Literature

सेवकधर्म

-जो आपुलें हित न करी । तो आपुला आपण वैरी ।येथे कांहीं कोणावरी । शब्द नाहीं ॥ ४ ॥ श्रेष्ठांचे मनोगत राखेना । बळेच करी वल्गना । युक्ति प्रयुक्ति नाना प्रकारें करी ॥ ५ ॥ श्रेष्ठांचे केलें मोडावें । आपुलेंचि पुढें प्रतिष्ठावें । तरी मग लागे भ्रष्टावें । वैभबा पासूनी ॥ ६ ॥ पुढे पुढे काम करी । मागें कांहींच न करी । कार्यातें नासतां उरी । नाहींच पुढे ॥ ७ ॥ कार्य करितां कांहीं न मागे । तयाची चिंता प्रभूस या । ऐसें जाणूनि विवेक जागे । म्हणिजे बरें ॥ १२ ॥ स्वामींनीं जें जें बोलावें । तेंचि सेवकी प्रतिष्ठावें  वेळ चुकवूनि बोलावें । विनीत होवोनी ॥१४॥ कळेल तरी सांगों नये । वडिलाशी बुद्धि शिकवों नये । नेणपणेचि उपाये। विवेकीं करावा ॥ १६ ।। पुढें पुढें करूं नये । आज्ञेवेगळे बतों नये । (आज्ञा ) न मानितां अपाये । नेमस्त आहे ॥ १७ ॥ मी करतों ऐसें पुसणें । तें पुसणे न पुसणें । करूं न करूं हें विचारणें । हें उत्तमोत्तम ॥ १८ ॥ ज्याकरितां प्राणी वाढले । त्यासीच आडवूं लागले। ते कैसे म्हणावे भले । नीतिवंत ॥ २५ ॥ सेवक तोचि अडेना । शब्द भुईस पाडेना काम चुकलें घडेना । कदाकाळीं ॥ २८॥ अपस्वार्य उदंड करणें । आणि स्वामीकार्य बुडावणें । ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । सेवकाचीं ॥ २९ ॥ सेवक विश्वास दाविती । वैरियाकडे मिळोनि जाती । त्या चांडाळासी गति । कोठेंचि नाहीं ॥ ३८ ॥ प्रत्येकानेंच मनन करण्यासारख्या या ओव्या आहेत. प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा चाकर असतोच. आईबाप गुरुदेव यांचे तर सर्वजणच चाकर आहेत. या ओल्या नीट लक्षांत ठेऊन न चुकतां वागणें हें रामराज्यांतल्या लोकांचा सहज स्वभाव होतो.

सेवकधर्माच्या दुसऱ्या समासाच्याहि कांही ओव्या बधूं. किती चुकती चांचू घेती । पदरीं घालितां न घेती। अन्याय करूनि म्हणती । अन्याय नाहीं  ३ उदंड हांसती दुसऱ्यासी । तोचि गुण आपणापाशीं । अखंड वर्णिती आपणासी । समयदेखतां ॥४॥ आपणावेगळे कार्य न व्हावें । अवर्षे आपणाचे असावें । आपलें केलें न मोडावें । ऐशी वासना ॥ ६ ॥ व्याप आटोप करावा समर्थ वेळेस आडवावा । आपुला हेका वाढवावा । अत्यादरें ७ स्वयें आपणासी कळेना । समय सांगितलें ऐकेना सत्य असेल तरी मानेना । अभिमानें ॥ ८ ॥ आज्ञेप्रमाणे असतां । बहुत दुःख वाटे चित्ता। आपुले इच्छेनें वर्ततां । बरें वाटे ॥ आपुले अवगुण लपत्री  श्रेष्ठापुढे जाणीव दावी । धीटपणेंचि दटावी कोणीएकासी ॥१३॥ काम सांगतांचि अडे । मिष करूनि वेळेसी दडे । कुकर्मी आदरें पवाडे । नाना यलें ॥ १४ ॥ मजवेगळें काम न चाले । ऐसें मार्गे पुढें बोले । कित्येक लोकाच ते फोडिले । आपणाकडे ॥ १९ ॥ समर्थासी कांहीं कळेना । मी सांगतों ऐकेना। शहाणपण दाखवी जना । नाना प्रकारें ॥ २०॥ समर्थाशी सांडूनि जे कां जन । सेवकाकडे लाविती मन । ते जाणावे परम हीन । नीच काठींचे ॥ २६ ॥ कामाकारणें ठेविले । काम पाहूनि वाढविले  तेहि उगेच गर्वे फुगले । कोण्या हिशोबें ॥ २९ ॥ या कारणें बदलीत जाणे । सेवक आज्ञेच्या गुणें । तरीच समर्थपण जाणें समर्थासी ॥३०॥ काम नासले तरी नासावें । परी सेवकाधीन न व्हावें । दास म्हणे स्वभावें । बोलिलों न्याय ॥ ३१ ॥

