Literature

स्वार्थ त्याग

आज मला संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची आठवण होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टवीती उपकारें ।। जगाच्या हितासाठी म्हणजेच सुखासाठी, जगाच्या उद्धारासाठी सर्वांना आत्मसुख मिळावे म्हणून संत, महंत व विभूती प्रयत्नशील असतात. यजमान किंवा कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबियासाठी प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे विश्व कुटुंबियां साठी संत जपदोद्धाराप्रित्यर्थ प्रयत्नशील असतात. परहितासाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवीत असतात. मना चंदनाचे परी त्वां झिजावेअसे श्रीसमर्थांनी म्हटले आहे. हे मना, तू धर्मपालनासाठी व सज्जनांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजव । असा या श्लोकाचा भावार्थ आहे. हाच श्रीसमर्थ चरित्राचा मुख्य आदर्श होय.

समर्थांना काहीच कमी नव्हते. उलट पुष्कळशी अनुकूलताच होती. त्यांचे लग्न झाले नसते असे नाही. व तशी शंकाही घेण्याचे कारण नाही. त्यांची देहयष्टी सुदृढ होती. असे असतानाही सर्वसंगपरित्याग करून ते कशासाठी घराबाहेर पडले ? कशासाठी ते लग्नमंडपातून पळून गेले ? वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी आपल्या मातेस काय सांगितले ? संसार चिंता करण्याबद्दल आईने सांगताच विश्वकुटुंबाची चिंता वहातोअसे त्यांनी का उत्तर दिले ? ब्राह्मण्य व वेद धर्माच्या रक्षणाचे प्रयत्न करण्याचे काय प्रयोजन होते ? हे सर्व जगत्कल्याणासाठीच की नाही ? जनाला आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान व्हावे यासाठीच की नाही ? या सर्व कारणासाठी श्रीसमर्थांनी आपल्या ऐहिक सुखावर तुळशी पत्र ठेवले. आपले संपूर्ण जीवनच जगदोद्धारासाठी खर्च केले. म्हणूनच आपण त्यांचा उत्सव करतो. त्यांना पूजेची अपेक्षा नाही व आपला गौरव व्हावा असेही त्यांना वाटत नाही. हे सर्व त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांचेच स्मरण म्हणून आपण करीत आहोत. यामुळे आपण त्यांच्यावर उपकार करीत नसून आपण आपलेच कल्याण साधित आहोत. आपण त्यांनी केलेल्या आपणा वरील उपकारांचे व त्यांच्या सद्गुणांचे नेहमी मनन करीत राहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच प्रयत्नशील असले पाहिजे. प्रेमानेच प्रेम वाढते. श्रीसमर्थांनी जनकल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करून अत्यंत कष्ट केले. प्रेमाश्रूंनी आपण यांची सेवा केली पाहिजे. त्यांचे चरित्र नेहमीच आपल्याला मार्गदर्शक ठरले आहे.

आराधनेची आवश्यकता

जगाला संतचरित्राचा अतिशय उपयोग होत असतो. त्या द्वारे आत्मोन्नतीचा सरळ मार्ग दुग्गोचर होतो. संतचरित्रापासून उत्कृष्ट जीवनाची लक्षणे व मानवाचे उच्च ध्येय कोणते बसावे हे ठरविणे सोपे जाते. यावेळी सहजव एका इंग्रजी कवीची उक्ती आठवते. मोठ्यांची चरित्रे सांगणे किंवा ऐकणे कशासाठी ? कारण त्यामध्ये विशिष्ट संदेश असल्यामुळे आपले जीवन उज्वल कषण्याचा मार्ग सापडतो. इतकेच नव्हे तर उत्साह, धेयं हीही प्राप्त होतात.

