Literature

समर्थ

आज आपण ज्यांचा उत्सव सुरू करीत आहोत त्या श्री समर्थ रामदास स्वामीजींची आपणा सर्वांना माहिती आहे. समर्थहा शब्द श्रीसमर्थांना अन्वये असाच आहे समर्थ म्हणजे सामर्थ्यवान, ज्याला सर्व प्रकारे संपूर्ण सामर्थ्य प्राप्त झाले आहे तोच या समर्थ नावाला योग्य ठरतो. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रास मिळतात त्याप्रमाणे सर्व प्रकाराचे सामर्थ्य समर्थात एकत्रित झालेले आढळते. अशक्त किंवा सामर्थ्य हीनास कोणीतरी समर्थ म्हणेल काय ? यो वै जेष्ठश्च श्रेष्ठश्च अत्यंत अशा श्रेष्ठ शक्तीच्या योगे अत्यंत सामर्थ्य प्राप्त करून घेणारा व ज्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान कोणीही नाही अशा महापुरुषाच समर्थ म्हटले जाते. त्यांना इतर कशाचीही उपमा देता येत नाही, अशा उपमारहित श्रेष्ठ विभूतीलाच समर्थम्हणून संबोधणे योग्य ठरते.

सद्गुरुच सर्व समर्थ

 गौरवात् गुरुः सर्वाहून श्रेठ असणारालाच श्रुतींनी गुरुअसे म्हटले आहे. श्रुतींनी त्यालाच अन्वर्थक अशो भूमा’ब्रह्मअशीही नावे दिली आहेत. या शब्दांचा व गुरु या शब्दाचा अर्थ एकच.बृहत्वात् ब्रह्म । महान आहे ते ब्रह्म‘, ‘ बव्होर्भावः भूमम् सर्व वस्तूपेक्षा श्रेष्ठत्वदर्शक म्हणून भूमाया शब्दाचा उपयोग केला जातो. यावरून गुरु, ब्रह्म व भूमा या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच सर्वश्रेष्ठ, सर्वात महान्, अनुपमेय व ज्याला मोजमाप नाही असाच ह्या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे. भूमा म्हणजे मोजमापाच्या पलीकडचे ते मोजता येत नाही व मापताही येत नाही. जी सर्व वस्तूंना आपणात सामावून घेते तीच पूर्ण वस्तू. तिच्यापेक्षा मोठी अशी कोणतीच वस्तू असू शकत नाही. तदुनात्त्येति कश्चनत्यापेक्षा जास्त सामर्थ्य असलेली कोणतीही वस्तू नाही हे निश्चित अशा अतिश्रेष्ठ वस्तूचा अर्थ गुरुकिंवा भूमाया शब्दानी प्रतिपादित केला जातो. गुरूंच्या महत्वाचे वर्णन करण्यासाठी यथार्थ व अन्वर्थक असे शब्द सापडणे कठीणच. अशा प्रकारे अपार सामर्थ्य असणारे जे गुरु त्यांना आपण समर्थया नावाने संबोधित असतो.

श्रीगुरु श्रुतींना अगम्य

श्रुति म्हणजे सर्वज्ञ व महान शक्ती. तिला ज्ञात नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. त्या शक्तीमुळेच हे विश्व निर्माण झाले आहे. श्रुतीमुळे सर्व काही निर्माण झाल्यामुळे निर्मित वस्तूंचे ज्ञान श्रुतींना आहेच व अशा प्रकारे श्रुतिमाता ही सर्वज्ञ आहे. असे असूनही ब्रह्मभूमा ” या शब्दांनी ओळखल्या जाणान्या गुरूंचे ती वर्णन करू शकली नाही. सर्वच श्रुतिनिर्मित आहे असे म्हटल्यावर गुरुमधील असलेले सामर्थ्य श्रुतिनिर्मित नाही काय असा प्रश्न उद्भवतो. हा केवळ प्रश्नच आहे. कारण गुरु किंवा गुरूंचे सामर्थ्य श्रुतिनिर्मित नाही. श्रुतींची जग निर्माण केले पण श्रुतींना गुरुअगम्य आहे. तस्य नेति नेति इति आदेशः ।असे असल्याने गुरूंचे वर्णन कसे करणार ? गुरूंची ओळख किंवा परिचय कसा होणार? गुरूंना कसे समजावून घेणार ? असे प्रश्न येतात व नेति नेति इति आदेशः । हेच त्याला उत्तर म्हणजे हे नाही, हे नाहीहा त्याचा अर्थ गुरुचे वर्णनही नेति नेतिया शब्दांनीच केले जाते. अवर्णनीय अशा गुरुह्या दोन अक्षरांचे वर्णन श्रुती करू शकल्या नाहीत यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

