Literature

सहशिक्षणाची अनिष्टता

अलीकडे मुलींच्या शाळांत मास्तरांच्या नेमणुका व मुलांच्या शाळांत मास्तरणींच्या नेमणुका होतात म्हणून ऐकलें. कोणत्याहि कर्माचा प्रारंभीचा हेतु उत्तमच असतो. मग त्याला फांटे फुटतात. माणूस विघ्नांना बळी पडतो. असा घसरला की, मग त्यालाच शास्त्रीयतेचे रूप देऊन तोच एक संप्रदाय

पडतो. असें सामान्यतः बहुतेक सर्व विलक्षण मताच्या कार्यकात्याँचें झालेलें मत पूर्वीपासूनच आढळून येते. चांगलें किती केलें आणि झाले तर कोणी दोष देत नाही. वाईट परिणाम झाला की मग सर्व पाठीमागें लागतात. शेवट पर्यंत टिकून राहाणें व निःस्त्रार्थ बुद्धीनें शास्त्रीय असेच आचरण जनहितासाठी करणे हे दोन सिद्धीचे मार्ग आहेत. प्राणपणानें सन्मार्गाचे रक्षण करावें. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा । सम्पत्तौ च विपत्तौ च साधू नामकरूपता ॥ –उदयास्तसमयीं जसा सूर्य एकाच रक्तकांतीचा असतो त्या त्याप्रमाणे सज्जन अनुकूल प्रतिकूल स्थितींतहि सत्याच्या एकरूप निश्चयानें असतात. धर्मेण निधनं श्रेयो न जयः पापकर्मणा ।— धर्मानें मरण आले तरी हरकत नाही, पण अधर्मानें जय मिळविणे नको असे त्यांच्या नसोनसीं विंबलेले असते. प्राणाघातानिवृत्तिः परधनहरणे संयमः सत्यवाक्यम्काले शक्त्यां प्रदानं युवतिजनकथामूकभावः परेषाम् । तृष्णास्त्रोतोविमङ्गो गुरुषु च विनयः सर्वभूतानुकम्पा । सामान्यः सर्वशालेष्वनुपहताविधिः श्रेयसामेष पंथाः ॥ ( भर्तृहरी) एकंदरीत कोणाच्याहिं मनःप्राणादिकांना अपाय न पोहोचविणें, न्यायाने धन संपादणें, दुसऱ्याच्या द्रव्याचे अपहरण न करणे, परधनाच्या अभिलाषेपासून मन मागें ओढणे, खरें असेल त बोलणे, दीनाची नड पाहून वेळीच यथाशक्ति साहाय्य करणे, परस्त्रीविषयी मुका आणि नपुंसक असणे, तृष्णेचा त्याग करणें, गुरुजनांच्या ठिकाणी विनय बाळगणे, सर्वभूतांच्या ठिकाणीं प्रेमभाव व दया ठेवणे, सर्व बाबतीतहि शास्त्रीय आचरणाची कास न सोडणे हा सर्वसामान्य मोक्षाचा राजमार्ग आहे.

मुले-मुली एकत्र राहून देखील त्यांच्यांत शुद्धता असली तर तशीं ती एकत्र राहूं नयेत म्हणून कोण म्हणेल तें एक तत्त्वदृष्टीच्या आर्य संस्कृतीचे स्वाभाविक लक्षणच झालें. रोग्याला औषधोपचार आणि पथ्य, अशांतलाच हा प्रकार आहे. सर्वच चांगले झाले म्हणजे कोणालाच कोणा पासून भीति नाहीं.

