Literature

सगोत्रविवाह निषेध

सर्ववर्णेषु तुल्यासु पत्नीष्वक्षतयोनिषु । आनुलोम्येन संभूता जात्या ज्ञेयास्त एव ते ॥ (मनु. १०५ )

— ब्राह्मणादि चार वर्षांतहि त्या त्या वर्णाच्या शास्त्रोक विवाहाच्या परिशुद्ध स्त्रियांतून उत्पन्न झालेली संततीच त्या त्या वर्णाची म्हणून मानली जाते. अशामुळेच वंशान्त्रय राहातो. यांनाच त्या त्या जातीचे विध्युक्त संस्कार होतात. देवपितृकार्यांत यांनाच अधिकार पोहोचतो. हेच उत्तराधिकारी होतात. यांनाच उत्तरक्रियेचा अधिकार असतो. पुत्र म्हणून हेच म्हणवून घतात. पुनाम नरकात् त्रायत इति पुत्रः । – ‘पुत्’ नांवाच्या नरकापासून सोडवितो तोच पुत्र अशी पुत्राची व्याख्या अशा औरस संततीलाच लागू पडते.

ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः । चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचमः ॥ (१०१४)

— ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य म्हणवून घेणाऱ्या अशा या तीन आणि शूद्राची एक चौथी, मिळून चारच भारतातल्या मूळ आणि मुख्य जाती. या चारांशिवाय पांचवी म्हणून एकहि जात नाहीं. याहून वेगळ्या दिसून येणाऱ्या बाकीच्या सर्व पोटजाती. या पोटजातींना संस्कार नाही. मनुस्मृतीच्या दहाव्या अध्यायांत यांच्याविषयीचे विवेचन आहे. स्मृतिभ्रंथांतून वेगवेगळी नांवें आहेत. यांच्याकरितां वेगवेगळे व्यवसायहि नेमून दिले आहेत. अशी ही आर्य संस्कृति आहे. विश्वमान्य आर्य संस्कृतीच्या धर्मग्रंथांच्या प्रमाणेच त्या धर्मानुयायांचा विचार व्हावयास पाहिजे. त्यांच्या धार्मिक प्रणालीचें उल्लंघन न होईल असा न्याय देणे व त्यांच्याविषयींचा विचार करणें, राजकीय, सामाजिक कायदे त्याविरुद्ध न होतील याची काळजी घेणें राजकर्त्यांचे कर्तव्य आहे. इहपर उन्नत-सुखास कारण होणान्या उच्च संस्कारांचा आदर्श

कायम राखण्याकरितां व सरभेसळीनें ते संस्कार नष्ट होतात म्हणून जाती, जातीधर्मकम, व्यवहार, व्यवसाय इत्यादि वेगवेगळे सांगितले आहेत. अन्य जातीशी रोटीबेटीच्या व्यवहाराचा निषेधहि पण याचकरितां केला आहे. स्पृश्यास्पृश्य विचारांना जें इतकें महत्त्व दिले जातें तेंहि याचकरितां अनार्यता, निष्ठुरता, क्रूरता, निष्क्रियात्मता पुरुषं व्यंजयन्तीह लोके कलुषयोनिजम् ॥ (मनु. १०-५८) सदाचारहीनता म्हणजेच अनार्यता. कठोर भाषण, कठोर स्वभाव, क्रूरवृत्ति, हिंसात्मक क्रिया, स्वपरहिताच्या युक्तकर्माचे अनुष्ठान इत्यादि ही लक्षणे संकरजातित्व प्रगट करतात. पित्र्यं वा भजते शीलं मातुर्वे मयमेव वा । न कथंचन दुर्योनिः प्रकृर्ति स्वां नियच्छति ॥ (मनु. १० ५९) संकरोद्भव मनुष्याच्या ठिकाणी पितृसंबंधीं, मातृसंबंधीं अथवा उभय संबंधीहि दुष्ट स्वभाव दिसून येतो. आपल्या संकरत्वाचा व जन्माला कारणी भूत असणाऱ्या मातापितरांचा स्वभाव आपल्या गुणांनी टिविल्याशिवाय तो कर्धी राहातच नाहीं. कुले मुख्येऽपि जातस्य यस्य स्याद्योनिसंकरः । स श्रयत्येव तच्छीलं नरोल्यमपि वा बहु ॥ (मनु. १०-६०) मोठ्या कुलांतला म्हणवून घेत असला तरी संकरयोनीचा मनुष्य कांहीं अंशानें तरी आपल्या जन्माला कारण असलेल्या पित्याच्या वळणाचा असतोच. त्याला वर्णव्यवस्था मान्य होत नाही. ज्या वर्णीयापासून अथवा ज्या धर्मीयापासून त्याची उत्पत्ति झाली असते त्या धर्मावर व त्या वर्णावर त्याची विशेष प्रीप्ति दिसून येते. त्या त्या वर्णाप्रमाणें व त्या त्या धर्माप्रमाणे वागावें असे त्याला वाटतें. त्या त्या वर्णाच्या व धर्माच्या लोकांना विशेष साहाय्य करावें, इतकेच नव्हे तर स्वकुलांतल्या व स्वधर्मांतल्या आपल्या माणसांनी तसेंच बागावें असें त्याला वाटतें व त्याप्रमाणेंच तो आपला अधिकार चालवून आपल्या कुटुंबांत 

