Literature

सतीधर्माचा गौरव

माता कौसल्येला पतीच्या सेवेतच राहण्याकरितां व तिने आपल्या बरोबर येऊ नये म्हणून श्रीरामाने सतीधर्म विशद केला. त्यासंबंधीची त्याच्याच मुखांतील कांहीं वाक्य पाहू या.

व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा । 

मर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत् ॥ २५ ॥

भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् । 

अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ॥ २६ ॥ शुश्रूषामेवे कुर्वीत भर्तुः प्रियहितेरता । 

एष धर्मः परो इष्टो लोके वेदे श्रुतः स्मृतः ॥ २७ ॥

( वा. रा. अ. स. २१ )

—प्रतोपवासादिकांचे सतत आचरण करणारी उत्कृष्ट आचारसंपन परमोत्तम अशी असून आपल्या पतीला अनुसरणारी जर नसेल तर त्या कोस पापगति प्राप्त होते. उलट देवपूजा, नतोपवास, नमनादि हातून एकवेळ नाही घडलें तरी केवळ पतिसेवेनेंच त्या सतीस पुण्यगति म्हणजे स्वर्गाची प्राप्ति होते. पतीला हितावह व प्रिय होईल असे आपले आचरण ठेऊन सतीनें पति शुश्रुषेतच असावे, असे श्रुत्यादिकांतुन दिसून येते. सती सीतेचीहि वचनें याला अनुरूपच आहेत.

आर्यपुत्र पिता माता भ्राता पुत्रस्तथा स्नुषा । 

स्वानि पुण्यानि भुंजानाः स्वं स्वं भाग्यमुपासते ||४|| भर्तुर्भाग्यं तु भार्येका प्राप्नोति पुरुषर्षभ । अतश्चैवाहमादिष्टा वने वस्तव्यमित्यपि ||५||

न पिता नात्मजो नात्मा न माता न सखीजनः । 

इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा ॥६॥

(वा. रा. अ. स. २७)

पूर्वी सती, आपल्या पतीला ‘आर्यपुत्र’ या गौरवपूर्ण नांवानें संबोधीत असे अर्से यावरून दिसून येते. सर्व आदर्श गुणांनी युक्त अशा अर्थानेंच या शब्दाचा उपयोग करीत असत. येथील आर्यपुत्र हें संबोधन श्रीरामालाच अनुलक्षून सीतेनें उच्चारलेलें आहे- हे आर्यपुत्रा ! मातापिता, बंधु, भगिनी, पुत्र, स्नुषा आदि सर्व आपआपलें भाग्य भोगतात. अर्धांगी म्हणून म्हटली जाणारी सती मात्र पतीच्या सुखदुःखाची भागीदार होते. इहलोकीं असो वा परलोकीं असो सतीला पती हीच गती. एरव्हीं माताहि नव्हे, पिताहि नव्हे, पुत्रहि नव्हे, कन्याहि नव्हे. मित्र बांधवादिहि पण नव्हेत. सती ही पतीचे अर्धांगच ठरल्यानंतर स्वतंत्रता कोठें उरली ! वेगळे अस्तित्व तरी कोठचें ?” यामुळे सीता श्रीरामाबरोबर अरण्यास न येतां अयोध्येतच कशी बरें राहू शकेल ! सती-पतीचा अनुकरणीय असा हा एक आदर्श होय.

home-last-sec-img