Literature

साधकाची अशी धारणा व्हावी

‘न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः । न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥ एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानस्ति मायामात्रमिदं द्वैतमद्वैतं परमार्थता ॥ न स्त्री न पुमानेषः न तु तद्द्वितीयमस्ति । विरोधहि कसला नाहीं, कशाचीउत्पत्तीहि झाली कोणीहि बद्ध नाहीं, कोणी साधकहि नाही, कोणी मुमुक्षुहि नाही आणि कोणी मुक्तहि पण नाही. सजातीय – विजातीय स्वगतभेदशून्य एक असे अद्वय ब्रम्ह आहे. या ठिकाणी अनेक असे काही नाही. द्वितीयरूप आणि द्वैत हे केवळ खोटे भासते. इथे एकरूप अद्वैतच खरें सुख देणारें म्हणून सत्य तत्व आहे, तो आनंदरूप आत्मा न स्त्री झाला आहे न पुरुष. ‘मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति ।‘ दुसरे म्हणूनच काही नसतां जो भेद आणि नानात्व मानतो, त्याला त्याच्या त्या कल्पनेनेच अनेकदां जन्मून अनेकदां मृत्युमुखांत पडावे लागते. या श्रुतिवाक्यांच्या आधारें जगांत सत्य म्हणून पहावयाचे झाल्यास इथे अनेक गाडग्यांतून असणाऱ्या एका मातीप्रमाणे, अनेक तरंगां तून असणाऱ्या एका समुद्राप्रमाणे, धोतर, रुमाल, साडी इत्यादि विभिन्नलिंगात्मक अनेक वस्त्रांतून असलेल्या एका कापसाच्या धाग्याप्रमाणे, मृगजलाच्या भासांतून असणाऱ्या एका सूर्यप्रकाशा प्रमाणे अथवा मुळी, जमीनीत पडलेली भेग, पाण्याची धार पडून आलेला आकार अथवा सर्प या अनेक कल्पनांतून असणाऱ्या एका दोरीप्रमाणे, एकाच्याच अनेक वेषांतल्या त्या सर्व नामरूपांतून असलेल्या त्याच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाप्रमाणे जगाच्या विभिन्न अनेकानेक आकारांतून तत्त्वत: निर्गुण निराकार असणारा मीच एक आहे; माझ्या ज्ञानमात्रतेनें, आनंदघनतेने (अद्वितीय आनंद रूपतेनें) मीच परब्रम्ह परमात्मा अथवा आत्मा म्हणवून घेतो. असे निश्चयाने समजणे म्हणजे ज्ञान. याचाच निःसंशय अनुभव, निर्वात दीपाप्रमाणें सदैव निश्चल असा. अखंड तेवत राहिला म्हणजे तोच आत्मसाक्षात्कार. जगांत कुठेहि कोणत्याही अवस्थेत कसल्याहि नामरूपाच्या दर्शनानें भिन्न अशी कोणतीच वृत्ति न उमटतां कांहीहि पाहिलें तरी आपल्या अद्वितीय आनंदरूपाचा नितान्त शांतिकर व अनंत समाधानकर अनुभवच एक हृदय आपोआप कोणत्याहि प्रयत्नाविरहित सहज उमटू लागला आणि दुःखशोक मुळांतूनच अजीबात नष्ट झाले म्हणजे आम्ही कृतकृत झालो.

मागच्या क्षणांत आनंदांत हंसत असणारी आई मुलाचा खोडसाळपणा बघून जाता जाता ssम्हणते आणि नेणत्या •मुलावर वरवर उगीच क्षणभर डोळे वटारून आपल्या गृहकृत्याला लागते. त्याप्रमाणे वरवर नेणत्या जगांत त्यांना त्यांना मार्गाला लावण्याच्या उद्देशाने अंतःस्थितीचा अनुभव घेत क्षणभर ते ते उपाय नाइलाजानें योजीत स्वरूपाकार असले म्हणून बिघडत नाही. पण ‘येथे कारण अंतरस्थिति। अंतरींच पाहिजे निवृति ।।‘ तें खरोखर पाहिजे. दिखाऊ टिकत नाही आणि त्याचा उपयोग आपल्याला आणि दुसऱ्यालाहि होत नाहीं. तसा तेवढा अभ्यास झाला पाहिजे. सर्व जगाच्या निखिल आनंदाचे अत्युन्नत असे अनंत अपार रूप, तें निरतिशय पवित्र रूप, तें अमित मंगलरूप, तें ब्रह्म तो परमात्मा म्हणजे केवळ आपणच विश्व म्हणजे आपल्याच निरवधि आनंदाचा सुंदर आविष्कार आहे, अशा अनुभवानें नित्य निर्विकार असणे म्हणजेच आत्मनिष्ठा, विश्वं यदेतत्परमात्म दर्शनम् असा आत्मनिष्ठाचा अनुभव असतो. निर्विकार आनंदाचा निष्कलंक पूर्ण चंद्रच तो. त्याचे दर्शनहि तसाच आनंद निर्माण करतें. सर्व खल्विदं ब्रह्म हे त्यालाच एक अक्षरश: पटले. स तत्र पर्येति जक्षत्क्रीडनरममाणः स्त्रीभिर्वा यानैर्वा ज्ञातिभिर्वा वयस्यैर्वा नोपजनं स्मरन्निदं शरीरम् । (छां. उ. अ. ८ खं. १२-३ ), स वा एष एवं पश्यन्नेवं मत्वान एवं विजानन् आत्मरतिरात्मक्रिड आत्ममिथुन आत्मानंदः स स्वराड् भवति । (छा. उ. अ. ७ खं. २५-२) त्याच्या विनोदांत, त्याच्या क्रीडेंस स्वपरदेहभावना नसते. सर्वत्र आत्मदर्शनच त्याला होते. आनंदहि आत्मरूपाचाच असतो. मी अन्यशून्य एक निर्विकार निराकार आनंदघन आहे, माझ्याहून व्यतिरिक्त काहीं नाहीं असे पाहणारा,

