Literature

सृष्टिस्वरुपं नाम प्रकरणं द्वादशम्‌‌

मयोपाधि जगद्योनिः सर्वज्ञत्वादि लक्षणः।।
स ईश इति विख्यातोजद्यः सृष्टिरीक्षणात्‌‌।।1।।
अर्थ—— ”माया” या उपाधीने युक्त जगत्‌‌रुपी योनी अशी ही सृष्टि त्या ईश्वराने केवळ आपल्या दृष्टिपाताने उत्पन्न केली जो कि, (ईश्वर) सर्वज्ञ आदि लक्षणानी प्रसिध्द आहे. ।।1।।

मायान्तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम्‌‌।।
तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत्‌‌।।2।।
अर्थ—— माया म्हणजे ही पृथ्वी समजावी आणि ईश्वर हा मायिन (माया उत्पन्न करणारा) असे म्हणतात आणि त्याच्या अवयवांपासूनच उत्पन्न अशी ही भूते (प्राणी) असून त्यामुळे हे सर्व जग व्याप्त आहें. ।।2।।

सृष्टवा बहुविधान्देहान्‌‌ प्रविष्टोयं यदा तदा।।
देहाभिमानतश्चास्य ह्यविद्योपाधिरागता।।3।।
अर्थ——अनेक प्रकार से शरीर निर्माण करुन ह्या ईश्वराने त्यात प्रवेश केला आणि देहअभिमान उत्पन्न होवून त्या प्राण्यांमध्ये अवद्यिा प्रकट झाली. ।।3।।

ईश एव ततो जीवोविद्योपाधित एव हि।।
देह दृष्टित एवायं किञिचज्ञ इति कथ्यते।।4।।
अर्थ—— परमेश्वरच त्या अविद्या उपाधीने वेष्टित झाल्याने देह दृष्टिने हा किंचित्‌‌ ज्ञाता असे म्हटले आहे. ।।4।।

देहाभिमानतश्चास्य सृष्टिर्मैथुनसम्भवा।।
स्वप्ने मानसिकी सृष्टिर्यथैवेशस्यसा भवेत्‌‌।।5ं।।
अर्थ— देहाभिमानतः देह म्हणजेच मी ह्‌या कल्पनेने ग्रस्त ही सृष्टि मैथुनातूनच उत्पन्न झाली. ज्या प्रमाणे स्वप्न ही मानामुळेच रचली गेलेली सृष्टि आहे. ती ईश्वराच्याच सृष्टिप्रमाणे सत्य पाटते. ।।5।।

नैवैकत्वेन कार्यं स्यादिति मत्वा स ईश्वरः।।
सृष्टिकामो द्विधा जाता शक्तिश्च शक्तिमानता।।6।।
अर्थ—— एकटेपणाने हे कार्य होणार नाही असे जाणून त्या ईश्वारने सृष्टि उत्पन्न करण्याच्या इच्छेने शक्ति आणि शक्तिमान्‌अशी दोन रुपे धारण केली. ।।6।।

द्वेधा विभज्य चात्मानमर्धेन पुरुषोभवत्‌‌।।
अर्धेन नारी तस्यां तु विराजमसृजत्‌‌ प्रभूः।।7।।
अर्थ— स्वतःस दोन भागात उत्पन्न करुन विभाजित करुन एकापासून पुरुष तत्व उत्पन्न केले आणि अर्ध्याभागाने नारी तत्व उत्पन्न केले. आणि त्यांत शोभा आणि तेज निर्माण केले. ।।7।।

प्रकृतिः पुरुषो भूत्वा स्वयमीशोमीदृशम्‌‌।।
ईक्षणेंन जगत्सर्वं प्रजारुपेण सृष्टवान्‌‌।।8।।
अर्थ—— प्रकृति आणि पुरुष रुपाने स्वयं ईश्वराने ह्‌या प्रमाणे ईक्षणाने म्हणजे दृष्टिक्षेप करुन हे सर्व जगत्‌ प्रजारुपाने निर्माण केले. ।।8।।

संङकल्पनं चेक्षणं वा तपः प्रकृतिरुच्यते।।
तत्संयोगेन विस्त्रंयत्स एवाभूत्स्वशक्तितः।।9।।
अर्थ—— संकल्प ईक्षण किंवा तप म्हणजेच प्रकृति असे म्हटले जाते. त्याच्या संयोगानेच हे जग स्वशक्तिने निर्माण झाले. ।।9।।

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन।।
न तदस्ति विनां यत्स्यान्मया भूतं चराचरम्‌‌।।10।।
अर्थ——जे ही ह्‌या प्राणीमात्रांमध्ये मूळ बीज आहे. ते सर्व माझोच रुप आहे. (तूं अर्जुन जाण )असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. हे चर आणि अचर दिसणारे सर्व कांही जगत्‌ माझ्‌यावाचून कांहीच नाहीं. ।।10।।

व्यक्ताव्यक्तस्वरुपेण प्रकृतिः सा द्विधा मता।।
ईक्षण भावतोव्यक्ता व्यक्ता चेक्षणतो हि सा।।11।।
अर्थ—— व्यक्त आणि अव्यक्त ह्‌या दोन रुपांनी ही सृष्टि विभागलेली आहे. ईक्षणाच्या भावाने अव्यक्त आणि व्यक्त ही सुध्दा ईक्षणानेच. ।।11।।

अव्यक्ताव्द्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे।।
रायिांगमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके।।12।।
अर्थ—— दिवस उजाडल्याबरोबर जे अव्यक्त असते ते लगेच व्यक्त स्वरुपांत रुपांतरित होते. आणि रात्र झाल्यावबरोबर जे व्यक्त स्वरुपांत असते ते अव्यक्त स्वरुपांत विलीन होवून जाते.।।12।।

सर्व भूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌‌।।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌‌।।13।।
अर्थ—— हे अर्जुन ! सर्व प्राणीमात्र ह्‌या प्रकृति रुपात जी माझ्‌यातूनच उत्पन्न आहे, त्यांत निर्माण होवून कल्पाच्या अंतीम समयी माझयातच विलिन होतात. आणि कल्पाच्या सुरुवातीला मीच त्यांचे सृजन (निर्मिती) कतो. ।।13।।

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनःपुनः।।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌‌।।14।।
अर्थ—— संपूर्ण दृश्य जगत्‌‌ प्रकृति ही माझ्‌‌या अधीन असून मी त्यांत ‌प्रवेश करुन पुनःपुनः तिला उत्पन्न करतो. आणि हा संपूर्ण प्राणी समुदाय परवश असून प्रकृतिच्या म्हणजे माझ्‌याच अधीन आहे. ।।14।।

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा।।
मद्‌‌भावा मानसा जाता येषां लोक इमाःप्रजाः।।15।।
अर्थ—— सात महार्ष्ी आणि चार ही मनु माझ्‌या मनापासून, मानसपुत्र उत्पन्न झाले आणि त्यांजपासूनच हे लोक (प्रजा) उत्पन्न झाले. ।।15।।