संतांच्या उपासनेने त्यांच्यात असलेली विशिष्ट शक्ती आपणामध्ये आविर्भूत होऊ शकते. त्यामुळे आपल्या जीवनाचेही

सार्थक होऊ शकते. आत्मनः कामाय सर्व प्रियं भवति ।। आपण आपल्या सुखासाठीच सुखप्राप्ती करून घेत असतो. आपले प्रयत्नही स्वार्थासाठी असतात. कोणताही मूढ मनुष्य प्रयोजना शिवाय कोणतेच कार्य करीत नसतो. प्रयोजनं विना न मंदोऽपि प्रवर्ततेही गोष्ट सत्य आहे. उत्सव करणे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत. संतांना पूजा, नैवेद्याची आवश्यकता नसते व त्यापासून त्यांना काहीच काम नसतो. स्वयं प्रकाशमानस्य कुलो निरांजनविधिः ? |’ या म्हणी नुसार त्यांना धूपदीपाची आवश्यकता नसते. नित्यतृप्ताय नैवेद्यम्या म्हणीप्रमाणे आहाराचीही गरज नसते. ब्रह्मानंद स्वरूपात ते नित्यतृप्त असतात. त्यांना नैवेद्य कशासाठी ? कोणतीही अपेक्षा नसताना सज्जनांची सेवा केल्यास संतृप्ती मिळून, स्वल्प सेवेने संतुष्ट होऊन ते आपणावर दया करतात. त्यांच्या आराधनेमुळे ज्ञान, वैराग्य, भक्ती, विभूतीमत्व ह्या सर्व गोष्टी आपणास कळतात. त्यांची सेवा आपल्या उद्धारासाठी त आहेच पण जीवनसाफल्यासाठीही आहे. त्यांच्या उद्धारासाठी नाही. त्यांचे वजन करणारे त्यांच्यासारखेच होतात. तस्मिन् तज्जने भेदाभावत्भक्त व भगवान यात भेद नाही. अनंतानंत रूप असे जे महान साम्राज्य आहे त्याचे ते सम्राट आहेत.

पंचवटी प्रयाण

घरी कोणतीच कमतरता नसता श्रीसमर्थ लग्नमंडपातून पसार होऊन एका मोठ्या झाडावर तीन दिवस राहिले होते. तेथे तीन दिवस राहाण्याचे कारण काय ? थोड्या अवकाशात ते दुसरीकडे जाऊ शकले असते. परंतु सर्व दिशांना त्यांना शोधण्यासाठी लोक फिरत असल्यामुळे ते तेथेच लपून बसले.

तीन दिवसानंतर परिस्थितीत मोठा बदल होऊन वातावरण शांत झाले व ते नंतर नासिक पंचवटीकडे निघाले. व्यावहारिक दृष्ट्या त्यांची बुद्धी किती सूक्ष्म होती याचेच हे प्रत्यंतर आहे. ते वाट चालत पंचवटीत येऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर उभे राहिले त्यावेळी श्रीरामप्रभु प्रकट होऊन “बाळ, तुला काय हवंय? तू इतके कष्ट कशासाठी घेतलेस? तू उपाचा संकल्प कशाकरिता करीत आहेस ? हे सर्व माझा साक्षात्कार व्हावा यासाठीच ना ? तुला आता माझा साक्षात्कार झाला आहे.” असे म्हणाले.

ज्ञान्यांना तपाची आवश्यकता

श्रीसमर्थ केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच तपस्या करण्यास प्रवृत्त झाले नाहीत. ते विचारी व विशाल हृदयी होते. महात्म्यांना स्वतःकरता तपाची आवश्यकता नसते. त्यांची तपस्या जनहितासाठीच असते. दुराचारी लोकांचा संपूर्ण नाश करून, सत्कर्मप्रवृत्तीच्या लोकांचे रक्षण करण्यासाठीच जीवन असते. अधर्म प्रवृत्ती नष्ट करून धर्ममार्गाप्रमाणे वागणाऱ्या लोकांना सहाय्य करणे हेच त्यांच्या तपाचे कारण आपला प्रत्येक क्षण जगदोद्धारासाठीच ते खर्च करीत असतात.

