Literature

श्री वामन स्तोत्रम्‌

(अनुष्टुप्‌छन्दः)

पयोव्रतस्य माहात्म्यं दर्शितुं योह्यवातरत्‌।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।1।।
पयोव्रताचे महात्म्य समजवण्यासाठीच ज्याने अवतार घेतला त्या वामनाला नमस्कार असो. ||1||

अहं भक्तवशोस्म्येतद्दर्शितुं योदितेस्सुतः।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।2।।
मी भक्तांच्या भक्तिनेच वश होतो हे दाखविण्यासच सिध्द करण्यासच अदितिपुत्र वामन ह्‌याचा श्री विष्णुंनी अवतार घेतला त्यांस वंदन असो।।2।।

पद्‌भ्यां व्याप्तं हि त्रैलोक्यं माहात्म्यँ स्वं व्यदर्शयत्‌
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।3।।
केवळ पावलांनीच त्रिभुवन व्याप्त केले हे दाखविण्यासाठीच ज्या वामनरुपाचे अवतरण सच्चिदानन्द विष्णुने केले त्यांच नमन आहे।।3।।

महत्वेपि महान्यद्वदणीयान्‌ यो ह्यणीयसः।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।4।।
महानतेत पण जो अतिमहान्‌ आणि लघुतेत पण अणूहूनही लहान त्या सच्चिदानन्द विष्णुरुपास वंदन करितो।।4।।

बलिर्यस्य कृपापात्रः कृत्वैवात्मनिवेदनम्‌‌।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।5।।
बलिराजा पण ज्यांस आत्मनिवेदन केल्यामुळे कृपा पात्र झाला त्या सच्चिदानन्दरुपी वामन अवतारास प्रणाम आहे।।5।।

दर्शितं येन सुप्रीत्या श्रेष्ठमात्मनिवेदनम्‌।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।6।।
ज्यांनी खर्‌या प्रेमाने आत्मनिवेदन हे श्रेष्ठ आहे असे संमत केले त्या सच्चिदानन्दरुपी वामन प्रभूस नमस्कार आहे।।6।।

अद्यापि द्वारपालो यो बलेर्भक्तिवशः प्रभुः।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।7।।
बलिराजाच्या भक्तिला वश होवून जो द्वारपाल म्हणून उभा राहण्यास आनंदाने तयार झाला तो सच्चिदानन्दरुपी वामनरुप विष्णु वंदनीय आहे।।7।।

निर्गुणे निष्क्रियो यो हि सगुणस्य क्रियोपि सन्‌ ।
वन्दे तं सच्चिदानन्दं वामनं विष्णुरुपिणम्‌ ।।8।।
जो निर्गुण असून सगुण पण आहे तद्वत्‌च सगुणाची क्रिया पण तोच आहे त्या वामनरुपी विष्णुस मी वंदन करितो।।8।।

।। इति श्रीवामनस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ।।

home-last-sec-img