भगवानुक्तवानेततत्प्रसिध्दं यतस्ततः।।
मनसी प्रथम सृर्ष्टिीवानां मैथुनात्‌‌तः ।।16।।
अर्थ—— भगवान श्रीकृष्ण ह्‌‌या प्रमाणे बोलले हे प्रसिध्दच आहे कीं सर्व सृष्टि आदिसमयांत म्हणजे सुरुवातीला मनामुळे उत्पन्न झाली आणि नंतर मैथुनापासून उत्पन्न झाली. ।।16।।

प्रकृतिः पुरुषोरुपोसावीशः स्त्रीपुरुषस्तथा।।
भृत्वा गृही पतिः पत्नी प्रजां सृजति स क्रमांत।।17।।
अर्थ—— प्रकृति आणि पुुरुष अश्या रुपाने हा ईश्वर स्त्री पुरुष ह्‌या रुपाने उत्पन्न होवून घरामध्यें पति—पत्नि बनून क्रमाने प्रजा निर्माणकर्ता झाला. ।।17।।

मम योनिर्महद्‌‌ ब्रह्म तस्मिन्गर्भ दधाम्यहम्‌‌।।
सम्भवः सर्वभूतांनां ततो भवति भारत।।18।।
अर्थ—— माझी योनी म्हणजे महद्‌‌ब्रह्म असून त्यांत मी गर्भाधान करतो आणि सर्व प्राण्यांची उत्पत्ति तपासूनच सम्भव होते. ।।18।।

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत।।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप।।19।।
अर्थ—— इच्छा आणि द्वेष उत्पन्न झाल्यामुळे त्यां द्वंद्वात (दोघांच्या पकडी मध्ये दिशाभूल होवून किंकर्तव्यमूढ अवस्था) मोहा मुळे सर्व प्राणी मोहित व भ्रष्ट होतात. आणि कल्पान्ति हे महान्‌ तप करण्यार्‌या अर्जुना ! हे सर्व जन्म घेतात.।।19।।

सृष्टिक्रमोयमेवेति प्रसिद्धश्चेशजीवयोः।।
कर्म सर्व हि सृष्टियर्थ निर्वाहार्थ ततश्च तत्‌‌।।20।।
अर्थ—— हा सृष्टिक्रम प्रसिध्दच आहे. सर्व कर्मे ही निर्मती आणि निर्वाहा साठीच केली जातात. असे हे आहे. ।।20।।

अव्यतं कारणं सूक्ष्म महत्‌‌त्व ततो विराट।।
स्थूल शरीरमीशस्य जगत्‌‌स्मिन्प्रतिष्ठितम्‌‌।।21।।
अर्थ—— अव्यक्त कारण हे सूक्ष्म असून महत्‌‌ तत्व विराट रुपाने पसरलेले आहे. आणि ईश्वराच्या स्थूल शरीरा पासून जगत्‌ त्यांत प्रतीयमान झालेले आहे. ।।21।।

राजते विविधत्वन विराड्‌‌ तेन सउच्यते।।
शरीरत्रयमेवं हि जानीयादीश्वरस्य च ।।22।।
अर्थ—— विविध रुपाने हे विराट पुरुषाचे रुप पसरलेले आहे. आणि ते सुशोभित होते. आणि आपले शरीरत्रय (स्थूल—सूक्ष्म—कारण) हे ईश्वराचेच रुप आहे, हे जपावे.।।22।।

अव्यक्तोपाधितश्चेशः स्वर्ण गर्भस्तथैव च ।।
महदुपाधितश्चैवं चाहङकारी विराजतः ।।23।।
अर्थ—— अव्यक्त असे तत्व उपाधिसहित स्वर्ण गर्भरुपाने व्यक्त होते व त्यांत महद्‌उपाधी म्हणजे अहंकार तत्व निर्माण होते. ।।23।।

अव्यक्त कारणे देहे बीजवत्सृष्टि वासना।।
ततः सैवाङकुरीभूय महत्‌त्वमितिस्फुटम्‌‌ ।।24।।
अर्थ—— अव्यक्त अश्या कारण देहामध्ये बीरुपाने सृष्टिवासना अर्थात्‌सुप्तवासना असतात. मग त्याच अंकुरित होवून महत्‌तत्वरुपाने स्पष्ट होवून फोफावतात. ।।24।।

तस्मिन्‌ हिरण्यगर्भः स बहुस्यामिति तप्यते।।
पुरुषप्रकृतिभावेन पतिः पत्नि ततस्तु सः।।25।।
अर्थ—— त्यांतच हिरण्यगर्भरुप बीज हे बहुस्याम्‌ अश्या रुपाने म्हणजे मी बहुतश्या रुपांत उद्‌भवित होईन अश्या स्फुरणतत्वामुळे प्रस्फुटीत होते. ।।25।।

यत्किञिचन्मिथुनं सृष्टौ व्यक्तं तत्पञचभूततः।।
स एव सर्वं यद्‌भूत यच्च भव्यं विराडिति।।26।।
अर्थ—— जे कांही मैथुनांतून उत्पन्न झाले ते सर्व पंच महाभूतांपासून व्यक्त झाले. त्यातुनच सर्व काहीं भूत उत्पन्न झालेले आणि उत्पन्न होणारे असे विराट्‌रुप आहे. ।।26।।

ईश एव हि जीवोयमविद्योपाधितः श्रुतः।।
कैवल्योपनिषच्छ्‌लोका उद्धृता के च नात्र तु।।27।।
अर्थ——— अविद्यामुळे उपाधी प्राप्त जीव ही हा ईश्वरतत्वरुपच आहे. कैवल्योपनिषदांतील श्लोकां वरुन हे स्पष्ट केले आहे. ते कोणते तत्व आहे की जे ईस्त्रराच्या अधिष्ठानाशिवाय आहे ? ।।27।।

हृत्पुण्डरीकं विरजं विशुद्धं विचिन्त्यमध्ये विशदं विशोकम्‌‌।।
अचिन्त्यमव्यक्तमनत्तरुपं शिव प्रशान्तममृतं ब्रह्मयोनियम्‌‌।।28।।
अर्थ——आपल्या हृदयकमलामध्ये विराजित असलेल्या निर्मल शुध्द, निर्विकार, शोकरहित, अचिन्त्य ज्याचे चिन्तन करणे कठिण आहे. अदृश्य, अमृतरुप, श्रीशंकराचे जे अत्यंत शान्त आणि ब्रह्मयोनी म्हणजे ब्रह्मतत्वच आहे अश्या रुपामध्ये मुनि ध्यान करुन प्रविष्ट होतात. असा 29 नंबरच्या श्लोकाला जोडून हा वाक्यार्थ पूर्ण होतो. ।।28।।