वीस बीस, पंचवीस पंचवीस वर्षांच्या अविवाहित मुली प्रत्येक घरांत आहेतच. एकेका घरांत तर त्यांची रांकच लागलेली असते. चांगल्या सुशील असतात. हुंड्याच्या पायीं त्यांचे लग्न झालेले नसते. ही हुंड्याची पद्धत एकदा राष्ट्रांतून गेली म्हणजे मुलींची लग्नें आपोआप लौकर लौकर होतील. हुंडा घेणाऱ्याला सक्त शिक्षा व्हावी म्हणजे ही घातुक चाल अनायासें बंद पडेल. पाश्चात्य देशांत मुलचिं वयोमान पंचवीस-तीस वर्षांचे असते, तीच पद्धत इथे चालू करावी म्हणून प्रयत्न चालल्याचे ऐकिवांत आहे. पाश्चिमात्य देशांत तिथल्या हवेमुळे मुली लौकर ऋतुप्राप्त होत नाहीत; सामान्य व्यव हार व स्पर्श यानें पुरुषालाहि इंद्रियवैकल्य होत नाहीं. इथे तशी स्थिति नाही. इथे हा उष्ण देश आहे. अलीकडची स्थिति बघितली म्हणजे शेकडा साठांवर अधिक मुलांमुलींना नऊदहा वर्षांपासूनच त्या भावना मनांत डोकाऊं लागतात हे त्यांच्या कृतीवरून कळून येते. शरीराची उत्पत्ती मैथुनापासूनच झाली असल्यामुळे ” कामाचे वळले शरीर ” इतके ते शरीरांतून व्यापून असते. • सहासात वर्षांच्या मुलांमुलींतच आईबापांकडून व इतर माणसांकडून नवरा वायकोच्या भावनेचे विनोदाच्या भाषेतून पेरले जाते. या हिशोबानें हिंदु स्थानांत पूर्वी मुलींचा विवाह आठव्या वर्षीच करून टाकीत. कुठे आडमार्गानें पाऊल पडूं नये व त्या भावनेचा परिपोष, विकार उत्पन्न होण्यापूर्वीपासूनच त्या वधुवरांच्या इतकाच मर्यादितपणे वाढत असावा म्हणूनच ही योजना होती. इतके बालविवाह होऊन देखील पूर्वीच्या लोकांची देहयष्टि नवीन पिढीच्या माणसांपेक्षां कितीतरी पटानें सुदृढ होती. याचे कारण आज उघड आहे. फॉर मार्गे जेव्हां वैदिक परंपरा उज्ज्चल होती, तेव्हां सातआठव्या वर्षीच मुलाचें उपनयन करून त्याला गुरुगृहीं वेदाभ्यासासाठी ठेवीत असत. आणि त्या वेळी विनोदाच्या भाषेतूनहि त्या मुलामुलींच्या मनांत अशा भावनेचे बीजारोपण करीत नसत.त्यामुळे सांग वेदाध्ययन होऊन गुरूनें गृहस्थाश्रमाकरितां परवानगी देईपर्यंत, पंचविसाव्या वर्षांपर्यंत त्या दिव्य व पवित्र वातावरणांत वाईट संस्कार, चाईट भावना, वाईट व्यवहार यांना वाव मिळत नसे; व तसें तें मन पवित्र राखण्याचे सामर्थ्य त्या वातावरणांत, त्या गुरूंत व त्या वेदाध्ययनांत असे. पुराकल्पे च नारीणां मौजीबंधनमिष्यते । अध्यापनं च वेदानां सावित्रीवचनं तथा पिता पितृव्यो भ्राता वा एनामध्यापयेत्परःस्वगृहे चैव कन्याया मैक्षचर्या विधीयते ॥ — फार पूर्वी कुमारिकांची उपनयनें होत असत. वेदाध्ययन पण त्या करीत असत. गायत्रीमंत्राचा उपदेशहि पण त्यांना होई. मात्र त्या कुमारीला तिचे वडील, चुलते, भाऊ यांपैकी कोणीतरी वरच्या घरींच शिकवीत असत. स्त्रगृहींच त्यांची मैक्षचर्या असे. अलीकडे सोळा-सतरा वर्षांच्या मुलींना शिकवात्रयाला अन्य शिक्षक असतो. शिक्षण दूषित, संस्कार दूषित त्यांतून विवाहाच्या गोष्टीहि नसतां कामाचा थैमान सारखा चाललेला असतो.

मुलांमुलींचा संपर्कहि शाळा, विश्वविद्यालयें यांतून असतो. अचकट विचकट विनोद, व्यसनी मनुष्यांचा सहवास, फिरावयाला जाणे, बागेतल्यासारख्या ठिकाणी एकत्र बसणें इत्यादि स्वतंत्र व्यवहार चाललेला असतो. त्यांतून या भावनेचे बी लहानपणींच पेरले गेलेलें असतें. धर्माचे, नीतीचे शिक्षण नाहीं, पुढचा बहुतेक समाज अशाच तऱ्हेचा व त्यांतून पाश्चात्य राष्ट्राचा आदर्श.आत तर त्याला कायद्याचीहि परवानगी नौकरी आदींचे स्वतंत्र जीवन. एकस्य कर्म संवीक्ष्य करोत्यन्योपि गर्हितम् । असें चालले आहे. पापं कर्तुं ऋणं कर्तुं मन्यंते मानवाः सुखम् । परिणामोतिगहनो महतामपि नाशकृत् ॥ – पाप करावयाला व ऋण काढावयाला मनुष्यांना प्रथमक्षणी फार आनंद होतो. त्याचा परिणाम पुढे काय होतो हें गहन आहे. मोठमोठ्यांच्या नाशालाहिं तो कारण होतो. एवंच प्रकृत स्थिति सुधारली पाहिजे. हें सर्व मंत्र्यांकडे आहे. अन्तःसारैरकुटिलैरच्छिद्रैः सुपरीक्षितैः । मन्त्रिभिर्धार्यते राज्यं सुस्तम्भैरिव मन्दिरम् । ( सुभाषित) – अंतःसारविचाराच्या, अकुटिल, अछिद्र, सुपरीक्षित अशा मंत्र्यांकडून, स्थिर स्तंभांकडून मंदिराचें धारण केल्या गेल्याप्रमाणे, राज्याचे धारण होतें. शीलसंवर्धन हें मुख्य आहे. शीलं परं भूषणं । इकडे दृष्टि ठेऊन त्यांनी राष्ट्राचा उद्धार करावा.

