Literature

हाच खरा त्याग

आतां त्यागाविषयीं बधूं – या अखिल कार्याचे कारण म्हणून असणारें, तें आनंदघन परमात्मस्वरूप स्वतःपूर्ण आहे. आनंदधन स्वरूपाला कशाची आवश्यकता व अपेक्षा असणार ? तें सदाचेंच अन्यनिरपेक्ष आहे. आनंदघन रूपाला कशापासूनच कांहीं प्रयोजन नसतांना, तें कशाची इच्छा करील ? त्या स्वयंपूर्ण असणाऱ्या आनंदमात्र रूपाला, या स्थिरचर विश्वापासून कसलें प्रयोजन साधावयाचे आहे ? कारणाला कार्याची कसलीहि जरुरी नसते; सर्वपूर्व असणारें अद्वितीय कारण आपल्या स्वभावानेंच सदैव सर्वकार्यशून्य असतें. कारण पूर्ण असतें; कार्य हें अल्प असतें. पूर्ण कधीं अल्प होत नाहीं व पूर्णांत अल्प कधी राहू शकत नाहीं. कारण सदोदितच निर्भेळ असतें. तें सर्वथैव अद्वितीयच असतें. एकापासून सर्व संख्या मोजतात. तरी सर्वपूर्व या एक आंकड्यांत दोन आंकडा नाहीं व दोहोंपासून पुढें क्रमाक्रमाने वाढत जाणाऱ्या अनेक संख्याहि पण नाहींत. तो एक जसा अगदीं संबंध एक असतो, तसेंच हें कारण एकच एक असून तें स्वरूपानें आनंदघन आहे. माया म्हणजेच दुसरी कल्पना मायामात्रमिदं द्वैतम् । तिथे न मायेचें द्वैत, न मायेपासून झालेले विविध अनेकत्व. प्रपञ्चोपशमं शान्तं शिवमद्वैतम् । तें मुळांतूनच द्वैतशून्य, प्रपंचशून्य आणि म्हणूनच नितांत शांत, परम सुखधन निखिल अद्वितीय असे आहे. अशा द्वैतशून्य व प्रपंचशून्य आनंदघन

कारणस्वरूपांत, द्वैत-मूळ हा, या विविध प्रपंचाचा केवळ अध्यारोप आहे. एकस्मिन्वस्तुनि अन्यस्यारोपः अध्यारोपः ।- एका अखंड अपरिछिन्न वस्तूवर अन्याचा झालेला आरोप (अनाठायीं कल्पना) अध्यारोप म्हणवून घेते. एकाद्या मुळीवर झालेली सर्पाची कल्पना समूळ नष्ट झाल्याशिवाय, मुळीचे यथार्थ असलेले रूप दृग्गोचर होणार नाहीं. मुळीला आपल्या विरुद्ध झालेल्या सर्पाच्या कल्पनेनें कसलेंहि प्रयोजन नाहीं; व कांहीं बाधकहि पण नाही. ती मुळी त्रिकालींहि कधी सर्प झाली नाही व होतहि पण नाहीं. यथार्थ मुळींचे दर्शन घ्यावयाचे झाल्यास, सर्पाच्या भावनेचा कांहींच अवशेष शिल्लक राहातां कामाचा नाही. सर्पाची भावना संपूर्ण ओसरल्यानंतरच यथार्थ मुळीचें अचूक ज्ञान होतें. मुळी आपल्या रूपानें दृग्गोचर होते. असेंच कारणांत कार्य नसल्यामुळे व कारण कधी कार्य होत नसल्यामुळे, त्यावर अनाठायी झालेली कार्याची कल्पना, हा अध्यारोप मुळांत नसून भासत असल्यामुळे, हा अशेष नष्ट झाल्याशिवाय, त्या कारणाची यथार्थता प्रगटणार नाहीं; त्याचे आहे तशा मूळ स्वरूपाचे दर्शन होणार नाहीं. झालेली विरुद्ध कल्पना समूळ नष्ट झाल्याशिवाय वस्तुस्थिति कशी निदर्शनास येईल ? केवळ स्वरूपानेच असणाऱ्या त्या आनंदरूप कारणब्रह्मावर, तदन्य वस्तूचा म्हणजे अखिल कार्यजाताचा केवळ आरोप आहे. अशा रीतीने नसून भासणाऱ्या अशेष कार्याची निःशेष निवृत्ति हाच खरा ‘त्याग’. स्वरूपाच्या प्राप्त्यर्थ निजानंदाच्या प्राप्त्यर्थ, याची अत्यंतावश्यकता आहे. अशेष कार्याच्या अजिबात विरुद्ध असणाऱ्या, याच्या अगदी पूर्वील केवल आनंदरूपांत, या निव्वळ आरोपित कार्याचे आस्तिक्य नाही असे सिद्ध झाल्यानंतर, या सर्वपूर्ण कारणरूप यथार्थ आनंदाच्या प्राप्त्यर्थ, निष्प्रयोजक, भ्रामक सुखाची व तत्कार्याची दृष्टि, अजिबात नष्टच व्हावयाला पाहिजे. भ्रामक सुखोत्पादक निःशेष कार्याचा समूळ त्यागच सत्यसुखरूप कारण स्वरूपाचें त्रिकालाबाधित अचूक साधन होऊं शकते.

