Literature

स्त्रियांसंबंधी शास्त्रकारांचे मत

— स्त्रिया विद्युताप्रमाणे आहेत. त्या थोड्या उघड्या पडल्या की घातुक होतात. निर्बंधनांनीच त्या अधिक लोकोपकारक ठरतात.

पुस्तकं वनिता वित्तं परहस्ते गतं गतं । यदि चेत्पुनरायाति नष्टं भ्रष्टं च खण्डितम् ॥

पुस्तक, वनिता, वित्त दुसऱ्याच्या हाती गेलेलें तशाच शुद्ध स्थितीत परत येणें दुरापास्तच. म्हणून परोपरीने स्त्रीचे रक्षण करावे लागते.

केवळ कल्पना भाषण-दर्शन-स्पर्शानें, दोन स्त्री-पुरुषांत केव्हां कामोत्पत्ति होईल हे सांगतां येत नाहीं. जगांत जोपर्यंत स्त्रीजात भोग्य आहे, हीच एक शिल्लक असते तोपर्यंत तिचे रक्षण कुठेहि करीत रहावेंच लागतें.

स्वां प्रसूर्ति चरित्रं च कुलमात्मानमेव च । स्वं च धर्मे प्रयत्नेन जायां रक्षन्हि रक्षति || ( मनु. ७ )

—पत्नीच्या एका रक्षणानें शुद्ध संतति-निर्माणद्वारां संततीचे, उचल पवित्र जीवनाचें, स्त्रकुलाचें, आपलें, आपल्या स्वत्वाचे, धर्माचें व कर्तव्य कर्माचेहि रक्षण होते.

सूक्ष्मेभ्योऽपि प्रसंगेभ्यो स्त्रियो रक्ष्या विशेषतः । द्वयोर्हि कुलयोः शोकमावहेयुररक्षिताः ।। (मनु. ९५ )

– कुसंग व दुःशील यांचा अल्पसा संबंधहि होऊं नये म्हणून बाल्या पासूनच स्त्रियांचे रक्षण करावें. मनेयमस्तु पोष्या। ( अथर्व. १४/१९५२) – पतीकडून पोसली जाणारी सती होय. पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षा यौवने । रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यमर्हति || (मनु. ९३) — कौमार्यांत पिता, तारुण्यांत भर्ता, वृद्धाप्यांत पुत्र स्त्रीचे रक्षण करतात. स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाहीं. घरची मालकीण घरींच असावयाला पाहिजे. गृहिणी गृहमुच्यते । अर्थस्य संग्रहे चैनां व्यये चैव नियोजयेत् । शौचे धर्मेऽन्नपक्त्यां च पारिणाह्यस्य वेक्षणे ॥ ( मनु. ९ । ११ ) धनधान्यांचा संग्रह, विनियोग, धान्यादि निवडणें, घर शुद्ध ठेवणें म्हणजे झाडलोट, सडासंमार्जन, सारवणें, रांगोळी काढणे इत्यादि गृहकृत्य, स्नानपानास पाणी आणणें, धर्मकार्यार्थ सहकारी होणें, स्वयंपाक करणें, बाढणें, दळणे, कांडणें, शिशुसंगोपन करणें, घरांत काय आहे नाहीं पाहणें, असलेल्या धनधान्याचे भांड्याकुंड्यांचे रक्षण करून नसलेल्या पदार्थाची पतीला आगाऊ सूचना देणें इत्यादि गृहकार्यांत गृहिणीची योजना करावी. चूलमूल सांभाळू आपली उन्नती करून घेण्याकरितांच स्त्रियांची उत्पत्ति आहे. परमात्म्याने गृहाच्या संततीच्या रक्षणार्थच त्याला पाहिजे ते देहस्वभाव त्यांच्यांत निर्माण करून बियांना निर्माण केले आहे. “ हे ईश्वराचें केलें जग । अन्यथा नव्हे ॥ ” प्रत्येक प्राणिपदार्थांची जी उत्पत्ति झाली आहे ती भिन्न भिन्न गुणांची आहे. तो त्यांचा देहस्वभाव असतो. जीवनांत कृत्रिमता आणि स्वभाव

