Literature

सद्गुरूची लक्षणे

जो ब्रह्मज्ञान उपदेशी । अज्ञान अंधारें निरसी । जीवात्मया परमात्म्यासी । ऐक्यता करी ॥ द. ५ स. २ । ९. विघडले देव आणि भक्त । जीवशिवपणे द्वैत । तया देवाभक्तां एकांत । करी तो सद्गुरु ॥ १० ॥ भव व्याघ्रे घालून उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोन शीघ्र सोडी । तो सद्गुरु जाणावा ॥ ११ ॥ प्राणी मायाजाळी पडले  संसारदुःखें दुखवले । ऐसे जेणें मुक्त केले । तो सद्गुरु जाणावा ॥१२॥ वासना नदी माहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी । तेथें उडी घालून तारी। तो सद्गुरु जाणावा ॥ १३ ॥ गर्भवास अति सांकडी । इच्छा बंधनाची बेडी । ज्ञान देऊन सीघ्र सोडी । तो सद्गुरु स्वामी ॥ १४ ॥ फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार । तोचि सद्गुरु माहेर । अनाथांचे ॥ १५ ॥ जीव एकदेशी बापुडें । तयासि ब्रह्माचे करी रोकडें । फेडी संसार सांकडें । वचनमात्रे ॥ १६ ॥ जें वेदांचें अभ्यांतरी । ते काढूनि अपल्यापरी । शिष्यश्रवण कवळ भरी उद्गारवचनें ॥ १७ ॥ वेदशास्त्र महानुभाव । पाहतां एकचि अनुभव । तोचि एक गुरुराव । ऐक्यरूपें ॥१८॥ श्रीरामाचें अंतरीं ध्यान करून त्याला अनुलक्षूनच श्रीसमर्थांनी हें वर्णन केलें नाहीं असें कोण म्हणेल  पुढेंहि गुरूचा आदर्श म्हणून श्रीरामालाच पुढे ठेऊन सद्गुरूची लक्षणे सांगण्यास प्रारंभ केला आहे. संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आदरें प्रतिपाळी । वेद विरहित टवाळी । करूंच नेर्णे ॥ १६ ॥ जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी । इंद्रिय दमन प्रतिपादी । तो सद्गुरु जाणावा ॥ २२ ॥ जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणि स्थूळ क्रियेचे साधन । तोचि सद्गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८ ॥ मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधी पाहिजे विमळज्ञान । निश्चयाचे समाधान  स्वरूपस्थिति ॥ ४५ ॥ याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ । विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषयीं ४६याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरूपण | जेथें परमार्थ विवरण निरंतर ॥ १७ ॥ जेथें सारासारविचार । तेथें होये जगोद्वार । नवविधा भक्तीचा आधार । बहूत जनासी ॥ १८ ॥ म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्म कर्म आणि साधन । कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२ ॥ यामध्ये एक उणें असें । तेणें ते विलक्षण दिसे । म्हणोनि सर्वहि विलसे । सद्गुरुपासीं ॥ ५३ ॥ तो बहुतांचे पाळणकर्ता । त्यांस बहुतांची असे चिंता नाना साधनें समर्थ । सद्गुरुपासी ॥ ५४॥

सद्गुरुकृपेनें होणाऱ्या ज्ञानाचे लक्षण श्रीसमर्थांनी ५ व्या दशकांतील सहाव्या समासांत पुढीलप्रमाणे सांगितले आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान पाहावें आपणासि आपण या नांव ज्ञान ॥ ५-६-१ ॥ मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरूप वोळखावें । नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २ ॥ जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक बोसरे । समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान ॥ ३ ॥ मन बुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार । उलेख परेहूनि पर। या नांव ज्ञान ॥ ४ ॥ जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हे अज्ञान । विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान । यासि बोलिजे ॥ ५ ॥ ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण या नांव शुद्ध स्वरूप ज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ । वेदांत मतें ॥ १८ ॥ शोधितां आपलें मूळ स्थान । सहजाच उडे अज्ञान या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्ष दायेक ॥ १९ ॥ मी कोण ऐसा हेत। धरून पाहतां देहातीत । आ लोकितां नेमस्त । स्वरुपचि होये ॥ २१ ॥ सहाव्या दशकाच्या सातव्या समासात कशासाठी आतां भजन करूं।म्हणून विपरीत भावना करून घेतलेल्या आपल्या शिष्याला उद्देशून श्रीरामाचे महत्त्व श्रीसमर्थांनीं सांगितले आहे. रामराज्याच्या उद्देशानें श्रीरामाचा परिचय करून घेण्यास निघालेल्या आम्हांला श्रीसमयांच्या अमृतवाणीचा लाभ काय होतो ते पाहूं.

हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तं एक मानवी रंक । भजेसिना तरी काय गेलें ॥ ६-७-२० ॥ आमुचे कुळी रघुनाथ । रघु नायें आमुचा परमार्थ । जो समर्थाचा हि समर्थ । देवां सोडविता ॥२१॥ त्याचे आम्हीं सेवकजन सेवेकरितां जालें ज्ञान । तेथे अभाव धरितां पतन । पाविजेल की ॥ २२ ॥ करी दुर्जनाचा संहार । भक्तजनासी आधार । ऐसा हा तो चमत्कार  रोकडा चाले ॥ २९ ॥ मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि जातें । कृपा केलिया रघुनायें । प्रचीत येते ॥ ३० ॥ रघुनाथ भजनें ज्ञान जालें । रघुनाथ भजनें महत्त्व वाढलें । म्हणोनियां तुवां केलें । पाहिजे आधी ॥ ३१ ॥ असे अगदीं निक्षून सांगून  हें तो आहे सप्रचित । आणि तुज वाटेना प्रचित  तरी साक्षा त्कारें नेमस्त । प्रत्ययो करात्रा  असें रोखठोक कळविलें आहे. पुढेहि रघुनाथ स्मरोनि कार्य करावें । तें तत्काळचि सिद्धि पावे । कर्ता राम हे असावें । अभ्यांतरी ॥ ३३ ॥ मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी । राम कर्ता म्हणतां पावसी । येश कीर्ती प्रताप ॥ ३६ ॥ या कारणें रघुनाथ भजन  त्यासि मानिती बहुत जन । ब्रह्मादिक आदिकरून राम भजनीं तत्परं ॥ ३९ ॥ इत्यादि भारत राज्याला राम-राज्याची दीक्षा देऊं पाहणाऱ्या आम्हां सर्वांनाहि हे सर्व ठाऊक असावयाला पाहिजे.

रामराज्याचे रामच अधिदैवत होतें. हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक हे श्रीसमर्थांच्या तोंडचे शब्द ऐकतांना  रामायणमहात्म्या चा ब्रह्मविष्णुमहेशाद्या यस्यांशा लोकसाधकाः । तमादिदेवं श्रीरामं विशुद्धं परमं भजे ॥ हा श्लोक आठवतो. श्रीसमर्थांनीहि सांगितलेच आहे कर्म केलेंचि करावें। ध्यान धरिलेंचि धरावें । विवरलेंचि विवरावें । पुन्हां निरूपण ॥ ११॥५॥१. तैसे आम्हांस घडलें । बोलिलेंचि बोलणे पडलें । कां जें विघडलें चि घडलें। पाहिजे समाधान ॥ २ ॥ अगदी असेंच प्रस्तुत मलाहि झाल्यासारखे वाटतें. वाचकांनी कंटाळू नये पोती ठेचून भरल्याप्रमाणे भरगच्च व्हावे म्हणून वाटते. उद्देश चांगलाच उद्देशाकडे लक्ष देऊन न आस्थेनें वाचून त्यांतले लागू पडणारे धडे गिरवून प्रत्येकानें तरबेज व्हावे. अकराव्या दशकाच्या पांचव्या समासांत राजकारणाचे धडे शिकविले आहेत. क्रमवार आचरणांत ठेवण्याचे नियम सांगितले आहेत. व्यक्तीचा आणि राष्ट्राचा व्यवहार शिकविला आहे. यांतल्याहि कांहीं ओव्या मननाकरितां ये उद्धृत करूं :