नेति-प्रमाणेन निराकृताखिलो हृदा समा-स्वादित-चिद्धनामृतः । 

त्यजेदशेषं जगदात्तसद्रसं पीत्वा यथांऽभः प्रजहाति तत्फलम् ॥ (रामगीता ३४ ) 


— अतव्यावृत्तिरूपानें, ‘नेति प्रमाणा’नें, हे तें नव्हे म्हणून सर्व कार्याचे निराकरण करून शुद्ध आत्मीय वृत्तीनें त्या चित्सुखामृताचा स्वाद घेत जो जन्ममरणरहित नित्य अविनाशी होऊन राहिला आहे, त्यानें शहाळ्यांतले सारभूत पाणी पिऊन, निःसार नरोटी फेकून दिल्याप्रमाणे, या जगांतलें सार आत्मसुख सेवून सकल नामरूपात्मक जगत, देहवासना व सारी भोगवासना संपूर्णपणें त्यागावी; आणि तो त्यागतोच. खऱ्याच्या लाभानें खोट्याच्या त्यागाप्रमाणेंच, तो त्यागहि आपोआपच अमलांत येतो.

सा तैत्तिरीयश्रुतिराह सादरं न्यासं प्रशस्ताखिलकर्मणां स्फुटम् । 

एतावदित्याह च वाजिनां श्रुतिर्ज्ञानं विमोक्षाय न कर्म साधनम् ॥२१॥

कृष्ण यजुर्वेदाच्या महानारायण उपनिषदांत तार्निवा एतान्यवराणी परा सि न्यास एवात्यरेच यत तस्मान्न्यासमेषां तपसामतिरिक्तमाहुः । प्रजननादि सांगितलेली सर्व साधनें गौण आहेत. या सर्व साधनांपेक्षां व या सर्व तपापेक्षा त्यागच एक मोक्षाचें साक्षात् साधन आहे. न्यास म्हणजे त्याग. या त्यागाचीच या इतर सर्व साधनांवर ताण आहे.

न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः ।

-विविध कर्मानुष्ठान, पुत्रोत्पादन, द्रव्यसंपादन यापैकी कांहींच न करतां, यांच्या त्यागानेंच मोक्ष मिळविला आणि ते अमर झाले; असे वाजस नीय श्रुतीचेंहि सांगणे आहे. उदाहरणार्थ श्रीदत्तात्रेयं, सनकसनंदनादि, शुक, वामदेव, आरुणी, श्वेतकेतु, ऋहु व जडभरत इत्यादिकांचा यांत अंतर्भाव होतो. प्रपंचाप्रवर्तकं लयोन्मुखीकरणं साधनम् । वृत्तीला प्रपंचाभिमुख न करतां, प्रपंचाकार होऊं न देतां, चिदानंदाहून वेगळी राहूं न देतां, त्यांत ती काथम चीच समरसून टाकून, ज्ञातज्ञानज्ञेयरहित निर्विकल्प आनंदमात्र, संविन्मात्र, केवळ एक सत्तामात्र असणेंच, मोक्षसाधन म्हणून म्हटले आहे. भरीव अशा केवल आनंदमात्र, त्याच्या जाणिवेचा भावसुद्धां अन्यभास उत्पन्न करून तद्विलक्षणरूप निर्माण करतो. असें झाल्यास, कुठे या देहाची, देहसुखाची, जगाची व इहलोकाच्या ऐश्वर्याची निःसार भावना ! कैमुनिक न्यायाने याची इच्छाच कोण करील? सर्वव्यापारमुत्सृज्य अहं ब्रह्मेति भावय । अहं ब्रह्मेति निश्चित्य त्वहंभावं परित्यज । अखिल बाह्यसुखाच्या व्यापाराचा संपूर्ण त्याग करून त्या केवल आनंदरूपाची भावना कर; तेंच मी म्हणून मान, ते निर्विकल्प आनंदब्रह्मच मी, म्हणून मीपणाच्या वृत्तीचा त्याग कर निर्विकल्प आनंदरूप होऊन राहा. असा साधनमार्ग श्रुतीनें दाखविला आहे. सुप्तेरुत्थाय सुप्त्यन्तं ब्रह्मैकं प्रविचिन्त्यताम् । दद्यान्नावसरः किंचित्कामादीनां मनागपि । झोंपून जागे झाल्यापासून, तें पुन्हां कडकडून झोप घेऊन इकडचे भानच नाहीसे होईपर्यंत अद्वितीय चिन्मात्र आनंदधन ब्रह्मरूपाचेंच अनुसंधान, ध्यान ठेवावें. वृत्ति उठूंच देऊं नये, कामादि विकारांची व अन्य कशाची मुळीं कल्पनाच न उठेल, अशा त्या आनंदमात्रतेत सदाच समरसून सहज राहावे असा श्रुतीचा उपदेश व आदेश आहे. तमात्मानं विदित्वा ब्राह्मणाः पुत्रेषणायाश्च वित्तैषणायाश्च लौकेषणायाश्च व्युत्थायाथ भिक्षाचर्य चरन्ति ॥

(बृ. उ. अ. ३. ब्रा. ५)

