Literature

सप्तसिंधू

‘ हिमालय ‘ आणि ‘इंदु सरोवर’ यांच्या सीमांचा विचार करून, या सीमांच्या आद्यंत अक्षरांच्या एकत्रीकरणामुळे होणारा ‘ हिन्दु’ शब्द पाहिला तर हें परधर्मीयांनी अथवा परदेशीयांनी ठेवलेले निंदाव्यंजक नांव नसून, पुरातन कालापासूनच चालत आलेले आहे हे स्पष्ट होते. कांहींच्या मता प्रमाणे सिंधुपासून तो झेलम, रावी, बियास, सतलज, सरस्वति, यमुना, गंगा या सप्तनद्यांच्या तारांबर आयांची वस्ती होती व त्यामुळे त्यांना सप्तसिंधु असें प्रथम म्हणू लागले व क्रमेण याचे रूपांतर हप्तहिंदूंत झाले; आणि आतां केवळ हिन्दु एवढाच काय तो शब्द राहिला.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेस्मिन्सन्निधिं कुरु ॥ या मंत्रांत गंगा, यमुना, सरस्वति, नर्मदा, सिंधु, गोदावरी, कावेरी या सप्त महानयांचा उल्लेख आहे. गंगा आणि सिंधु व यांच्या मध्ये असणाऱ्या झेलमादि मिळून अशा या सप्तनद्यांच्या कांठींच हिन्दूंची अथवा आर्यांची वस्ती होती असे म्हणण्यापेक्षां वर उद्धृत केलेल्या गंगादि कावेरीपर्यंतच्या व त्याच्या आसपासच्या प्रदेशांत त्यांची वस्ती होती म्हणून मानलें तर हिमालयापासून तें इंदु सरोवरापर्यंतच्या हिन्दुस्थानाच्या सरहद्दीच्या दृष्टीनेंहि अनुकूल होईल. ज्या पुण्यनद्यांच्या कांठीं आर्यांची वस्ती होती त्या या सप्त पुण्यनथांचे आवाहन ते रोज पूजेकरितां ठेवलेल्या कलशोदकांत करीत व अजूनहि करीत असतात. ती प्रथा अव्याहत चालू आहे. यामुळे सहजच आपल्या देशमर्यादेची व त्यांत असणाऱ्या अखंड आपल्या आर्यजातीची प्रत्यहीं आठवण होते व पूजेच्या या पवित्र प्रसंगी एकोप्याचा व संघटनेचा दिव्य संदेश मिळतो. या सप्त-महा-नद्यांच्या काठी आजूबाजूला आर्यांची वस्ती पूर्वी हि होती व ती त्यामुळे आतांहि आहे. या दृष्टीनेंच आर्यांना सप्तसिंधु म्हणजे गंगादि सप्त नयांच्या काठी व आसपास वास करून राहिलेले लोक असें प्रथम नांव आलें व तें क्रमेण हप्त-हिंदु होऊन आतां केवळ हिंदु एवढेच एक शिल्लक राहिलें. या सात नद्यांमध्येच सर्व भारतवर्षाचा अंतर्भाव होतो. या सप्तनद्यांच्या मधल्या व आसपासच्या प्रदेशालाच हिन्दु लोकांचे स्थान अथवा हिन्दुस्थान असे म्हणतात. इमम्मे गंगे यमुने सरस्वति शुतुद्रिस्तोमं स च तापरुष्ण्या । असिक्न्या मरुद्गृधे वितस्तयाजिर्किये शृणुह्या सुषोमया ॥ ( ऋग्वेद सं. ८, ३, ६) अत्रप्रधानभूताः सप्तनद्यः स्तूयन्ते । तदद्वयव भूताश्च तिस्त्रः । ( इति सायणः ) या मंत्रांत गंगादि दश नद्यांना संबोधून ‘ मी केलेल्या या स्तोत्राचा स्वीकार करा’ अशी प्रार्थना आहे. यांत मुख्य सात नद्यांचे वर्णन आहे, बाकीच्या तीन त्या उपनद्या आहेत असे सायणा चार्यांचे यावरील भाष्य आहे. या वैदिक मंत्रानेंहि मागच्या विधानाला पुष्टि मिळते. सिंधुर्देशाब्धिनदे। (विश्वमेदिन्यौ) सिंधुः समुद्रे नद्यां च नदे-देश, नदी, नंद व समुद्र या चार अर्यांनी हा शब्द वापरला जातो हैं या प्रमाणा वरून सिद्ध होतें. सिंध देश आहे, सिंधु नदि आहे, सिंधु समुद्र आहे. कोणत्याहि समुद्राला व नदीलाहि सिंधु हें सामान्य नांव आहे. ‘ स्यन्द’ प्रसवणे या धातूपासून सिंधु या शब्दाची व्युत्पत्ति आहे. ‘स्यन्दते’ वाहते या अर्थानें नदी असा अर्थ होतो. “स’ काराच्या ठिकाणी ‘ह’ काराचा उच्चार करण्याचा परिपाठ आहे. स्वसुर शब्दाचा सिंधमध्ये ‘ स्वहुरो’ असा उच्चार करतात. ‘ जोधपूरच्या भागांत ‘सारा’ शब्दाचा उच्चार ‘ हारा’ असा होतो. प्राचीन हिंदी भाषेत ‘केसरी’ या शब्दाचा उच्चार केहरी’ असा केला जातो. नवीन हिंदीतहि ‘मास’ हा शब्द ‘ माह’ असा उच्चारला जातो. वर्ण मालेच्या दृष्टीनेंहि ‘स’ च्या पाठोपाठ ‘ह’ येतो; दोन्ही महाप्राणच आहेत. या अशा कारणांनी ‘स’ काराच्या ठिकाणी वाचते ‘ह’ काराचा उच्चार केला जातो. सर्ह्यपिच्च ( पाणिनी ३४-५७) असे पाणिनीसूत्रहि आहे. ‘सि’ च्या ठिकाणी कचित् ‘हि’ असें होतें. वैदिक प्रयोगांतहि ‘ स काराच्या जागी ‘ह’ काराचा कोठें कोठें उपयोग केलेला दिसून येतो.

