Literature

सुराज्य व सुसमाजाची घटना

अयोध्याकांडाचा १०० वा सर्ग फार महत्त्वाचा असून हा आर्य संस्कृतीच्या जिज्ञासूंना व राज्यसूत्रधारांना अवश्य विचारणीय आहे. यांत  राज्यकारभाराचे धडे आहेत, त्याचे मार्गदर्शन आहे. राज्य चालवावें कसें हे यामुळे कळून येतें. राजकारणांत भाग घेणाऱ्यांनी याचा अवश्य अभ्यास केलाच पाहिजे. हा श्रीरामाचाच उपदेश आहे. श्रीरामाच्याच मुखारविंदापासून याचा जन्म आहे. आदर्श रामराज्यांत नांदूं पाहाणाऱ्या आम्हां सर्वांनाच याचे अव लोकन, आलोचन व अभ्यसन अत्यवश्य आहे. पुरोहित अथवा कुलगुरु, म्हणून एक जसा कुटुंबाला अवश्य असतो त्याप्रमाणे तो राष्ट्रालाहि एक हवा. बृहस्पत्याचार्य हे देवगुरु असल्याप्रमाणें शुक्राचार्य हे दैत्यगुरु आहेत. दैत्यांनाहि जर यांची आवश्यकता भासते तर मग कोणाला भासणार नाहीं ? मनुष्यांना तर याची फार आवश्यकता असते. राज्यधुरंधरांना याचेच मार्गदर्शन असल्या मुळे या राजगुरुवरच राज्यधुरंधरांच्या व राष्ट्राच्या इहपर उन्नतींची जबाबदारी येते. पर्यायानें राजगुरुच राष्ट्रगुरु होतो. श्रीरामाचे वासिष्ठ हे कुलपुरोहित, गुरु व तसेच राजकारणांतलेहि पण सल्लागार होते. राजगुरु सावगीक, ज्ञानपूर्ण, सिद्ध असला म्हणजे आपोआपच राजकारणांतहि त्याचा सल्ला घ्यावासा वाटतो व तो घेतला जातो. श्रीराम वसिष्ठांचा आदर्श पुढे ठेऊन याचा विचार केला म्हणजे पुरे. या बाबतीतले अगदी ताजे उदाहरण शिव-समर्थांचे आहे. इध्वस्त्रवरसंपन्न मर्थशास्त्रविशारदम् । सुधन्वानमुपाध्यायं कश्चित्वं तात मन्यसे ॥ १४ ॥ शस्त्रास्त्र व शाल-विशारद उपाध्यायांचा सत्कार राखतोस ना, भरता म्हणून श्रीरामाने विचारले आहे. उपाध्याय ‘शापादपि शरादपि सामर्थ्यवान असावेत.

home-last-sec-img