– आपल्या त्या शुद्ध आत्मरूपाला जाणून स्त्रीपुत्रांच्या, वित्ताच्या व इहपरलोकांच्या इच्छांचा त्याग करून, भिक्षेनेंच केवळ आपला निर्वाह ब्राह्मण चालवीत असतात, एके ठिकाणीहि पण कुठे राहात नाहीत असा या मंत्राचा अर्थ होतो. आत्मज्ञानोत्तर असा त्याग आंगी बाणतो, याची साक्ष या मंत्रानें पटते. विरक्तीच आत्मज्ञानाचे एक मुख्य लक्षण आहे, हे तत्त्र इथे स्पष्ट होतें. अयं लोकः पुत्रेणैव जेयः नान्येन कर्मणा आत्मा वै पुत्रनामासि । अशा संकुचित अर्थाच्या गौण श्रुतींचा पारदर्शी संन्याश्याच्या पक्क हृदयावर परिणाम होत नाहीं. संभोगसुखापेक्षां या लोकी कोणतेंहि अधिक सुख नाहीं, पुत्रप्राप्तीनें सर्व सुखाची संप्राप्ति होते, एका पुत्रप्राप्तीशिवाय अन्य कोणत्याहि कर्मसाधनानें, या लोकींचें समग्र सुख अनुभविलें असें होत नाहीं, हा लोक पुत्रानेंच एक जिंकिला जातो, पुत्रप्राप्तीनेंच केवळ इहलोकींचे कर्तव्य संपर्ते, माझा आत्माच तूं पुत्र नांवानें आहेस या आधारानें, या लोकीं पुत्राच्या रूपा नेच आत्मप्राप्ति होते. अशा या कल्पना संन्याश्यांच्या प्रौढ विचारापुढे अत्यंत बालिश ठरतात. मुलांची सारखी रांग लागून उलट अन्नान्नदशा अधिक झालेली, पै-पैशाकरितां हात पसरत, ज्याच्या त्याच्यापुढें अनाकरितां तोंड बेंगाडत, अनेक आपदांनीं गांजलेली व खंगून गेलेलीं, दीन, कृश अशी केविलवाणी कितीतरी आढळतात. त्यांना पाहिल्याबरोबर नसली तरी दुःखाची कल्पना येते; मग ते पुत्रप्राप्तीनें किती सुखी झाले असतील तें उघडच दिसतें.

एतमेव प्रवाजिनो लोकमिच्छंतः प्रवजन्ति । एतद्धस्म वै तत्पूर्वे विद्वांसः प्रजां न कामयन्ते किं प्रजया करिष्यामो येषां नोऽयमात्माऽयं लोक इति ते हस्म पुत्रैषणायाश्च वित्तैषणायाश्च लौकैषणायाश्च व्युत्थायाय मक्षाचर्य चरन्ति । (बृ.अ. ४ ब्रा. ४)

वेगळे म्हणून थोडेंसुद्धां ज्या ठिकाणी शिल्लक राहात नाही त्या आनंदमात्र असणाऱ्या, आत्मप्राप्तीची इच्छा करून त्या आनंदांतच पूर्वीचे विद्वान एकरूप होऊन गेले. आकाशांतल्या विजेप्रमाणे कांहीं काळ भ्रांतिसुखाचें साधन होऊन, अंती अति दुःखरूपानें परिणत होणाऱ्या, निःसार दारा, द्रव्य, पुत्र, मित्र, आदि ऐहिक व पारलौकिक सुखसाधनांचा त्याग करून, त्यांच्यामुळे सुख मिळतें ही वासना नष्ट करून, प्रक्षालनाद्धि पंकस्य दूरादस्पर्शनं वरम । या न्यायानें, बाल्यांतच विवेक विरक्तीनें आधुनिक विद्वानहि संन्यासाश्रमाचा स्वीकार करतात; व प्राण धारणार्थच केवळ भिक्षावृत्तीनें जीवन चालवितात. आम्हांला आत्मप्राप्तीच एक अभिप्रेत असतांना, आत्माच एक आमचा लोक असतांना, प्रजादिकांच्या साधनाचे महत्त्व आम्हांला वाटत नाही. त्यांच्या निष्प्रयोजकत्वाचा व निःसारत्वाचा निश्चय असल्यामुळे, त्यांची आम्हांला इच्छाच न होता, या लोकांच्या वैभवाची कल्पनाच नसतां, धन, दारा, पुत्रादिकांना व या लोकाला तरी घेऊन आम्हीं काय करावें ? अशी त्यांची भावना असते. ते सदैव आत्मानंदांतच गर्क असतात. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः अथ मर्त्योऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्रुते ॥ (बृ. ४|४|७) हृदयाचा आश्रय करून राहिलेल्या सर्व वासना जेव्हां निपटून नष्ट होतात, तेव्हां तो मर्त्यच अमर होतो. इथेच त्याला ब्रह्मरूपाची प्राप्ति होते. शान्तो दान्त उपरतस्तितिक्षुः समाहितो भूत्वाऽऽत्मन्येवात्मानं पश्यति सर्वमात्मानं पश्यति ॥ (बृ. ४|४|२३). आत्मरूप देह, इंद्रियें, प्राण, मन, बुद्धि आदिकांहून विलक्षण असून, त्याला यांच्या संबंधानें बाह्य भोग्य पदार्थांपासून लाभणाऱ्या विषय सुखाचा संपर्क नाहीं. तें सदाच कर्म, त्याचें फळ व देहादिक, यांच्याशी संबंध न ठेवणारे आहे. असें जाणणारा शांत, जितेंद्रिय, निरुपाधि, निष्क्रिय, सहनशील व दक्ष होऊन तो स्वरूपाचेंच एक लक्ष्य बाळगून असतो, आपल्यांत आपणाला बघतो, अखिल विश्व आत्मरूपानेंच पाहातो, आत्मस्थिति सुटून त्याला कशाचेंहि भान होत नाहीं. पूर्णश्चिदानंदमयोऽवतिष्ठते न वेद बाह्यं न किचिदांतरम् ॥ (रामगीता ४७) ज्ञानी चिदानंद अंतर्बाह्य पूर्ण असतो. आत्मानंदाव्यतिरिक्त अंतर्बाह्य दृश्याचें भान त्याला असत नाहीं.