ज्ञानी व महात्मे यांना स्वतःकरता तपस्येचे मुळीच प्रयोजन नसले तरी जगदोद्धारासाठीच त्याची आवश्यकता असते. अकामस्य क्रिया काचित्ज्ञानी कशाची इच्छा घरून तप करतो? ज्यांना आत्मानंद प्राप्त झाला आहे, ज्यांनी ज्ञानी ही पदवी मिळवली आहे अशांना नवीन असे काय मिळवायचे आहे ? शहाळघातील पाणी पिऊन आपण करवंटी टाकून देतो त्याप्रमाणे आनंदाचा अनुभभव घेऊन निःसार अशा जगाचा ते तिरस्कार करतात व जगातील वासना, नाम, रूप वगैरे करवंटी प्रमाणे फेकून देतात. निजानंदप्राप्तीनंतर जगाची मुळीच गरज नसते. अशा वेळी हे जग निःसार भासते. ब्रह्मवित् आप्नोति परम्। महात्म्याच्या आनंदाला पारावार नसतो. त्याला कोणतीही उपमा देता येत नाही. न शक्यते।त्याचे वर्णन शब्दांनी करणे अधक्य आहे. असे असूनही इतरांचे कष्ट पाहून संत-महंतांना अपार दुःख होते. जनहितासाठीच की नाही ? या प्रमाणेच श्रीसमर्थ श्रीरामप्रभूना उद्देशन “हे प्रभो! आपल्या कृपेने मी धन्य झालो हे खरे आहे तपानेच सर्व सामर्थ्य प्राप्त होत असल्यामुळे त्यासाठीच मी घराबाहेर पडलो. तपाने सामर्थ्य प्राप्त होते हे मला सिद्ध करायचे आहे. धर्म शास्त्रातील ग्रंथ व पुराणातील वचने हेत हे मला जगतास दाखवावयाचे आहे. तपाचरण न करता कोणतीही सिद्धी मिळत नाही हे दाखविण्यासाठी समर्थ असतानाही सामान्य जनासारखे आचरण करणे हा धर्म होय. सामान्यजनापेक्षा विशेष रीतीने वागणे हेच महात्म्यांचे जीवन होय तपसा कि न सिध्यति पुंसाम् ? हे वाक्य माझ्या वागण्याने मला सिद्ध करावयाचे आहे. ह्यासाठीच मी तपाचरण करू इच्छितो. मनुष्य आपल्या तपोबलाने परमात्मपद मिळवू शकतो नर करणी करे सो नरका नारायण हो जाय। मनुष्य तपानेच नारायण होऊ शकतो मनुष्य सदाचरणाने काय मिळवू शकतो हे सोदाहरण सिद्धासाठीची तप करू इच्छितो.” असे आवर्जून म्हणाले.

तपश्चर्या

पंचवटीजवळच टाकळी या नावाचे एक खेडे आहे. यावेळी तेथे अरण्य होते. तेथे एक गुहा असून तश्री अत्यंत मनोरम होती. सुंदर व शोभिवंत वनश्री हे तपासाठी योग्य स्थळ असते.