अनन्य राहे समुदाव  इतर जनांस उपजे भाव। ऐसा आहे अभिप्राव । उपायाचा ॥ ३ ॥ मुख्य हरिकथा निरूपण दुसरें तें राजकारण । तिसरें तें सावधपण । सर्वविषयीं ॥ ४ ॥ चौथा अत्यंत साक्षप । फेडावे नाना आक्षप  अन्याये थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥ ५ ॥ जाणावें पराचे अंतर उदासीनता निरंतर । नीतिन्यायासि अंतर ! पडोंचि नेदावें ॥ ६ ॥ संकेतें लोक बेधावा । येकून येक बोधावा । प्रपंचहि सांवरावा । येथानुशक्त्या ॥ ७ ॥ प्रपंच समयो ओळखावा । धीर बहुत असावा संबंध पडों नेदावा अति परी तयाचा ॥ ८ ॥ उपाधीसी विस्तारावें । उपाधीत न सांपडावें । नीचत्व पहिलेच घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥ दोष देखोन झांकाचे अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥१०॥ तऱ्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाये । नव्हे तें चि करावें कार्ये । दीर्घ प्रेत्ने ॥११॥ फड नासोचि नेदावा । पडिला प्रसंग सांवरावा । अतिवाद न करावा । कोणी येकासी ॥ १२ ॥ दुसऱ्याचें अभिष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें ॥ १३ ॥ दुःख दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें। बरें बाईट सोसावें । समुदायाचें ॥१४॥ अपार असावें पाठांतर । सन्निध चि असावा विचार सदा सर्वदा तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥ शांती करून करवावी । तऱ्हे सांडून सांडवावी । सत्क्रिया करून करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥ सरळ रीतीनें होत नसेल तर बहुजनांच्या हिताकरितां गत्यंतर नसल्यामुळे करणें असेल अपाये। तरी बोलोन दाखवूं नये । परस्परे चि प्रत्ययें प्रचितीस आणावा ॥ १७ ॥ जो बहुतांचें सोशीना । स बहुत लोक मिळेना। बहुत सोशितां उरेना महत्व आपुलें ॥ १८ ॥ राजकारण बहुत करावे। परंतु कळोंचि नेदावें । परपीडेवरी नसावे । अंतःकरण ॥ १९ ॥

शुभमस्तु सर्वजगतः परहितनिरता भवन्तु भूतगणाः । दोषाः प्रयान्तु नाशं सर्वजनोऽयं सदा सुखी भवतु करावयाचें तें याचकरितां हा आर्य संस्कृतीचा परिपाठ श्रीसमर्थांच्या या ओवीतूनहि कसा उठून दिसतो बघा. लोकहिताच्या उन्नत दृष्टीने रोग बरा होण्यास दिल्या जाणाऱ्या कडवट औषधाप्रमाणे कांहींसें तीव्रहि बागावे लागतें. लोक पारखावे लागतात.

लोक पारखून सांडावे  राजकारणें अभिमान झाडावे पुन्हां मेळवून घ्यावे । दुरील दोरें ॥ २० ॥ हिरवटासी दुरी धरावें। कचरटासी न बोलावें । संमंध पडतां सोडून जावें । येकीकडे ॥ २१ ॥ ऐसें असो राजकारण सांगतां तें असाधारण सुचित असतां अंतःकरण  राजकारण जाणें ॥ २२ ॥

सतां हि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाण मन्तःकरणप्रवृत्तयः ॥ हाच अभिप्राय येथे प्रगट झाला आहे. शुद्धांतःकरणाच्या उदात्त ध्येयाच्या ईश कृपाप्रसादित माणसांना त्या त्या वेळी आपोआपच देवाची योग्य सूचना अथवा प्रेरणा होते. पुढे राजकारणाची नीति आहे.  वृक्षारूढासि उचलावें आश्रयाची आवश्यकता असून शरण आलेल्या सत्पात्रास आधार द्यावा.  युद्धकर्त्यास  म्हणजे गुरमीच्या माणसांना ढकलून यावें ।  (आश्रय देऊं नये) कारवाराचे सांगावें। आंग कैसें ॥ २३ ॥ पाहातां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना । आलें वैभव अभिळासीना  कांहीं केल्या २४ एकाची पाठी राखणे । एकास देखों न सकणें ऐसी नव्हेत की लक्षणे । चातुर्याचीं ॥ २५ ॥

सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु माकश्चिद् दुःखमाप्नुयात् ।। म्हणूनच सर्व केले पाहिजे. श्रीरामाचा अवतारहिं पण याकरितांच होता. त्याच्या भारतवर्षाच्या राज्यांत म्हणजेच रामराज्यांत असेच सर्वत्र होत असलेले दिसून यावयाला पाहिजे.

श्रीरामदासांची शिकवण थोड्या प्रमाणांत का होईना श्रीरामहृदयाचा परिचय होण्याकरितां आम्ही येथें बघत आहोत. श्रीसमर्थांनी अकराव्या दशकाच्या सहाव्या समासांत  महंतलक्षण या मथळ्याखाली आदर्श पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. कोणत्याहि दृष्टीने आदर्श पुरुषाची लक्षणे सांगावयास म्हणून श्रीसमर्थ जिथे जिथे उद्युक्त होतात तिथे तिथे करोनि रघुनाथस्मरण हें सारखें चोहींकडे अनुगत असतेच असा आपण निश्चयच बाळगावा.

हरिकथा निरूपण । नेमस्तपणे राजकारण । वर्तायाचें लक्षण  असावें ॥४॥ पुस जाणे सांगों जाणे । अर्यांतर करूं जाणे । सकळिकांचे राखों जाणे। समाधान ॥५॥ दीर्घसूचना आर्धी कळे । सावधपणे तर्क प्रबळे  जाण जाणोनि निवळे । यथा योग्य ॥ ६ ॥ ताळमेळ तानमानें । प्रबंद कविता जाड वचनें । मज्यालसी नाना चिन्हें । सुचती जया ॥ ८ ॥ जो एकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर । अथवा शोधी अर्थातर  ग्रंथगभींचें ॥ ९॥ आधींच सिकोनि ओ सिकवी  तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकवळें ॥ १० ॥ अक्षर सुंदर वाचर्णे सुंदर। बोलणें सुंदर चालणे सुंदर । भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर । करून दावी ॥ ११ ॥ जयास येत्न चि आवडे । नाना प्रसंगी पवाडे । धीटपणे प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥ सांकडीम बत जाणे । उपाधीमध्ये मिळों जाणे । अलितपणे राखों जाणे आपणासी ॥ १३ ॥ आहे तरी सत्र ठाईं। पाहो जातां कोठेच नाही जैसा अंतरात्मा ठाईंच्या ठाईं। गुप्त जाला १४ त्या वेगळे कांहींच नसे पाहों जातां तो न दिसे । न दिसोन वर्तवीतसे  प्राणीमात्रासी ॥ १५ ॥ तैसाचि हा नाना परी । बहुत जनास शहाणे करी नाना विद्या विवरी । स्थूळ सूक्ष्मा ॥ १६ ॥ (आधिभौतिक आणि पारमार्थिक राखों जाणे नीति न्याये । न करी न करवी अन्याये । कठीण प्रसंगी उपाये । करूं जाणे ॥ १८ ॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधा बहुतांचा । दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥

समर्थांचे हृदय या ठिकाणी संपूर्ण व्यक्त झाले आहे. भारताच्या ‘ रामराज्यांत रामाची ओळख आबालवृद्धांना असली पाहिजे. श्रीरामाच परिचय व्हावा म्हणून श्रीरामाचे वर्णन श्रीसमर्थांनी केले व त्याची रीआम्ही ओढली. समर्थ म्हणतात : ऐसें ओळखिले पाहिजे । ओळखोन भजन कोजें जैसा साहेब नमस्कारिजे । ओळखिल्या उपरी ॥ ११-९-७॥ श्रीरामाला पुढे ठेऊन श्रीसमर्थांनीं जीवनांतला वर्तनक्रम आम्हांला अनेक ठिकाणी आंखून दिला आहे व तदनुसार आर्य संस्कृतीचे बाळकडूहि आम्हांला पाजले आहे. अकराव्या दशकाच्या दहाव्या समासांतहि असाच प्रसंग आला आहे. तिथल्या कांहओव्या पाहूं :  मूर्ख एकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो । असा इशारा देऊन सर्वदेहचालक अंतरात्म्याप्रमाणेच महंत अथवा नेता असावा असा उपदेश केला आहे :

