Literature

सतीपति व गृहस्थाश्रमरहस्य

गृहस्थाश्रमाच्या जीवनरूप वैलगाडीची स्त्रीपुरुष ही दोन चक्रे होत. तात्त्विक दर्शन हा गाडीवान व पातिव्रत्य आणि एकपत्नीत्रत हे दोन बैल समजावेत. गृहस्थाश्रमांत सतीपतींचा धनिष्ट संबंध असतो. त्यांच्यांत एकात्मता असते. सतीपतींचें एकात्मिक आचरण आर्य संस्कृतीचें एक मुख्य अंग आहे. रामराज्यांत असला सीतारामांचाच एक आदर्श असला पाहिजे.

अन्योन्यस्याव्यभीचारो भवेदामरणान्तिकः । एष धर्मः समासेन ज्ञेयः स्त्रीपुंसयोः परः ॥ (मनु. ९/१० )

– आमरणांत सतीपति हे अव्यभिचारी असले पाहिजेत. थोडक्यांत हाच एक स्त्रीपुरुषांचा मुख्य धर्म आहे. तथा नित्यं यतेयातां स्त्रीपुंसौ तु कृत क्रियौ । यथा नाभिचरेतां तौ वियुक्तावितरेतरम् ॥ १०२ || दोघांकडूनहि धर्मार्थकाम या विषयांच्या ठिकाणी व्याभिचार कधींहि न होईल अशी परस्पर स्त्रीपुरुषांनी एकत्र राहून सर्वदाच काळजी घेतली पाहिजे. नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वाऽशुभः । यासां स्त्रीणां प्रियो भर्ता तासां लोका महो दयाः ॥ (वा. रा. अ. स. ११६/२१) दुःशील: कामवृत्तो वा धनैर्वा परि वर्जितः । स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः ॥ २२ ॥ सीता अनुसूया या दोन सतीशिरोमणी स्त्रीरत्नांच्या संवादांतले हे दोन श्लोक आहेत. नगरस्थ वा वनस्थ असो, शुभाचारसंपन्न असो वा अशुभाचारयुक्त असो, कसाहि असला तरीहि ज्या सतींना पति प्रिय असतो त्यांना दिव्य लोकांची प्राप्ति होते. दुःशील असो, कामी असो, दरिद्री असो आर्य स्वभावाच्या स्त्रियांना तो आपला पतीच परमदैवत आहे असा या श्लोकांचा भावार्य आहे. नात्यागोत्याची मंडळी, सकळ राजोपचार, तो राजवाडा, ते वैभव, तो दासदासींचा परिवार, तो, ते सर्व सुखसोडून सीता श्रीरामाबरोबर फलमूलांनी उपजीविका करीत कंटकमय, संकटग्रस्त अशा त्या घोर वनांतल्या चिकट मार्गांनी ऊन, बारा, पाऊस सहन करून, अनवाणी आलेली पाहून द्रवलेल्या अतःकरणाने अनुसूयेच्या मुखांतून साहजिकच बाहेर आलेले हे उद्गार आर्य स्त्रियांची लक्षणेच प्रगट करीत आहेत. रामायणांतल्या या लोकांशी अगदी जुळणारे मनुस्मृतीचे काही श्लोक खाली देतो.

विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः । उपचर्यः स्त्रिया साध्या सततं देववत्पतिः ॥ (मनु. ५|८।१५४). नास्ति स्त्रीणां पृथग्यज्ञो न यतं नाप्युपोषणम् । पतिं शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते ॥ १५५ ॥ पाणि ग्राहस्य साध्वी स्त्री जीवितो वा मृतस्य च । पतिलोकमभीप्सन्ति नाचरे त्किंचिदप्रियम् ॥ १५६ ॥-दुःशील, स्त्रीलंपट, दुर्गुणी असा कसाहि पति असो त्याला देवाप्रमाणे मानून त्याची सतीने सतत सेवा करावी. ज्या योगें केवळ स्वर्ग मिळतो त्या पतिसेवेशिवाय स्त्रियांना वेगळा असा यज्ञ नाहीं, वेगळे व्रत नाहीं, वेगळे उपोषणहि नाही. शास्त्रीय विवाहाच्या साध्वी स्त्रीनें पति जिवंत असेपर्यंत व मरणोत्तरहि त्याचे कधीहि कांहीं अप्रिय म्हणून आचरू नये. व्यभिचारात्तु भर्तुः स्त्री लोके प्राप्नोति निन्द्यताम् । श्रृगालयोनिं प्राप्नोति पापरोगैश्च पीड्यते || ५-१६४ ॥ – व्यभिचारानें स्त्री, मग ती कितीहि कुलीन असो, जिवंत असेपर्यंत जगांत निंद्य होते. मरणोत्तर कोल्ही होते. तें सर्व अनुभवून पुनः मनुष्यजन्मालाच आल्यास ती पापिष्टांना प्राप्त होणाऱ्या मोठमोठ्या कुष्ट महारोगादिकांनी आपोआप पछाडली जाते. पतिव्रता स्त्री गरोदर राहिली तर तिचा किती उत्सव करतात; आणि तीच विधवा ! तिचे तोंडहि कुणी पाहात नाहीं. लोकांच्या दृष्टीला न पडतां कुठे तरी काना कोपऱ्यांतून तिला आपले लाजिरवाणें जीवित कसे तरी कंठावें लागतें. धर्मा धर्मांत असे हे एवढे अंतर आहे. पति या नाभिचरति मनोवाग्देहसंयता । सा भर्तृलोकमाप्नोति सद्भिः साध्वीति चोच्यते ।। —मनोवाग्देहांनीहि ली पतींशीं थोडादेखील व्यभिचार करीत नाहीं, ती स्वर्गादि उत्कृष्ट लोकीं पतसह वास करते आणि जिवंत असेपर्यंत इथे साध्वी म्हणवून घेते. सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रजावती । साभार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता ॥ ( व्यासस्मृति) – जी गृहव्यापारांत दक्ष असते, जी पुत्रवती असते, जी पतिप्राण असते, जी पतिव्रता असते तीच