तथादिमध्यान्तविहीनमेकं विभुं चिदानन्दमरुपमद्‌‌भूतम्‌‌।।
उमासहायं परमेश्वरं प्रभु त्रिलोचनं नीलकंठ प्रशान्तम्‌‌।।
ध्यात्वामुनिर्गच्छति भूतयोनिं समस्तसाक्षिं तमसः परस्तात्‌‌।।29।।
अर्थ—— आदि मध्य व अन्तरहित एक सर्वव्यापी (विभुं) तसेच सत्‌चित्‌ आनन्दमय अद्‌भुत असे श्री शंकरांचे रुप जे उमा पार्वती सह आहे तसेच त्रिनयन नीलकण्ठ प्रशान्त आहे. अश्यांचे मुनीध्यान करतात जे की (शिवशंकर) समस्त भूतयोनी म्हणजे प्राणीमात्रां मध्ये साक्षीरुपाने विद्यमान आहेत. अज्ञानरुप अंधःकाराला पार करुन (तो मुनी) परम तत्वामध्ये प्रविष्ट होतो. ।।29।।

स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोक्षरः परमः स्वराट्‌‌।।
स एव विष्णुः स प्राणः स कालोग्निः स चन्द्रमा।।30।।
अर्थ—— तो ब्रह्म आहे. तो इन्द्र आहे. तोच शिव आहे, अविनाशी आहे, तोच परात्पर आणि प्रकाशरुप आहे. तो. विष्णुप्राण आणि काल आहे. तो अग्नि आहे आणि चन्द्रमा आहे. ।।30।।

स एव सर्वं यद्‌‌भूतं यच्च भंव्यं सनातनम्‌‌।।
ज्ञात्वा तं मृत्युमत्येति नान्यः पन्था विमुक्तयें ।।31।।
अर्थ—— जे कांही आतापर्यंत होवून गेले आणि होणार आहे, ते सनातन ब्रह्मच आहे. त्याला समजणाराच मृत्युला पार करुन जाऊं शकतो. पूर्णतः मुक्त होण्यासाठी त्याच्याशिवाय उपाय नाहीं. ।।31।।

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि।।
सम्पश्यन्‌‌ ब्रह्म परमं यातिनान्येन हेतुना ।।32।।
अर्थ——सर्व प्राणी आत्मतत्वामध्ये स्थिर आहेत आणि सर्व प्राणीमात्रांत माझ्‌यांत जे तत्व आहे तेच तत्व आहे. हे जो साधक अनुभूत करतो तोच परमतत्वाप्रत पोहोचतो ह्‌या शिवाय तो दूसर्‌या कोठल्याही मार्गाने जात नाहीं. ।।32।।

आत्मानमरणिं कृत्वां प्रणवं चोत्‌‌रारणिम्‌‌।।
ज्ञाननिर्मंथनभ्यासात्‌‌ पाप दहति पण्डितः।।33।।
अर्थ—— अन्तःकरणाला अरणीचा वरचा भाग कल्पून प्रणवाला त्याचा खलचा भाग मानून मंथन करुन (दोन काष्टखण्डानंना घेवून वर खाली ठेवून घासतात, व यज्ञाचा अग्नि प्रकट करण्यासाठी त्यांतून ठिणग्या पाडून अणी मंथन ही क्रिया होते व ती करुन यज्ञाची सुरुवात होते) ज्ञान मंथनाने ज्ञान ज्योति प्रकट करण्याच्या(अभ्यासा द्वारे) साधक जो बुध्दिमान, प्रयत्नशील असेल तो आपले अज्ञानरुपी बंधन जाळून नष्ट करेल. ।।33।।

स एव मायापरिमोहितात्मा शरीरमास्थाय करोति सर्वं।।
स्त्रियान्नपानादिविचित्रभोगैः स एव जाग्रत्परितृप्तिमेति।।34।।
अर्थ—— तो आत्माच मायेने परिमोहित होवून मोहाने लपेटला जाउन शरीराशी तादात्म्यभाव उत्पन्न करुन सर्व प्रकारचे कार्य करतो. तोच जागृत अवस्थेमध्ये स्त्री—अन्न—पान आदि भोग प्राप्त करुन परितृप्त होतो. ।।34।।

स्वप्ने तु जीवः सुखदुःख भोक्ता स्वमाययाकल्पित विश्वलोके।।
सुषुप्तिकाले सकले विलीने तमोभिंभूतः सुखरुपमेति।।35।।
अर्थ—— तोच आत्मा आपल्याच मायेने स्वप्नामध्ये रचल्या गेलेल्या संसारांत सुख भोगतो. तो. सुषुप्तावस्थेत सर्व (इंद्रिये) कांही विलीन झाल्यावर तमस्‌ (अप्रतिति) ज्ञानाने आवृत्त होवून आपल्या मध्येच आनंदानुभूति घेतो. ।।35।।

पुनश्च जन्मान्तरकर्मयोगात्‌ स एवजीवः स्वपिती प्रबुद्धः।।
पुरत्रये क्रीडतियश्च जीवस्ततस्तुजातं सकलं विचित्रम्‌‌।।36।।
अर्थ—— नन्तर पुन्हा पूर्वजन्मकृत कर्माच्या संयोगाने जीव स्वप्न पाहतो आणि जागा होतो. तो जागृत स्वप्न सुषुप्ति रुपी अवस्थां मध्ये खेळतो आणि त्यामुळेच नानाविध नाविन्य उत्पन्न होते. त्याचा आधार अखण्ड बोध आणि आनंद स्वरुप आहे. त्यातच तिन्ही पुर अवस्था विलिन होवून जातात.।।36।।

आधारमानन्दमखण्डबोधं यस्मिन्‌ लयं याति पुरत्रयञच।।
ज्ञयं परब्रह्म सुशान्तमेतत्स्वयं प्रकाशं तमसः परस्तात्‌‌।।37।।
अर्थ—— अत्यंत प्रशांत असे परब्रह्मतत्व विदित केले पाहिजे, जे स्वयंप्रकाशी असून अज्ञानरुपी अंधःकाराच्या पलीकडे आहे. ।।37।।

मायोपाधित एवास्य ब्रह्मणो नाम “ईश्वरः”।।
अवद्यिापाधितस्तस्य ब्रह्मणो नाम जीवकः।।38।।
अर्थ—— माया उपाधि सहित जे आत्मतत्व त्यालाच ईश्वर म्हणतात. अविद्या उपाधि सहित त्या ब्रह्मतत्वाचे नांव जीव असे आहे. ।।38।।

उपाधिभ्यां विहीनौ तौ ब्रह्मैवासङगरुपतः।।
घटाकाशौ महाकाशौ महदाकाशो एव हि ।।39।।
अर्थ—— उपाधीने विरहित असे ते दोन्ही ही (ईश्वर आणि जीवक) हे असंग असे ब्रह्मतत्वच आहे. घटाकाश, महाकाश आणि महद्‌‌आकाश हे सर्व एकच आहेत.।।39।।

शुभ्राभवच्च सा मायाविद्या कृष्णाभ्रवत्तयो।।
ब्रह्मसूर्यप्रकाशो यो बिम्बितः स इमाविति।।40।।
अर्थ—— शुभ्र रुपाने जी असते ती शुभ्र अभ्राप्रमाणे (अभ्र—ढग) आणि अविद्या ही काळया मेघाप्रमाणे असते. विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान हे सूर्याप्रमाणे असते. सूर्योदय झाल्यावर अभ्रे नष्ट होतात त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान प्राप्ती झाल्यावर (कृष्णवर्णीय) अविद्या नष्ट होते. ।।40।।