श्रीगुरु उपमारहित

श्रीगुरु किती मोठे आहेत? समुद्राएवढे मोठे आहेत काय? असा जर प्रश्न केला तर त्याचे नाहीहेच उत्तर येईल. आकाशाएवढे आहेत काय? ह्या प्रश्नाचेही हेच उत्तर मिळेल. आकाशादपि सूक्ष्मः । आकाशापेक्षा मोठे आहेत. तसेच आकाशवत् सर्व गतश्च नित्यःसद्गुरु आकाशाप्रमाणेच सर्वव्यापी व नित्यही आहेत. न हि दृष्टान्ते सर्व साम्यम्अर्थात हे दृष्टांतही योग्य नाहीत. आकाशाप्रमाणे गुरु आहेत असे म्हटले तर काय विघटेल ? पण नित्य या विशेषणाने ते आकाशापेक्षा श्रेष्ठ ठरतात, कारण आकाश अनित्य आहे.

आत्मनः आकाशः संभूतःआत्म्यापासून उत्पत्ती.. उत्पन्न झालेली कोणतीही वस्तू नाशवंत, म्हणून बाकाञ्चही नाश वंत होय. नाश पावणारी, नासणारी, विकारी अशी वस्तु क्षुल्लक वस्तू होय. ज्यात चारी लोक सामावले आहेत व जे आपल्या स्वरूपातच रहावे ते निर्मित असल्याने नाशवंतच आहे. .नाश पावणारी वस्तू श्रेष्ठ कशी असणार ? श्रेष्ठ असूच शकत नाही. वस्तूंचा निर्मिताच श्रेष्ठ होय. निर्मित वस्तू श्रेष्ठ नव्हे आपण आकाशाची उपमा गुरूस दिली तर आकाश अनित्य असल्याने ती उपमा शोभत नाही. कारण गुरु नित्य आहेत. त्यांना आकाशाचा दृष्टांत अयोग्य, अनुपयुक्त होय. म्हणून आकाशामध्ये सामावलेल्या वस्तूंची उपमा कैमुत्तिक न्यायाने अयोग्यच ठरणार ! श्रीमत् दासबोधाच्या पहिल्या दशकातील चवच्या समासात सद्गुरु कोणत्याही उपमेपेक्षा श्रेष्ठ होत म्हणजेच अनुपमेय आहेत असे रसभरित वर्णन श्री समर्थांनी केले आहे. परीस, गंगा, सागर, क्षीरसागर, मेरु, भूमी, सूर्य, महाशेष, अमृत, कल्पतरु, चितामणी, कामधेनु इतकेच नव्हे तर इंद्र, चंद्र, हरिहर, ब्रह्मादि सुद्धा सदगुरूंच्या उपमेस अयोग्य आहेत असे समर्थांनी अत्यंत संयुक्तिकपणे त्या समासात पटवून दिले आहे.