एक भार्या म्हणवून घेते. अबलोकनार्थ दक्षस्मृतीचे देतो

गृहाश्रमात्परं नास्ति यदि भार्या वशानुगा । तया धर्मार्थकामानां त्रिवर्गफलमनुते ॥ ४॥ १ ॥ अनुकूला न वाग्दुष्टा दक्षा साध्वी प्रियंवदा । आत्मगुप्ता स्वामिभक्ता देवता सा न मानुषी ॥ ३ ॥ अनुकूलकस्य स्वर्गस्तस्य न संशयः । प्रतिकूलकलत्रस्य नरको नात्र संशयः ॥ ४ ॥ गृहवासः सुखाय हि पत्नीमूलं च तत्सुखम् सा पत्नी या विनीता स्याच्चि ‘तज्ञावशवर्तिनी ॥ ६ ॥ प्रदृष्टा मनसा नित्यं स्थानमानविचक्षणा | भर्तुः प्रियकरा या तु सा भार्या त्वितरा जरा ॥ १२ ॥ जिव्हा भार्या शिशुभ्रांता मित्रो दासः समाश्रिताः । यस्यैते तु बिनीताः स्युस्तस्य लोकेऽपि गौरवम् ।। १३ ।। —भार्या जर वश असली तर त्या गृहस्थाश्रमाहून कांही श्रेष्ठ नाही. तिच्यामुळेच धर्मार्थकाम या त्रिवर्गाचे फळ मिळते. सर्वतोपरी अनुकूल, मंजुळ बोलणारी, दक्ष, साध्वी, सत्य आणि प्रिय बोलणारी, आपले आपणच रक्षण करून घेणारी, पतिभक्त असणारी, देवमाणूस म्हटल्याप्रमाणे ती भार्या ‘देवताभार्या ‘ म्हणून म्हटली जाते. अनुकूल पत्नीने पतीस मिळतो व प्रतिकूल पनीने त्यास नरक मिळतो. ऐहिक सुखासाठी गृहस्थाश्रम जगांत पत्नीमूलकच तें ऐहिक सुख असते. जी विनयशील व अनन्य असते, जी चित्त जाणणारी असते तीच पत्नी, जी सर्वदा संतुष्ट, प्रसन्न हंसतमुखी, स्थानमान लक्षांत घेऊन वागणारी, नवऱ्याचे प्रिय आच रण्यांत सदा दक्ष असणारी अशी असेल तर ती भायी, नाही तर जीर्थत्यंगं यया इति जरा देहाला जीर्णजर्जर करून टाकणारी ती एक जिल्हा भार्या, शिशु, बंधु, मित्र, दास, आश्रित हे स ज्याच्या कांत असतात त्यालाच लोकांत गौरव असतो. धर्मपत्नी समा ख्याताया निर्दोषा यदि सा भवेत् दोषे सति न दोषः स्यादन्या कार्या गुणान्विता ॥ २५ ॥ जर निर्दोषी असेल तरच ती धर्मपत्नी म्हणवून घेते. तिच्यांत कांही दोष असल्यास तिचा त्याग केल्याने दोष लागत नाही पुत्रप्राप्तीकरितां अन्य गुणान्वित वधूशी शास्त्रीय विवाह कराया. मात्र दुसऱ्याच ऐकून कसली तरी अनाठायी कल्पना करून पत्नीचा त्याग करूं नये, म्हणून याच्या पुढच्याच लोकांत सांगितले आहे. अदुष्टापतिता भार्या यौवने य: परित्यजेत् । स जीवनान्ते स्त्रीत्वं च वंध्यत्वं च समाप्नुयात् ॥ १६ निर्दोषी व अपतित अशा भार्येस जो भर तारुण्यांत सोडतो तिचा त्याग करितो तो मरणानंतर स्त्री होतो व त्याला बालवैधव्य प्राप्त होते. दरिद्रं व्याधितं चैव भर्तारं याऽवमन्यते । शुनी गृध्री च मकरी जायते सा पुनः पुनः ॥ १७ ॥ दरिद्री अथवा व्याधिग्रस्त असणाऱ्या पतीचा जी अपमान करते ती कुत्री, गृध्री, मगरी यांच्या जन्माला पुनः पुनः जाते. सतीपति हो ‘ एकदेहन्याया ‘नें असावयाला पाहिजेत. समापो हृदयानि नौ । शुद्ध पाण्यांत शुद्ध पाणी मिळून एक झाल्याप्रमाणे आम्हां दोघांचेहि हृदय व हृदयांतील विचार एक असावेत असे पतिपत्नीकडून बद विले जाणारें हें वेदवाक्य आहे. वैदिक संस्कृतींतल्या सतीपतींच्या हृदयाची हैं। वाक्य संपूर्ण परिचय करून देतें. याच्याविरुद्ध आचारविचार ज्या ठिकाणी दिसून येतो तें वैदिक अथवा आर्य संस्कृतीचें लक्षण नव्हे. प्रसंगोपात्त सती शिरोमणी सीतेची या ठिकाणी आठवण झाली. यथा मे हृदयं नित्यं नापस पति राघवात् । तथा लोकस्य साक्षी मां सर्वतः पातु पावकः II ( बा. रा युद्ध कां. ११६-२५ ) आर्य धर्माचें पातिवत्य कसाला लावून बाबन्नकशी उतरलेल्या सती सीतेचे हे वरील उद्गार आहेत. अग्नीचे दिव्य करून पाति व्रत्याच्या परीक्षेत सीता पूर्ण उत्तीर्ण झाल्याची साक्ष जगाला पटवून देण्याच्या उद्देशानें उच्चारलेले सीतेच्या आत्मविश्वासाचे हे उद्गार आहेत. श्रीरामाला सोडून माझें हृदय केव्हांहि विचलित न झाल्याची साक्ष म्हणून सर्वसाक्षी अग्नि माझें सर्वतोपरी रक्षण करो, म्हणून साक्ष पटविण्यासाठी बोलावून आण ण्यास अग्नीच्या राजवाड्यांत शिरल्याप्रमाणें सीतेने पुढे धगधगत असलेल्या चिर्तेत अत्यंत समाधानी वृत्तीनें प्रवेश केला. विधूयाथ चितां तां तु वैदेहीं हव्यवाहनः । उत्तस्थौ मूर्तिमानाशु गृहीत्वा जनकात्मजाम् ॥ (बा. रा. यु. कां. स. ११८-२) – आपल्या बद्दलची ची साक्ष पटविण्याकरितां प्रत्यक्ष अग्नीलाच सीतेनें घेऊन आल्याचें तें दिव्य दर्शन या श्लोकांतून होते. सीता त्या चिते जवळ जाते तोंच ती चिता शांत झाली. अग्नीची ती गगनभेदी ज्वाला एकदम दिसेनाशी होऊन त्या ठिकाणीं शांत तेजाच्या अग्निदेवाचा दिव्य साक्षात्कार झाला. वात्सल्यानें सीतेला हातीं धरून आपली साक्ष पटविण्यासा अग्निदेवांनीं सुरुवात केली. “ रामा, तुझी अर्धांगी ही सीता, ‘त्वञ्चित्ता त्वत्प रायणा —तुला अनन्य आहे. ही त्वच्चित्त आणि त्वत्परायण आहे. ह निर्दोषी आहे, निष्पाप आहे, मनोवाकानेंहि हिच्याकडून अन्यथा आचरण खचित झालें नाहीं व कधीं तें होणेंहि शक्य नाहीं. या तुझ्या धर्मपत्नीचा तू स्वीकार कर हिच्या परिशुद्ध आचरणाची साक्ष पटविण्याकरितांच मी आलो आहे. ” सर्व लोकांसमक्ष अशी वस्तुस्थिति कळवून अग्नीनं श्रीरामास सीतेला अर्पण केलें. श्रीरामाला हे ठाऊक असले तरी लोकांच्या प्रत्ययास येण्याकरितां खरे असल्यास अग्निसुद्धां शांत होतो व देवसुद्धा प्रत्यक्ष त्याची साक्ष देण्या करितां येतात असे सर्वांना विदित होण्याकरितां श्रीरामानें सीतेकडून हे दिव्य करविले.