असे दोन प्रकार आहेत. यांत स्वभावो मूर्ध्नि वर्तते । स्वभावत टिकाऊ आणि स्वपरहितकारक असतो. स्वभावमन्यथाकतु कः शक्तो देवनिर्मितम् । निसर्गाचे नियम कोण बरे वेगळे करू शकेल ! कृत्रिम टिकाऊ नसते व ती परिणामी हितकारकहि होत नाही. क्षेत्रभूता मवेशारी बीजभूतः स्मृतः पुमान् । क्षेत्रबीजसमायोगात्संभवः सर्वप्राणिनाम् ॥ (मनु.) बीजप्रद पिता आहे आणि ही त्याचे अतिबाहेर संगोपन करणारी श्री क्षेत्रभूता आहे. गर्भवारण झाल्यानंतर नवमास गर्भधारण व स्वअन्नरसांनी पिंडाचे पोषण करते. नवमताच्या दयाळु हृदयाला हे स्त्रियांचे दुःख पाहणे शक्य न झाल्यामुळे यांत फरक करून, ते आजपर्यंत स्त्रियांना झालें आतां पुढे से पुरुषांना यावे म्हणून समत्वाच्या दृष्टीने विचार करून बर्तवूं लागले, तर जसे त्यांना शक्य नाही, तसेच इतर शिशुसंगोपनादिक गृहकृत्यादिक पुरुषांना देऊन द्रव्योपार्जन, रक्षणादि बाहेरची कृत्ये स्त्रियांना दिली, तर ते तितकेंच साध्य होणें शक्य नाही. त्यांच्यांत लिंगभेद, देहभेद, स्वभावभेद, कार्यभेद, कर्तव्यमेद आहे. भिन्न भिन्न कार्यक्षमता आहे. भिन्न हेतूनेच त्यांची उत्पत्ति आहे. “ नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव एकाच परी देहस्वभाव | वेगळाले । (दासबोध. १७ । २ । २०.) बालकास वाढवी जननी । हें तो नव्हे पुरुषाचेनी उपाधी वाटे जयाचेनि । ते हे वनिता ॥ २६ ॥ नाही कंटाळा नाहीं । आलस्य नाही त्रास नाही । इतुकी माया कोटोंचे नाहीं। मातेवेगळी ॥ २७ ॥ नाना उपाधी वाढवू जाणे । नाना मायेनें गोवू जाणे । नाना प्रीति लावू जाणे । नाना प्रपंचाची ||२८|| पुरुषास खींचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष परस्परें वासनेस बांबोन टाकलें ॥ २९ ॥ मुळी सूक्ष्म निर्माण झालें । पुढें स्पष्ट दिसोनि आलें । उत्पत्तीचे कार्य चाले । उमायतकर्ता ॥ ३२ ॥ मुळी शिवशक्ती खरें । पुढे झाली वधुबरें । चौन्यांशी लक्ष विस्तारें। विस्तारली जे ||३३||

पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोऽटनम् । स्वप्नोऽन्यगेहवासश्च नारीसंदूषणानि षट् (मनु. ९।१३) ( १ ) मांसादि उन्मत्त अन्नाचे व मयादि उत्तेजक (पेयाचें ) द्रव्याचे खानपान; (२) दुर्जन ‘विषयी जनां ‘चा संसर्गः जवळच्या नात्याची मंडळी सोडून तसेच, महात्मे सोडून इतर कोणत्याहि परपुरुषाबरोबर वास; (३) पतीचा विरह; (४) इकडे तिकडे फिरणें ; (स्वतंत्रपणे एकटीने कुठे तरी जाणें ); (५) अकाली झोपणे; (६) व परगृहवास हे सहा प्रकार स्त्रियांच्या ठिकाणी व्यभिचार-दोष निर्माण करणारे आहेत. व्यवहारावरून परिणाम ताडावा या न्यायाने हे सहाहि आता समाजांत दिसून येतात. याचा परिणाम काय झाला आहे तो समाजाने व सरकारने विचार करून पाहावा. ‘प्रत्यक्षाला प्रमाण कशाला’! ये दृष्टार्थास्ते तत्प्रमाणम् । ये त्वदृष्टार्थास्तेषु वैदिकशब्दानुमानम् । जे प्रत्यक्ष आहे त्याला प्रत्यक्षच प्रमाण जें दृष्टिगोचर नाही, त्याला मात्र वैदिक प्रमाण अनुमान प्रमाण आहे. कामनाम्ना किरातेन विकीर्णा मुग्धचेतसःनाय नरविहङ्गानामङ्गबंधनवागुराः ॥ ( याज्ञ. उ. ११). जन्मपल्वलमत्स्यानां चित्तकर्दमचारिणाम् । पुंसां दुर्वासनारज्जुनरी बडिशपिण्डिका || १२ ॥ एक. जीवन्मुक्त सोडून सामान्यतः सर्व बाकीच्या नरपक्ष्यांना आपल्या आहारी पाडावे म्हणून नारी नांवाचे जाल काम नांवाच्या पारध्याने जीवन भूमीवर पसरून ठेवले आहे. जन्मजळाशयांत वावरणाऱ्या, चित्तकमांतल्या नरमीनांना आपल्या आहारी पाडण्याकरितां दुर्वासनेच्या दोरीला नारी नांवाचे आंमिष बांधून काम कोळी वाट पाहात असतो असे जे वर्णन केले आहे त्यांत तथ्य आहे. या कलियुगांत तर पापप्रवर्तक दुष्ट शक्तींचा फारच सुळसुळाट असतो. हे विघ्नसंतोषी कुठे संधी मिळते म्हणून वाट पाहात असतात. कलियुगांत तर दुष्ट प्रवृत्ति अधिक म्हणून सांगितलेहि आहे. अशा वेळी सांथीच्या दिवसांत आपले रक्षण केल्याप्रमाणे अधिक नियम पाळून या दिवसांत राहावयाला पाहिजे की नाहीं प्रौढविवाह, सहशिक्षण, विवाह स्वातंत्र्य, घटस्फोट, पुनर्विवाह इत्यादि कायद्यांनी व शाळा, विश्वविद्यालये, वसतिगृहें, कचेऱ्या, न्यायालये यांतल्या साहचर्यानें कलियुगीन वातावरणाला आतां तर आधींच पेटलेल्या अग्नीत तूप ओतल्याप्रमाणे झाले आहे. गौडी माध्वी तथा पैष्टी विज्ञेया विविधा सुरा। चतुर्थी स्त्री सुरा प्रोक्ता ययेदं मोहितं जगत् || ( अवधूत गीता ) गोडी, माध्वी आणि पैष्टी असे दारूचे तीन प्रकार आहेत. चौथ्या प्रकारची दारू म्हणजेच प्रमदा या दारूचे इतर दारूशीं बैलक्षण्य असलेलेहि शास्त्रकारांनी उलगडून सांगितले आहे. प्रमदा दृष्ट्वा च माद्यति सुरां पीत्वा च माद्यति। प्रमदा-या नांवानेंच या दारूची निशा फार मोठी आहे असे वाटते. प्याल्याने इतर दारू चढते, पण प्रमदा नांवाची दारू, हिला नुसते पाहिल्यानेच चढते. ‘माद्यति प्रमदां दृष्ट्वा सुरां पीत्वा च माद्यति । तस्माद्दष्टिविषां नारीं दूरतः परिवर्जयेत् ।। (नारद प. उ. ६/३१)