प्रगट कीर्ति ते ढळेना। बहुत जनास कळेना । पाहों जातां आढळेना । काये कैसें ॥ ६ ॥ वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषण तें चाळणेवीण येक क्षण | जाऊं च नेदी ॥ ७ ॥ त्यागी ओळखीचे जन । भूषण । सर्व काळ नित्य नूतन । लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ॥८॥ बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें । म्हणजे बरें ॥१६॥ अखंड एकांत सेवाचा अभ्यास चि करीत जावा । काळ सार्थक चि करावा । जनासहित ॥ १७ ॥ उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे । उदंड समुदाये करावे परी गुप्तरूपें ॥ १८ ॥ अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग । लोक समजोन मग आज्ञा इच्छिती ॥ १९ ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाण जाणोन धरावे । जवळी दुरी ॥ २१ ॥ अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नसतां वेर्थ जातें । जाणोनि शोधावीं चित्तें | नाना प्रकारें ॥ २२ ॥ अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें । आपला मगज राखणें । कांहीतरी ॥ २३ ॥ हें प्रचितीचें बोलिलें। आधीं केलें मग सांगितलें । मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी एकें ॥ २४ ॥ महंतें महंत करावे । युक्ति बुद्धीनें भरावे जाणते करून बिखराये । नाना देसी ॥ २५ ॥ शेवटच्या या दोन ओव्यांतून श्रीसमर्थांची निरहंकार वृत्ति,अचूक मार्गदर्शन, कर्तव्यदक्षता व जनहिताची कळकळ स्पष्ट व्यक्त होते. ” पतित पावनाचे ( श्रीरामाचे ) दास। तेहि पावन करिती जगास । ऐसा निश्चयो बहुतांस । अंतरीं आला ॥ ” हे श्रीसमर्थांचे शब्द त्यांच्या बाबतींत अगदी खरे ठरतात. यापुढच्या बाराव्या दशकांत पहिल्या समासांत श्रीसमर्थ सांगतात आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका। येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल | प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ॥२॥ संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा संयुक्त । अखंड पाहे युक्तायुक्त | विचारणा हे ॥ ८ ॥ प्रपंचीं जो सावधान | तो परमार्थ करील जाण । प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ॥ ९॥ म्हणोनि सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालविणें । ऐसें न करितां भोगणें ।नाना दुःखे ॥ १० ॥ सुखी असतो खबर्दार । दुःखी होतो बेखबर। ऐसा हा लौकिक विचार । दिसताच आहे १३॥ म्हणोनि । धन्य तयाचे महिमान । जनीं राखें समाधान । तोचि एक ॥ १४॥ | चाळणेचा आळस केला । तरी अवचिता पडेल घाला । ते वेळ साबरायाला । अवकाश ऊँचा ॥१५॥ म्हणौन दीर्घसूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक । लोकांकरितां लोक । शाहाणे होती ॥ १६ ॥ पर ते शाहाणे ओळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे । अवगुण देखोन सांडावे । जनामधें ॥ १७ ॥ मनुष्य पारखूं राहेना । आणि कोणाचें मन तोडांना। मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥ दिसे सकळांस सारिखा। पाहतां विवेकी नेटका | कामी निकामी लोकां । वरें पाहे ॥ १९ ॥ जाणोन पाहिजेत सर्व । हेंचि तयाचें अपूर्व । ज्याचे त्यापरी गौरव । राखे जाणे ॥ २० ॥

याच्या पुढच्या दुसऱ्या समासांतहि जीवनाचे धडे आहेत. शिकावयाचे या दृष्टीनें कांहीं ओव्या येथें बघू आपल्या अपयशाचें सर्व कारण म्हणजे केवळ अचूक यत्नाचा अभाव हें पुढील ओवीवरून दिसून येतें. ही ओवी एक मोठा महत्त्वाचा पाठ शिकविते. श्रीरामाच्या आदर्शमत्वाचे मुख्य कारण म्हणजे अचूक प्रयत्न हेहि यांतून स्पष्ट होतें.

‘अचूक येत्न करवेना । म्हणोन केलें तें सजेना । आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्या ॥ ६ ॥ समजले पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥” हा इषारा समर्थांनी पुष्कळ वेळां दिला आहे. 

अचूक यत्नांतच याचा अंतर्भाव होतो.  दुसऱ्यास शब्द ठेवणें आपला कैपक्ष घेणें । पाहों जातां लौकिक लक्षणें । बहुतेक ऐसीं।।१२।।

 या जनसामान्य लक्षणापासून दिव्य जीवनाकरितां आपल्याला राहणे अवश्य आहे, त्यासंबंधी पुढे बघू.  

लोकी बरें म्हणाया कारणें । भल्यांस लागतें सोसणें । न सोसत भंडवाण । सहजचि होये ॥ १२-२-१३. आपणास जे मानेना । कदापि राहावेना । उरी तोडून जावेना । कोणी येकें ॥ १४ ॥ खरें चालतो खरें । त्यास मानिती लहानथोरें। न्याये अन्याये सहज चिरुले ॥ १५ ॥ लोकांस कळेना तंवरी । विवेके क्ष्मा जो नक तेणे करितां बराबरी होत जाते ॥ १६ ॥ जंवरी चंदन झिजेना l तंव तो सुगंध कळेना । चंदन आणि वृक्ष नाना सगट होती ॥ १७ ।। उत्तम गुण न कळे । तो या जनास कार्य कळे उत्तम गुण देखनां निकले। जगदांतर ॥ १८ ॥ जगदांतर निवळत गेलें जगदांतरी मुख्य जालें। मग जाणाचे बोळले । विश्वजन ॥ १९ ॥ जनी जनार्दन बोला तरी काये उणे तयाला राजी राखावें सकळांला।  कठिण आहे || २० || पुढाऱ्यांनी इकडे लक्ष पोहोचवून कार्यरंगांत ( क्षेत्रांत) वावरावें. पेरले तें उगवतें । उसणे द्यावे घ्यावे लागते । वर्म काढितां भंगते परंतर ॥२१॥ लौकिकी बरेपण केलें । तेणें सौम्य वाढले । उत्तरासारिखे आले । प्रत्योत्तर ॥ २२ ॥ हें आप आपणापासी । येथे बोल नाही जनासी । शिकवावे आपल्या मनासी । क्षणक्षणा ॥ २३ ॥ 

हा धडा अत्यंत आस्थेने आपण शिकावयास पाहिजे. लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेणती । तेणें प्राणी करंटें होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥ आपणास आहे मरण म्हणोन राखावें बरेपण । कठिण आहे लक्षण विवेकाचें ॥ २६ ॥ हे असले तरी गत्यंतरच नसल्यामुळे आपल्या प्रयत्नाने मुख्य श्रीराम समर्थकृपेनें हे अंगवळणी पाडून घ्यावयालाच पाहिजे. 

बरे करता बरे होते। हे तो प्रत्ययास येतें । आतां पुढे सांगावें तें । कोणास काये ॥ २८ ॥ चुकूनसुद्धां आडमार्गानें न जाता जाणून बुजून सदैव सन्मार्गावरच प्राणपणाने राहावयाला पाहिजे हे यांतून स्पष्ट होते. हेच श्रीरामाच्या जीवनाचे ब्रीदवाक्य आहे. 

हरिकया निरूपण बरेपणे राजकारण प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ||२९|| विया उदंडचि सिकला प्रसंगमान चुक्तचि गेला तरी मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥

समयसूचकता, प्रसंगावधान, दूरदृष्टि, अमोल संधीचा अचूक प्रयत्न करून उपयोग करून घेणे हे सर्वत्र पाहिजे, हा या ओवीत श्रीसमर्थांनी आम्हांला पाठ दिला आहे. तो कधीच विसरता कामा नये. हरिकथा ( सगुण मजन ), निरूपण (ब्रह्मस्वरूपाचे परिज्ञान ) व बरेपणे राजकारण या वर विशेष भर देऊन श्रीसमर्थ पुनः पुनः सांगत आहेत, ते का याचा खोल विचार करून त्याचे महत्त्व जाणावयाला पाहिजे.

या पुढील तिसऱ्या समासाच्याहि या ओव्या विचारणीय आहेत: पृथ्वीमध्यें बहुत लोक । तेंहि पाहावा विवेक। इहलोक आणि परलोक । बरा पाहावा ॥ १ ॥ इहलोक साधाया कारणे । जाणत्याची संगती धरणे lपरलोक साधाया कारणें । सद्गुरु पाहिजे ॥ ॥ सद्गुरूसी काये पुसावें । हेहि कळेना स्वभावें । अनन्य भावें येकभावें । दोन्ही गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥

 याचे महत्त्व विशेष आहे. इकडे आम्हां सर्वासच लक्ष पुरवावयास पाहिजे. दोनी गोष्टी त्या कोण। देव कोण आपण कोण या गोष्टिचे विवरण । केलें चि करावें ॥ ४ ॥ सकळ केलियाचे फळ । शामत ओळखावें निश्चळ । आपण कोण हा केवळ । शोध घ्यावा ॥६॥ शाश्वत देव तो निर्गुण । ऐसी अंतरीं बाणली खूण | देव कळला मी कोण । कळले पाहिजे ॥ २२ ॥ पंचीकरण तत्वविवरण | महावाक्य वस्तु आपण । निसंगपणें निवेदन । केलें पाहिजे ॥२६॥ पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास। ऐसी ही प्रचीत मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥

रामराज्यांत नांदूं पाहाणाऱ्या आम्हां सर्वांनाहि ही ओवी अगदीं हृदयाशीं बाळगावयाला पाहिजे. श्रीरामाचा संप्रदाय, सद्गुरूचें महत्त्व, त्याला काय पुसावें व देव कोण, आपण कोण याचा उलगडा या ओवींतून झाला आहे. जगास पावन करण्याचा मार्ग व त्या मार्गदर्शकत्वाची रामभक्तावर असणारी ! जबाबदारी या दोन्ही गोष्टी यांतून स्पष्ट होतात. रामराज्याच्या अखिल प्रजेनें हे उमगावयाला पाहिजे. पुढच्या चौथ्या समासांतल्या तीनचारच ओव्या घेऊं.