असे दिव्य करून आपल्या पातिव्रात्याची खूण पटवून देण्याइतके आर्य स्त्रीयांच्या ठिकाणी कायबापनाचे पावित्र्य असले पाहिजे. भारत स्त्रीरत्नांचे असे हे शील समाजाकडून व सरकाराकडूनहि सुरक्षित झाले पाहिजे. स्त्रीपुरुष अशा शीलाचे होण्यास बालशिक्षणाच्या पायापासूनच सुरुवात झाली पाहिजे. आईवडिलांच्या आचरणांतहि तें दिसून येऊन शाळेतहि तसेच शिक्षण मिळालें, सरकारनेंहि तसेच कायदे केले व समाजांत सर्वत्र तसे दिसून आले तर तो जातिस्वभाव बनतो, त्या देशाची तशी चर्याच बनते. • केल्यानें सर्वहि होतें. ‘ पातिव्रत्याचे, एकपत्नीत्रताचे व ब्रह्मचर्याचे परिपालन प्रत्येकाकडूनच प्राणपणाने व्हावयाला पाहिजे ही आर्यसंस्कृति आहे.

सीतेसारखेच सावित्रीचें पण उदाहरण आहे. ‘दीर्घायुरथवाल्पायुः सगुणो निर्गुणोऽपि वा । सकृद्धृतो मया भर्ता न द्वितीयं वृणोम्यहम् ।। ( महाभारत वनप. २९४।२७) सत्यवान दीर्घायु असो वा अल्पायु, सद्गुणी असो वा दुर्गुणी, मी एकदां त्याला पति म्हणून मानल्यानंतर प्राण गेला तरी दुसन्याशी कधी लग्न करणार नाही, असे सावित्रीनें उत्तर दिलें होते. ही आर्य स्त्रियांची तेजस्त्रिता, पावित्र्य व उच्च आदर्शाचें दिव्य आचरण ! स्त्रीपुरुषांतूनहि अशी निष्ठा पाहिजे. अविवाहित मुलांमुलींनी इकडे लक्ष द्यावयास पाहिजे. सद्य:परिस्थितीतून उन्नतीचा मार्ग आंखला पाहिजे. उत्कृष्ट शीलाचा वारसा गमावू नये. आपल्यापरी भारताच्या अत्युच्च संस्कृतीचें प्रत्येकानें भूषण व्हावें. भारताची संस्कृति म्हणजे यथार्थ माणुसकीचा आदर्श होय. जगाचेंच यामुळे हित होते. याचा विचार करून सरकारानेहि याकरितां कंकणबद्ध राहिले पाहिजे. सावित्रीनें अल्पायु असलेल्या सत्यवानाला दीर्घायु केलें. निष्ठेचे हे सामर्थ्य आहे. सरकारानें पुनर्विवाहाचे व घटस्फोटाचे कायदे करण्यापेक्षां अशी निष्ठा समाजांतून निर्माण होईल अशी शिक्षणपद्धति आखावी व याला अनुरूप कायदे करावेत. यानें भारताचें व अनुषंगानें सबंध जगाचेंच कल्याण आहे. आपण उद्धरून जगाचा उद्धार करणे हे श्रेयस्कर का आपण नासून जगासहि नासून टाकणें हें श्रेयस्कर, याचा भारताच्या विधिमंडळाने (लोकसभेने) व मंत्रिमंडळानें पूर्ण विचार करावा. तीर्त्वा स्वयं भीमभवार्णवं च । अहेतुनान्यानपि तारयन्तः ||- आपण स्वतः हा संसारसमुद्र तरून कसल्याहि स्वार्थाशिवायच जगाचाहि उद्धार करण्याचे हे भारताचे शील आहे. हे भारताचे आनुवंशिक संस्कार आहेत. मानवी जीवनाचे खरे भूषण एक शीलच होय. शीलं परं भूषणम् । भारताच्या तात्विक जीवनाचे भूषण असलेलें शील भारतानें प्राण गेल्यासहि सोडूं नये, पातिव्रत्याच्या प्रभावानें अबला सबला होतात. पतिव्रतेस एकादा मनुष्य, समाज, सरकारच काय प्रत्यक्ष ब्रह्माविष्णुमहेश्वरहि भ्रष्टवूं शकत नाहीत हे अनसूयेनें आपलीच साक्ष पटवून जगांत सिद्ध करून दाखविले; महिलासमाजास धैर्य दिलें व तेजस्त्री अशा पवित्र जीवनाचा दिव्य मार्ग आंखून दिला; आपल्या पतिचरणोदकाच्या सिंचनानें ब्रह्माविष्णुमदेश्वरांना नेणती बालके करून टाकले व त्या अतियांच्या म्हणण्याप्रमाणे वाढावयाला आली; अतिथिसत्काराचे व पातिव्रत्याचें आनुवंशिक ब्रीद राखलें. पातिव्रत्याचा प्रभाव इतका मोठा असतां समाजाला असेच कां वळण लावू नये, सरकारने असेच कायदे कां परिपाठांत आणूं नयेत ? हा दिव्य मार्ग टाकून, आर्य संस्कृति इतकी थोर असतांना हिच्याकडे दुर्लक्ष करून, भारतांत असलेली ही इतकी दिव्य संपत्ति सोडून, जगांतल्या साऱ्यांना कर्ज देण्याचा आपला अधिकार विसरून, कुठे इस्लाम तर कुठे इसाई संस्कृतीचें कर्ज कां काढावें ? कां विनाकारण आपले महत्त्व घालवावें व मुद्दाम दीन व्हावें न जाणून एखाद्याचें घर खाली झालेच तर त्यानें आपल्याबरोबर सान्या राष्ट्राचीच संपत्ति कां घालवावी ? उच्च संस्कृतीच्या बाळशाचें तें गोंडस रूप, तें अपार तेज घालवून खप्पड तोंडाचें तेजोहीन राष्ट्र कुणीहि कां होऊं द्यावें व कां कुणी तसे प्रयत्न करावेत? एखाद्यानें कुणी तसे प्रयत्न केलेच तर भारताला खरें आपले हित कशांत आहे हें कां समजूं नये ? अन्धेन नीयमाना यथान्धाः । असे को व्हावें ? “ आंधळ्याच्या सर्वे चाललें आंधळे । घात एकेवेळे पुढे मागें ही श्रीतुकारामोक्ति, कशासाठी कोण जाणें, आठवते खरी ! राष्ट्राचे भवितव्य सूचकच ही आठवण असल्यास राष्ट्राने वेळीच जागे होऊं नये ! प्रक्षालनाद्धि पंकस्य दुरादस्पर्शनं वरम् ॥ विटाळ करून घेऊन स्नान करीत बसल्यापेक्षा त्यापासून दूर राहून त्याला स्पर्श न केलेलाच बरा.