आत्मनः आकाशः संभूतः गुरुला आत्मा असे म्हणता येईल काय ? हा शब्द योग्य आहे काय ? या गोष्टीचा निरनिराळ्या तऱ्हेने विचार करुन व निरनिराळ्या अर्याची कल्पना करून आत्म शब्द गुरु शब्दास योग्य आहे असे ठरते. दोन्हीही शब्द एकाच अर्थी आहेत. परंतु आत्मन आकाशः संभूतः । या मंत्रामध्ये आत्मा शब्द विराट रूपाला अनुसरून आहे. ” हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् । ह्या मंत्रामध्ये हिरण्यगर्भहा विराटापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. असे असल्याने हिरण्यगर्भास गुरु म्हटले तर काय होईल ? पण त्यापेक्षाही श्रेष्ठ असे अव्यक्त ईश्वरीतत्त्व आहे. तेव्हा या ईश्वरीत तत्वास गुरु म्हणावयाचे काय ? पण त्यापेक्षाही श्रेष्ठ असे साक्षी चैतन्य आहे. मग साक्षी चैतन्यास गुरु म्हणावयाचे काय ? नाही. कारण साक्षी चैतन्य हे मायेने वेष्टले गेलेले आहे व त्या मुळेच त्याला साक्षी चैतन्य हे नाव प्राप्त झाले आहे आणि ते सापेक्ष आहे. दुसऱ्याशी सापेक्ष असलेले आपले स्वरूप दर्शविणे हे त्याचे कार्य माया आणि माया कार्य यांच्यi अपेक्षेमुळे त्याला साक्षीचैतन्य हे नाव आहे. आपण स्वतः दृश्य स्वरूप नसल्याने दुसऱ्यास साक्षीरूप कसे असणार? कारण विराटदि साक्षी चैतन्यांनासुद्धा आत्म असे नाव आहे.

आनंदघनरूप म्हणजेच श्रीगुरुस्वरूप

आनंदघन असे पूर्णस्वरूपच गुरुस्वरूप होय. ते आपल्याच श्रेष्ठतेने परिपूर्ण आहे यामध्ये विश्वकल्पनेचा अभाव असल्याने विश्वाचा कार्यकारणभाव याच्यात नाही. यत्र नान्यत् पश्यति, नान्यत् शृणोति नान्यत् विजानाति स भूमा । संपूर्णपणे भरलेल्या या वस्तूस पाहणे, ऐकणे व समजून घेणे अशक्य आहे. हेच अनंत व अपाररूप आहे, असे श्रुतींनी सांगितले आहे. यत्रान्यत् पश्यति, अन्यत्शृणोति, अन्यद्विजानाति तवल्पम् येथे मात्र पाहणे, ऐकणे, समजून घेणे वगैरे गोष्टी असल्यामुळे हे जग अति अल्प आहे बसे श्रुतींचे म्हणणे आहे.  यदल्पं तन्मर्त्यम्हे अल्प असणारे विश्व नाशवंत ना पावणारे आहे, म्हणूनच ते क्षणभंगूर आहे. क्षणाक्षणात त्यामध्ये बदल होत असल्याने त्यास निश्चित असे रूप नाही. ते आभासरूप असल्याने काही काळ सत्यस्वरूप भासत असले तरी ते ब्रह्मस्वरूप नाही.भूमाया शब्दाने, नावाने प्रसिद्ध असलेल्या गुरुताच्या दृष्टीने हे सर्व नामासरूपच होय. स्वतः सुखरूपी नसलेले हे जग सुखभासी असले तरी आभासरूपच स्वयंप्रकाशरूपी असलेले गुरुतत्त्वच नित्यसुख असल्यामुळे, सत्यसुख असल्यामुळे, त्याविरुद्ध गुणधर्म असलेले हे जग सुखरूप कसे असेल ?

क्षणभंगूर असणारे हे जग अत्यंत अल्प आहे. उत्पन्न झालेले, उत्पन्न होणारे हे जग ही एक वस्तू आहे अशी कल्पना करून त्याला निर्माण करणारा ईश्वर आहे असे म्हटले तर ईश्वरत्वाच्याही पूर्वी व त्या तत्त्वापेक्षाही अद्वितीय अशी ब्रह्म गुरु किंवा ही सत्यवस्तु असल्या कारणाने इतर सर्वच आभासरूप आहे असे उघड होते. मुळात अस्तित्वात नसलेल्या राज्याचा राजा आहेस असे कोणाला म्हटले तर ते राज्यपद खरे ठरेल का?

* ब्रह्म सत्यं जगन्मिथ्याया रीतीने अखिल विश्वाचा स्वामी असलेल्या ईश्वरालाही गुरु ह्या नावाने संबोधणे अशक्य आहे कारण त्यापेक्षाही गुरु श्रेष्ठ होय. त्यामुळे अनंतकोटी ब्रह्मांड नायकअशा विरुदावली खोटी ठरून गुरूंच्या बेष्ठत्वास कोणतीही उपमा देता येत नाही हेच सिद्ध होते.