जैसें मुखें ज्ञान बोले । तैसी च सर्वे क्रिया चाले । दीक्षा देखोनि चकित झाले । सुचिष्मंत ॥ १३ ॥ असें आम्हां सर्वांना व्हावयास पाहिजे. सन्मार्गे जगास मिळाला । म्हणजे जगदीश बोळला । प्रसंग पाहिजे कळला कोणी येक ॥ १७ ॥ रामराज्यांत राहावयाचे तर हा जगदीश ओळखण्याचा मार्ग आम्हांला प्रथम हस्तगत करणे अवश्य आहे. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नानसंध्या भगवद्भजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥

अशी रामराज्याची प्रजा असावयास हवी एरवीं रामराज्याची प्रजा म्हणवून घेर्णे म्हणजे हिऱ्याच्या पोटी गारगोटी अथवा समर्थाचा पुत्र भिकारी जैसा असे होण्याचा संभव आहे. आर्य संस्कृतचे हे पाठ आहेत. आदर्श पुरुष श्रीरामाची ही लक्षणे आहेत.  आधी केले मग सांगितलें या श्रीदवाक्याच्या श्रीरामभक्त मारुतिरायाच्या अवताराचे हे स्वानुभवोद्गार आहेत. आपल्याला ज्येष्ठांनी दिलेले हे पाठ न कंटाळतां गिरवावयालाच पाहिजेत. यानें श्रीरामाची आपल्यावर आपोआप कृपा होईल.

आयुष्यांत वागावें कसें याकरितां आपण माहिती मिळत जात आहोत तें श्रीरामाला आदर्श ठेऊन शिकत आहोत. त्याच्या कृपेंतील अनुकरणीय व्यक्तींचे बोल ऐकत आहोत. आर्य संस्कृतीचा परिचय करून घेत आहोत. पुढच्या ओव्यांकडे थोडेंसें लक्ष पुरवून पुढे जाऊँ बरीच दूरची मजल गांठावयाची आहे. विषय त्यागेंवीण तो कांहीं। परलोक तो प्राप्त नाहीं । ऐसें बोलणे ठाई ठाईं। बरें पाहा ॥ ४ ॥ या विषयत्यागाचा उलगडा श्रीसमर्थच करतात. सबळ विषय त्यागणे । शुद्ध कार्याकारण घेणें  विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी ॥ २७ ॥ (द. १२ स. ७) जगण्या उपचार गृहस्थाश्रमाच्या निर्वाहणार्थ शेलके विषयसेवन सदाचरण आत्मचिंतन रामराज्याच्या प्रजेत असावयाला पाहिजे. घालून अकलेचा पवाड  व्हावें ब्रह्मांडाहून जाड । तेथें कैचें आणलें द्वाड । करंटपण ॥ २९ ॥ ( द. १२ स. ९) केल्याने होत आहे रे। आधी केलें चि पाहिजे यत्न तो देव जाणावा । अंतरीं धरितां बरें ॥ ( स्फुट प्रक. ) श्रीसमर्थांच्या या अचूक प्रयत्नवादापुढे गबाळ निराशावाद कोठें दडून जातो त्याचा पत्ता लागत नाही. रामभक्तांचा अर्थात् श्रीरामाचा हा संप्रदाय. श्रीरामाच्याच तालमीत रामभक्त तयार होतात का नाही ! राम राज्याच्या प्रजेचाहि हा ध्रुवतारा असावयास पाहिजे. लहान थोर काम कांहीं। केल्या वेगळे होत नाही। करंट्या सावध पाहीं । सदेव होसी ॥ ६ ॥ (१२-९) श्रीसमर्थ आमची पाठ थोपटून जागे करून दौर्बल्य घालवून सदेव म्हणजे सर्वतोपरी भाग्यवान् होण्यास सावधपणाचा इशारा देत आहेत.

हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । व्युत्पन्न आणि वादरहित  तरी हेहि अपूर्वता ॥ द. १४ स. ५१४. रागज्ञानी ताळज्ञानी । सकळवळा ब्रह्मज्ञानी । निराभिमानें वर्ते जनीं । तरी हेहि अपूर्वता ५

आदर्श रामराज्यांत अशी अपूर्वताच हवी. उच्च आदर्श डोळ्यापुढे ठेऊन वागणे शक्य आहे किंवा नाही या कल्पनेचा बागुलबुवा आम्हांस वाटावयाला नको.

अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती । कुविद्या सांडूनि सिकती। शाहाणे त्रिया ।। द. १४ स. ६ ओ. ५ ।। मूर्खपण सांडितां जाते। शाहाणपण सिकतां येते । कारबार करितां उमजते । सकळ कांही ॥ ६ ॥ मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी । चातुर्यवीण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥

देवाणघेवाण हा जगाचा न्याय आहे. करावें तसे भरावें हे सर्वानी ओळखून वागावें. आपण वागून व वर्तवून जगांत सत्क्रिया प्रतिष्ठावी. खोल विचारानें दूरदृष्टीनें व विवेकानें सदैव वर्तावें. आपण दुसऱ्यास करावें । तें उसिणे सर्वे चि घ्यावें ।जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ।। १२ ।। न्यायें वर्तेल तो शाहाणा अन्यायी तो दैन्यबाणा । नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जें बहुत मानलें । तें बहुत मान्य केलें । येर तें व्यर्थाचे गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥ लोक आपणासी बोळावे । किंवा अवघेचि कोसळावे । आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥१५॥ समाधानें समाधान वाढे  मैत्रीनें मैत्री जोडे । मोडितां क्षणमात्रे मोडे । बरेपण ॥ १६ ॥ लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे । लोक सहज चि ओढे । कामासाठीं ॥ २२ ॥ म्हणोन दुसऱ्यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें । दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें । लागेल पुढें ॥ २३ ॥ समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले । या वेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥ जितुका व्याप तितुके वैभव  वैभवासारखा हावभाव  समजलें पाहिजे उपाव । प्रगट चि आहे ॥ २६ ॥ आळसे कार्यभाग नासतो । साक्षेपें होत होत होतो । दिसते गोष्टी कळेना तो शहाणा कैसा ॥ २७ ॥ मैत्री करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्य। बोलिलें हें सत्य की असत्य । ओळखावें ॥ २८ ॥ आपण येकायेकीं येकला । सृष्टींत भांडत चालिला। बहुतांमध्ये येकल्याला  येश कैचें ॥३१॥ बहुतांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें  प्राणीमात्रासी ॥ ३२॥ शाहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमधें भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥ स्वपर उद्वाराचा व स्वपर सुखी जीवनाचा हा विवेक-उपाय आहे. आर्यांची झेप साऱ्या विश्वालाच पोहोंचते. आर्य संस्कृतीचें हें थोरपण आहे. श्रीरामचरित्राचा हा फांकलेला प्रकाश आहे. अंतरापासून वैराग्य। तेंचि जाणावें महद्भाग्य । लोलंगते येवढे अभाग्य । आणीक नाहीं ॥१४ ७ १०॥ भाग्याचें लक्षण व जीविताच्या सफलतेचें हें रहस्य आहे.

समाजशाखाच्या दृष्टीने व व्यावहारिक दृष्टीने पुढच्या ओल्या विशेष मननीय आहेत.

येके संगतीनें तरती। येके संगतीनें बुढती या कारण सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥ जो दुसऱ्याचे अंतर जाणे । देशकालप्रसंग जाणें । तया पुरुषा काय उणें भूमंडळी ॥ २८ ॥ नीच प्राणी गुरुव पावला। तेथें आचारचि बुडाला । वेदशास्त्रब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥ गुरुत्व आलें नीचयाती । कांहीयेक बाढली महंती शुद्र आचार बुडविती । ब्राह्मणाचा ॥ ३४ ॥

आचारः परमो धर्मः । आचारहीनं न पुनन्ति वेदाः । या दृष्टीनें आचाराचे प्राधान्य विशेष आहे. आणि त्यावरच घाला पडला तर….. भारताच्या सद्यः परिस्थितीचा विचार होऊन भावी आदर्श रामराज्याची सिद्धता झपाट्याने व्हावयाला पाहिजे. श्रीसमर्थ हे मारुतिरायांचे अवतार त्यामुळे रामाच्या व रामराज्याच्या प्राप्त्यर्थ त्यांना विचारूनच पुढे पाऊल टाकले पाहिजे. अग्रे वाचयाति प्रभंजनसुतस्तत्वं मुनिभ्यः परम् । श्रीराम सर्भेत तांत्रिक विवरण वाचून दाखविण्याचा अधिकार श्रीमारुतिरायांना होता. ते चिरंजीव आहेत. त्यांचेच अवतार श्रीसमर्थ. त्यांच्या उपदेशाप्रमाणे पाऊल टाकीत गेलों म्हणजे भारतवर्षाचे राज्य खरोखरी रामराज्य होऊन आम्हां सर्वांची जीवनयात्रा सुखसंतोषाची होईल व आम्हांपासून जगाला यथार्थ  मार्गदर्शन होईल.