अयंत्रा राष्ट्रांत नियम घालूं लागतो. अलीकडच्या बहुजनांच्या दृष्टिकोनाचा विचार केला म्हणजे, या सिद्धांतानुसार यांपैकी कोणाचीच बीजशुद्धि नाहीं, म्हणून सांगण्याचा यांतून निघाल्यासारखा वाटला तरी, तो केवळ तसाच मानतां येत नाहीं. कारण, विचारसंकराचें, आचारसंकराचें, आहारसंकराचें, शिक्षणसंकराचे, देशसंकराचे, आईबापांतून कोणीहि असलें तरी पुरे. यांच्यांत जातीसंकर, अथवा धर्मसंकरच व्हावयास पाहिजे असे नाही. त्यांच्या संततींत तोच संस्कार उतरतो. अथवा लहानपणापासून भिन्न धर्मा व भिन्न जातीच्या माणसांत, भिन्न देशांत, भिन्न संस्कारांत, भिन्न आचारविचारांत व भिन्न शिक्षणांतर तो बाढला असला तरी त्याचीच त्याला अधिक प्रीति दिसून येते. कित्येक राजेरजवाड्यांतून व गर्भश्रीमंतांतून इतर वर्णाच्या व इतर धर्माच्या दाबा असतात. त्यांचे दूधहि असें करतें. हाहि एक प्रकारचा संकरच होतो. बहुजन समाजाच्या विचारांचा पगडा इतरांवर पडूनहि असे होण्याचा संभव असतो. सार्वजनिक शिक्षणाचा परिणामहि कारण होतो. हाहि एक प्रकारचा संकरच आहे. गर्भ राहावयाच्या वेळी ज्याची आठवण होते, जी कल्पना येते, जे पुढे दिसते, त्याच्या बाईट-चांगलेपणामुळेहि गर्भावर परिणाम होऊन ती संतति, त्याच्याप्रमाणे चांगली बाईट होते. गर्भ राहिल्यानंतरहि कांही कालपर्यंत समोरील दृश्याचा, जवळच्या संगतीचा, सभोवारच्या वातावरणाचा, खाण्या विण्याचा कांही अंशाने त्या गर्भावर, त्या त्या प्रमाणे चांगलाबाईट परिणाम होतो. झोपावयाच्या खोलीतल्या निनोच्या फोटोवर दृष्टि पडल्यामुळे एका सच्छील नवराबायकोच्या पोटी स्वभावानें व रूपाने निम्रोसारखाच मुलगा झाला. कारण काय हें न जाणून एका साधूला विचारावयाला गेले असत त्याने त्या फोटोची जाणीव देऊन समाधान केल्याचे एका ठिकाणी ऐकलेले आठवते. हाहि एक प्रकारचा संकरच आहे. आपली संस्कृति हीन बा लागली व दुसऱ्या संस्कृतीचा प्रचार आपल्यांतून व्हावा अशी बुद्धि झाली की, यांपैकी कोणत्या प्रकारचा का होईना, संकर झाला असे मानावेंच लागते. अलीकडच्या काळांत तर, कित्येक मुंबईसारख्या शहरांतली तरुण मुलेमुली, घरी केलेले पदार्थ टाकून, इराण्याच्या अथवा खिश्चनांच्या हॉटेलांत जातात, त्यांचे संस्कार काय होतील सनातनी आईबाप असले तरी, मुलगा कॉलेजांतह जावयाला नको, साध्या इंग्रजी शाळेत गेला तरी, पुढें क्रॉप ठेवतो, वूट घालतो, आणि तुम्ही जुन्या काळची मंडळी’ म्हणून तो सरळ आपल्या आईवडिलांना नावे ठेवतो, सोवळ्याओवळ्याची हा टिंगल करतो व जाती धर्माला तर तो झुगारूनच देतो. असा हा वातावरणाचा परिणाम होतो.

