Literature

सापत्न आदर्श

रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये । 

तस्मात्तुष्टास्मि यद्राजा रामं राज्यभिषेक्ष्यति ।

( वा. रा. अ. स. ७-३५)

श्रीराम आणि भरत या दोघांमध्येहि मला भेद दिसून येत नाहीं. महाराज श्रीरामाला पट्टाभिषिक्त करणार आहेत हे ऐकून मला मोठा संतोष वाटतो. हें कैकेयीचें वाक्य आहे. मंथरेनें कितीहि सांगितलें तरी अगोदर कैकेयी श्रीरामाची स्तुतीच केली होती.

धर्मज्ञो गुरुभिर्दान्तः कृतज्ञः सत्यवाक् शुचिः ।

रामो राज्ञः सुतो ज्येष्ठो यौवराज्यमतोऽर्हति ॥ १४॥ 

भ्रातॄन् भृत्यांश्च दीर्घायुः पितृवत् पालयिष्यति । 

संतप्यसे कथं कुब्जे श्रुत्वा रामाभिषेचनम् १५

यथा मे भरतो मान्यस्तथा भूयोऽपि राघवः ।

कौसल्यातोऽतिरिक्तं च सोऽनुशुश्रूषते हि माम् ॥ १८॥ 

राज्यं यदिद्द रामस्य भरतस्यापि तत्तथा । 

मन्यते हि यथात्मानं तथा भ्रातृस्तु राघवः ॥१९॥

( वा. अ. स. ८ )

-श्रीराम हा धर्मज्ञ सद्गुणी वसिष्ठाकडून उत्तम शिक्षण घेतलेला कृतज्ञ सत्यभाषी परिशुद्ध हृदयाचा व त्यांतून महाराजांचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे यौव राज्याचा अधिकार त्याला आहे. तो चिरंजीव होवो. सिंहासनावर बसला तरी पित्याप्रमाणे तो बंधु आणि मृत्य ( चाकर नोकर ) यांचे परिपालन करील. रामराज्याभिषेकाची वार्ता ऐकून तूं कां एवढी जळत आहेस भरतापेक्षां श्रीरामावरच माझे प्रेम अधिक आहे. तो कौसल्येपेक्षां मलाच अधिक मानतो माझीच अधिक सेवा करतो. रामाचें राज्य झालें तरी भरताचे राज्य झाल्या सारखेच आहे. भरतच युवराज होणार. श्रीराम आपल्याप्रमाणेच आपल्या बंधूंच्यावरहि प्रेम करतो. सापत्नभाव नाहीसा करण्याचे हें एक आदर्श आचरण होय.

उपाध्यायान् दशाचार्य आचार्याणां शतं पिता ।

सहस्रं तु पितॄन्माता गौरवेणातिरिच्यते ॥

( म. स्मृ. २ १४५)

-गौरवाच्या दृष्टीने पाहातां माता ही पित्यापेक्षां हजार पटीने अधिक श्रेष्ठ आहे. या सिद्धांतानुरूप युक्तिवाद करून कौसल्येनें श्रीरामाला तूं वनांत जाऊं नकोस असे सांगितलें व पित्राज्ञेच्या पालनापेक्षा आपली प्रलापोऽर्थ शून्यः । आज्ञा पाळणें अधिक धर्म्य आहे म्हणून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. श्रीरामानें तें सर्व निमूटपणे ऐकून घेतलें व धर्मदृष्टीनेंच आपल्या मातेचें सांत्वनहि पण केलें.

मातेची योग्यता पित्यापेक्षां हजारपर्टीने अधिक असली तरी सती ही पतीला अनुसरणारी असल्यामुळे पुराणादिकांतून मातेपेक्षां पित्याची आज्ञाच पालन केल्याची उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेनें उलट युक्तिवाद करून कौसल्यामातेची श्रीरामानें समजूत घातली.

home-last-sec-img