अशा स्थळीच सात्विक वृत्ती वृद्धिंगत होत असते मनास प्राप्त होतो. त्या दृष्यामुळे परमात्माचे व्यापकत्व लक्षात येते आणि परमात्म्याच्या अनंत शक्तीचे वैचित्र्य मनात बिंबते असेच स्थळ तप:साधानेसाठी योग्य समजले जाते. टाकळी अत्यंत मनोहर असल्याने तेथील गुहेत समर्थ राहू लागले दररोज पहाटे तीन वाजता उठून थोडं ध्यान करून, स्नानापूर्वीचे सर्व कार्य आटोपून स्नान करून, श्रीरामप्रभूंची पूजा करून सूर्योदयकाली सूर्यास अध्यं देऊन, गायत्रीजप पूर्ण करून, रामजपांचे पुरश्चरण करीत असत पुरश्चरणाच्या दृष्टीने तेरा कोटी जप पूर्ण करण्या साठी ते गोदावरीच्या प्रवाहात उसे रहात होते. सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत गोदावरीच्या प्रवाहात उभे राहून ते जप करोत. पाण्याच्या प्रवाहात एक क्षण उभे राहणे कठीण. कारण माशांच्या चावण्या मुळे हालचाल करावीच लागते. श्रीसमर्थ मात्र माध्यांनी पर्यंत प्रवाहात उभे रहात असल्यामुळे मोठे मोठे मासे त्यांना चावत असत किती ही सहनशक्ती ? मासे चावल्यामुळे नामीपर्यंत वण पडत. तसेच पाण्यात उभे राहण्याने पाण्यात राहाणारा शरीराचा माय पांढरा पडला होता. हे सर्व पाहून श्रीमारुतिरायास दया येऊन ते त्यांच्या शरीरावरील व्रण त्यांच्या अंगावर हात फिरवून पुसून काढीत असत.

मध्यान्ही पुन्हा स्नान करून ब्रह्मयज्ञादि कर्मे आटोपून माधुकरीसाठी बाहेर निघत. माधुकरी संपल्यावर श्रीरामप्रभूस तिचा नैवेद्य दाखवून त्यातील प्रसाद घेऊन नदीतीरी येत व तेथे प्रसाद अक्षण करून तेथेच ध्यानस्थ बसत. अशा रीतीने त्यानी तीन वर्षे तेथे घालविल्यानंतर एक नवीनच प्रसंग उद्भवला.

दशपुत्रे वंश

एके दिवशी माध्यान्ही ध्यान संपवून तर्पणादि कर्मे करीत असता तर्पणादि कर्मे करीत असता एका स्त्रीने तेथे येऊन त्यांना नमस्कार केला. हातातील बावाज झाला व चेह-याकडे पाहताच तिच्या कपाळी कुंकूही दिसले ध्यानातून नुकतेच उठले असल्याने अष्टपुत्री सौभाग्यवती भव । असा आशीर्वाद दिला हे ऐकताच तिच्या समागमे असलेली मंडळी आश्चर्यचकित झाली व स्वामी! हा आशीर्वाद या जन्मासाठी की पुढच्या जन्मा साठी ? ‘ असा त्या स्त्रीने प्रश्न केला. समर्थांना त्याचे आश्चर्य वाटून या स्त्रीने असे का विचारले ? याचा विचार करीत असता तिच्या बरोबरची मंडळी पुढे आली व त्यांची महाराज, हिचा नवरा स्वर्गस्थ झाल्याने ही स्त्री सती जाण्यास निघाली आहे. येताना वाटेत आपण दिसलात व कोणी महात्मा आहे असे समजून तिने आपणास नमस्कार केला. असे सांगतान श्रीसमर्थांनी थोडा विचार करून ठीक आहे. माझ्या तोंडून निघालेला आशीर्वाद परमेश्वर खोटा होऊ देणार नाही. एवं जवाबदारी त्याचीच आहे. ते शव इकडे आणा.असे म्हणाले. ती सर्व मंडळी भाविक असल्याने महात्म्याचा आशीर्वाद खरा ठरणार न आपसात बोलत बोलत त्यांनी ते शव समर्थांच्या जवळ आणले. ती मंडळी नास्तिक असती तर त्यानी मेलेला कधी जिवंत होतो काय ? असे म्हणून निघून गेले असते. परंतु त्यानी तसे केले नाही. श्रीसमर्थांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या शवादर प्रोक्षण करून बाळ उठ ||’ असे म्हणताच ते उठून बसले. त्यावेळी तेथे असलेल्या मंडळींच्या आनंदास पारावर राहिला नाही. नंतर त्या दंपतीने अत्यंत भक्तीने नमस्कार करून महाराज, आपला महिमा काय वर्णावा ? आपल्या कृपेनेच आज हे सुभाग्य प्राप्त झाले आहे. अशी अनन्य वृत्तीने स्थानी कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे श्रीसमर्थ संतुष्ट होऊन वाळ अष्टपुत्रवती होअसा आशीर्वाद दिया. इतकेच काय पण तुझा विनय व माता पाहून तुला आणखी दोन पुत्र होतील असेही म्हणाले आणि घडलेही तसेच त्या वंशास दशपुत्रेअसे आडनाव पडून आजही त्या आडनावाची घराणी आहेत.