अर्धो ह वा एष आत्मनस्तस्माद्यजायां न विन्दते नैतावत्प्रजायते असर्वो हि तावद्भवति । अथ यथैव जायां विन्दतेऽथ प्रजायते तर्हि सर्वो भवति तथा चैतद्वेदविदो विप्रा वदन्ति यो भर्ता सैव भार्या इति । ( वाजसनीय ब्राह्मण) विवाहाची प्रवृत्ति सामान्य मनुष्याला ‘देहेन सह जन्यते’ असें थोड्या अतिशयोक्तीनें म्हटले तरी तितकें भिनून असतें असा अर्थबोध होतो. वरच्या वाजसनीय ब्राह्मणाच्या वाक्यानेहि हा जनसामान्यांचा नैसर्गिक नियम आहे हें सिद्ध होतें. आपला अर्धा भागच असल्यामुळे जोपर्यंत ‘जाया’ नसते तोपर्यंत तो पुरुष केवळ अर्ध्या भागाच्या रूपानें अपूर्णच असतो. जायेचा लाभ होऊन संतति होते तेव्हां तो पूर्ण होतो. हें सर्व जाणलेले विप्र, जो भर्ता तोच भार्येच्या रूपानें आहे, एकाच देहाचे हे दोन पार्ष आहेत, एका ‘मी ’ या आत्मीय स्फूर्तीनें प्रजेकरितां स्त्रीपुरुषांची अशी दोन रूपें धारण केली असल्यामुळे पतिपत्नींत भेद नाहीं, जो पति तीच पत्नी व जी पत्नी तोच पति, असे म्हणतात. हा याचा अर्थ. अलीकडे स्त्रिया, ‘आम्हांला आतांपर्यंत

हीन लेखले’ म्हणून म्हणतात त्याला आधार नाही. या वरील प्रमाणे पति इतक्याच महत्त्वाच्या दृष्टीने पत्नीलाहि पूर्वी पाहात होते हैं लक्षांत येइल. पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने । रक्षन्ति स्थाविर पुत्राः न श्री. स्वातंत्र्यमर्हति ॥ १।३ || या वाक्याने रागावलेल्यांनी मनूच्या या पुढच्या लोकांकडे लक्ष द्यावे. पितृभिर्भ्रातृभिश्चैताः पतिभिर्देवरैस्तथा । पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणमीप्सुभिः ॥ (मनु. ३-५५) मोठ्या समारंभाने लग्न झाल्यानंतरहि ज्याला ऐश्वर्य मिळावे म्हणून वाटते व आपले कल्याण असे वाटते त्या जनक, बंधु आदिकांनी, पति, दीरादिकांनी गौरवाने पाडून अन्नपानादिकांनी व अलंकारादिकांनी त्या वधूस संतुष्ट राखावें. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः (मनु. ३–३–५६)– ज्या कुलांत व ज्या राष्ट्रांत पिता व बंधु आदिकांकडून त व दौर आदिवांकडून व इतर सर्वजनांकडून स्त्रिया पवित्रतेने, गौरवानें बघितल्या जातात, तिथे देवता प्रसन्न असतात. ज्या ठिकाणी असे पूज्य दृष्टीनें बचितलें जात नाही त्या ठिकाणी होणाऱ्या सर्व श्रौत स्मात लाकिक किया विफल होतात, असा याचा अर्थ. स्त्रीषु दुष्टासु कौतेय जायते वर्णसंकरः – स्त्री दुष्ट निघाली तर वर्णसंकर होतो. आर्यांची उच्च संस्कृति नष्ट होईल अशा भीतीने, अमोल दागिना योग्य काली वापरून पुनः सुंदर पेटीत ठेवल्या प्रमाणे, स्त्रियांना पति सुंदर अशा मर्यादिने वागवीत असत. इतरहि मातृवर्ग म्हणून मोठ्या पूज्यतेनें व गौरवाने बघत असत. हीच परंपरा आतांहि पण चालावी.

home-last-sec-img