Literature

सत्याचा महिमा

सत्यमेवानृशंसं च राजवृत्तं सनातनम् । 

तस्मात्सत्यात्मकं राज्यं सत्ये लोकः प्रतिष्ठितः ॥

-सत्याचे सरळ आचरण व हिताचें प्रेमळ शासन हा राजाचा सनातन धर्म होय. सत्याचें राज्य असले पाहिजे. सत्याच्या पायावर जगाची प्रतिष्ठा आहे.

ऋषयश्चैव देवाश्च सत्यमेव हि मेनिरै ।

सत्यवादी च लोकेस्मिन् परमं गच्छति क्षयम् ॥

ऋषींनी आणि देवतांनी सत्यालाच मान दिला, सत्यच एक उत्कृष्ट मानले. सत्यभाषी जगांत मोक्ष मिळवितो. मोक्षांत दुःखाचा परमक्षय म्हणजे अत्यंताभाव असतो. म्हणून मोक्षास परमक्षय असें नांव आहे. इंद्रिय, वाणी व मन यांनी जे जसें जाणलेलें असतें तसेच प्रगट करणें हें व्यावहारिक सत्य होय. ब्रह्म हें जगाचे अंतिम सत्य असल्यामुळे ब्रह्मनिरूपण करणेंहि सत्य होय.

उद्विजन्ते यथा सर्पान्नरादनृतवादिनः ।

धर्मः सत्यं परो लोके मूलं स्वर्गस्य चोच्यते ॥

खोटे बोलणाऱ्याकडे सर्पाइतक्याच प्रेमानें लोक बघतात; तितकेच ते त्याला चाहतात. जगांतच सत्य हा एक श्रेष्ठ धर्म आहे. स्वर्गाचें तसेंच मोक्षाचें सत्य हेच एक मूलकारण आहे.

सत्यमेवेश्वरो लोके सत्यपद्माश्रितः सदा ।

सत्यमूलानि सर्वाणि सत्यान्नास्ति परं पदम् ॥

जगामध्यें सत्यच ईश्वर होय ( सत्य पाळणाऱ्याच्या अंगांत ईश्वराइतकें सामर्थ्य येते). सत्याच्या पायावरच धर्माचे मंदिर स्थिर असतें. लक्ष्मीहि ( संपत्तिहि ) सत्याचाच आश्रय करून राहते, सत्याबरोबरच असते, सत्यपालनानेंच प्राप्त होते. निखिल मोक्षसाधनाचें सत्य हेंच एक मूळ आहे. सत्या पेक्षां अधिक उत्तम गति कोणतीच नाही आणि सत्यापेक्षां अधिक श्रेष्ठ पद दुसरे नाहीं.

दत्तामिष्टं हुतं चैव तप्तानि च तपांसि च ।

वेदाः सत्यप्रतिष्ठानास्तस्मात्सत्यपरो भवेत् ॥ ( वा. रा. अयो. स. १०९।१३।१४ )

दान, यज्ञ, होम, अनेक प्रकारची तपें, सर्व वेद या सर्वांचा आधार एक सत्यच असल्यामुळे सर्वांनीं सत्यपरायण झाले पाहिजे.  बोले तैसा चा त्याचीं वंदावीं पाउलें । ” श्रीरामालाच इतके आदर्श पुरुष म्हणून कां माना वयाचे, श्रीरामालाच इतकें वंद्य म्हणून कां मानावयाचें तें या तुकारामोक्ती स्पष्ट जैसें बोलणीं बोले । तैसोंच चालणीं चाले। योगी ज्यानें तोषि विले । तो महापुरुष हा श्रीराम आहे. अनृतं नोक्तपूर्व मे न वदिष्ये कथं चन । -असत्य मी कधीं पूर्वीहि बोललों नाहीं आणि पुढेहि बोलणार नाहीं, म्हणून आपल्या जीवनाची साक्ष ठेवून श्रीरामानें कैकयीचे समाधान केलें होतें. सत्यान्न प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रमदितव्यम् । म्हणून श्रुति सांगते. कोणी किती आग्रह केला तरी श्रीरामाचे वसिष्ठादि सर्वांना हें असें एकच सांगणे होते. ही श्रीरामाच्या सत्यप्रतिज्ञतेची घोषणा आहे.

लक्ष्मीचन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् ।

अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥

– चंद्राची मुखश्री त्याला सोडून जाऊं शकेल, हिमालय पर्वत आपले हिम सोडून राहू शकेल, समुद्र आपली मर्यादा उल्लंधूं शकेल पण मी मात्र तीर्थस्वरूपी पित्याचे वचन थोडेंहि भंगविणार नाही. खऱ्या पितृभक्तीच्या सत्यसंधाचा हा एक आदर्श आहे. पित्याशी किती कृतज्ञ असले पाहिजे याचा धडाच अशा रीतीनें श्रीरामानें घालून दिला आहे.

home-last-sec-img