सत्संगाद्भवति हि साधुता खलानां । साधूनां न हि खलसंगमात्ख लत्वम् । आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते। मृद्धं न हि कुसुमानि धारयन्ति ॥ (सुभाषित.) आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते । “पुष्पसंगें मातीस वास लागे.” या अनुभवाप्रमाणे विदेशीय, विधर्मीय, विजातीय, परभाषीय संस्कार, आपल्यावर न होकं देता, त्यांच्यावरच उच्च आर्यांच्या या संततीचा का परिणाम होत नाही ? असें कोणी विचारल्यास ती आर्यांची वृत्ति आज शेकडों वर्षांपासून निर्भेळ अशी ठेवली गेली नसल्यामुळे, त्यांच्या या संतातीतून प्रभाव उरला नाहीं; त्यामुळे चटकन अन्यांचा परिणाम त्यांच्यावर होतो. नियमाला अपवाद असतोच. आपल्या आचारविचारानें दुसऱ्या धर्मीयांवर ब दुसऱ्या संस्काराच्या माणसांवर परिणाम उत्पन्न करणारी मंडळी पूर्वी नव्हती व आज नाहीत असेंहि म्हणतां येत नाहीं. मुसलमानी अमदानीत कबिरासारख्या अनेकांवर या हिन्दु संस्कृतीचा परिणाम झाला. इंग्रजी अमदानीत मॅक्समुल्लर आदि. कित्येकांवर परिणाम झाला. भगवी वस्त्रे धारण करून कित्येक पाश्चिमात्य, वैदिक संन्यस्त वृत्तीच्या शांत जीवनाचा आतांहि अभ्यास करीत आहेत. कित्येक पाश्चिमात्य नवराबायकोची जोडपीं, धोतर-लुगडी नेसून, भस्म-कुंकू लावून, आर्य संस्कृतीचा आदर दाखवितात. त्या मुसलमानांच्या अमदानीतच मुकुंदराज, ज्ञानेश्वर, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वति, तुलसीदास, श्रीसमर्थ, तुकारामादि संत झाले. बिरबलासारखे प्रधान झाले. इंग्रजी अमदानींत विवेका नंद, रामतीर्थ, टिळक, गोखले, पं. मालवीय इत्यादि झालेच.

वर्णदूषक, धर्मदूषक राष्ट्रांत अधिक होणें, कोणीहि विचार पुरुष अनिष्ट आणि घातुकच मानील.

