Literature

संघटना व तिचे महत्त्व

श्रुति पारमार्थिक निरतिशय सुखाचें जसें मार्गदर्शन करते त्याप्रमाणेच साध्य करून घेण्याकरितां कारणीभूत असणाऱ्या व्यावहारिक जीवनाच्या उन्नत आदर्शाचाहि पण उपदेश करते. परस्परसौहार्द आणि सहकारिता हीं व्यावहारिक जीवनास अत्यावश्यक आहेत. संगच्छध्वम् । संवो मनांसि जानताम् । देवा भागं यथा पूर्व संजानाना उपासते ॥ (ऋ. १०|१९१-२) एकत्र व्हा. उन्नतीच्या दिव्य मार्गाचा विचार करा. तुमचा उत्कर्ष साधा. प्रगतीकरितां यत्न करा. परस्परांत प्रेमळ आचरण ठेवा. तात्त्विक आचारविचार ठेवा. मन रिझविण्यासारख्या गोड विचाराचे प्रेमळ, सत्य आणि मृदु मधुर भाषण करा. परस्परांत स्नेह आणि परस्पराशी सहकार ठेवा. परस्परांचे सुख दुःख जाणा. परस्परप्रेमाने त्याच्या निवृत्तीचा उपाय योजा. परस्परांचे इंगित ओळखून सर्वच सन्मार्गाने जा. सन्मार्गाच्या जीवनांत एकमेकांस साहाय्य करा. सामुदायिक एकोप्याचे जीवन चालवा. तुमचे विद्वान पूर्वज एकत्र मिळूनच विचार करीत असत, सामुदायिक अनुष्ठान चालवीत असत, आपआपले वर्ण श्रमोक्त आचार अधिकारपरत्वे कायम ठेवून त्यांतून उन्नतीचा मार्ग आंखीत असत. आपल्या सदाचरणानें, सद्विचारानें व अनन्य भक्तीनेंहि परमात्म्याला संतुष्ट करीत असत. समानो मंत्रः समितिः समानी समानं मनः सहचित्त मे॒पाम् । समानं मंत्रमाभिमंत्रये वः समानेन वो हविषा जुहोमि । (ऋ. १०।१९१-३ )—तुम्हां सर्वांचे विचार समान रहस्यपूर्ण असावेत. तुमच्या परिषदा अचूक विचारांनी युक्त असाव्यात. उच्च ध्येयाच्या परिष्कृत आचार विचारांचा त्यांतून एकजुटीनें सारखा प्रसार व प्रचार होत राहावा. सर्वांचे मन शुद्ध असावे. राष्ट्रांत शुद्ध आचारविचारांचे पीक यावें. राष्ट्रांतल्या पुढान्यांत धर्मोपदेशकांत, महात्म्यांत व इतर समाजांत दिव्य संघटना दिसून यात्री. तुम्हां सर्वांचे विचार तुम्हां सर्वांच्या उन्नतीला कारण व्हावेत. अभ्युदय-निःश्रेयसाला सर्वतोपरि साधक होणारे आचार, विचार व उच्चार समाजांतून सर्वत्र पाहावयास सांपडावेत. हा समानतेने सर्वांना माझा समान उपदेश आहे. सर्वांनाहि माझी तात्त्विक शिकवण एकच आहे. तेव्हां सर्वांचाहि योगक्षेम उत्कृष्टपणे चालावा अशीच माझी उत्कट इच्छा आहे व त्याकरितांच माझा हा सर्व प्रयत्न आहे.

समानीव आकृतिः । समाना हृदयानि वः । समानमस्तु वो मो यथावस्सुसहासति ॥ तुमच्यांत एकी राहण्यासाठी तुमच्यांत परस्पर सहानुभूति असण्यासाठीं, परस्परांचे प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी, परस्परांचे परस्परांना साहाय्य मिळण्यासाठी तुम्हीं सर्वांनी एकोप्यानें राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, लौकिक आणि पारमार्थिक कर्तव्ये चालविण्यासाठी, राजकीय विषयांतहि दुमत न होण्यासाठी, तुम्हां सर्वांचा अभिप्राय एक असला पाहिजे.

करतश्रुति किती उपदेश करीत आहे पाहा! संघटनेत मोठी शक्ति असते. संघटना ही शक्ति होय. संघटना हे एक समाजाचे अनेकवच असते. येव थेंब सांचत तळे होते, तळ्याची नदी व नदीचा समुद्र होतो. बिंदूबिंदूचा मिळून सिंधु होतो अशी म्हण आहे. वरील श्रुतीचा अभिप्राय यांत व्यक्त आहे. जशी जशी संघटना होत जाईल त्या त्या प्रमाणांत परमात्म्याचे व्यापक स्वरूप समाजांत प्रगटत, समाजाला शक्ति लाभते, त्यामुळे सामुदायिक सकायार्ला जोम येतो.

home-last-sec-img