यत्तदद्रेश्यमग्रामगोत्रम वर्णमचक्षुःश्रोत्रं तदपाणिपादं नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं तदभूतयोनिं परिपश्यन्ति धीराः (मुंडक उ. १-६) बाह्य दृष्टीचा जो विषय होत नाहीं; ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, मन आदिकांस ज्याचे ग्रहण होत नाहीं; ज्याला वंशपरंपरेचा अन्वय नाहीं, ज्याला रूपरंग नाहीं; ज्याला चक्षु श्रोत्रादि इंद्रियें नाहींत; जे करचरणादि अवयवशून्य आहे; जे निर्विकार, जन्मशून्य, सर्वव्यापी, अविनाशी आहे; त्या अतिसूक्ष्म आत्मप्रत्ययसार अशाच चराचर जगताच्या कारणरूपाला विवेकी, बुद्धिमान् ज्ञानी सर्वत्र सर्वतः पहातात. या वाक्यावरून व अनुभवावरूनहि ज्ञान्याची कारणदृष्टि असते आणि अज्ञान्याची कार्यदृष्टि असते हे स्पष्ट होते. कस्मिन्नु विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति । कोणत्या एकाच्या ज्ञानाने या सर्वांचे ज्ञान होते ? (मुंडक उ. १-१-३) येनाश्रुत श्रुतं भवत्यमतं मतमविज्ञातं विज्ञातमिति कथं न भगवः स आदेशो भवतीति । (छा. उ. अ. ६ खं. १-३.) ज्याच्यानें ऐकले नसेल तें सर्वहि ऐकल्यासारखे होते, असंगत संमत होतें अणि जे कळून आलेले नसतें तेंहि पण कळून येतें, असा तो उपदेश कोणता ? या प्रश्नांना उत्तर म्हणून

आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः । आत्मनो वा अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेनेद सर्व विदितम् । (च. उ. अ. २ बा. ४-५ ) सर्वाहून अधिक प्रिय असणांच्या आत्म्याला (आत्मा म्हणजे तो आपण या श्रीसमर्थांच्या उक्तीप्रमाणे आपल्यालाच ) पहावें, आपल्याच स्वरूपाचे वर्णन ऐकावें. त्या वर्णनांत आलेल्या अविनाशी, निर्गुण, निराकार, चिन्मात्र, आनंदवन, जगत्कारण सर्वाधार, सर्वगत सर्वरूप सर्वशून्य, अद्वय इत्यादि लक्षणांचा मी म्हणून मनन करावें. मननानंतर निश्चयाने त्याचाच ध्यास घेऊन त्याच्याच चिंतनांत अहर्निश असावें. आत्मदर्शनानें, श्रवणानें, मननानें, त्याच्या निश्चयात्मक निदिध्यासानें हे सर्व जाणले आतां जें ऐकले नव्हते तें ऐकल्यासारखे, असंमत ते संमत झाल्यासारखे व जें कळून आले नव्हते ते कळून आल्यासारखे झाले, असे याज्ञ वल्क्यांनी सांगितले आहे.

नाहीं तरी आत्म्याव्यतिरिक्त या जगात काय आहे ? असेल तर मीया आपल्या भानविरहित बघून ते सांगता येत नाही, असे प्रत्ययाला आल्यास हे सर्वहि आत्मभानांत प्रतिबिंबिलेले आत्ममात्र आहे, हे कोण नाकबूल करील ? तें आत्मरूप सर्व जाणणाऱ्या मीया आत्मभानाचे लक्ष्य असल्यामुळे स्वप्रकाश अद्वितीय ज्ञानमात्र आनन्दघन आहे, हे मी या अनुभवात असणाऱ्या आपल्या अद्वितीयत्वाच्या अनुभवानेंहि पटते. मी म्हणजे मीच, दुसरा नाही. असा याचा अर्थ नाहीं का होत ? कोण आहे रे तिकडे ?’ म्हणून विचारले असता मीच एकटा आहेहा स्वरूपाचा अनुभव बाहेर पडतो. मीया अनुभवांत अन्याचा अभाव प्रत्येक वेळी उघडकीस येत असतो. देहपरवें भेद वाटला तरी तो मानीव आहे. प्रत्येक देहांत मीहे आहेत. अनेक गाडग्यांतले एका नदीचें स्वच्छ पाणी एकत्र ओतले म्हणजे त्या पाण्यांत जसा भेद रहात नाही, त्याप्रमाणे अनेक देहांतले मीएकवटले म्हणजे एक मीभान उरतें आणि त्या भानाचे लक्ष्य आपण केवळ भानरहित आनंदरूप आहों, हें विचार करून बघितले म्हणजे नाहीं का प्रत्ययाला येणार ?

home-last-sec-img