Literature

श्रुतिस्मृतिवचन

श्रुतिस्मृत्यदितो धर्मो ह्यधर्मस्तद्विपर्ययः ।

— श्रुतिस्मृतींनी सांगितलेला, निर्णित केलेलाच धर्म होय आणि त्यांनी निषेधिलेलाच अधर्म होय. श्रुतिस्मृत्युदितं धर्ममनुतिष्ठन् हि मानवः । इह कीर्तिमवाप्नोति प्रेत्य चानुत्तमं सुखम् । (मनु. अ. २१९) श्रुतिस्मृतींनीं निर्धारिलेल्या धर्माचेंच आचरण केलें असतां, यालोकों मनुष्य सत्कीर्ति मिळवून सुखानें नांदतो व देहान्तीं त्या परिशुद्ध परमात्म्याच्या अनंतानंत आनंदस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन मोक्ष प्राप्त करून घेतो. वेदांत देवपितृकार्याला विशेष महत्त्व दिले आहे. यानें सृष्टि चालते, ‘देवाण घेवाण’ हा सृष्टीचा नियम आहे. यज्ञादि कर्मापासून देवतांची तृप्ति आणि श्राद्धादि कर्मापासून पितरांची तृप्ति होऊन जगामध्यें धनधान्य, पाऊसपाणी, संततिसंपत्ति, आरोग्यभाग्य लाभून सर्वांचेच जविन दिव्य सुखासमाधानाचें होतें. यज्ञो विश्वस्य भुवनस्य नाभिः । यज्ञ हा विश्वाच्या स्थितीला कारण आहे. इच्छन्ति देवाः सुन्वन्तं न स्वप्नाय स्पृहयन्ति । (ऋग्वेद ८-२-१८) देवता यज्ञकर्त्या, सदाचारसंपन्न, पुरुषार्थशील, आस्तिक व विद्यासंपन्न भक्तांवर प्रेम करतात. नास्तिक लोकांवर त्यांचे प्रेम असत नाहीं. शुद्धाः पूता भवत यज्ञियासः । (ऋ. ५-५१-१) तुम्ही शुद्ध व्हा, पवित्र व्हा, आस्तिक व्हा, याज्ञिक व्हा, संघटित व्हा, भक्त व्हा, परोपकारी व्हा, सदाचरणी व्हा, असा श्रुति बोध करीत आहे. ऋतस्य पथा प्रेत ।( यजु. ७-४५) 

सत्यमार्गाचें अवलंबन करा व त्याचें फळ मिळवा, म्हणून श्रुतीचें सांगणे आहे. जीवनाचा राजमार्ग श्रुतीनें दाखविला आहे. सत्यस्य नावः सुकृतमपीपरन् । (ऋ. ९-७३-१) धर्मनिष्ठ सत्त्वशीलाला त्याच्या सत्याची नावच, त्याचें सत्याचरणच तारक होते. सत्कर्माच्या नावेंत बसलेलाच भवसमुद्र तरून जातो. संश्रुतेन गमेमहि । (अथर्व . १-१-४) — आपण वेदाच्या उपदेशाप्रमाणे वागू या.

home-last-sec-img