असङगो ब्रह्मसूर्यो हिी तत्प्रकाशोपि तादृशः।।
सङगीव मन्यते भ्रान्त्या तदेवाज्ञानमुच्यते।।41।।
अर्थ—— सूर्याप्रमाणे तत्वज्ञान हे स्वच्छ निर्मल स्वयंप्रकाशी असून त्याचा प्रभाव (प्रकाश) पण तसाच निर्लिप्त स्वच्छ स्पष्ट असतो. भ्रान्तिच्या संगतीने, भ्रांति मुळे उत्पन्न झालेले ते अज्ञान म्हणूनच सम्बोधिले जाते. ।।41।।

जीवेशौ भवतोज्ञानात्‌‌ मायाविद्ये तर्थव च ।।
ब्रह्माण्डमपि पिण्डाण्डपुंस्त्रीसर्जनकल्पने ।।42।।
अर्थ—— जीव हा अज्ञानापासून आणि माया ही विद्येपासून उत्पन्न होते. ब्रह्माण्ड पण पुरुष—स्त्री लिंगाच्या उत्पत्तिने त्याच कल्पनेने उत्पन्न होते. ।।42।।

प्रवृत्तौ सर्जनं कार्यं पुंस्त्री चेति विभावनम्‌‌।।
निवृतौ सर्जनं काय्रं नापि पुंस्त्रीविभावनम्‌‌।।43।।
अर्थ—— प्रवृत्ती रुपाने ते सृजनाचे कार्य पुरुष—स्त्री आदि विभागांत उत्पन्न होते आणि निवृत्ति रुपाने ते सृजनाचे कार्य असते, त्यांत पुरुष—स्त्री हा अभेद आहे. ।।43।।

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्म उच्चते।।
भूतभावोद्‌‌भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः।।44।।
अर्थ—— अक्षर अखण्ड परंब्रह्म हे स्वाभावतः अध्यात्म म्हणून ओळखले जाते. भूत आणि भाव ह्‌या प्रमाणे झालेले कर्म हे ”कर्म” म्हणूनच ओळखले जाते. ।।44।।

प्रवृत्तिलक्षणं कर्म ज्ञानं निवृत्तिलक्षमणम्‌‌।।
प्रवृत्तिस्सा गृहिणाञच निवृतिःसाच न्यासिनाम्‌‌।।45।।
अर्थ—— प्रवृत्तिरुपी केलेले कर्म हे ”कर्म” आहे आणि निवृत्ति रुपाने होणारे ते ज्ञान म्हटले जाते. भौतिक सुखासाठी कर्म हे प्रवृत्ति रुपी कर्म आणि हे लिप्त करतेव त्याचे परिणाम भोगावे लागतात परंतु निवृत्ति रुपी कर्म हे आपल्याला ठेव ठेवल्यासारखे कल्याणकारी असतात. ।।45।।

प्रवृत्तौ देहसम्बन्धाद्‌‌देहाहङकारतोपि च ।।
ईषणावतशतः कार्यं निवृत्तौ नेदृशं क्वचित्‌‌।।46।।
अर्थ—— देह संबंध, देहबुध्दि आणि अहंकार ह्‌या मुळे प्रवृत्तिरुप कार्य होते. इच्छावश होवूनच कार्य होतात. मात्र निवृत्ति मार्गात ह्‌या प्रमाणे इच्छावश होवून कांहीच कार्य होत नाहित.।।46।।

जनिमत्पदार्थस्वीकारः सङग्रहश्च दिवानिशम्‌‌।।
तत्सुखेच्छाप्रवुत्तौ च निवृत्तोै नेदृशं क्वचित्‌‌।।47।।
अर्थ—— उत्पत्ति मुळेच पदार्थांचा हव्यास हसतों. आणि रात्रंदिवस संग्रही वृत्ती ठेवली जाते. त्यापासून सुख मिळविण्याची, मिळण्याची इच्छा असते. तसे निवृत्ति मध्ये निरीच्छताच असते.

पुत्रेच्छया भवेत्‌कामः पतिपत्नीत्वभावनम्‌‌।।
गृहं धन प्र्रवृतौ च निवृती ने दृशं क्वचित्‌‌।।48।।
अर्थ—— पुत्राच्या इच्छेमुळे काम वासना उत्पन्न होत. आणि पति—पत्नि ही भावनापण उत्पन्न होते. घर आणि धन ह्‌यांच्या प्रवृत्ति मध्येच ती प्रवृत्त होते. मात्र निवृत्त प्रवृत्तिला हे काहींच नको असते. ।।48।।

तारतम्यञच वैविध्यं भिन्नत्वं स्वेतरं सुखम्‌‌।।
कार्यदृष्टिः प्रवृत्तौ च निवृत्तौ नेदृशं क्वचित्‌‌।।49।।
अर्थ—— विविध रुपामध्ये त्या ”तर” ”तम” भावाने तो सुख बघतो. प्रवृत्ति रुपी विचारकाचे माझे व परक्याचे (अश्या स्वार्थ बुध्दिने) सुख चिंतले जाते. मात्र निवृत्ति विचारक असे कांहीच चिंतन करीत नाहीं. ।।49।।

उत्पत्तिः सृष्टिनिर्वाहः कार्यादृष्टयेव जीवनम्‌‌।।
रागद्वेषौ प्रव्रुत्तौ च निवृत्तौ नेदृशं क्वचित्‌‌।।50।।
अर्थ—— निर्मिति, सृष्टिमध्ये जीवनासाठी कार्य करणे (जीविकोपार्जन) ह्‌या हेतुने कार्य करणे आणि त्याच बरोबर राग (आसक्ति) आणि द्वेष हे विकार असणे ह्‌या प्रमाणे प्रवृत्तिमार्गीय माणसाचे जीवन असते. मात्र जो निवृत्ति मार्गी असतो त्याने राग द्वेषादि सर्व भावांवर जय मिळविलेला असतो. त्याच्या वागण्यांत त्या सारखे कांहीं ही नसते।।50।।

अहं कर्ता तथा भोक्ता फलदाता महेश्वरः।।
पुनर्जन्म प्रवृत्तौच निवृत्तौ नेदृशं क्वचित्‌‌।।51।।
अर्थ—— मी कर्ता, मी भोक्ता, फळ देणारा ईश्वर असे प्रवृत्ति मार्गी माणसाचे विचार त्यास पुनर्जन्माची प्राप्ती करवतात आणि निवृत्तिरुप जो साधक असतो त्याचे असे विचार नसतात. ।।51।।