यत्र त्वेते परिध्वंसा जायन्ते वर्णदूषकाः । राष्ट्रियैः सह तद्राष्ट्र क्षिप्रमेव विनश्यति ॥ (मनु. १०/६१)

– ज्या कुलांत व ज्या राष्ट्रांत असे धर्म व वर्ण-विध्वंसक लोक अधिकारपदावर असतात अथवा विशेष मनुष्यबळानें अथवा द्रव्यबळानें युक्त असतात ते कुल व राष्ट्र यांच्या स्वतःच्या अनाचारानें व अनाचाराच्या हड्डी प्रचाराने थोड्याच अवधीत नष्ट होतें, असा या वरील श्लोकाचा अर्थ आहे. किती कष्ट झाले, वेळी आत्मयज्ञ करावा लागला तरी मागें पुढें न पाहातां प्रत्येक सज्जनानें वैदिक संस्कृतीच्या रक्षणार्थ झटावें, जिवापाड कष्ट सोसावेत. ब्राह्मणजातीवरच जगाच्या इहपर कल्याणाची भिस्त आहे. स्वाभाविकच त्यांचे उच्च संस्कार असतात. उच्च संस्काराचे परिणाम त्यांच्या गर्भावस्थे पासूनच होत असतात. उच्च संस्कार अशा रीतीनें त्यांच्या रक्तांतूनच भिनलेले असतात. ब्राह्मणांनी आपला अधिकार व उत्तरदायित्व ओळखून असावें अजूनसुद्धां ब्राह्मणाविषयीं स्वाभाविकच समाजांत आदर दिसून येतो. गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु । गोब्राह्मणांना शुभ आणि क्षेम असलें म्हणजे सर्व लोकच सुखी होतात हे या प्रार्थनेतून स्पष्ट होते. गोब्राह्मण समाजाचे घटक आहेत. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मण हिताय च । असे म्हणूनच देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. गो ब्राह्मणांना एकदा राखलें म्हणजे जगाचे आपोआपच संरक्षण होतें ही देवाचीहि कल्पना आहे. समाजाच्या जबाबदार मनुष्याचीहि ती तशी असावी. या विषयासंबंधीचा मनूचा एक छोक सहज ओघाने आठवला.

ब्राह्मणार्थे गवार्थे वा देहत्यागोऽनुपस्कृतः । स्त्रीवालाभ्युपपत्तौ च बाह्यानां सिद्धिकारणम् ॥ (मनु. १०-६२) |

गोब्राह्मण आणि श्रीवाल यांच्या रक्षणार्य प्रसंगी प्राणत्याग करणेंहि श्रेयस्कर होते, असे मनूचे म्हणणे आहे. ब्राह्मणांनी आपल्या आचर णांनी आजपर्यंतचे पूज्यत्व पुढे हि कायम राखिले पाहिजे. आपल्या सच्चवलाने मनुष्य जगतो हेहि पण विसरता कामा नये.

पारित्यजेदर्थकामौ यौ स्यातां धर्मवर्जितौ । धर्म चाप्यसुखोदकै लोकविक्रुष्टमेव च || ( ४|१७६). धर्माविरुद्ध असणारी द्रव्योत्पादनाची साधनें त्यागावीत. अधर्मानें लाभणारें धन स्वीकारूं नये. धर्माला अविरुद्ध इच्छा बाळगाव्यात व त्यांच्या पूर्तीचे प्रयत्न करावेत. धर्माविरुद्ध कसलीहि इच्छा मुळीं करूंच नये. गृहस्थांनी स्वधर्मोचित ‘काम’ केवळ सत्संततीकरितांच बाळगावा. परिणामी असुखकारक व सज्जनमन संतापजनक कार्यात कर्तव्यबुद्धि अथवा धर्मबुद्धि ठेऊं नये.

अधार्मिको नरो यो हि यस्य चाप्यनृतं धनम् । हिंसारतश्च यो नित्यं नेहासौ सुखमेधते || ( ४१७७)

अधार्मिक आचरणाचा, असत्यादि अमार्गीय धनोपार्जनचा, हिंसा प्रधान जीवनाचा मनुष्य या जगांत कधीहि सुखी होत नाही.