तुर्यावस्था ही चौथी अवस्था आहे. हिचें वर्णन करतांना, वहार्यमग्राह्यमलक्षणम् ” । ( मांडुक्य उ० ) अदृश्य, अव्यवहार्य, अग्राह्य ब लक्षणशून्य ती आहे असें श्रुति सांगते. तेव्हां ही आत्मस्थितिरूप तुर्यावस्था, दृश्य, व्यवहार्य, ग्राह्य व लक्षणान्वित जागृत स्वभाहून निराळी आहे हे ठरलें. न प्रज्ञानघनं न प्रज्ञं नाप्रज्ञम् । या लक्षणानें सुषुप्तीहूनहि ती वेगळीच ठरते. तिसरी अवस्था ओलांडूनच चौथीची प्राप्ति होते. तिसऱ्या अवस्थेतच दृश्याचा व दृश्य व्यवहाराचा, वासनेचा व वासनात्मक प्रपंचाचा, मी माझें या कल्प नेचा व या कल्पनेच्या व्यवहाराचा समग्र लय झाल्यानंतर, पुढच्यांत यांपैकीं काय उरणार ? त्या निष्प्रपंच आत्मप्राप्तिकरितां निष्प्रपंचच व्हावयाला नको का ? या दृष्टीनें आत्मप्राप्तीला त्यागाची आवश्यकता नाहीं म्हणून कोण मानील ? सर्वहि दिसेनासें झालेल्या सुषुप्तीच्या पलिकडे असणारें तुर्यपद एकात्मप्रत्ययसारम्’ एकात्म अनुभवानें अत्यंत सारभूत असें आहे. त्यागः प्रपंचरूपस्य चिदात्मत्वावलोकनात् । – आपल्या चिन्मात्रतेच्या लक्ष्यानें, आनंदघनतेच्या स्थितीनेंच पूर्ण असणें व कोणत्याहि वृत्तिवश न होणें, हा ‘ सर्वोत्कृष्ट त्याग’ आहे. यांत ‘शते पञ्चाशत् ‘ न्यायानें सर्व प्रकारच्या त्यागाचा व वैराग्याचा आपोआपच अंतर्भाव होतो. कृष्ण यजुर्वेदाच्या कठशार्खेत यमानें नचिकेताला ब्रह्मविद्येचा उपदेश करण्यापूर्वी सांगितलें, शतायुषः पुत्रपौत्रान्वृणीष्व बहून्पशून्हस्तिाहिरण्य-मश्वान् । भूमेर्मह दायतनं वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावदिच्छसि ||२३|| ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान्कामा छन्दतः प्रार्थयस्व ॥ इमा रामाः सरथाः सतूर्या नहीदृशा लम्भनीया मनुष्यैः ॥ आभिर्मत्प्रत्ताभिः परिचारयस्व । ” –पूर्ण आयुष्याच्या पुत्रपौत्रांनी, पशुपक्ष्यांनी व अलोट संपत्तीनें सर्वतोपरि

 

समृद्ध असणारें आखिल भूमंडलाचें साम्राज्य पाहिजे तर लोकांत ज्या लाभत नाहीत त्या सर्व कामनांना ( भोगसुखांना ) आपल्या इच्छच्छेप्रमाणें मागून घे. रथवाद्यांसह या अप्सरा घेऊन जा. ब्रह्मविद्या कशाला हिजे ? अशा रीतीनें अनेक प्रकारें नचिकेताला मोहवश करण्याविषयीं बहु प्रयत्न यमानें केलें, तरी या वर्णनांना व विषयी वैभवाला तो भाळला नाहीं व ह्मविद्येचा हट्टहि त्यानें सोडला नाही. पराचः कामाननुयन्ति बालास्ते मृत्य म्ति विततस्य पाशम् ॥ अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवमध्वो प्रार्थयन्ते ॥ (कठ. उ. २-२) बालबुद्धीची माणसेंच बाह्य विषयांच्या

पाठीमागे लागतात आणि मृत्यूच्या विस्तृत जाति आपण होऊन पडतात. प्रबुद्ध लोकांच याहून वेगळे आहे. ते अविनाशी आमरूप जाणून निव असतात. ते शाश्वतमुख क्षणभंगुर विषयसुखांत बघत नाहीत.

सत्यमुदीक्षा ब्रह्मयज्ञः पृथिवीं चारयन्ति ।। (अर्पण. १२)

पारमार्थिक सत्य, व्यावहारिक सत्य, उम्र तप सहतांची दीक्षा आणि ब्रह्मयज्ञ यांनी पृथ्वीला धारण केले आहे, असे अथर्वण वेंदाच्या बाराच्या कांडांतील पृथ्वीसूकति महटले आहे. जगाच्या स्थितीला सत्यादि ही साधनें किती आवश्यक आहेत, हे या मंत्रावरून काढून येते. ब्राह्मणांनीच आपल्या चरितार्यांकरितां बनविलेली अथवा रचलेली ही वचनें नव्हेत. ही श्रुतिवाक्यं आहेत. सर्वहितचि सर्वमान्य श्रुतिसिद्धांत हे होत.