जीव जीवांत घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा । राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा द. १५ स. १ ओ. ४

समाजांत कार्य करावयाचें तें धाकधपटशानें नव्हे तर पोटांत शिरून हें तत्त्व या ओबींतून दिसून येतें. समाजांत कडक शिस्त असावी ढिलेपणानें समाज विस्कळीत होतो हें या पुढील ओवींतून श्रीसमर्थांनी कळविले आहे.

जानवें हेंवडकारें झाल ढिलेपणें हेंवड आलें । नेमस्तपणें शोभलें ।दृष्टीपुढें ॥ ५ ॥ प्रेमानें व हितोपदेशानेंच समाजाची घडी बसवावी.

तैसोंच हें मनास मन। विवेकें जावें मिळोन । ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥ स्पष्ट व्यवहार असावा. न्यायनिष्ठुर असावें. अनुमानें अनुमान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो । या कारणें प्रत्यये तो । आधी पाहावा ॥ ७ ॥ श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले ॥ ११ ॥ राजे जाती राजपथे। चोर जाती चोरपंथें । वेडें ठके अल्प स्त्रायें । मूर्खपणें ॥ १२ ॥

सर्वोत्तम विचारसरणी उच्च ध्येय व सर्वोत्कृष्ट वर्तनक्रम असावा. अल्पस्वार्थानें कोणीहि कर्धीहि अल्प होऊं नये. श्रेष्ठ कार्यानी मनुष्य श्रेष्ठ होतो आणि श्रेष्ठ माणसे नेहमीच श्रेष्ठ कार्ये करतात.

जो जगदांतरी मिळाला । तो जगदांतर चि झाला । अस्त्रीं परत्रीं तयाला । काये उणें ॥ १४ ॥ प्रत्येकानेंच असे असावें. लटिक्याचा साभिमान घेणे । सत्य अत्रवेंच सोडणे मूर्खपणाची लक्षणें । ते हे ऐसी ॥ २० ॥ सत्याचा जो साभिमान तो जाणाचा निराभिमान । न्याये अन्याये समान । कदापि नव्हे ॥ २१ ॥

अनाठायीं भावना असू नये. आपली योग्य कल्पना असावी. अचूक खणगांठ बांधावी. एरवी तसे न झाल्यास कार्यच कांहीं होणें शक्य नाहीं. न्याय अन्याय दोन्ही कधीं एक करूं नयेत. न्याय आणि न्यायी आचरणाचें फळ उत्कृष्ट व तसेच ते टिकाऊ असते.

न्याये म्हणजे तो शाश्वत । अन्याये म्हणजे तो अशाश्वत । बाष्कळ आणि नेमस्त । येक कैसा ॥ २२ ॥

मुख्य मुख्यांना हाताशी धरून त्यांना सुधारले म्हणजे त्यांच्या हाता खालचा समाज आपोआपच सुधारतो व अनन्य होतो.

आचार विचारेंविण । जें जें करणें तो तो सीण। धूर्त आणि विचक्षण तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले परी ते धूतेंचि आळिले । धूर्तापासीं कांहीं न चले बाजाऱ्यांचे ॥ २५ ॥ या कारणें मुख्य मुख्य । तयांसी करावें सख्य । येणें करितां असंख्य बाजारी मिळती ॥ २६ ॥ ओळखीनें ओळखी साधावी बुद्धीनें बुद्धि बोधावी नीतिन्यायें वाट रोधावी। पाषांडाची ॥ ३०॥ भेट भेटों उरी राखणे हे चातुर्याची लक्षणें । मनुष्यमात्र उत्तम गुणें । समाधान पावे ॥ ३५ ॥ लोकीं लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले । भूमंडळीं सत्ता चाले । गुप्तरूपें ॥ १५/२६. ठाई ठाईं उदंड तावे । मनुष्यमात्र तितुकें झोंबे । चहुंकडे उदंड लांबे । परमार्थ बुद्धि ॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळी थोर थोर । प्रत्ययाने प्राणीमात्र सोडविले ॥ २८ ॥ ऐसें कैवाढ उदंड जाणे । तेणें लोक होती शाहाणे । जेथें तेथें प्रत्यये बाणें । प्राणिमात्रासी ॥ २९ ॥ ऐसी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हें स्वभावें । संकेर्ते बोलिलें ॥ ३० ॥

दास म्हणजे श्रीरामदास. त्यांनी श्रीरामाच्या आवडीचा हा लोकसंग्रह केला. लोकजागृति केली. आधी केलें मग सांगितले या नात्यानें दुसऱ्याच्या मार्गदर्शनार्थ लिहून ठेबिलें हे दास म्हणे स्वभावें या पदावरून स्पष्ट होर्ते. जेथे उदंड जाणीव । तोच तितुके सदेव । थोडे जाणीवेनें नर्देव । होती लोक ॥ १५/३/६. विशाल हृदयाचे लोक सदेव होतात असे सांगण्यांत श्रीसमर्थांचा काय हेतु आहे तो आम्ही जाणला पाहिजे. याविषयीं पुढें पाहूं.

व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी सदेव होती । देखत देखतां ॥ ७ ॥ जो बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा जाला । जनी शाहण्या मनुष्याला । काय उणें ॥ २६ ॥ रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येतें । डोळे झांकणी करावी ते काये निमित्य ॥ १५/६/९. उदंडाचे उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावें। खरेखोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥ माणूस हेकाड आणि कच्चे मान्य करावें तयाचे येणें प्रकारें बहुतांचे अंतर राखावें ॥ १३ ॥ वेडे करावें शाहाणे । तरीच जिणें श्लाघ्यवाणे । उगेच वादांग वाढवणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥ मिळोन जाऊन मेळवावें। पडी घेऊन उलथावें । कांहींच कळों नेदावें । विवेकवळे ॥ १६ ॥ जो दुसऱ्याच्या हितावरी । तो विपट कांहींच न करी । मानत मानत विवरी। अंतर तयाचें ॥ १८ ॥ आधी अंतर हातीं घ्यावें । भग हळुहळु उकलावें । नाना उपायें न्यावें । परलोकासी ॥ १९ ॥ भूमंडळीं सकळास मान्य । तो म्हणों नये सामान्य कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी ॥ २९ ॥ ऐसीं चातुर्याची लक्षणें। चातुर्ये दिग्विजये करणें । मग तयास काय उणें । जेथें तेथें ॥ ३० ॥

हें चातुर्य त्यांच्याच कृपेनें आम्हांला प्राप्त व्हावयास पाहिजे. राज्य धुरंधरांनी कोणत्याहि समाजाला न दुखवितां युक्तीनें लोकहिताच्या इहपर कल्याणकारक शास्त्रोक्त सुधारणा घडवून आणाव्यात हा यांतून अर्थ निघतो. लोकजागृतीचे हे धडे आर्य संस्कृतीला अनुसरून विश्वाच्या इहपर कल्याणाचे आपलें उदात्त हृदय व्यक्त करतात श्रीसमर्थांचा अनुभव सांगतात आणि त्याला श्रीरामाच्याच शिकवणीचा आधार दाखवितात. भारताचे रामराज्य करतांना भारताची पूर्वपरंपरा कशी आहे व श्रीरामाचे तसेच रामराज्याचे हृदय काय आर्य संस्कृतीचें लक्षण कोणतें याचा विचार करून महाजनो येन गतः स पंथाः । म्हणून विश्वसूनच पुढे पाऊल टाकले पाहिजे.

संगतीच्या लोकांचेंच वळण लागतें म्हणून सत्संगतीतच असावें असें श्रीसमर्थ निक्षून सांगतात. सुखमय दिव्य जीवनाचा सत्संग हा एक मुख्य घटकावयवच आहे. उत्तम संगती धरावी । आपली आपण चिंता करावी । अंतरीं वरी विवराची । बुद्धि जाणत्याची ।। १७ । ७ । १२. इहलोक आणि परलोक। जाणता तो सुखदायेक । नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥ जाणता देवाचा अंश । नेणता म्हणजे तो राक्षेस । यामधे जे विशेष  तें जाणोन घ्यावें ॥ १४ ॥ जाणता तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य । जेणेंकरितां होईजे धन्य । तें चि घ्यावें ॥ १५ ॥ साक्षपी शाहाण्याची संगती । तेणें साक्षपी शाहाणे होती । आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख ॥ १६ ॥ उत्तम संगतीचे फळ सुख । अधम संगतीचें फळ दुःख । आनंद सांडोनिया शोक । कैसा घ्यावा ॥ १७॥ उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यास चि बुडाला । नाना अभ्यासें प्राणीयाला । सुटिका कैंची १७  १० १७. वेड लागोन जाले वोंगळ । त्यांस सारखेच वाटे सकळ । ते जाणावें बाष्कळ । विवेकी नव्हेती ॥१८॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदे सकळ सृष्टि चाले । आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २०॥ आधी राखावा आचार । मग पाहावा विचार  आचारविचारें पैलपार पाविजेतो ॥ २५ ॥