सर्वदा अविनाशी एक । सद्गुरुपद । तयासी उपमा काय द्यावी । सद्गुरु हे नित्य निर्विकार ॥असे आहे. अधिकारी, अविनाशी अशा रूपाला कोणतीही उपमा देता येत नाही म्हणूनच ते अनुपमेय. सर्व श्रेष्ठस्थिती म्हणजेच गुरुपदहोय. यस्मत् परतरं नास्ति ।ज्याच्यापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही तेच सद्गुरुपद होय. न तु तद्वितीयमस्ति। तेथे दुसरे काहीही असू शकत नाही.यस्मात् परं नापरमस्ति किंचित्तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा कोणताच पदार्थ नसून तो सर्व ठिकाणी व्यापलेला अद्वितीय असा आहे. एकमेवाद्वितीयं ब्रह्म असे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण श्रुतींनी सांगितले आहे. अशा प्रकारची एकमेव असलेली ही वस्तू दिसणार कशी? हे जग दृग्गोचर होण्यास काय कारण असेल बरे? असे प्रश्न उभे राहतात. यत्र नान्यपश्चती । अभिनवेने अखंड आनंदघन असलेले हे स्वरूप स्वानुभावानेच कळ शकते, नित्यं परोक्षं ब्रह्म । आनन्दो ब्रह्मेति व्यजानात् P अनुभव त्रिपुटी म्हणजे समजणे, समजून घेणे व समजून घेण्याची वस्तू म्हणजेच भोगणारा, योगण्याची वस्तू व भोगण्याचा क्रम अनुभव त्रिपुटी नसलेले आनंदस्वरूपच गुरुतत्व स्वरूप होय. असे हे परमानंदस्वरूप ब्रह्मच गुरु शब्दाने ओळखणे शक्य आहे. ज्य ठिकाणी जगनिर्मिती नाही, दुःखशोकाचा स्पर्श नाही, फक्त आनंदाचा अनुभव परिपूर्ण व नित्य आहे अशा स्वरूपाला गुरुअसे म्हणतात.

श्रीगुरुच मोक्षदाता

अत्यंत शुद्ध, आनंदमय, दुःखशोकरहित, परिपूर्ण सत्यस्वरूप म्हणजेच अद्वितीय स्थिती, परममंगल गुरुपद होय. अशा परम मंगल गुरुनाथाची आराधना किंवा नित्यस्मरण करणान्यास कशाचीही उणीव भासणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांचे भजन भक्ती करणारा भक्त त्या मंगळ स्वरूपात एकरूप होईल. श्रीगुरु हे मोक्षाधिकारी आहेत. त्यांच्या हातात मोक्ष आहे. देवतांच्या हातात आयुधे बसतात, पण गुरूंच्या हातात मोक्षच. दंडपाणी, शारपाणी, कोदंडपाणी, चकराणी अशी देवतांची नावे आहेत. गुरूंचे नाव मोक्षपाणी निरतिशयानन्दावाप्ति मोक्षस्य लक्षणाम्निरतिशय आन्नदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. सर्व प्रकारच्या आनंदाहून श्रेष्ठ ब्रह्मानंद श्रीगुरूंच्या हाती आहे.