तस्यै तपो दमः कर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानि सत्यमायतनम् ॥(केन खं. १-८) 

तप, दम, कर्म, वेद व वेदांगें ही त्या ब्रह्मविद्येची प्रतिष्ठा आहे व सत्य हा आधार आहे. ब्रह्मविद्येच्या पूर्णतेला हे सर्वदि अत्यावश्य आहे. असे है ज्ञानकांडाच्या उपनिषदाचेच मत आहे. आत्मज्ञान तरी यांना सोडून होणे शक्य आहे काय ? कुठेहि सदाचार सोडून भागतच नाही. त्याला वेद हे मुख्य प्रमाण आहे, तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेल || (बृ. १४/४/२२) त्या परमात्म्याची, औपनिषदपुरुषाची वेदप्रमाणाने वैदिक यज्ञ, दान, तप, इत्यादि आचरून व रागद्वेवरहित निष्कामकर्म करून, त्या परमात्म्याला त्या औपनिषदपुरुषाला ‘ ब्राह्मण जाणण्याची इच्छा करतात. या मंत्रावरून ब्राह्मणांचे ध्येय, आत्मज्ञान करून घ्यावयाचे असते; व त्याकरिता ते वेदाध्ययन, यज्ञ, दान, तप इत्यादि वैदिक साधने निष्काम होऊन करतात व वेदवाक्यांचा आधार घेऊन विचार करतात है सिद्ध होते. तमेव विदित्वा मुनिर्भवति । या परमात्म्याला जाणूनच मुनि होतो. ब्राह्मणाच्या उचादि आचारविचारांना वेदप्रमाणच आधार असतो, हे स्पष्ट होते. ब्राह्मणांची उत्पत्ति परमात्म्याच्या मुखापासून झाल्यामुळे, स्वभावतः धर्मकर्मरूपाने प्राप्त होणाऱ्या उपदेशाचे, अध्यापकत्वाचे, गुरुत्वाचे कर्तव्य चालवावयाचे तर त्यांनी या दृष्टीने केलेल्या सर्व विधानांना बेदाचाच आधार असतो. ते त्यांचे स्वकपोलकल्पित जल्पन का ?

सत्यमूचुर्नर एवाहि चक्रुः ॥ (ऋ. ४।३३।६ ) —त्यांनी सत्याचेच प्रतिपादन केलें; आणि त्याचप्रमाणे आपले

आचरणहि ठेवले असे वेदांचे सांगणे आहे. सुगा ऋतस्य पंथाः ॥ (ऋ. ८।३१।१३ ) – सत्याचा मार्गच सुखाचा सुगम मार्ग, असा त्यांचा निर्धार झालेला असतो. भद्रं भद्रं ऋतुमस्मासु धेहि (ऋ. १।१२३।१३ ) हे प्रभो, आमच्यांत मंगलमय कल्याणकारक असे, तुझ्या प्राप्तांचे उत्तम उत्तम संकल्प निर्माण करून, वेदविहित कर्म, उपासना व ज्ञानकांड यांचे आमच्या कडून आचरण करव, अशी त्या देवाजवळ ते अहर्निश प्रार्थना करीत असतात. मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे । यजु० ( ३६-१८ ) – आम्हां परस्परांत मैत्री नांदो आणि आम्ही परस्परांना मित्रप्रेमानेंच बघावें, म्हणून ते देवाजवळ मागतात. तस्य ते भक्तिवांसः स्याम । ( अथर्व. ६-७९ ३) हे प्रभो, सर्व हे आम्ही तुझे एकांतिक भक्त व्हावें, म्हणून त्यांची देवाजवळ प्रार्थना असते. रमन्तां पुण्या लक्ष्मीर्याः पापीस्ता अनीशम् । (अथर्व ७-११५ ४) — पुण्यकर्माच्या अनेक सौंदर्यांनी माझा आश्रम सुशोभित होवो. सत्कर्माचें तें समग्र भाग्य माझ्या आश्रमांत नांदो, माझ्या जीवनाच्या प्रत्येक विभागांत ती अखिल पुण्यकर्माची, कमनीय भाग्यश्री सतत रममाण होवो. मी पापाच्या समग्र कर्माना व प्रवृत्तींना समूळ नष्ट केले आहे, असे त्यांचे आत्मविश्वासार्ने भरलेले भरीव उद्गार आहेत.

निर्दृष्ट व निरुपद्रवी असें केवळ जनहिताचें जीवन निःस्वार्थ दृष्टीनें घालीत कायालेश सहन करीत, रानावनांतून राहात, कंदमूलफलावर निर्वाह करीत परमात्मप्राप्त्यर्थ अहर्निश प्रयत्न करीत, स्वपरउद्वाराकरितांच केवळ जीवित धारण करून असणाऱ्या गरीब आणि सरळ, सात्विक, परोपकारी व सत्पात्र ब्राह्मणवर्गावर विनाकारण जे सर्वजण असे तुटून पडतात, त्याला काय म्हणावें ? निष्कारणवैरिणो जगति । याचाच हाहि एक मसला दुसरे काय?