सकळ जाती एकवटण्याच्या या काळी या ओव्या बोधप्रद होतील काय वाईटाचा त्याग आणि उत्कृष्टाचे ग्रहण करणे हा जीवनमार्ग आहे. अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्मे होते फजीती। सत्कर्मे कीर्ति वाढे ॥२८॥हा उपदेश अगदी प्रत्येकानें स्वतःच्या अंतःकरणांत कोरून ठेवण्यासारखा नव्हे काय 

श्रीसमर्थ कसे कळवळून उपदेश करीत आहेत पाहा :

दुलभ शरीरीं दुल्लभ आयुष्य  याचा करूं नये नास । दास म्हणे सावकास विवेक पाहावा  १८ ३ १  अद्वितीय आनंदघन परमात्म स्वरूपच एक नित्य आणि तद्व्यतिरिक्त भेद व अनेकत्वांनी युक्त व दुःखमय असें नामरूपात्मक आखल विश्व हें अनित्य अशा विचाराला नित्यानित्य विवेक (अर्स) म्हणतात. हरि संकल्प मुळी होता तो चि फळी पाहाबा आतां । नाना देह्यांतरी तत्त्वतां । शोधितां कळे ॥ १८४२८ ॥

एकोऽहं एकच मी हे स्फुरण या जगातल्या देहांतून सर्व सामान्यपणे सारखें जें दिसून येतें तें निरखून बघावे. चराचर विश्व बघत असतांनाहि त्या आनंदघन परमात्मरूपांतच दृष्टि खिळून असावयाला पाहिजे. इज्याचारदमोऽहिंसा दानं स्वाध्यायकर्म च । अयं तु परमो धर्मों यद्योगेनात्मदर्शनम् । यज्ञ शिष्टाचार अंतर्बाह्येद्रिय निग्रह कोणत्याहि दृष्टीनें परपीडा न होईल असे वागणे धनधान्यादि जीवनोपयोगी पदार्थ सत्पात्र ब्राह्मण व दीनदुबळे यांच्या कार्मी वेंचर्णे नित्यशः वेदशाबाध्ययन स्तोत्रपाठ इत्यादि आचारधर्म स्थानीय जरी असले तरी ज्ञानयोगाने परमात्म्याच्या त्या आनंदघन स्वरूपाचे सर्वत्र अनुसंधान ठेवणें हा परमधर्म होय असें याज्ञवल्क्यांनीहि उपदेशिले आहे.

प्रगट रामाचे निशाण । आत्माराम ज्ञानघन । विश्वंभर विद्यमान | भाग्य कळे ॥ २० ॥ ४ ॥ १४॥ रामराज्यांतल्या सर्व लोकांचे असे है भाग्य उदयाला आले पाहिजे. उदंड प्रगटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेथेंच पूजेस अधिकार  पुण्यशरीरीं १८|४|३६. पूज्य पूजेसी अधिकार उगेचि तोषवावे इतर । दुखऊं नये कोणाचें अंतर म्हणजे बरें ३८ऐका फडनिसीचें लक्षण । विरंग जाऊं नेदी क्षण समस्तांचें अंतःकर्ण । सांभाळीत जावें ॥ १८ । ५। १०. अन्यायें बहुतांस पुरवलें। हें देखिलें ना ऐकिलें । वेडें उगे चि भरी भरलें । असत्याचे ॥ २५॥ असत्य म्हणिजें तें चि पाप । सत्य जाणावें स्वरूप । दोहींमधें साक्षप । कोणाचा करावा ॥२६॥

सत्यस्वरूपाच्या दृष्टीनेंच जीवन व्यतीत करणे हाच श्रीरामाचा संप्रदाय. श्रीरामराज्यांत हें सर्वत्र दिसून यावयाला पाहिजे. अठराव्या दशकाच्या सहाच्या समासांतल्या ओव्या उल्लेखनीय आहेत :

न्याय नीति विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ १४॥ महायत्न सावधपणें । समय धारिष्ट धरण। अद्भुताचे कार्य करणें । देणें ईश्वराचें ॥ १५ ॥ येश कीर्ति प्रताप महिमा।उत्तम गुणासी नाही सीमा। नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे ।। १६ ।। देव ब्राह्मण आचार विचार । कित्येक जनासी आधार | सदा ध परोपकार । देणें ईश्वराचें ॥ १७ ॥ इहलोक परलोक पाहाणे । अखंड सावधपणें राहाणें । बहुत जनांचे साहणें । देणे ईश्वराचे ॥ १८ ॥ देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणांची चिता वाहणे । बहु जनासी पाळणे देणें ईश्वराचें || १९ ।। धर्मस्थापनेचें नर । ते ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचे ॥ २० ॥ उत्तम गुणाचा ग्राहिक | तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मवासना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचे ॥२१॥ 

श्रीरामरायाच्या कृपेनें असें हें ईश्वरी देणें आमच्या भारतवर्षाच्या राम राज्यांत सर्वत्र प्रसूत व्हावे.

कांहींच भक्ति केली नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता । जैसे कांहींच न करितां खामीस मागती ॥ १८ ॥७॥ २ ॥ असे कधीं होऊं नये. धर्म रक्षणाचे कष्ट आम्ही बिनदिक्कत सोसावयास पाहिजेत. मगच आमचे हे राज्य रामराज्य होईल. कष्टेंवणि फळ नाहीं । कप्टेंवीण राज्यं नाहीं । केल्या बीण होत नाही साध्य जनीं ॥ १८७३. आधी कष्टाचे दुःख सोसिती । ते पुढे सुखाचे फळ भोगिती । आधी आळसे सुखावती । त्यांसी पुढे दुःख ॥ ५ ॥ जेंहीं उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले । येर ते बोलत चि राहिले । करंटे जन ॥ १६ ॥ परमेश्वरी अनुसंधान । लावितां होईजे पावन । मुख्य ज्ञानें चि विज्ञान | पाविजेतें ॥ १८/८/२४. ऐसी ही विवेकाची विवर्णे | पाहावी सुचित अंतःकण । नित्यानित्य विवेक श्रवणें । जगदोद्वार ॥ २५ ॥

यांत पावन होण्याचा, अपरोक्ष ज्ञानाचा व जगदुद्धाराचा उपाय कोणता तें उघड करून सांगितले आहे. यांत आर्य संस्कृतीचे हृदय प्रगट होतें.

उपाय परियाये दीर्घ प्रेत्न । विवेकवळे नाना येत्न । करील तयाचें महिमान । तो चि जाणे ॥ १८।१०।३९ ।। माहात्म्यप्राप्तीचे उपाय यांत दिसून येतात. असेच पुढे जाऊं.

न्याये परियाये उपाये। मूर्खास है कळे काये। मूर्खाकारितां चिवडा होये । मज्यालसचा ॥४१॥ मग ते शाहाणे नीट करिती। स्वयें साहोन साहविती । स्वयें करून करविती । लोकां करवी || ५२ ।। पृथ्वीमध्ये उदंड जन । जनामधें असती सज्जन । जयांकरितां समाधान | प्राणीमात्रासी ॥ ४३ ॥ तो मनोगतांची आंगे जाणे । मान प्रसंग समये जाणे । संतप्तालागी निवऊं जाणे । नाना प्रकारे ॥ ४४ ॥ ऐसा जो जाणता लोक समर्थ तयाचा विवेक । त्याचे करणे कांही एक । जनास कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनास चालवी । नाना मंडळे हालबी । ऐसी हे समर्थ पदवी । ||४६|| विवेक एकांती करावा । जगदीश धारणेनें धरावा । लोक आपला आणि परावा । म्हणों चि नये ॥ १७ ॥ हेत समजोन उत्तर देणें । दुसऱ्याचे जीवींचे समजणें । मुख्य चातुर्याची लक्षणें । ते हे ऐसी ॥ १९ ॥२॥६॥ बाष्कळामधें बैसों नये । उद्धटासी तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥ नेणतेपण सोडूं नये । जाणपणे फुगों नये । नाना जनांचें हृदये। मृदु शब्दें उकलावें ॥१०॥ उत्तम गुण प्रगटबावे । मग भल त्यासी बोलतां फावे । भले पाहोन करावे । शोधून मित्र १५ ।। उंच नीच म्हणों नये । सकळांचे निववावें हृदये । अस्तमानी जाऊं नये । कोठें तरी ॥ १८ ॥ जगामधे जगमित्र । जिव्हेपासी आहे सूत्र । कोठें तरी सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९॥ ही सारी शिकवण म्हणजे श्रीसमर्थ मुखांतून आपल्या राज्यांतल्या लोकांना श्रीरामाने दिलेले दिव्य धडे होत.