दृष्टिक्षेपानें अथवा केवळ दर्शनानेंच आपले विष मिनविणारी जालिम विषाची एकादी सपोची जात असल्याप्रमाणें ही स्त्री जात असल्यामुळे दृष्टि विषा नारीच्या सहवासापासून, दर्शनापासून, स्पर्शनापासून, समाजापासून दूर राहावे असे त्रिकालज्ञ शास्त्रकारांनी निक्षून सांगितले आहे. ही गोष्ट डावलून जातां येत नाही. समाजशास्त्रज्ञांनी नेत्यांनी कुटुंबियांनी तरुण मुलांमुलींनी याचा विचार करावा. आपल्या दर्शन-श्रवणाच्या अनुभवाने याचे सत्यत्व आज तरी ठरविणें समाजाच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत आत्यावश्यक आहे. धर्माची, नीतीची, मनोभूर्माची, ऐहिक-पारलौकिक स्थितीची तर गोष्ट राहूंदयाच, पण या साहचार्यानें तरुण पिढीच्या प्रकृतीवर विलक्षण परिणाम होत आहे. आरोग्याच्या दृष्टीनें, भावी पिढीच्या दृष्टीने तरी सर्वांनाच याचा विचार आतां आवश्यक भासू लागला आहे.

स्त्री पुरुषांचे देह आणि मनोधर्म वेगवेगळे आहेत. याच दृष्टीने स्त्रियांना घरची व पुरुषांना बाहेरची व्यवस्था शास्त्रकारांनी वाटून दिली आहे. नवरा बायको दोघेहि नोकरीवर असतांना या नवरा-बायकोची एकाच गांवांत अथवा एक-दोन मैलांच्या अंतरावरच्या गांवांत जवळ जवळ नेमणूक न होतां यांच्या नेमणुकीने पांच पांच सहा सहा वर्षे नुसती भेटहि न झालेल्यांची उदाहरणे आहेत. रजा मिळत नाहीं, सुट्टीच्या दिवसांत गरिबमुळे तितक्या दुरून येणें होत नाहीं. स्त्रीशिक्षणाला व स्त्री कार्यक्षमतेला उत्तेजन यावे म्हणून पुरुषा पेक्षां स्त्रियांच्याच नेमणुका सर्व खात्यांतून हि अलीकडे अधिक दिसून येत आहेत. याचा परिणाम कित्येक पुरुष निरुद्योगी होऊन घरीं राहण्यांत होत आहे. असेंच अजून अधिक प्रमाणांत झालें, तर घरची व्यवस्था पुरुषांकडे व बाहेरची व्यवस्था स्त्रियांकडे येऊन आतांपर्यंत जो स्त्रीवर्ग पोष्य होता, तो पोषकवर्ग बनून पुरुषवर्गच पोष्य बनेल. झाडलोट, सडासंमार्जन करणें, स्नानपानाकरतां पाणी भरून ठेवणें, स्वयंपाक करणें, वाढणें, उष्टी काढणें, वस्खें धुणे, शिशु संगोपन इत्यादि सर्व कार्ये पुरुषालाच करावी लागतील. या अदला बदलींत एकच एक नवमास गर्भ वाहण्याचें काम मात्र पूर्वीप्रमाणे स्त्रियांकडेच राहील यांत संशय नाहीं. तेंहि कांहीं प्रयत्न करून पुरुषांकडे सोपवण्याचा शोध लागला म्हणजे पूर्वीचा स्त्रीवर्गच आतां पुरुष झाला व पूर्वीचा पुरुषवर्गच आतां स्त्री झाला म्हणून म्हणता येईल व कालमहिमेचें आश्चर्य मानतां येईल. असे झाले तरी काय पुन्हां स्त्रीपुरुषांचे पूर्ववतच झालें असें होईल. वेगळे काहीच न होता घेतलेले अम मात्र पदरात पडतील. 

  • पुमान्पुलोऽधिके शुक्रे स्त्री भवत्याधिके स्त्रियाः । समेऽपुमान्पुत्रियो वा क्षणिऽल्पेच विपर्ययः ॥ (मनु. ३-४९) 