श्रीगुरूंनाच शरण गेले पाहिजे

सर्वांनाच सुखाची इच्छा आहे. सुख हा दोन अक्षरी शब्द है जग कशासाठी धडपडते? तर सुखासाठीच सुख कसे प्राप्त होईल? असा सर्वांच्यापुढे प्रश्न आहे. विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर, महामाया हे ज्यांच्यापाशी नाहीत अशा श्रीगुरूंच्या कृपेनेच सुखाची प्राप्ती होते. आनंदरूप म्हणजे परम सुख मोजच श्रीगुरूंच्या हाती आहे. मग अशा गुरुमूर्तीचे वर्णन कसे व किती करावे ! ज्याच्या कृपा प्रसादाने जन्म-मरण नाहीसे होऊन, जन्म-मरणांस कारणीभूत असलेल्या वासना नष्ट होतात. असा गुरु सर्वतोपरि श्रेष्ठ होय. मोक्षरूपो महान सुखाची प्राप्ती करून देणाच्या गुरुनाथास इतर अल्पसुख मिळवून देणे असाध्य नाही. कोटयाधीशास पाच-दहा रुपयांची काय किंमत वाटणार? काहीच नाही. तस्मादात्मजंह्यर्चयेत् भूतिकामः । आत्मज्ञानाने गुरूंची आराधना केल्यास त्यास सर्व ऐश्वर्य प्राप्त होतात जसे श्रुतींनी म्हटले आहे. अशा गुरु श्रेष्ठास शरण जाऊन, मोक्ष मिळवून आनंदरूपाने रहाणे हे सर्वांचे कर्तव्य होय.

मीपणातच श्रीगुरूंची ओळख

अंचत इति आत्मा!आपल्या स्वतःच्या प्रकाशामुळे प्रकाशित होणारी वस्तू म्हणजेच आत्मा होय. आत्मा ह्या शब्दाने गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे. आत्मा या शब्दाचा अर्थ सर्वांना माहित आहे. आपल्या आत्म्यास जीव असेही म्हणतात. अशा दृष्टीने तुम्ही व तुमचा आत्माहे निरनिराळे दाखवा असे म्हटले तर शक्य होणार नाही. अहह्मात्माअसा अनुभव आहे. कोठेही पाहिले तरी वरील प्रमाणेच अनुभव येतो.

अम्भस्य पारे भुवनस्य मध्ये नाकस्य पृष्ठे । स्वर्ग, मृत्यु, पाताळादि लोकात मीपणाची जाणीव असतेच, स्वर्ग लोक एकवीस आहेत. अमरा निर्जरा देवाः इत्यादि.

देवांचे देह प्रकाशमान असून तेथील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणावाचून कोणतीही व्यक्ती नाही. ह्या सर्वांचे यथार्थ स्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तू होय. देह म्हणजे आत्मा नव्हे, कारण आत्मा स्वय प्रकाशी आहे. तोच देहामध्ये मीपणा उत्पन्न करतो.

देहात्मभाव निरसन

तत्वं गृहाति इति गुरुःतत्व जाणणाराच होय. वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान देणारी महाशक्ती म्हणजे गुरु होय. गुरु म्हणजे कोण ? त्यांचा उपदेश कोणते सुख प्राप्त करून देतो ? या विषयाचे आता पावेतो विवेचन केले. कोणतीही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंदघनरूप आहो, तेथे दुख शोकाला वाव नाही. तेथे अशांततेचा वासही नाही, देह वगैरे काही नाही. आपल्याच अस्तित्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ती म्हणजे गुरुव देव आदींच्या दर्शनास जाताना शुचिर्भूर्तपणे सोवळ्यानेच गेले पाहिजे. ओवळी वस्त्रे सोडून, तीर्थस्नान करून, सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ नाही, तर देहाभिमानरूपी ओवळे टाकून देऊन, सद्गुरुरूपी ज्ञानगंगेत स्नान करून आत्मभावनारूपी सोवळे नेसून जाणे असा अर्थ आहे.

सद्गुरु समर्थांच्या आराधनेने सामर्थ्य प्राप्ती 

गुरु देव आदींच्या दर्शनास जाताना मन शुद्ध असावे. राग

वगैरे असल्यास गुरूंचा अनुग्रह होणार नाही. मी विद्वान, मी श्रीमत, मी अधिकारी अशा भावनेने जाण्यात मुळीच अर्थ नाही.  निरहंकारी भूत्वा ब्रह्मष्ठं शरणमुपगम्यह्या वचना नुसार निरहंकारी, निराभिमानी असावे. असाच मनुष्य गुरूंच्या अनुग्रहास योग्य होय. श्री समर्थांच्या उत्सवात त्यांची सेवा केल्याने सामर्थ्य प्राप्त होईल. कोणतीच कमतरता असणार नाही. दृढ निश्चयाने सेवा केल्यास ती सेवा करणाऱ्याचे कल्याणच होईल असे मी निश्चितपणे सांगतो.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

home-last-sec-img