या ओव्या वाचतांना कित्येकांना दुसऱ्या कोणाचें चित्र डोळ्यापुढे उभें राहिल्यास कित्येकांना आपलेंच चित्र डोळ्यापुढे येईल. सर्व समाजच सुधारल्यास अशा प्रकारचे कोणतेंच उदाहरण डोळ्यापुढे उभे राहाणार नाहीं.. नेत्यांनी लक्षांत बाळगण्यासारख्या ओव्या कांहीं उद्धृत करतो. प्रकरणाच्या या ओव्या आहेत. सावधता सावधता-धुरेनें धीर सोडूं नये । मुख्य प्रसंग चुकों नये । उद्योगरहित कामा नये । पशु जैसे ॥ जेथें बद्ध विचार । तेथें ईश्वर अवतार मागें झाले थोर थोर । धके चपेटे सोसोनी ॥ आपल्या मनासी रोधावें । परांतर शोधावें । क्षणक्षणा सांभाळावें । बदलेल म्हणोनी । इशारतीचे बोलतां नये । बोलावयाचें लिहूं नये । लिहावयाचे सांगूं नये । जबानीने  १२ अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें । तजबिजा करीत बसावें । एकांत स्थळीं ॥ कांहीं उग्रस्थिति सांडावी। कांही सौम्यता धरावी। चिंता लागावी परात्री । अंतर्यामीं ॥ राजी राखतां जग । मग कार्यभागाची लगबग । ऐसें जाणोनिया सांग  समाधान राखावें ॥

आम्ही आतांपर्यंत श्रीरामांनी स्वतः सांगितलेल्या व आपल्या दासांकडून वदविलेल्या उपदेशाचे कांहीं चुटके वाचले ते अमृताचे घुटकेच आहेत. आधुनिक भारताच्या राज्यपध्दतीला रामराज्य म्हणून गौरवास्पद नांव दिलेलें आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचें आदर्श आचरण आणि त्याची सर्वांनाहि हितकर असलेली वचनें भारतवासियांपुढे सदैव असली पाहिजेत. हा एक आचरणाचा श्रेष्ठ दर्जा म्हणून सर्वांच्या मनांत चिंबले पाहिजे. सान्या अनर्थ परंपरेला कारण काय म्हणून विचारलें असतां तत्त्वविचाराचा आणि तात्त्विक व सात्विक आचरणाचा अभाव हें एकच एक कारण सांगतां येईल. स्वार्थामुळे निर्माण होणाऱ्या सर्व अनर्थपरंपरेचा त्याग करून भारतीय लोक सर्व सद्गुणांनी युक्त असे अखिल मानवजातीलाहि अनुकरणीय आदर्श होऊन राहिले पाहिजेत. यासाठींच श्रीरामाच्या तत्त्वविचाराचे आणि त्याच्या सात्विक आचरणाचें परिशीलन आपण येथें करीत आहोत.

home-last-sec-img