न सीदन्नपि धर्मेण मनोऽधर्मे निवेशयेत् । अधार्मिकाणां पापानामाशु पश्यन्विपर्ययम् || ( ४१७१)

 — धर्माच्या अनुष्ठानानेच असतां कसलेहि कष्ट आले, असलेली संपत्ति नष्ट होऊन अन्नाची ददात जरी भासू लागली तरी अधर्माकडे कधी वळूं नये, कारण अधर्मानें अधार्मिकांना, पापानें पाप्यांना लौकरच त्यांच्या पापकर्माचें फळ याहून अधिक मिळाल्याशिवाय राहात नाही. अधर्मानें स्वतःला व पुढे पुत्रादिकांना अस्त्री परत्री व पुढच्या जन्मीहि दुःख अनुभवावे लागतें व पुढे व पुढे पुत्रादिकांनाहि पुढच्या जन्मी तरी खास सुख आहेच, म्हणून परत्रसाधनाकरितां तरी

चरण करावे. चांगल्याचे चांगले व वाईटाचे वाईट असे फळ आज ना मिळाल्याशिवाय कधीहि राहात नाही.

नाधर्मश्चरितो लोके सद्यः फलति गौरिव | शनैरावर्तमानस्तु कर्तुर्मूलानि कृन्तति ॥

कांसेला हात घालून दूध काढू लागल्याप्रमाणें अधर्म तात्कालच फळ देतो असे नाही. सावकाशपणानें अधर्म कर्त्याचें सर्वतोपरि निर्मूलन करतो. त्याच्या संततिसंपत्तीचेहि निर्मूलन करतो.

यदि नात्मनि पुत्रेषु न चेत्पुत्रेषु नप्तृषु । न त्वेव तु कृतोधर्मः कर्तुर्भवति निष्फलः ॥ ४-१७३ ।। 

अधर्मेणैधते तावत्ततो भद्राणि पश्यति । ततः सपत्नाञ्जयति समूलस्तु विनश्यति ॥ ४–१७४ ॥ 

– पापाचा परिणाम एकदम दिसला नाहीं तरी मुलगा, नातु, पणतु म्हणून पुढे तरी त्याच्या कुलांत त्यांना तें अनुभवावें लागतेंच. अधर्मानें प्रथम प्रथम पैसा, बायकामुले, दासदासी, मोठा वाडा इत्यादिकांनी वैभव प्राप्त झाल्यासारखे दिसले तरी, आपल्याविरुद्ध असणाऱ्या सज्जनांना जनधन बलाने कष्ट देऊन त्यांच्यावर जय मिळविल्यासारखे वाटले तरी, वेळ आली को तो अधर्म या सर्वांचा एका क्षणांत समूल नाश करून टाकतो. मग हें ‘स्वप्नप्रपंचा’ प्रमाणे होतें कां नव्हते याप्रमाणे होते. अधर्म त्याच्या तारतम्यानें कमीअधिक प्रमाणांत व कमीअधिक प्रकालांत फलद्रूप होतोच होतो. कितीहि झांकलें तरी दुष्कृत्यांचा स्फोट झाल्याशिवाय राहोत नाहीं. ‘ अशी एक इंग्रजी भाषेंतहि म्हण आहे.