दानसंवनना होते ग्रंथा मेधाविभिः कृताः । यजस्व देहि दीक्षस्व तपस्तप्यस्व संत्यज ॥ ( वा. रा. अ. कां. १०९)

— हे दानप्रधान ग्रंथ, प्रायः बुद्धिमान ब्राह्मणांनी केले आहेत. स्वार्थ -ऊन यज्ञ कर, दान दे, व्रत उद्यापन कर, तप कर, सर्व संपत्तीचा त्याग कर म्हणून ते सांगतात, असें हें तुमचें विधान जाबालि ऋषिवर्या ! सत्याच्या कसालाच लावल्यास कितपत ग्राह्य ठरतें तें तुम्हीच पाहा ! सत्यं च धर्मं च पराक्रमं च भूतानुकंपा प्रियवादितां च । द्विजाति

देवातिथिपूजनं च पंथानमाहुत्रिदिवस्य सन्तः ।। (बा. रा. अ. ११०|३१) – सत्य भाषण, स्वधर्माचरण, दुष्टदंडणाचे काम पराक्रम, भूतदया, प्रिय पथ्यकर असे गोड वचन, देव, ब्राह्मण, अतिथि यांचे पूजन है स्वर्गाचे महाद्वार आहे, असे साधुसंतांनी म्हटले आहे. हे श्रीरामाचें नास्तिकमतानें वाद घालणाऱ्या जाबालीशी केलेल्या बुद्धिवादाचे अंतिम निर्णायक वाक्य होय. न नास्तिकानां वचनं ब्रवीम्यहं । न नास्तिकोऽहं न च नास्ति किंचन || निवर्तनार्थे तब राम कारणात् । प्रसादनार्थं च मयैतदीरितम् || ( वा. रा. अ. ११०|३८।३९ ) 

– रामा, नास्तिकांच्या पक्षाचे मंडण करावे हा माझा उद्देश नाही व मी स्वतः हि पण नास्तिक नाहीं; कसें तरी करून तुला अयोध्येला परत न्यायच म्हणून, तुझ्यावरील प्रेमातिशयाने केलेला हा एक केवळ युक्तिवाद आहे. यांत माझा असणारा उद्देश एवढाच उद्देश कांहीं वाईट नाही. हे जाबालीचे वचन त्यांचे हृदय उघड करून दाखवितें. कसे का होईना, आम्हांला मात्र या निमित्तानें श्रीरामाच्या उपदेशामृताचा लाभ झाला. या संवादाने श्रीरामाच्या हृद्गत विचारांचे आम्हांला दर्शन झालें. धर्मपर मनुष्याला त्या धर्मप्रवणते पासून परावृत्त करण्याच्या अनेकांच्या अनेकानेक प्रयत्नांतून, इष्टमित्रांचा व बंधुबांधवांचा भिडेचा आग्रह आणि मान्यवर लोकांचा नास्तिक युक्तिवादहि प्रमुखत्वानें भाग घेतांना या ठिकाणी आम्हांला दिसून येतो. इकडे. आम्हीहि लक्ष पुरवावयाला पाहिजे. आपली धर्मश्रद्धा अनेक धर्मसंकटांच्या कसाबर लावून पाहात असतांना, आपल्या मृदुमधुर शब्दाच्या पाशांत अडकवूं पाहाणारा प्रेमीजनांचा आग्रह व आपाततः खरेंच लोभनीय ठरणाऱ्या विषमिश्रित अन्नासारखा प्रेमी पंडितांचा नास्तिकवाद, ही दोन्ही बराच त्रास देतात. राम राज्यांतले नागरिक होण्याची सिद्धता करणाऱ्या आधुनिक असल जनतेला श्रीरामाचे हे उदाहरण अनुसरण्यास आदर्शस्थानीय आहे. धर्मजीवन स मिळविण्याकरितां कशी मोठमोठी संकटे येतात, मोठमोठ्या धुरेची माणसेच कशीं इरेस पडलेली असतात, यांत कशा कशा कष्टपरंपरेला तोंड द्यावे लागते; कोण धैर्य, किती चिकाटी, कशी सहनशीलता पाहिजे याची कल्पना यावरून येईल. कितीहि कष्ट झाले तरी आपल्या तनुमनाचा अशा बाबतीत तोल सांभाळणेंच इहपरसुखाचा मार्ग होय. सन्मागांत नुसते कष्टच अनुभवावयाला लागतात. दुर्भार्गांत कष्ट अनुभवून नष्ट व्हावे लागते. आमच्या ठिकाणी श्रीरामा प्रमाणे यथार्थ धर्मश्रद्धा आणि निश्चल धर्मपरायणता असली, तर आतां असलेलें स्वराज्यहि रामराज्य बनण्यास विलंब लागणार नाही. थोड्याच अवर्धत रामराज्य होईल.

लोके न हि स विद्येत यो न राममनुव्रतः ॥(बा. रा. अ. कां.)