भोगतोयज्ञानवृध्दिश्च भोगेच्छायाविवर्धनम्‌‌।।
अतृप्तिहिं प्रवृत्तिच निवृत्ति नेदृशं क्वचित्‌‌।।52।।
अर्थ—— भोगापासून अज्ञानाची वृध्दि होते. आणि भोग भोगल्याने इच्छा ह्‌या वृध्दिंगत होतात. प्रवृत्ति मार्गाने अतृप्ति प्राप्त होते. मात्र निवृत्ति मार्गामध्ये साधकाला इच्छाच नसतात. भोगेच्छा नसतात. ।।52।।

इच्छाप्राप्तपदार्थानां चिन्ता तद्रक्षणस्य च ।।
प्राप्ततृप्तिः प्रवृत्तौच निवृत्तौ नेदृशं क्वचितं।।53।।
अर्थ—— इच्छा ही अप्राप्त वस्तुंसाठी असते. आणि प्राप्त झालेल्या वस्तुंच्या रक्षणासाठी चिन्ता असते, एकंदर प्रवृत्तिशाली जीवाला तृप्ती हवी असते. ।।53।।

भोगादनन्तरं दुःखं जुगुप्सांशुचिता तथा।।
विषादेर्ष्ये प्रवृत्तौच निवृतौ नेदृशं क्वचित्‌‌।।54।।
अर्थ——तसे निवृत्तीमार्गी साधकास भौतिक सुखप्रदायक वस्तुंची प्राप्ती आणि तत्सम धडपड नसते. ।।54।।

प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च भिन्नमार्गो परस्परौ।।
ब्रह्माज्ञानात्प्रवृत्तिः स्यान्निवृत्तिर्ब्रह्मवेदनात्‌‌।।55।।
अर्थ—— प्रवृत्ति आणि निवृत्ति हे परस्पर भिन्नमार्ग आहेत. ब्रह्मतत्वाच्या अज्ञानामुळे मनुष्य प्रवृत्ति मार्गी होतो. उलट ब्रह्मज्ञानाने त्याला निवृत्ति मार्ग प्रिय वाटतो. ।।55।।

प्रपञचतः प्रवृत्तिः स्यान्निवृत्ति स्तदभावतः।।
कर्मतश्च प्रवृत्तिः स्यान्निवृत्तिः कर्मत्यागतः ।।56।।
अर्थ—— प्रपंचात रस आसक्ति निर्माण झाल्यामुळे माणूस प्रवृत्ति मार्गाचा होतो. निवृत्ति मार्गी हा प्रपंचापासून दूर जातो. कर्मबाहुल्यामुळे (अधिक कर्म प्राप्त झाल्याने) प्रवृत्तिमार्गी होतो. कर्मातील नीरसतेने तो निवृत्तिमार्गी होतो. ।।56।।

कार्याभानात्‌प्रवृत्ति स्यान्निवृत्तिः स्तदभावतः।।
प्रवृत्तिर्बोधयेत्कर्म निवृत्तिर्निष्क्रियात्मताम्‌‌।।57।।
अर्थ—— कार्याचे भान झाल्यामुळे ”मी कर्ता आहे” ह्‌या भावनेचा उदय झाल्यामुळे अहं बुध्दिने तो प्रवृत्ति मार्गी होतो. आणि ती बुध्दि नसते (मी कर्ता आहे ही बुध्दि) तेव्हां तो निवृत्ति मार्गी होतो. ।।57।।

स्वभिन्नं वस्तुभोगो हि कर्मणा फलमीदृशम्‌‌।।
ब्रह्मस्वरुपप्राप्तिस्तु कर्मणा न कदाचन।।58।।
अर्थ—— आपल्यापासून सर्व भोग व आनंद वेगळे आहेत (म्हणजे आनंदप्राप्तीचे स्थान अंतःकरणांत नसून ते बाहेरील भौतक वस्तु—पदार्थांमध्ये आहे.) ही प्रवृत्ति असल्याने कर्माचे फळ प्राप्त होते. परंतु ब्रह्मतत्वच सर्वत्र अंतरबाह्‌य भरलेले असून त्यांतच सुखबुध्दि असणे म्हणजे निवृत्तिमार्ग असून त्या पासून कर्मफलाने लिप्तता होत नाहीं. ।।58।।

स्वान्यस्य हि सम्प्राप्तिः यतः कर्मफलं भवेत्‌‌।।
स्वप्राप्तिः कर्मणा नैव स्पष्टं कस्य नस्यादिदम्‌‌।।59।।
अर्थ—— माझयापासून दूसरे हे वेगळे तत्व आहे आप पर भाव हे वाटणे म्हणजे कर्मफल लिंपिले जाते ते भोगावे लागते. परंतु स्वतःचीच आत्मप्राप्ती झाली म्हणजे दूसरे तिसरे कांहीच न राहता स्पष्टपणे एकच एक तत्व शिल्लक राहते.।।59।।

कार्यान्तर्भूतमेवं हि कर्मणा प्राप्यते यतः।।
कार्यशून्यपरं ब्रह्म कारणं नैव प्राप्यते।।60।।
अर्थ—— कार्य केल्याने तदनन्तरच त्याचे फळ परिणाम हे निर्माण होते. परंतु ज्याच्याकडून निर्लिप्त भावाने फलाशा न ठेवता कार्य हे केवळ कर्तव्यभावाने केल्यास त्यास त्याचे फल चिकटत नाही. ते ब्रह्मभूत होवून त्याचे कारण फल माथी पडत नाहीं. ।।60।।

यदानन्दपरं ब्रह्म जगत्कारणमीदृशम्‌‌।।
तदज्ञानाज्जगत्कार्य तद्विरुद्धं सुदुःखदम्‌‌।।61।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे परमानंदादायक ब्रह्मच जगत्‌ उत्पत्तिचे कारण आहेे, तेंव्हा त्याच्या ज्ञानामुळे जगत्कार्य समजते. त्या उलट त्याच्या अज्ञानाने अतिदुःखाची प्राप्ती होते. ।।61।।

जगदन्तरर्गतं वस्तु कर्मणा प्राप्यते यतः।।
दुःखाय हि भवेत्कर्म सुखाय न कदाचन ।।62।।
अर्थ—— जगतामधील वस्तु ही कर्मामुळेच प्राप्त होते. हे जसे खरे ओ त्या प्रमाणे दुःखासाठीच कर्म होते आणि सुखासाठी तक घडत नाहीं.।।62।।

कर्मणा बध्यते जन्तुर्विद्यया च वियुच्यते।।
तस्मात्कर्म न कुर्वन्ति यतयः पारदर्शिनः।।63।।
अर्थ—— कर्मामुळे प्राणी हा बंधनांत पडतो परंतु ज्ञानप्राप्तीने तो मुक्त होता म्हणून जे परमचिंतक असे यती असतात ते महान्‌ योगी असतात. ते कर्म करीत नाहीं अर्थात सकाम कर्म अहंकारयुक्त होवून करीत नाहीत. ।।63।।

अनिष्टमिष्टं मिश्रञच त्रिविधं कर्मणा फलम्‌‌।।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्‌‌।।64।।
अर्थ—— इष्ट—अनिष्ट आणि मिश्र असे कर्माचे विविध प्रकारचे फळं असतात. ही फळ प्रवृत्ति मार्गीयांना कोठलाच अहं प्रवृत्तिचा त्याग न करण्याने प्राप्त होतात आणि चिकटतात. परंतु सन्यासी लोकांना ती चिकटत नाहींत.

