं मायाSपि वा भाव्यते
नैकस्मिन्नितरस्य भाव इति यत्सत्यं श्रुतेः सम्मतम्।।
द्वैतं हेतुरहो भयस्य गदितं ज्ञात्वैक्यमालंब्य च
नित्यं तं बदरीश्वरं गुरुवरं सच्चित्सुखं नौम्यहम्।।३।।

एका वस्तूमध्ये दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व असू शकत नाही हे श्रुतींनी मान्य केले आहे तर त्या एका (ब्रह्मा) मध्येच हे सर्व जग किंवा ही माया कशी अभिव्यक्त होऊ शकते? द्वैत हेंच भयाचे मूळ सांगितले आहे. अद्वैत जाणून व त्याचा अवलंब करून त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ठ बदरीनाथांचे मी स्तवन करतो.

वंध्यापुत्रजनिर्यथैंव किलतद्धेतुस्तथैंव मृषा
विश्वं, तस्यच कारणं तदपि चेन् मिथ्येंद्रजालादिवत्।।
यस्मिन्नैव जगन्नहेतुरपि या मायाSस्य वा प्रस्फुरेत
नित्यं तं बदरीश्वरं गुरुवरं सच्चित्सुखं नौम्यहम्।।४।।

ज्याप्रमाणे खरोखर वंध्यपुत्रजन्म खोटा आहे त्याप्रमाणे त्याचा हेतुहि मिथ्या आहे. विश्व व त्याचे कारण हे जर असतील तर तेहि इंद्रजालाप्रमाणे मिथ्या आहेत. ज्याचे ठिकाणी जगत् व त्याचे मूळकारण माया हे (परमार्थिक दृष्ट्या) स्फुरणार नाहींत त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ठ बदरीनाथांचे मी स्तवन करतो.

भ्रांत्युत्थं यदि वा भवेद्भवतु तज्जीवेश-विश्वादिकं
मायामात्रमिदं न मेSस्ति नितरां भ्रांतेरधिष्ठानतः
यस्मिन् भूम्नि नरश्चयोविदिति वा नामापि न श्रूयते
नित्यं तं बदरीश्वरं गुरुवरं सच्चित्सुखं नौम्यहम्।।५।।

अथवा जीव, ईश्वर, विश्वादि सर्व भ्रांतीने उत्पन्न झालें असतील तर असू द्या. ते फक्त मायास्वरूप आहे व मी भ्रांतीचे अधिष्ठान असल्यामुळे त्याचा माझ्याशी मुळींच संबंध नाही. ज्या भूमाच्या ठिकाणी स्त्री व पुरुष हे नाव सुद्धा ऐकू येत नाही त्या सनातन सच्चित्सुख गुरुश्रेष्ठ बदरीनाथांचे मी स्तवन करतो.

जीवन्मुक्तिप्रदं शुद्धं श्रीनारायण-पंचकम्
पठनाच्छ्रवणादस्य जीवनमुक्तिमवाप्नुयात्।।६।।

हे नारायण पंचक शुद्ध व जीवन्मुक्तप्रद आहे. त्याच्या श्रवणाने किंवा पठणाने जीवन्मुक्ती प्राप्त होईल.

।।इति शिवम्।।

home-last-sec-img