“prevention is better than cure” झालेल्या परिणामाचे विविध उपायांनी परिमार्जन करीत बसण्यापेक्षा त्याचा प्रतिबंधच अत्यंत क्षेमकर असतो, म्हणून आंग्ल संस्कृतीहि आम्हांला अशा कृत्यापासून जणूं वारीत आहे. विवाह हा एक संस्कार आहे. विवाहाने मनुष्यरूपाच्या प्रकृतिपुरुषांना सृष्टि कार्याची व तशीच स्त्रीपुरुषामधून असलेल्या अद्वितीय तत्त्वाची दीक्षा देणे होय. अखंड अनन्यतेचे नियम घालून परस्परांच्या ऐहिक, पारलौकिक जीवनाची दोघेहि पूरक आहेत, हे कळविणें व मूळची अद्वितीय निष्ठा पुनश्च जागृत करणे होय. सृष्टिकार्याकरितां स्वरूपभूत असणारी शक्ति वेगळी करून, एकाचे दोन बनून, दोघांत एकत्र बघत, संततीच्या रूपाने परमात्मा बहु झाला; तोच व्यवहार तदंशभूत प्रवृत्तिसंकल्पाच्या जीवनहि अनुगत झाला आहे. हे सृष्टितत्त्व आहे. हा विश्वाचाच प्रवृत्तिधर्म होय. अन्योन्य सतीपतीच्या द्वारें परमात्मा आपला सृष्टिसंकल्प पुढे चालवीत आहे. सतो. पतीच्या प्रत्येक जोडप्याच्या अनन्यतेने आपल्या शक्तीत व आपल्यांत अस लेलें अनन्यत्व म्हणजेच एकत्व परमात्मा दर्शवीत आहे. शक्ति-शक्तिमानांतून असलेल्या अनन्यतेप्रमाणे म्हणजे एकत्याप्रमाणेच प्रत्येक सतीपतींच्या जोडप्यां तून अनन्यता म्हणजे एकत्व दिसून यावयाला पाहिजे. चिन्मात्र पुरुषाची संवेदनात्मक शक्ति प्रजोत्पादनाच्या संकल्पाने वेगळी होऊन स्थूल प्रजो त्पादनाकरितां तीच स्थूळ पत्नीच्या रूपाने प्रगट झाली. “एकोऽहं बहु स्याम्” ‘मी अनेक व्हावे’ असा संकल्प करून स्त्रीपुरुषाच्या अनेक जोडप्यांची रूपें त्याने प्रथम धारण केली व संततिरूपानें तो परमात्मा नंतर अनेक झाला. वगवेगळ्या स्त्रीपुरुषांच्या विविध जोडप्यांच्या रूपांनी एक मी हे भान अनेक झालें व एकजोडप्याच्या रूपाने त्याने आपले एकत्व राखिलें. ही प्रजोत्पादनाच्या निमित्ताने झालेली एकाचींच दोन रूपें असल्यामुळे प्रजो त्पादनाच्या व तदर्थ साधन म्हणून गणल्या गेलेल्या धर्मार्थात आम्ही परस्परांना सोडून परस्पर कर्धी वागणार नाही म्हणून शपथ घेतली जाते व एकत्वानें प्रवृत्तिधर्म अनुष्टिला जातो. भिन्नत्वाच्या कृतीत व बहुत्वाच्या व्यवहारांत एकत्याच्या ज्ञानानें क्रममुक्ति मिळविण्याचा हा प्रवृत्तिमार्ग आहे. निवृत्तिमार्ग म्हणजे संन्यास. हा मार्ग सधोमुक्तीचा आहे. ‘मी’ अशी ही एक आत्मरूपाची जाणीव प्रजोत्पादनाच्या वासनेने सतीपतींच्या व तद्वारां संततीच्या अनेक रूपांनी नटली असल्यामुळे सतीपतदन व त्यांच्या संततीतून एकत्याची भावना जागृत राहणं अवश्य आहे व नैसर्गिक आहे. ईशप्रणीत दृष्टीनें सतीपतींना पातिव्रत्याचें व एकपत्नीत्रताचे आणि तत्संततीला आर्य धर्म याच मातृपितृभक्तीचे कर्तव्यत्वेन विधान करीत आहे. यांत कोणास कसली चूक काढतां येणे शक्य आहे ? साक्षात् ईशप्रणीत आर्य धर्माचें हें तत्त्व जाणल्यास भारतांतच काय अखिल जगांतच विवाहविच्छेद, घटस्फोट, पुनर्विवाह अशासारखे घातुक कायदे कोण करील व कोणी केल्यास कोण अमलांत आणील आणि कोण त्याप्रमाणे मनापासून वागेल ? अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः । ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्

home-last-sec-img