दिव्य दृष्टी

अशा प्रकारच्या ह्या चमत्कारानंतर श्रीसमर्थाकडे लोकांची रीघ लावली. त्याचे समाधान करीत करीत त्यांनी आपलेही तप निर्विघ्नपणे पूर्ण केले. या गोष्टींचा विचार करता अवतारी होते हे स्पष्ट दिसते. सामान्य मनुष्या श्रीसमर्थ अशाप्रकारे वागणे शक्य आहे काय ? मुळीच शक्य नाही. पुढील चमत्कार सांगण्यास आपल्याला वेळही नाही. तसेच संपूर्णपणे कोणी लिहूनही ठेवले नाहीत. सामान्यपणे विचार केल्यास आपल्यावरील संकटे दूर करण्यासाठी कितीतरी लोक समर्थांना शरण आले असतील, कितीतरी चमत्कार घडले असतील. परंतु ते सर्व लिहून ठेवणे अशक्य असल्याने साधारण असलेली एक दोन उदाहरणे लिहून ठेवलेली दिसतात.

हे सर्व चालू असताही त्यांचे नित्यनैमित्तिक आन्हिक तपश्चर्या चालूच होती. ठरविलेले नियम कोणताही अडथळा येऊ न देता किंवा त्यात चूक न करता चालू ठेवणे यालाच सामान्यपणे तप असे म्हणतात. श्री समर्थ आपले नियम नीटपणे संभाळून सब कामे कशी पूर्ण करीत असत? या प्रश्न उत्तर केवळ त्यांच्या दिव्य दृष्टीनेच त्यांचे सर्व कार्य होत होते‘, हेच होय.

जास्वंदीचे फूल

अशा प्रकारे बारा वर्षे पूर्ण होत आली. श्रीमारुतराय श्रीसमर्थांच्याबरोबर त्यांच्या बाल्यदशेपासूनच असत. एके दिवशी