अजीवेशात्मकं ब्रह्म मायाविद्याविशून्यतः।।
नामरुपविशून्यं तत्‌जगच्छून्यमजं ध्रुवम्‌‌।।65।।
अर्थ—— जीवभाव रहित ब्रह्मरुप, माया आणि अवद्यिा या पासून निर्लिप्त नामरुप रहित ते शून्य असे जगत्‌ अनादि व अनन्त नित्य असे आहे. ।।65।।

जगत्सङकल्प शुन्यं तत्पुमान्नैव न प्रकृतिः।।
नापि नारी नरो नैव प्रपञचाभावतः क्वचित्‌‌।।66।।
अर्थ—— संकल्पशून्य जगत्‌‌ म्हणजे त्यांत प्रकृति आणि पुरुष हा विभागच नाहीं न कि तेथे नर नारी हा भेद आहे, ज्या पासून हा प्रपञच निर्मित होतो. ।।66।।

कामादिदोषशून्यं यनिर्विकल्पं निराकुलम्‌‌।।
आनन्दघनमत्यच्चं ब्रह्मैकं प्रविजृम्भते।।67।।
अर्थ—— काम आदि दोषांपासून अलिप्त, अद्वितीय आणि सुखमय आनंदाची अति उच्च सीमाच असे ”ब्रह्म” हेच तत्व एकच एक अत्यंत विशाल आणि असीमरुपाने फैललेले असते, पसरलेले असते.।।67।।

या मा मिथ्येति सा माया मिथ्यायाश्च जनिः कुतः।।
विद्यते या न साविद्या सा कुतोत्रावशिष्यते।।68।।
अर्थ—— ”या मा इति स माया” जी नसतेच (”मा” हे संस्कृतमध्ये निषेधात्मक अव्यय आहे, जी मुळी अस्तित्वातच नाही ती माया) ती माया, मिथ्या खोटी अशी स्थिति तिचा जन्मच तो कोठला ? (विद्यते या न सा इति अविद्या) जी अस्तित्वांतच नाहीं ती येथे कोठून शिल्लक राहणार ? ।।68।।

वन्धया पुत्रकथैवात्र जीवेशादिप्रकल्पना।।
प्रजाया सृष्टिकार्यं तं सर्वंहि वितथं तथा ।।69।।
अर्थ—— वंध्या स्त्रीचा पुत्र कोठला? जीवेश वगैरे ह्‌या कल्पना तद्वतच आहेत. प्रजोत्पत्ति आदि सृष्टिकार्य ही तसेच व्यर्थ आहे. ।।69।।

कार्यात्पूर्वन्न कार्य स्यात्‌ नाधिष्ठानाद्विता ततः।।
अन्ते नैव यतःकार्यं तदेतच्छशशृङगवत्‌‌।।70।।
अर्थ—— कार्याच्या पूर्वी जे कार्य नसेल, ज्याला अधिष्ठान नसेल, आणि अंतिम अवस्थेत जे कार्य शिल्लकच रहात नाही, ते सशाच्या शिंगाप्रमाणे असंभव आहे. ।।70।।

आदावन्ने जगन्नास्ति वर्तमानेपि तत्तथा।।
आदावन्ते वर्तते यत्‌‌ वर्तमानेपि ब्रह्म तत्‌‌।।71।।
अर्थ—— आदि समयी आणि अंतिम समयी जगत्‌‌ रहात नाही. वर्तमानांत सुध्दा ते तसेच आहे. जे आदि अंती आणि वर्तमानांत राहते ते ब्रह्मतत्वच आहे. ।।71।।

सिध्दान्तोध्यात्मशास्त्रााणां सर्वापन्हव एव हि।।
नाविद्यास्तीह नो माया सर्व ब्रह्मेदमक्लवम्‌‌।।72।।
अर्थ—— अध्यात्म शास्त्राचा सिध्दान्त हाच आहे की जे कांही सर्व सत्य आहे, ते आवृत्त म्हणजे झाकलेलेच राहते. मायेने वेष्टित होते. येथे अवद्यिा पण नसते आणि माया पण नसते. सर्व काहीं ब्रह्मच निष्कलंक असते. ।।72।।

अतद्वयावृत्तिरुपेण नेति नेतीतिवाक्यतः।।
बुधौर्निरस्यते सर्वं ब्रह्मैकं प्रविलक्ष्यते।।73।।
अर्थ—— बुध म्हणजे पण्डित लोकांकडून ते ब्रह्मतत्व ”नेति न, इति” असे हे नाही—हे नाही असे म्हणून अद्वय आवृत्ति रुपाने ते दूसरे तत्व निरस्त केले जाते. जे कांही ब्रह्मच आहे. (सर्वं खलु इदं ब्रह्मम !) असे सिध्द केले जाते. ।।73।।

सर्वं हि खल्विदं ब्रह्म नेंह नानास्ति किञच न ।।
सच्चिदानंदब्रह्मैव सर्वन्नैवं समीक्षते।।74।।
अर्थ—— ”सर्वं हि खलु इदं ब्रह्म”, हे सर्वच खरे म्हणजे ब्रह्मतत्वाधिष्ठित आहे आणि विविध वेगळे असे कांहीही नाही. सत्‌ चित्‌‌ आनंदमय ब्रह्मच सर्वत्र विराजित आहे. ।।74।।

व्यतिरेकेण यद्वत्स्यानदन्वये नापि तत्तथा।।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेंह नानास्ति किञच न ।।75।।
अर्थ—— व्यतिरेक निषेधात्मक पद्यति नेति—नेति अश्या रीतिने जे असते, ते व्यतिरेक (हे असे—हे असे) अश्या रीतिने ब्रह्मतत्वाचे वर्णन सांगता येत नाहीं. ते एकमेव अद्वितीय ब्रह्म असल्याने त्याचा सारखे काहींच नाही. ते अनुपमेय आहे. ।।75।।

प्रपञसत्यभानेन तत्यागे दोष ईक्ष्यते।।
प्रपञचभावतः कस्य तत्यागे दोष सम्भवः।।76।।
अर्थ—— प्रपंच हेच सत्य आहे, असे समजणार्‌यासच त्याचा त्याग करणे ह्‌यांत दोष संभवतो पण ज्याला प्रपंच हा असत्यच आहे, असे वाटते त्यास कसला त्याग आणि कसला दोष? सन्यासी भावनेने सारे जगच मिथ्या आहे, त्यांत तंना कसला त्याग आणि कसला दोष ?।।76।।