श्रीश्च ते लक्ष्मीश्च पल्ल्यौ ( शु. यजु. ३१।११) ऱ्हीश्च ते लक्ष्मीश्च पल्यौ (कृ. यजु. तै. अ. ३।१३ )
‘ श्रीश्च’ या ठिकाणी ‘ ऱ्हीश्च ‘ हा फरक येथें स्पष्ट दिसून येतो. एकाच अर्थी हे दोन प्रयोग आहेत. ‘ मंदाक्षं ऱ्हस्त्रिपाव्रीडा’ या आधारानें ऱ्ही चा अर्थ लज्जा म्हणून इथें होऊं शकत नाही. या सर्व विवेचनावरून ‘स’ काराचा ‘ह ’ कार होतो असें सिद्ध झाल्यामुळे ‘सिंधु’ पासून ‘हिंदु’ असा शब्द झाला; विदेशी लोकांनी हें नांव पाडलें नाहीं हे स्पष्ट होते. हा प्रयोग सर्वत्र वापरांत आढळून येत नाहीं हें खरें. आपण सिंधी मनुष्याला सिंधीच म्हणतों, सिंधु नदीलाहि सिंधु नदीच म्हणतों, सिंध प्रांतांलाहि सिंधच म्हणतो. समुद्र या अर्थीसुद्धां सिंधु म्हणूनच वापरतो. या कोणत्याहि ठिकाणी हिन्दु म्हणून आपण हा शब्द वापरीत नाहीं. हिन्दू शब्दाच्या व्याख्या अनेकांनी केल्या आहेत. त्या मिळतील तितक्या एकत्र करून त्यांवर मनन करूं.

home-last-sec-img