Literature

श्री समर्थपच्ञकम्

(अनुष्टुप्‌छन्दः)

यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं यथा।
देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमि तम्‌ ।।1।।
ज्या प्रमाणे शिंपल्यामधून मोती (म्हणजे मुल्यवान्‌ मणि ) उत्पन्न होतो त्या प्रमाणे मातृगर्भांतून उत्पन्न झालेले श्री समर्थ देशभक्तिरुपी अमृताने परिपूर्ण भरलेले होते त्यांस मी वंदन करितो ।।1।।

स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः ।
रामभक्तेर्य आरामः श्रीसमर्थं प्रणौमि तम्‌ ।।2।।
स्फूर्ति आणि शक्ति संचारित करणारा त्यांना आपल्या अमृतवाणीने शिवाजी राज्याच्या व इतर सैनिकांच्या हृदयांत उत्साहाचा बहार आणणारा जणुं काय वसंत ऋतुच, आणि त्याच प्रमाणे पुण्यकर्म आणि ज्ञान ह्‌यांचे जणु। सरोवरच अश्या श्री समर्थांना जे की सदा श्रीरामभक्तिमध्येच रममाण रहात होते त्यांना मी नमन करितो ।।2।।

अज्ञानतिमिरार्को यः सुधांशुः शान्तिदस्तथा ।
सत्तत्त्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थं प्रणौमि तम्‌ ।।3।।
अज्ञानरुपी अंधःकाराचा नाश करणारा जणूं सूर्यच, शान्ति प्रदान करणारा जणुं शीतल चन्द्रच, सत्‌ तत्त्वाचे दान करणारे( ज्ञानदान प्रसवणारे) रत्नच की काय अश्या श्री समर्थ रामदासांना मी भजतो ।।3।।

यस्तप्तहृत्सुधा वृष्टिर्यो दीनजनकामधुक्‌ ।
मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमि तम्‌ ।।4।।
जो संतप्त हृदयी जनांस सुधा (अमृतवृष्टी) आणि दीन असहाय लोकांना कामधेनु प्रमाणे यथा इच्छा तथा सर्व प्रदान करणारे असे गुरुरामदास ह्यांचा मी चरणस्पर्श करितो. मोक्षाची इच्छा करणार्‌यास त्यांना तसे ज्ञान देवून त्या—त्या मार्गाने कर्मकरण्यास प्रवृत्त करणारे असे रामदासस्वामी ह्‌यांस मी वंदन करितो ।।4।।

पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः ।
आनन्दवनवृक्षस्य श्रीसमर्थं प्रणौमि तम्‌ ।।5।।
ज्या प्रमाणे अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण त्या प्रमाणे शिवरायांचे श्रीरामदासगुरु, हे कल्पतरु प्रमाणे त्यांच्या आनंदवनांतील एक कल्पवृक्षच. अश्या दासांना मी प्रणाम करतो ।।5।।

श्लोकपच्ञकमेतद्यः स श्रध्दाभक्तितः पठेत्‌ ।
आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति ।।
ह्‌या पांच श्लोकांचा जो श्रध्दाभक्तिने पाठ करेल त्यास दीर्घायु, आरोग्य, ऐश्वर्य, भक्ति आणि मुक्ति मिळेल.

।। इति श्री समर्थपच्ञकम्‌ सम्पूर्णम्‌ ।।

रचनास्थळ: श्री क्षेत्र वरदपुरं
मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img