शिवःक्षरति लोकान्वै विष्णुः पाति जगत्रयम्‌‌।।
ब्रह्मा सृजति लोकान्वै एवमादिक्रियादिकम्‌‌।।77।।
अर्थ—— शिव हा या लोकाचा (जगाचा) अन्त करतो. विष्णु हा पालनकर्ता आहे. आणि ब्रह्मा हा सृजनकर्ता आहे. ह्‌या प्रमाणे आदि क्रिया मानली जाते. ।।77।।

यद्यदस्ति पुराणेषु यद्यद्वे द्वेषु निर्णयम्‌‌।।
सर्वोपनिषदां भावं सर्वं शशबिषाणवत्‌‌।।78।।
अर्थ—— जे—जे पुराणांत आहे, ते—ते विद्वानांचे म्हणणे आहे, उपनिषदांतही हाच भाव आणि निर्णय आहे. की सर्व जगत हे शशशृगवत (जे असंभव असे सश्याच्या शिंगाप्रमाणे) असे आहे व्यर्थ आहे. ।।78।।

नित्यानंदमयं ब्रह्म केवलं सर्वदा स्वयम्‌‌।।
अनन्तमव्ययं शान्तमेकरुपमनामयम्‌‌।।79।।
अर्थ—— नित्य सदा आनंदमय ब्रह्म हे स्वतःच स्वयं प्रकाशी असून अनन्त आणि अखण्डरुपात्मक, शान्त, एकतत्वरुपाने आणि नाम रुपाविरहित असे आहे. ।।79।।

वन्ध्याकुमारवचने भतिश्चेदस्ति किञच न ।।
सशशृङगेण नागेन्द्रो मृतश्चेज्जगदस्ति तत्‌‌।।80।।
अर्थ—— वंध्य स्त्रीच्या मुलाच्या वचनांनी कांही कोठे कुणाला भयभीत व्हावे लागते का? (ते अशक्यच आह)े आणि सश्याच्या शिंगानी नागांचा महाराजा सर्प मारला गेला, हे जसे असंभव आहे, तद्वतच हे जग पण मिथ्या आहे. ।।80।।

मृगतृष्णाजं पीतवा वृप्तश्चेदस्त्विदंजगत्‌‌।।
नरशृङगेण नष्टश्चेत्कश्चिदंस्त्विदमेव हि।।81।।
अर्थ—— मृगजळांतील पाणी पिऊन हे जग तृप्त झाले असे जर म्हटले तर, माणसाच्या शिंगाने हे जगत नष्ट होईल, असे म्हणण्यासारखे व्यर्थ आहे. ।।81।।

गगने नीलिमा सत्यं जगत्सत्यं भविष्यति।।
शुक्तिका रजतं सत्यं भूषणं चेष्ज्जगद्‌भवेत।।82।।
अर्थ—— गगन म्हणजे आकाश , हे खरेच नीळे आहे, असे म्हटले तर हे सारे जग पण सत्यच आहे, असे म्हटले जाईल. आणि शिंपले हे खरचच चांदीचे आहे, असे म्हटले तर हे जगत्‌ पण एक आभूषणच होईल. ।।82।।

रज्जुसर्पेण दष्टश्चेन्नरो भवतु ससृतिः।।
चित्रस्थदीपैस्तमसो नाशश्चेदस्त्विदं जगत्‌‌ ।।83।।
अर्थ—— रज्जु म्हणजे दोरी आणि तिलाच सर्व मानून बसला (कोण एक अज्ञानी आणि त्या सर्पाच्या दशाने एक मनुष्य मेला आणि त्याला सत्‌गति मिळाली हे म्हणणे जसे अशक्य व कल्पित वाटते त्या प्रमाणे चित्रामधील दिव्याच्या उजेडाने खरोखरच अंधार केला असे म्हणणे सुध्दा जसे अशक्य आणि व्यर्थच बालिशपणाचे वेडेपणाचे आहे, तद्वच हे जग खरेच आहे असे म्हणणे होईल. (अर्थात पण्डितांचे मत हे जग म्हणजे सुध्दा स्वप्नवत्‌ असत्यच आहे, हे तात्पर्य.) ।।83।।

सर्व हि खल्विदं ब्रह्म तज्जलानीर्ति नित्यशः।।
सत्वा शान्तमुपासीत श्रुत समुपंदिश्यते।।84।।
अर्थ—— खरे तर सर्वच (हे चराचर जगत्‌) हे ब्रह्म आहे. (सर्वं खलु इदं ब्रह्म) असे दृष्टिने पाहून त्याप्रमाणे शांतपणे त्या ब्रह्म तत्वाची उपासना करावी, असे आमचे श्रुति वेदशास्त्र सांगते. ।।84।।

यत्तदद्रेश्यमग्राह्यमगोत्रं सर्वतोमुखम्‌‌।।
परिपश्यन्ति धीरा ये भूतयोनिं तदव्ययेम्‌‌।।85।।
अर्थ——जे जे सर्वत्र अग्राह्‌य अगोत्र म्हणजे ज्याचे ज्याचे आम्हास ज्ञान नाही ते सुध्दा सर्व चराचर जगत हे ब्रह्मतत्वाचेच अविनाशी रुप आहे, असे पण्डित ज्ञानी लोक मानतात. ।ं।85।।

लोकान्कर्मचितानेवं परीक्ष्य ब्राह्मण स्वयम्‌‌।।
आयान्निर्वेदपत्यन्त नास्त्यकृतः कृतेन यत्‌‌।।86।।
अर्थ—— अश्यातर्‌हेने कर्म करणार्‌यांचे परीक्षण करुन ब्रह्मदेव जो स्वतःच वैराग्याचा अधिपति आहे, त्यांस कर्मफलाने लिप्त होवू देत नाही. (जरी त्यांनी कर्मे केलीत तरी.) ।।86।।

पराञिच खानि व्यतृणत्स्यंभूस्तस्मात्पराङपश्चयति नान्तरात्मन्‌‌।।
कश्चिद्धीरः प्रत्यगात्मानमैक्षदावृत्‌‌चक्षुरमृतत्वमिच्छन्‌‌ ।।87।।
अर्थ—— ह्‌या उलट तत्वाचे जे लोक असतात (कीं जे सर्वत्र एकच ब्रह्मरुप तत्व भरलेले आहे, असे मानत नाहीत.) ते स्वतःला आणि दूसर्‌याला खूप वेगळेपणाने समजतात. त्यांस आपल्या अंतरतत्वाप्रमाणे मानीत नाहीत. कोणी धीरपुरषच परमात्मतत्वाला आपल्या नयनांभेावतीच वेष्टित असा समजतो. (म्हणजे सर्वत्र ब्रह्मतत्व भरलेले त्याला दिसते.)।।87।।

पराचःकामाननुयन्ति बालास्ते मृत्येोयन्ति विततस्यच पाशम्‌‌।।
अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्र्रुवमध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते ।।88।।
अर्थ—— प्रतिकूल प्रवृत्तिचे कामनांची इच्छा करणारे व त्यानुरुप चालणारे बालबुध्दिचे लोक मृत्युच्या विशाल दीघ्र पाशास बांधले जातात आणि धीर अर्थात्‌ज्ञानी अमृतत्वास जाणून निश्चित अनिश्चित असे ह्‌या भौतिक जगांत इच्छित नाहीं. ।।88।।