Murder will be out विवाहाचा संबंध धर्माशी आहे, नीतीशी आहे, स्वतःच्या व भावी पिटांच्या जीवनाशीं आहे. यथा बीजं तथांकुरः । या न्यायानें निर्दुष्ट माता पितरांच्यावरच निर्दुष्ट प्रजा अवलंबून असते. असेंच पुढे जाऊन म्हणावयाचे “म्हणजे विवाहाची एक पद्धत निर्दुष्ट झाली म्हणजे सर्व जगच निर्दुष्ट होतें. दृश्य प्रपंचांत एक मनुष्यजातच अशी आहे कीं, जीत नीतिनियम पाळले जातात; जीत स्वेतर स्त्रीच्या ठिकाणी आईबहिणीचा व्यवहार दिसून येतो. असा उन्नत विचार जर मनुष्यजातींतून नाहीसा झाला तर मनुष्यजातच नरपशु म्हणवून घेईल. अशी ही पशुवृत्ति थांबविण्याकरितांच केलेल्या अनेक निषेधांतून सगोत्र विवाहाचा निषेधहि पण एक आहे. भारतपप ऋषींची संतति आहे. गोत्र सांगणे म्हणजे अमस्या ऋषीच्या वंशान्तला मी आहे म्हणून कळविणे होय. ‘अमुक वेदांतर्गत, अमुक गोत्रोत्पन्न, अमुक शर्माऽहं अभिवादयामि या वैदिक अभिवादनांत म्हणजे संध्येच्या नंतर नित्य केल्या जाणाऱ्या गुरुवंदनांत ऋग्वेदादि विभागांनी ‘अमुक वेदतिरोत, अमुक सूत्राच्या अमुक शाखेचा, अमुक गोत्रांत उत्पन्न झालेला, अमक्या नांवाचा मी आहे. हे गुरुवर्या, असा मी तुला नमस्कार करतो’ म्हणून गुरु, आचार्य यांना नमन करावयाचे असते. यांत प्रत्येक ब्राह्मण विशिष्ट वेद सूत्र, शाखा, प्रवर गोत्र व नांव उच्चारून आपल्या वंशावयाची ओळख करून देतो व ती जाणीव ठेवतो. हा वंशान्वय पुढे अविच्छिन्न चालण्यास कुलीन घराण्याच्या सवर्ण कन्येशी विवाह करावा. ती सगोत्रांतील असू नये, म्हणून सांगितले आहे. एका गोत्राची मंडळी म्हणजे एका ऋषीच्या वंशांतली मंडळी. या दृष्टीने सगोत्र- विवाह म्हणजे भाऊबहिणीचाच तो विवाह होतो. आणि ही पशुवृत्ति आहे. म्हणून मनुष्यांना, त्यांतून विशेष ब्राह्मणांना, हे सांगितले आहे. असलेल्या जातीत ब्राह्मणवर्ग आतापर्यंत कितीहि नाही म्हटले तरी इतरांपेक्षा अधिक प्रमाणांत हे पाळून आहे असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाहीं. आतां तोहि पण विस्कळीत होऊं पाहात आहे. आणि तो तसा करण्याकरितां इतर जातींचा व सरकारचा अनाठायी आग्रह दिसून येत आहे. जगांतली एक उच्च संस्कृति मालवून सर्वच अंधारांत चांचपडण्याचीच ही योजना आहे. जगाचे भवितव्य काय आहे कोणास ठाऊक! सत्याच्या आणि तत्त्वाच्या दिव्य जीवनाला हे जग दिवसेंदिवस आंचवत चालले आहे असे म्हणणे प्राप्त होते.

एका गोत्राचे लोक एकटुंबाप्रमाणे असतात. एका कुटुंबांत णाऱ्या बंधुबंधुप्रमाणे अथवा भगिनीभगिनीप्रमाणे त्या त्या गोत्राचे लोक असतात. असे असल्यामुळे सगोत्र विवाह म्हणजे बंधुभगिनत लग्न लावण्या इतकी पशुवृत्ती स्त्री कारणे होय. त्यांत मनुष्यत्वाची कोणतीहि उच्च भावना दिसून येत नाही, हे आपण पाहिले. सवर्ण विवाहाचा विचार झाला. पुनर्विवाहाचाहि विचार केला. वेन राजाच्या कालापासून तो आतांपर्यंत वादांत, अन्य वर्णात पुनर्विवाहाचा संस्कार काही अंशी दिसून येत असला तरी ब्राह्मणांत तो आतांपर्यंत नव्हता. या वेन राजाची साऱ्याच मानवांना पशुतुल्य करण्याची अवशिष्ट वासना जागृत होऊन हल्लींच्या राज्यसूत्रधाऱ्यांच्या ठिकाणी शिरली व ती अवशिष्ट ब्राह्मणजाती भ्रष्ट करून आपला दुष्ट संकल्प पूर्ण करण्याकरितां असा प्रयत्न करीत आहे, असे कोणी म्हटल्यास त्याला कोण काय उत्तर देईल ?

home-last-sec-img