एकोणीस दशकाचा चौथा समास ‘सदेव’ म्हणजे भाग्यशाल्यांच्या लक्षणांनी भरलेला आहे. सदेव म्हणजे ‘ देवासहित असलेल्या आस्तिक देवकृपेच्या माणसाची ही लक्षणें होत. मूळावरूनच पाहण्यांत लाभ अधिक हैं स्पष्ट आहे.

येथे चटक लागावी म्हणून थोडें थोडें देतो. उपजत गुण शरीरीं। परोपकारी नाना परी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्व काळ ॥ २॥ सुंदर अक्षर लेहों जाणें । चपळ शुद्ध वाचूं जाणें । अर्थातर सांगों जाणें । सकळ कांहीं ॥ ३ ॥ कोणाचें मनोगत तोडीना । भल्यांची संगती सोडीना। सदेव लक्षण अनुमान । आणून ठेवी ॥ ४ ॥ तो सकळ जनासी व्हावा । जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमान गोवा । कांहींच नाहीं ॥ ५॥ नम्रपणें पुस जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे। बोला ऐसे वर्तो जाणे । उत्तम किया ॥ ८ ॥ जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगत पुण्यराशी | माहांपुरुष ॥ ९ ॥ तो परोपकार करितांचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणें तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥ बहुतजन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे उणें कोणाचे न साहे तया ये पुरुषासी ॥ ११ ॥ सकळांसी नम्र बोलणे | मनोगत राखोन चालणे अखंड कोणीयेकाचे उणें पड़ों चि नेदी ॥ १३ ॥ नीति न्याय भजन मर्यादा काळ सार्थक करी सदा दरिद्रपणाची आपदा तेथे कैची ॥ १४ ॥ उत्तम गुणे शंगारला । तो बहुतांमध्ये शोमला प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥ प्रपंची जाणे राजकारण परमार्थी साकल्प विवरण सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा मोक्ता ॥ १७ ॥ जितुके कांही उत्तम गुण । तें समर्थाचे लक्षण अवगुण ते क्षण | सहज चि जालें ॥ ३१ ॥

श्रीसमयांचे म्हणजे श्रीरामाचे व श्रीरामकृपेच्या रामदासांचे असे जाणावें. रामराज्यांत असणारे सारेच ‘रामदास’ हे निःसंदिग्ध आहे. आम्ही ज्यांना समर्थ म्हणतो ते श्रीरामाला समर्थ म्हणत असत.

परमार्थी आणि विवेकी । त्याचे करणे माने लोकी कां जे विवर वियरों चुकी। पड़ों चि नेदी | १९०६ १. जो जो संदेह बाटे जना| तो तो कदापी करीना आदि अंत अनुमाना आणून सोडी ॥ २ ॥ स्वतः निस्पृह असेना। त्याचे बोलणेंचि मानेना । कठीण आहे (जनता) जनार्दना। राजी राखणे ॥ ३ ॥ उत्कट भव्य तोच घ्यावें । मळमळीत अवघें चि टाकावें। निस्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळीं ॥ १५ ॥ दुर्जनासी राखों जाणे । सञ्जनासी निवऊं जा सकांचे मनींचे जाणे । ज्याचे त्यापरी ॥ १९ ॥ संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासी लगटे । समुदाव ॥ २० ॥ जेथे तेथे नित्य नवा | जनासी बाटे हा असावा । परंतु लालचीचा गोवा पड़ों चि नेदी ॥२१॥ उत्कट भक्ति उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन | उत्कट योग अनुष्ठान | ठाई ठाईं ॥ २२ ॥ उत्कट निस्पृहता घरली । त्याची कीर्ति दिगांती फांकली । उत्कट भक्तीनें निवाली | जनमंडळी ॥ २३ ॥

ही सर्व कार्यकर्त्याची लक्षणे. समाजाचे राष्ट्राचे किंवा जगाचे ज्याला कल्याण साधावयाचे आहे त्याला हे गुण आंगवळणी असावे लागतात. श्रीसमर्थांचे प्रत्येकाला काय सांगणे आहे ते पाहा:

नाही देहाचा भरंवसा केव्हां सरेल वयसा प्रसंग पढेल कैसा। कोण जाणे ॥ २५ ॥ या कारणें सावधान असावें। जितुके होईल तितुके

करावें । भगवत्कीर्तनं भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आपणास जें जें अनुकूळ । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ | विवेक उमजाबा ॥ २७ ॥ विवेकामधें सांपडेना । ऐसें तो कांहींच असेना । एकांतीं बिबेक अनुमाना। आणून सोडी ॥ २८ ॥ अखंड तजविजा चाळणा जेथें । पाहतां काय उणें तेथें । येकांतेंविण प्राणीयातें । बुद्धिं कैची ॥ २९ ॥ येकांती विवेक करावा । आत्माराम ओळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहीं च नाहीं ॥ ३० ॥

प्रत्येकानेंच हें हृदयाशी बाळगून असावें की नाही ? कार्यकर्त्यास श्री समर्थांची किती परोपरीनें शिकवणूक आहे !