श्रीसमर्थांना ते आज तुझ्या तोंडून पुराण ऐकावे अशी माझी इच्छा आहे असे म्हणाले. अवश्य सांगेन पण ते तितके सोपे व सुलभ नाही. मात्र आपली कृपा असल्यास मी सांगू शकेन.असे समर्थ म्हणाले व ते दोघे बोलत बोलत मंदिरात प्रवेशले. श्रीमतिराय बटुरूपाने समोर बसले. पुराण सुरू होण्यापूर्वी पुराणिकाजवळ जाऊन आज मी पुराण सांगणार आहे. आपण संमती दिल्यास ते शक्य होईल, असे श्रीसमर्थ म्हणताच पुराणिकांस अत्यानंद झाला व त्याने संमती दिली. श्रीसमर्थांची कीर्ती, त्यांचे चमत्कार, त्यांचे प्राबल्य सर्वांना माहीत असल्यामुळे सर्वांना आनंद वाटला. पुराण सांगण्याचे आपण होऊन पत्करल्या मूळे पुराणिकावे आपले आसन श्रीसमर्थांना देऊन ते श्रोतृवृंदाव वसले आपल्यासमोर बसलेल्या बटुरूपी श्रीमारुतिरायास उद्देशूनच श्रीसमर्थ पुराण सांगत होते व श्रीमारुतिराय मस्तक डोळावीत होते. सीता शुद्धीच्या संदर्भात सीताशुद्धीसाठी लंकेत सूक्ष्मरूपाने प्रवेश करून श्रीमारुतिराय विश्रांती घेत होते. हा विषय आला. त्यावेळी ” श्रीमारुतराय कुठे बसले होते? असा बटूने प्रश्न केला. त्यावर श्रीसमर्थानी झाडाखालीअसे उत्तर दिले. बटूने पुन्हा विचारले कोणत्या झाडाखाली ? तेव्हा समर्थ म्हणाले जास्वंदीच्या झाडाखाली ? कोणती जास्वंद ? बसा बटूने प्रश्न करतान श्रीसमर्थानी पांढरीअसे उत्तर दिले. त्या बटुने नाही ती तांबडी होती, असे म्हणताच समर्थांनी तत्काळ नाही नाही, ती पांढरीच होती.असे उत्तर दिले. ह्या वादामुळे इतर श्रोतृवंद कंटाळून बटूस उद्देशून हा अगदी मोठ्या विद्वानासारखे काही तरीच विचारतो, तुला त्या फुलाच्या रंगाशी काय करायचय ? | असे म्हणाला. त्यावेळी श्रीसमर्थांनी श्रोतृवृंदाची समजूत घातली व हा वाद तेथेच थांबून योग्यवेळी पुराण संपले. मंदिरातून बाहेर पडल्यावर मारुतराय समर्थांना म्हणाले फुलाच्या रंगाशी मला काही कर्तव्य नाही पण तेथे कोण गेले होते तू का मी याला प्रमाण काय ?’  यावर समर्थ म्हणाले, याला फक्त एक प्रमाण व ते म्हणजे त्याठिकाणी पुन्हा जाणे. श्रीमातराय ताबडतोब लंकेत झाडाजवळ गेले आणि त्या ठिकाणी त्यांना पांढऱ्या रंगाचीच जास्वंद आढळली. अरेरे! ! मीच फसलो. ” असे म्हणून परत येत असता विभीषणाने एवढी घाई कशाची, आपण येण्याचे व जाण्याचे कारण मला समजले नाही. माझ्याव रागावला तर नाही ना? असे विचारले, त्यावेळी  माझ्याच अंशाने रामदास ह्या नावाचा महात्मा जन्माल आला असून त्याच्या माझ्या वादामुळे संशय निर्माण झाला व तो संशय नाहीसा करण्यासाठीच मी येथे आलो मी लंकेत आलो असता ह्या जास्वंदीच्या झाडाखाली विश्रांती घेतली होती. त्याच्या फुलाच्या रंगाबद्दल दोघांनी चर्चा फुलाचा रंग पांढरासांगितळा व मी तांवडाअसा वाद घातला. त्याची खात्री करून घेण्यासाठीच मी आलो होतो. आता पाहिले तर त्याचेच म्हणणे खरे ठरले. मी आता तिकडेच जात आहे,’ असे श्रीमारुतिराय म्हणाले. त्यावर विभीषण, ‘मला त्या महात्म्यांचे दर्शन घडेल काय ?” असे म्हणाला. त्यावर श्रीमारुति राय ठीक आहे. ते तीर्थयात्रेसाठी रामेश्वरास येतील तेव्हा तुझ्याकडे येण्याची व्यवस्था करतोअसे म्हणून श्रीमर्याकडे आले व तुझे म्हणणे खरे ठरले. पण तुला ते कसे कळले ?” असे विचारताच ते म्हणाले, ‘स्वामी तुम्ही त्यावेळी लंकेत क्रोधाने गेल्यामुळे तुम्हा सर्व तांबडेच दिसणे स्वाभाविक बाहे. कारण आपले डोळे त्यावेळी खालभडक झाले होते. फुल पांढरेच होते. ह्याला आणखी एक पुरावा आहे. रावण हा शिव भक्त होता. श्रीशिवास पांढरे फूलच आवडते असा विचार मना आणून मी त्या फुलाचा रंग ठरविला.असे श्रीसमर्थ म्हणाले व “शिष्यात् च्छेत् पराभवम् !ही म्हण खरी ठरली.

home-last-sec-img