Literature

श्री रामनाथ स्तोत्रम्‌

(वसन्ततिलकवृत्तम्‌)

यस्मात्परं न किल चापरमस्ति किञि्‌च—
ज्जायान्यकोपि हि तथा च भवेदणीयान्‌ ।
निष्कम्प एक इति योव्ययसौख्यरूपः
तं रामनाथममलं मुनिवन्द्यमीडे ।।1।।
ज्याच्यापेक्षा कुणी ही दूसरा श्रेष्ठ नाही, कणभर सुध्दा वरचढ झाला नाही आणि पुढे ही कोणी ज्याच्यापेक्षा कणभर सुध्दा महान झाला नाही अश्या निष्कंप न घटणार्‌या, स्थिर आणि अचल पदावर दृढ रहाणार्‌या, मुनिजनांकडून वंदित झालेल्या निष्कलंक अश्या श्रीरामनाथमुनिंना मी वंदन करितो. ।।1।।

रज्वां यथा मम विभाति फणीति मिथ्या
यस्मिंस्तथा बत विभाति विभेदभानं
योज्ञाननाशनविधौ प्रथितस्तमोरिः
तं रामनाथममलं मुनिवन्द्यमीडे ।।2।।
दोरीवर ज्या प्रमाणे सर्पाचा भास होतो (व आपल्याला भय उत्पन्न होते) आणि नन्तर भानावर येवून जेंव्हा त्यातील भेद आकलन होतो तद्वतच अज्ञानरूपी अंधःकाराचा प्रथमनाश कर्ता श्री मुनिजनमान्य अश्या त्या रामनाथांची मी स्तुती करतो. ।।2।।

शुक्तौ यथा रजतभानमिदन्तथैवं
यस्मिन्भवेद्‌भ्रमविभासित भोगभावः
यद्गक्तिरेव भवरोगनुदासुधेयं
तं रामनाथममलं मुनिवन्द्यमीडे ।।3।।
शिंपल्यावर ज्याप्रमाणे रजत म्हणजे चांदीचा भ्रम होतो व अंती ते समजते की हा भ्रमच होता त्या प्रमाणे हे भौतिक जगांतील सर्वच उपभेाग सुखदायक आहेत असा भ्रम होतो. तो शेवटी ह्‌यांच्या भक्तिने दूर होतो. भक्ति हेच त्या भ्रमरूपी दुःखसागराचे नाश करणारे, भवरोगाचा नाश करणारे अमृत आहे, हे मुनिवर रामनाथांमुळे ज्ञात होते म्हणून मी त्यांचे स्तवन करितो. ।।3।।

यः काममत्तगजमस्तकभेदसिंहो
यो विघ्नसर्पभवभीतिनुदग्दरूत्मान्‌
यो दुर्विषह्य भवतापविनाशचन्द्रः
तं रामनाथममलं मुनिवन्द्यमीडे ।।4।।
जो कामरूपी मदोन्मत्त हत्तीचे मस्तक फोडणारा जणू सिंहच आहे; विघ्नभयरूपी सर्पाला पळवून लावणारा बलशाली शक्तिमान’ आहे, भवतापरूपी दुर्विषाचा नाश करणारा अमृतवर्षा करणारा — जणु चन्द्रच आहे त्या निष्पाप मंगलमय अश्या श्रीरामनाथमुनिवरांना माझा प्रणाम आहे. ।।4।।

यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः
यज्जीव विश्व भवशोक भयातिदूरम्‌
सच्चित्सुखाद्वयमिदं हृदि यत्स्वरूपं
तं रामनाथममलं मुनिवन्द्यमीडे ।।5।।
ज्याचे स्पष्टीकरण वेदांनी नेति नेति’ (हे असे नाही,असे नाही) म्हणून केले आहे. भवशोकामुळे भयभीत असा जीव त्या परमतत्वाला ह्‌या विश्वापासून फारच दूरचा आहे असे मानतो त्या अज्ञानी जीवाला ह्या मुनिश्रेष्ठांनी असे समजावून दिले आहे,की तो परमेश्वर अगदी आपल्या निकट हृदयांतच आहे, जे मुनिश्रेष्ठ हे परमतत्व जे की अक्षय सुखाचा निधिचआहे’ हे समजावून सांगतात त्यांस मी वंदन करितो. ।5।।

।। इति श्रीरामनाथस्तोत्रम्‌ सम्पूर्णम्‌ ।।

मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img