Literature

श्री वेङ्‌कटेशस्तोत्रम्‌

(शालिनीवृत्तम्‌)

भगवान परम परिव्राजकाचार्य श्री श्रीधरस्वामीविरचित

नाहं जाने संस्कृतं प्राकृतं वा
स्तोतुं त्वां भो नो श्रुतिं नो स्मृतिं च।
भक्तिर्ज्ञानं नापि योगस्तपोस्ति
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।1।।
हे व्यंकटेशा मी संस्कृत किंवा प्राकृत जाणत नाही. तुझी स्तुती करण्याकरिता हे महाराजा ! मी श्रुति किंवा स्मृति ग्रंथांचा ज्ञाता नाही. भक्ति, ज्ञान, तप, योग पण मला ज्ञात नाही. परंतु हे परमेश्वरा मला तू दर्शन दे.। ।1।।

नाहं याचे भोगसौख्यं दयालो
दुःख सर्वं जन्मना जायते यत्‌।
जानेहं त्वां ज्ञानदं मोक्षदं च
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।2।।
जत्मतःच जे दुःख भोगावे लागते ते सोडून आणि कोठले ही भोग सौख्य ह्‌याची मी याचना करीत नाही. हे दयाघना मी येव्हडेच जाणतो की तू ज्ञान देणारा दाता आणि मोक्षदाता आहेस. ।।2।।

देहोशुध्दो मूत्रविष्ठादिरूपः
ग्राम्यं सौख्यं कश्मलं दुःखरूपम्‌।
न स्त्रीपुत्रक्षेत्रवित्तानि याचे
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।3।।
मूत्र, विष्टा आदिचे आगर असे हे देह आणि त्यापासून मिळणारे हिणकस(निकृष्ट) असे सुख स्त्री पुत्र वित्त जमीन जुमला ह्‌याची मी वांछा करीत नाही, फक्त तूं मला दर्शन दे.(अशी मला तळमळ लागली आहे.) ।।3।।

त्वद्रूपेस्मिन्नद्वये चित्स्वरूपे
पुंस्त्री विश्वं जन्ममृत्युर्मनो मे।
मायाविद्या नापि तत्कार्यमीषत्‌
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।4।।
तुझ्‌या ह्‌या अश्या चित्‌ म्हणजे अविनाषी स्वरुपात स्त्री पुरुष जन्म मृत्यु माया अविद्या हे सर्व कार्य माझ्‌या मनाला समजत नाही. (मी त्यातील अंतर समजू शकत नाही) तूं फक्त मला दर्शन दे. ।।4।।

नायं देहो नेन्द्रियं नान्तरङ्‌गं
नायं लोको भाति सौख्याय मेद्य।
त्वत्तोन्यो नो तारको दीनबन्धो
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।5।।
मला आता हे जगत्‌ माझ्‌या सौख्यासाठी भले आहे असे वाटत नाही. हा देह, ही इंन्द्रियें, हा सर्व अंतरंग मला आनंदित करीत नाही, तर हे दीनबन्धो! तुझ्‌याशिवाय दूसरा मला आता तारणारा नाही, म्हणून हे देवा तूं मला दर्शन दे. मला तुझीच ओढ लागली आहे. ।।5।।

जानेहं त्वां ब्रम्हरूपं ह्यकायं
मायाविद्याशून्यमद्वैतरूपम्‌।
भक्तानां यत्पालने रूपधृक्त्वं
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।6।।
तूं ब्रम्हरुप असून अशरीरी (देहरुपाने नाहीस) आहेस. माया अविद्या आदिपासून अलिप्त आणि अव्दैतरुप आहेस. भक्तांचे पालन करण्यासाठी तूं रुपधारण करतोस हे व्यंकटेशा तूं मला दर्शन दे. ।।6।।

त्वत्सौख्यं भो नित्यशुध्दाभयं यत्‌
मायाविद्याजन्मकर्मादिरूपम्‌।
प्राप्तुं शक्यं किं भवेत्वां विनातो
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।7।।
नित्य सतत अभयकारक आणि शुध्दरुप असे तुझ्‌या प्राप्तीचे सौख्य हे माया अविद्या जन्म—कर्मांनीयुक्त अश्या मला काय प्राप्त होईल ? तर ते तुझ्‌याविना काय मिळणार म्हणून हे व्यंकटेशा तूं मला दर्शन दे. ।।7।।

श्रुत्या युक्त्या मत्सरूपं त्वमेव
ज्ञात्वापीयं बाधते कापि शङ्‌का।
मायौद्धत्यं वारणायैहि शीघ्रं
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।8।।
श्रुतिग्रंथानुसार स्वस्वरुप म्हणजे तूच आहेस, हे समजून सुध्दा काही शंका त्रास देतेच. हे मायारुपी अज्ञानाचे उध्दटपण असलेले नम्रताहीन असलेले विचारांचे सांवट (अंधकार, आभाळ)आले आहे ते दूर करण्यासाठी तूं धाव घे. हे व्यंकटेशा तूं मला दर्शन दे. ।।8।।

दीनोहं त्वां प्रार्थये भक्तितोत्र
नोपेक्षस्व स्वेन रूपेण पाहि।
मायाविद्याविश्वजीवेशशान्त्यै
देहि त्वं मे दर्शनं वेङ्‌कटेश ।।9।।
मी अत्यंत दीन अगतिक असा तुझी प्रार्थना करतो. की तूं माझी उपेक्षा करु नकोस. स्वतःच्या रुपाचा प्रसाद दर्शन रुपाने देवून तूं मला पावन कर. माया अविद्या विश्व आणि परमेश्वर ह्‌याचे आकलन करवून ज्ञान दान करुन मला शान्ति दे आणि तुझे दर्शन दे हीच विनन्ती आहे.।।9।।

(अनुष्टुप्‌छन्दः)

वेङ्‌कटेशस्तवः पुण्यो ज्ञानविज्ञानदः शिवः।
भवतापहरो नित्यं राजते शरदिन्दुवत्‌।।
वेङ्‌कटेशाचे स्तवन हे ज्ञान — विज्ञान प्रदायक व मंगल आहे. भवसागराचा जो ताप तो शांत करणारे असून ते शरद्‌ऋतुतील चन्द्रा प्रमाणे आल्हादकारक आहे.

।। इति श्रीवेङ्‌कटेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ।।

मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img