स्त्री-पुरुषांच्या रजोरेतांच्या मिश्रणानें गर्भ राहतो. गर्भ राहाच्याच्या वेळी पुरुषांच्या रेताचे प्रमाण अधिक झाले तर पुरुष होतो, व स्त्रियांच्या रजाचे प्रमाण अधिक झाल्यास स्त्री होते. अनुकूल आहारादिकाच्या आधिक्याने रेताचे प्रमाण अधिक करून पुरुषांनी पुरुष-सेततांकरितां प्रयत्न करावा, असाहि यांतून अर्थ निघतो. स्त्री-पुरुषांच्या रजोरेताच्या समप्रमाणानें संतती नपुंसक होते; असा याहि वरच्या श्लोकाचा अर्थ आहे. विषम म्हणजे ५।७।१९।१५ या रात्री गर्भधारण झाल्यास कन्या होते, सम म्हणजे ६|१२|१४|१६ या रात्री गर्मधारण झाल्यास पुत्र होतो, असेहि सांगितले आहे. खाल्लेल्या अन्नापाण्याचा रस बनतो; त्या रसापासून नंतर रक्त बनतें, रक्ता नंतर मांस, मांसानंतर भेद, मेदानंतर चर्म, चर्मानंतर स्नायु, स्नायूनंतर अस्थि व अस्थीनंतर रेत बनते. रज हा रक्ताचाच प्रकार आहे. रेत ही शेवटची धातु आहे. त्यामुळे रेताच्या आधिक्याने झालेला पुरुषदेह स्त्रीदेहापेक्षा देहमनाच्या शक्ताने अधिक प्रबळ व अधिक कार्यक्षम असतो. हे असे जाणून बाहेरची कामे पुरुषांना दिली गेली व स्त्रियांना घरची कामे दिली गेली. त्यांच्या देह मनाच्या स्थितीनुसारच ती कामे असल्यामुळे, घरी बसल्याबसल्या त्यांना ती करता येतात. स्त्रियांचे देह जात्याच अतिकोमल व श्रमअसहिष्णु असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. महिन्याची पाळीहि त्यांना असते. विटाळशीपण इतरांचा स्पर्श व देहमनाचे श्रम त्यांना असह्य होतात. विटाळशीपणी झालेली कांहीची अशक्तता तर बऱ्याच दिवसांनी भरून निघते, तर काहींचा स्त्राव यांबतच नाही. अशा वेळी तनुमनाचे श्रम बळजबरीने केल्यास प्रवृत्ती वर परिणाम होऊन देह अशक्त बनतो. कार्यहि नीट होत नाही. या वेळी देहाची तशीच मेंदूची शक्ति कमी झाल्याने साहजिकच कांही नको वाटते. नौकरांच्या आशेनें कसेबसे काम करण्यांत येते. हे चार दिवस स्त्रीयांना रजेचे असावेत, अशी सर्व कारणे बाहेरच्या नौकऱ्यादिकांचे विषयी स्त्रियांचे स्वाभाविक अपात्रत्व दर्शवितात. शिशुसंगोपनाचाहि प्रश्न तसाच. आपल्या बरोबर त्यांना मुले नेतां येत नाहीत. दुसऱ्यानी दूध पाजलेच तर त्यांच्या मुलांना तें कमी पडते व त्यामुळे ती मुले दुर्बल होतात. मुलाकरितांच आइला पान्हा फुटतो, त्या दृष्टीने हि हें अस्वाभाविक होते. आईचे दूध प्यायला मिळाल्यामुळे मुलाची व मुलाला प्यावयाला न दिल्यामुळे सारखे तें पिळून टाकून टाकून आईची प्रकृति बिघडेल. निसर्गाचा नियम मोडेल. पुढची पिडीहि दुर्बळ बनेल. यानें राष्ट्राचे मोठे नुकसान होईल. नौकरांच्या आशेनें सर्वच घराबाहेर गेल्या तर घरीं दुसऱ्या स्त्रीचे दूध मिळणारही नाही. आई गेली तिथे पायापायांत घुटमळत असणाऱ्या मुलाचे संगोपन अशी नौकरांची आई कसे करूं शकेल ! शिशुसंगोपनाच्या दृष्टीनें आई त्याशिव चौबीसहि तास पाहिजे. प्रजेच्या हिताच्या दृष्टीने या सर्वांचा विचार प्रजेनें व पुढान्यांनी केला पाहिजे.

home-last-sec-img