— श्रीरामाच्या अत्युत्कृष्ट धर्माचरणाचा उन्नत आदर्श सदैव डोळ्यापुढे ठेऊन न वागणारा, असा एकहि कोणी आखिल त्रैलोक्यांतच कधीं असू नये. श्रीरामाची लोकमान्यता आणि विश्वासार्ह व अनुकरणीय आचरण, यांचा धडा प्रत्येकानें अवश्य गिरवावा. अशा अनुकरणीय आदर्श जीवनाच्या प्रभेनेंच सर्वांचे मुखकमळ अतिशय शोभत असावें. यांत सौंदर्य आहे, यांत आरोग्य आहे, यांत आकर्षकता आहे, यांत सत्कीर्ति आहे आणि यांतच पराकाष्ठेचे सुख आहे. रामचरितानुगामी रामराज्यांत अवश्य अशीच प्रजा पाहिजे. सबंध रामराज्यांत कोणालाहि दैहिक, दैविक आणि भौतिक पापतापांचा कसला वारासुद्धां लागूं नये. ब्रह्मचर्य, न्यायनीति, परोपकार, दानधर्म, विद्वत्ता, दया, सत्य, सदाचार, सरलता, औदार्य, तप, विश्वबंधुता, पातिव्रत्य, एकपत्नीव्रत, उच्च ध्येयनिष्टता, गोड स्वभाव, अध्यात्मपरता, ब्रह्मात्मैक्य इत्यादि सर्व शुभलक्षणांनी रामराज्यांतील अखिल नागरिक, सदैव सुशोभित असोत. पौर्णिमेच्या, त्यांतहि शुद्ध व निष्कलंक असणाऱ्या अनुपमेय चंद्राप्रमाणें, दैविक संपत्तीच्या आखिल दिव्य सद्गुणांनी शोभायमान होऊन, आपल्या आदर्श शीलाच्या दिव्य प्रभेनें, अखिल विश्वभर सदैव उजळ माथ्यानेच हें भारत अखंड मिरवो; व आपल्या प्रमाणेच अखिल विश्वाला सभाग्य करो व जीवन्मुक्त करून सोडो.

‘रामराज्य’ या नांवाच्या या भारतवर्षाच्या राज्याला, श्रीरामच एक चक्राधिपति होय. सुमंताप्रमाणेच या रामराज्यांतील मंत्री असले पाहिजेत. अखिल सौम्य सद्गुण, ऐहिक सुखसाधनांत अनासक्ति, धर्मकार्यात तत्परता निःस्वार्थ राष्ट्रसेवा, विलक्षण बुद्धिमत्ता, उत्कट संघटनाशक्ति, अलौकिक प्रतिभा, आदरणीय चालचालणूक, इत्यादि आदर्श गुण सर्व मंत्र्यांच्या ठिकाणी नेहमी प्रकर्षाने असावेत. चातुर्वर्ण्य च लोकेऽस्मिन् स्वे स्वे कार्यों नियोक्ष्यति ।(बा. रा. बालकांड ) रामराज्याच्या शासनपद्धतीचे हें एक लक्षणच होऊन राहावयाला पाहिजे. चातुर्वर्णाच्या लोकांनी आपआपसांत कोणताहि कोप, ताप, राग, , द्वेष, असूया, तिरस्कार न ठेवता, आपआपल्या लोकहितकारी स्वधर्मोचित युक्त कर्माच्या ठिकाण, सुखासमाधानानें या रामराज्यांत असावें. श्रीरामाविषयीं नारदांनी वाल्मीकीला सांगितलेले ” चातुर्वर्ण्यं च ” इत्यादि उपर्युक्त वचन आतांच्याहि रामराज्याला लागू व्हावें.