थोडें बोलोन समाधान करणें । रागेजोन तरी मन धरणें । मनुष्य वेधींच लावणें । कोणी एक ||१९|७|४|| कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनीं भांगले । क्षण क्षणा परीक्षिले पाहिजे लोक ॥ ६ ॥ जिकडे तिकडे कीर्ति माजे। सगट लोकांस हव्यास उपजे लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥ अभ्यासें प्रगट व्हावें । नाहींतरी झांकोन असावें । प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ||१७|| मंद हळुहळु चालतो । चपळ कैसा अटोपतो । अरबी ( घोडा) फिरविणार तो कैसा असावा ॥१८॥ हीं धकाधकीची कामे । तिक्षण बुद्धीचीं वर्मे । भोळ्या भावार्थी संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥ जरी चढती वाढती आवडी उठे। तरी परमार्थ प्रगटे । घ घस करितां विटे । सगट लोकु ॥ २१ ॥ आपले लोकांस मानेना। लोकांच आपणास मानेना। अवघा विकल्पाच मना । समाधान कैचें ॥ २२ ॥ संगीत ( उत्कृष्टपणें ) चालला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप । क्षणक्षणा विक्षेप । किती म्हणौनि सांगावा ॥ २५ ॥ आतां हैं आपणाचिपासीं । बरें विचारावें आपणासी । अनुकूल पडेल तैसी । वर्तणूक करावी ॥३०॥ श्रीसमर्थांनी कशाला मोठें पाप आणि करंटपण म्हटले आहे तें पाहा. सकळ अवगुणामध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुकेना की || १९ ८ ८. ढाळेचि काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्वदा । तेथें पीळ पेंचाची आपदा । आढळेचिना ॥ ९ ॥ मोठीं राजकारणें चुकती। राजकारणी वेढां लागती। ज्ञाना चुकीची फजीती। चहुंकडे ॥ ११ ॥ या कारणे चुकों नये । म्हणजे उदंड उपाये। उपायाचा अपाये । चुकतां होये ॥ १२ ॥ व्यापेंविण आटोप केला । तो अवघा घसरत चि गेला । अकलेचा बंद नाही घातला दूरीदृष्टीनें ॥ १५ ॥ पुढाऱ्यांना अशा प्रकारे सर्व सांगून एक शेवटची सूचना दिली आहे ती पाहा. ज्यासी उपाधी आवरेना । तेणें उपाधी वाढवावीना । सावाचत करू नियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांव धांवो उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोकहि कष्टी । हे कामा नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत कष्टी जाला । आपणहि अत्यंत त्रासला । वेथे चि केला गलबला । कासयासी ॥२१॥ असो उपाधचि काम ऐसे । कांहीं बरें कांहीं काणोंसे । सकळ समजोन ऐसें । बर्तता बरें ॥ २२ ॥ शुद्ध विश्रांतीचे स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ । तेथें विकार चि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवधे तुटोनी जाती । मनासी वाटे विश्रांती । ऐसी दुल्लम परब्रह्मस्थिती। विवेकें सांभाळावी ॥ २६ ॥ या ठिकाणी दुर्लभ म्हणजे अतिशय महत्त्वाची ( परब्रह्मस्थिती ) असा अर्थ करावा. कार्यकर्त्यांस विश्रांती मिळावी म्हणून पुढची सूचना आहे. कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठित जावा काळ । जेणें करितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥ २९ ॥ एकांतांत अनेक उपाय सुचतात. ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास । तेणें अखंड सावकाश ( यथावकाश ) । एकांत सेवावा ॥ १९/९/१. जेथें तज वीजा कळती । अखंड चाळणा निघती । प्राणीमात्राची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥ राष्ट्रांत व राष्ट्राबाहेरच्या समाजाचे सूक्ष्म निरक्षिण करीत राहावयास पाहिजे. त्या त्या माणसांची गांठ घालून आपण नामा निराळे तें तें बंड तिथल्या तिथेच मोडून टाकावें. जेणें जें जें मन घरिलें । तें तें आधींच समजलें । कृत्रिम अवघें चि खुंटलें। सहज चि येणें ॥ ५ ॥ हुंब्यासी हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लौंदास पुढे उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥ नष्टासी नष्ट योजावे । वाचाळासी वाचाळ आणावे । आपणावरी विकल्पाचे गोवे। पड़ों च नेदी ॥ ११ ॥ कांटर्नि कांटी झाडावी झाडावी परी ते कळों नेदावी । कळ कटेपणाची पदवी । असो द्यावी ॥ १२ ॥ या ठिकाणी जशास तसें “” व ‘ कांट्याने कांटा काढावा’ या दोन म्हणी आठवतात आणि नारदांच्या भूमिकेचे स्मरण होते. षट्कर्णी गोष्ट झाली म्हणजे कठीण जाते. म्हणून तजविजा गुप्तच असाव्या. न कळतां करी कार्य जे ते । ते काम तत्काळचि होते. गचगचत पडतां ते चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥ कोणी एक काम करितां होते । न करितां तें मागे पडतें। या कारणे दिलेपण तें । असो चि नये ।। १५ ।। दुसरी ही सूचनाहि अत्यंत महत्त्वाची आहे. जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला । जो आपणाचे कष्टत गेला । तोचि भला ॥ १६ ॥ मुख्य सूत्र हाती घ्यावें । करणें तें लोकां करवीं करवावें । कित्येक खलक उगवाचे राजकारणामध्ये ॥ १८ ॥ आपल्या बुद्धिवैभवापुढें कारस्थानी लोकांना जागच्या जागी गप्प बसवावें. ग्रामण्य वर्मी सांपडावें । रगडून पीठ चि करावें । करूनि मागुती सांवरावें। बुडऊं नये ॥ २० ॥ राष्ट्राच्या व तसेच जगाच्याच इहपर उन्नति व सुखसोईकरितांच राजकारण असतें. एवढा उदात्त हेतु त्यांत असावयास  पाहिजे. करावयाचें ते स्वपर उन्नतीकरितांच व्हावयास पाहिजे. कोणाच्याहि वाईटावर दृष्टि नसावी. समाजांतल्या कार्यकत्यांना समर्थांनी दुसरी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. दुर्जन प्राणी समजावे | परी ते न करावे। सज्जन्नापरीस आळवावे महत्व देऊनी ॥ २३ ॥ जनामध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । याकारणें ते बाट बुझनि टाकावी ॥ २४ ॥ उघड द्वेष न पत्करतां युक्तीनें दुष्टांना गौरवूनच स्वतःला अथवा समाजाला त्याच्यापासून कसली बाधा न होईल अशा रीतीनें, त्यांना होईल तर शक्य तो सुधारून अथवा त्यांचा परस्पर कांटा काढून धर्मकार्य साधावें, समाजस्वास्थ्य राखावें. दुर्जनास कोणत्याहि प्रकारें हट्टाला पेटून कांहीहि, केव्हांहि, कोणालाहि अपघात करण्यास कोठें मुळी वावच न मिळेल अशा सर्व वाटा रोधून ठेवाव्यात. ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहणें विवेक । सावधापुढें अविवेक | येईल कैचा ॥ १९१०१३. जितुकें कांहीं आप णासी ठावें । तितुकें हळु शिकवावें । शाहाणे करून सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥ केवढी ही उदात्त भावना ! सर्वे जनाः सुखिनो भवन्तु । सर्व सुखी असावे । ऐशी वासना ॥ ” आर्य संस्कृतीचें हें एक मुख्य लक्षणच आहे. श्रीरामरायाच्या कोरीव आचरणाचेहि हेंच एक तात्पर्य आहे. श्रीरामराज्यांत नांदूं पाहणाऱ्या आम्हांला रामरायाच्या सदुपदेशानेंच वागावयास पाहिजे. श्रीसमर्थाचा उपदेश म्हणजे श्रीरामरायाचाच उपदेश होय. श्रीसमर्थ हे शिष्य आणि श्रीरामराय हे श्रीगुरु. शिष्याच्या मुखांत श्रीगुरूचाच उपदेश असणार. अगदी हेच समर्थानींहि पण स्पष्टपणे सांगितले आहे. भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें तो हा दासबोध । ॥२०-१०-३० ॥

श्रीरामदासाग्रणी मारुतिरायाचा अवतार असणाऱ्या श्रीसमयीच्या तोडून श्रीरामोपदिष्ट व्यवहारस्थिति परमार्थरीति व राजकारणपद्धति आपण श्रवण केली, श्रीरामहृदयाचा परिचय करून घेतला व रामराज्यांत वागाव याचे कसे हैं आपण शिकलो. श्रीवाल्मीकींच्या शब्दांत पुन्हां हंच अजून एकदां भक्तिभावानें ऐकूं या. अधिकस्याधिकं फलम् ॥ “

सुभ्रूरायतताम्राक्षः साक्षाद्विष्णुरिव स्वयम् । रामो लोकाभिरामोऽयं शौर्यवीर्यपराक्रमे ||४५|| (अ.स. २)

या श्लोकांत श्रीराम हा विष्णुप्रमाणें सुंदर, सकलजननानंदकर व तसाच अतुल पराक्रमी आहे असें वर्णन आहे. रक्षको विष्णुः । विष्णु हा सृष्टीचा रक्षक आहे. धर्माच्या योगानेंच सृष्टीचे रक्षण व्हावे लागते आणि यामुळेच ‘रामाचे हे असे कोरीव धर्माचरण आहे.

धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचें ॥ १८/६/२०॥ जे सत्कीर्तीचे पुरुष । ते परमे श्वराचे अंश । धर्मस्थापनेचा हव्यास | तेथेचि बसे ||१७|१॥२९॥

येथें ईश्वर व परमेश्वर हे शब्द विष्णुपर आहेत. 

धर्मग्लानांच्या वेळीं, अधर्म जगांत फोफावला असतांना साक्षात् विष्णुच या भूतलावर अवतार धारण करून सज्जनांचे रक्षण व दुष्टांचें निर्दलन करतो व धर्मस्थापना करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ (भ.गीता. ४७.) श्रीकृष्णाच्या या बचनाप्रमाणें धर्मस्थापनेकरितां घेतलेल्या विष्णूच्या अनेक अवतारांपैकी दहा प्रमुख आहेत. त्या मालिकेत श्रीरामाचा सातवा अवतार म्हणून गणला जातो.  नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणें । धर्म स्थापाया कारणें । विष्णूस जन्म || १०|४|४१. म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेहि विष्णूचे अवतार ॥ ४२ ॥ ” अयोध्या कांडाच्या पहिल्या सगतील ७ व्या श्लोकावरून श्रीराम हा विष्णुचाच अवतार आहे असे कळून येते. स हि देवैरुदोर्णस्य रावणस्य वधार्थिभिः । अर्थितो मानुषे लोके जज्ञे विष्णुः सनातनः ॥

रावणाचा वध व्हावा म्हणून देवांनी प्रार्थना केली व त्याकरितांच तो सनातन विष्णु श्रीरामरूपाने पृथ्वीतलावर अवतरला, हा अर्थ या श्लोकांतून निघतो. सीराम हा श्रीमहाविष्णूचाच अवतार हे स्पष्ट होते. तो स्वतः निरंकुश असुन देखील त्याचे एवढे अचूक धर्माचरण केवळ धर्ममार्ग-निदर्शनार्थच आहे हि पण यामुळे कळून येतें.”

श्रीरामाची लोकप्रियता

बलमारोग्यमायुश्च रामस्य विदितात्मनः ।

देवासुरमनुष्येषु सगंधर्वोरगेषु च ॥ ५२ ।। 

आशंसते जनः सर्वो राष्ट्रे पुरवरे तथा । 

आभ्यंतरश्च बाह्यश्च पौरजानपदो जनः ॥ ५३ ॥

स्त्रियो वृद्धास्तरुण्यश्च सायं प्रातः समाहिताः । 

सर्वान् देवान् नमस्यन्ति रामस्यार्थे मनस्विनः ||५४||

( वा. रा. अ. स. २)

श्रीरामाच्या लोकप्रियतेची कल्पना या श्लोकावरून चांगली होते. सर्व गुणसंपन्नच लोकमान्य होतो व असा लोकमान्यच लोकप्रिय होतो. अशा रीतीनें लोकमान्य व लोकप्रिय होणें हें परम भाग्याचे उत्कट लक्षण होय. याला श्रीराम एक आदर्श आहे हें या श्लोकावरून स्पष्ट होते. देवदानवमानव तसेच गणगंधर्वनागादिक सर्वहि श्रीरामाला आयुरारोग्यादिकांचा सतत लाभ होवो अशी रात्रंदिवस इच्छा करीत होते. बालतरुणवृद्धादि सकळ नर नारीहि याचकरितां अहर्निश देवाची प्रार्थना करीत व त्याला अनन्यभावें नमस्कार घालीत. रामाच्या ‘सकळहृदय निवासी’ या विशेषणाची येथें अशी आठवण होते.

home-last-sec-img