पाशबद्धः स्मृतो जीवः पाशमुक्तः सनातनः ।।
तुषेण बद्धो व्रीहिस्यातुषा भावेनःतण्डुलः।।89।।
अर्थ—— पाशबध्द जो असतो तो जीव म्हटला जातो आणि पाशमुक्त जो असतो त्याला सनातन म्हटले जाते. कोड्‌यांने वेष्टित तसे तांदूळाचे अन्न (रुप) साळ, त्यास ”ब्रीहि” असे म्हणतात. आणि कोंडा काढून टाकल्यावर साळीच्या वरचे तांदूळाचे कडक टरफल भुरकट रंगाचे जे असतात, त्यास तांदूळ असे म्हणतात. ।।89।।

ध्यायन्नास्ते मुनिश्चैवमासुप्तेशमृतेस्तुयः।।
जीवन्मुक्तः स विज्ञेयः स धन्यः कृतकृत्यवान्‌‌।।90।।
अर्थ—— जो साधक मुनी सतत ध्यान करीत रात्रंदिवस झोप येईपर्यंत ईशतत्वाचेच ध्यान करतो, सत्य, मंगल ह्‌या विषयीच ध्यान करतो, तोच धन्य समजावा, तोच कृतकृत्य आणि जीवन्मुक्त झाला असे आहे. ।।90।।

जीवन्मुक्तपदं त्यक्त्वा स्वदेहे कालात्कृते।।
विशत्यदेशमुक्तत्व पवनो स्पन्दताविव।।91।।
अर्थ———जीवनमुक्त पदाचा त्याग करुन, आपला देह कालवश झाल्यावर तो मुनि कोठल्याही सीमे मध्ये न राहता अदेशत्वं म्हणजे कुठलेच स्थान सीमित न राहता, तो वायुप्रमाणे सर्वत्र फैलत प्रसारित होतो. ।।91।।

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्‌‌।।
ब्रह्मचर्यभहिंसा च शारीरं तप उच्यते।।92।।
अर्थ—— देव, ब्राह्मण,गुरु आणि विद्वान ह्‌यांचे पूजन, पावियिं, सरलता हे ”शारीर तप” असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे पण ”शारीर तप” असे म्हटले जाते. ।।92।।

अनुद्वगकरं वाक्यं सत्यं प्रियहिततञच यत्‌‌।।
स्वाध्यायाम्यसनं चैव वाङमयं तप उच्यते।।93।।
अर्थ—— उद्वेग न उत्पन्न करणारे सत्य आणि हितकारके प्रिय वाटणारे असे वाक्य बोलणे, सतत अध्ययनरत राहून स्वाध्याय करुन राहणे हे वाङमय तप आहे. ।।93।।

मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।।
भावसंशुद्धिरित्येतत्‌‌पो मानसमुच्यते।।94।।
अर्थ—— मन हे प्रसन्न ठेवणे, सौम्य भाषा बोलणे, मौन धारण करणे, आत्मनियंत्रण करणे, हे भाव जे असतात्‌ (विचार तरंग) त्यांस शुध्द ठेवणे ह्‌यास मानस तप असे म्हणतात. ।।94।।

विविधंपत इदं नित्य जीवनञच मुमुक्षुणाम्‌‌।।
अनेनैव मुमुक्षुस्यात्साधको मान्य इत्यपि ।।95।।
अर्थ—— असे नानाविध तप हेच मुमुक्षु साधकांचे तपस्वी जीवन आहे. ह्‌यामुळेच मुमुक्षु मोक्षाची इच्छा करणार्‌याचे जीवन साधक म्हणून म्हटले गेले आहे. ।।95।।

स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा गुरुतोषणात्‌‌।।
सधनं प्रभवेत्पुंसां वैराग्यादि चतुष्टयम्‌‌।।96।।
अर्थ—— आपल्या वर्णाश्रमाच्या धर्माचे पालन करुन, तपाने गुरुचे संतुष्टीकरण करुन ”वैराग्य चतुष्टर्य” हे साधन साध्य केले जाते. ।।96।।

परमात्मन एवायं मोक्षधर्मप्रसूरितः।।
सर्वप्रथममे वातो गुरुमार्गादिमस्तु सः।।97।।
अर्थ—— परमात्म्या कडे जाणारा हा मोक्ष मार्ग आणि त्याचा प्रवाह हा प्रथम गुरुराजांकडे जाणारा मार्ग आहे. ।।97।।

गुरुरेव हरिः साक्षान्नान्य इत्यब्रवीत्‌‌ श्रृतिः।।
तद्‌भक्त्यापि च मुक्तिःस्यात्कृता चेद्‌गुरुभावतः ।।98।।
अर्थ——श्रुति अर्थात वेदांनी हेच सांगीतले आहे कीं गुरु हेच साक्षात हरि म्हणजे परमेश्वर आहेत. दूसरे कोणी नाहीं. त्यांची गुरुची भक्ति केल्यानेच मुक्ति मिळते आणि ती गुरुभावनाने भक्ति केली पाहिजे.।।98।।

योमामजमनादिञच वेति लोक महेश्वरम्‌‌।।
असम्मूढ स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुचयते।।99।।
अर्थ—— जो मला अनादि, अजन्मा असा लोक महेश्वर म्हणून जाणतो, तो असंमूढ अर्थात्‌दृढ बुध्दि असलेला मूढबुध्दि ज्याची नाही असा, साधक ह्‌या मर्त्य लोकांमध्ये सर्व पापांपासून मुक्त होतो. ।।99।।

इत्यत्रापीशभक्तितस्तु ब्रह्मरुपेण बोधिता।।
ब्रह्मरुपेणेंशभक्तिः कार्यतो वा मुमुमुक्षुभिः।।100।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे येथे ईशबुध्दि ही ब्रह्मरुपाने स्पष्ट केली आहे ब्रह्मरुपाने ईशभक्ति कार्यरुपाने मुमुक्षु साधका कडून झाली पाहिजे. ।।100।।

नित्यानित्यविवेकोयमिहा मुत्र विरागता।।
शमादिषट्‌‌कसम्पत्तिः मुमुक्षुत्वं हि साधनम्‌‌।।101।।
अर्थ—— नित्य आणि नित्य ह्‌‌यातिल विवेक, आसक्ति रहित राहणे आणि शम दमादि षट्‌‌सम्पत्ति हीच मुमुक्षुसाधकाची साधने आहेत, असे येथे सांगितले आहे. षट्‌‌सम्पत्ति—(1)शम—इंदियनिग्रह (2)दम—मनोनिग्रह (3) तितिक्षा— सहनशील (4) उपरति—संसारात रस नसणे (5) श्रध्दा—गुरुशास्त्र (6.) शान्ति—शंकानिवृत्ति. ह्‌या विषयी पूज्यभाव असला पाहिजे. ।।101 ।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे सृष्टिस्वरुपं नाम द्वादशं प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img