प्रहृष्टमुदितो लोकस्तुष्टः पुष्टः सुधार्मिकः । 

निरामयो ह्यशोकश्च दुर्भिक्ष्यभयवर्जितः ॥ १ ॥

न पुत्रमरणं केचिद्रक्ष्यन्ति पुरुषाः क्वचित् । 

नार्यश्चाविधवा नित्यं भविष्यन्ति पतिव्रताः ॥ २ ॥ 

न चाग्निजं भयं किंचिन्नाप्सु मज्जन्ति जन्तवः | 

न वातजं भयं किंचिन्नापि ज्वरकृतं तथा ॥ ३ ॥ 

न चापि क्षुद्धयं तत्र न तस्करभयं तथा । 

नगराणे च राष्ट्राणि धनधान्ययुतानि च ॥ ४ ॥

भारताचें राज्य अगर्दी असेच रामराज्य व्हावें. रामराज्यांतील लोक प्रहृष्ट, प्रमुदित, तुष्ट, पुष्ट, संपूर्ण धर्मिष्ट, बलिष्ट, अरोगिष्ट, नित्य सुखिष्ट, अशोकिष्ट व सर्वोत्कृष्ट असे असावेत. आतां तर (दुर्भिक्ष्य) नसावेच, पण कधीतरी दुर्भिक्ष्य येईल की काय, ही भीतिहि या भारताच्या रामराज्यांत असतां उपयोगी नाहीं. जीवनाच्या अंत्य क्षणापर्यंत हि पुत्रमरणाची अनिष्ट ती कोणी ऐकलेली नसावीच. सबंध भारतवर्षाच्या रामराज्यांत विधवा व अपवित्रता शोधल्यासहि कुठे सांपडूं नयेत की असू नयेत. कुणालाच अकाली मरण येऊं नये. कोणीहि कधीं भाजून, बुडून मरूं नये. अपमृत्यु असा कुणालाच येऊं नये. वावटळ किंवा तुफान म्हणून कुणाच्या ऐकण्यांत सुद्धां नसू नये. कोणालाहि कधी अन्नाची चिंता भासू नये. चोरीछिनालीचा र ऐकूनहि कुणाला संस्कार असू नये. खेडींपाडीं, पुरे पट्टणें, अखिल राष्ट्र, न पाहावें तेथें धनधान्यांनी समृद्ध असावें. कोणताहि वर्णविद्वेष नसतां, हि स्वधर्मनिष्ठ असे पारमार्थिक दृष्टीचे विवेकी लोक भारतांत नांदावेत. आपल्या आचरणांनी जगाचेच त्यांनीं धन्यवाद व्यावेत. हें द्रव्यसंपत्तीचें व बी संपत्तीचें नांदतें राष्ट्र व्हावें, भारतीयांचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक तथा राष्ट्रीय जीवन आपल्या व्यावहारिक व पारमार्थिक अशा दोन्हीहि क्षेत्रांत, विश्वानुकरणीय व विश्वबंद्य व्हावें. भारताच्या प्रबुद्ध मनुष्यांत तर राहोच, ( पण ) कसल्या अप्रबुद्ध बालकांतहि कोणता दुर्गुण पाहूं म्हटला तरी दिसू येऊं नये. सर्वांचेंहि निर्व्यसनी जीवन असावें. आर्य संस्कृतीचा उच्च आदर्श सर्व जगांतच प्रसिद्ध असला पाहिजे. आदर्श मातापिता, आदर्श सति-पति, आदर्श सवती-सवती, आदर्श बंधु-भगिनी, आदर्श सापत्न बंधु, आदर्श कन्यापुत्र, आदर्श सासु-सासरे, आदर्श सासू सुना, आदर्श जांवाई-सासरे, आदर्श नणंदा-भावजया, आदर्श दीर-भावजय, आदर्श जावा-जावा, आदर्श स्वामी-सेवक या भारतांत नितांत सुखसंतोपाने नांदत असावेत. आदर्श शिक्षण, आदर्श देशबंधुत्व, आदर्श शिष्टाचार, आदर्श सभ्यता, आदर्श गुरु शिष्य-संप्रदाय, आदर्श समाज, उच्च विचारसरणी, उन्नत आचार, उत्कृष्ट नीति, आदर्श दीक्षा, मृदुमधुर वाणी, अचल विश्वास, दुर्दम्य धर्मनिष्ठा, हार्दिक प्रेम व सारेंच परिशुद्ध जीवन, रामराज्यांतून सर्वत्र दिसून आले पाहिजे. शुद्ध आचारविचाराचे बाळसे प्रत्येकाच्या तोंडावर उठून दिसत असावें. भारतांतल्या प्रत्येकाची स्थिति, कोरीव दिव्य आचरणाची असावी. रामराज्यांत एकहि कामी, कृपण, क्रूर, मूर्ख, नास्तिक, अविवेकी, दरिद्री, नीतिभ्रष्ट, ओंगळ आणि अधर्मी असता कामा नये. कितीहि परिशोधून बघितले तरी, एखादाहि अयोग्य मनुष्य सबंध भारतांतच सांपडतां कामा नये. भारताच्या मधुर विकासांनी विश्वच प्रफुल्लित झाले पाहिजे. जगाच्या स्फूर्तिकिरणांचें भारत में एक केंद्रच झाले पाहिजे. अध्यात्माच्या पायावरच प्रत्येकाच्या जीवनाचे मंदिर, गगनभेदी, आपल्या उन्नततेनें जगांतल्या तात्त्विक जीवनाचा जयस्तंभच होऊन राहावे. आर्य संस्कृतीचे जयघोष विश्वांतून दुमदुमून राहावेत. विश्वांतल्या कोणत्याहि भागांतून पाहिलें तरी भारताच्या धर्मध्वजाचे दर्शन व्हावें, इतका तो धर्मध्वज विस्तृत व्हावा, उन्नत व्हावा व विश्वभर फडकत असावा. त्याच्या अलौकिक वैभवाच्या दिव्य प्रकाशानें, समग्र विश्वच उजळत असावें, उत्साही व्हावे व आनंदपरवशतेनें त्याचे गोडवे गात असावें. असे हैं सनातन वैदिक धर्माचे अपार वैभव आहे. आर्य संस्कृतीची अशी ही अपार महती आहे. भारतीय रामराज्याची ही निशाणी आहे.

विश्वउदयाचलावर उदीयमान होत असणाऱ्या या विश्वधर्माच्या कीर्तिसूर्याचें तें अपार वैभव आणि तें असामान्य विभूतिमत्व पाहून, त्याच्या गुणगानाची दिव्य स्फूर्ति उत्पन्न होत नाही, असा विश्वांतच कोणी नाहीं. स्विस्त धमांचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या, मोनिअर नांवाच्या एकनिष्ठ खिस्तभक्तानें, प्रथम कुतूहलानें सनातन धर्माच्या ग्रंथांचे वरवर अवलोकन केलें. तेवढ्यानेच तो आकृष्ट झाला. परवशतेने आर्य धर्माच्या त्या सर्वातिश्रेष्ठते पुढे बिनम्र होऊन, त्या दिव्य आनंदमय प्रकाशापुढे स्वदेहाभिमान, स्वराष्ट्राभिमान, स्वधर्माभिमान, सर्व विसरून त्यानें खाली गुढघे टेकले व दोन्ही हात जोडून याची अनन्यतेनें स्तुति केली. आपल्या उद्धाराकरितां एकचित्तानें प्रार्थना केली. खोल अभ्यास केला व कायमचा भक्त झाला. त्याच्या तोंडचे कांही उद्गार पाहूं.

“Hinduism is all-tolerant, all-compliant, all-comprehen sive, all-absorbing. 

—‘हा सनातन हिन्दु धर्म सर्वसहिष्णु, अति थोर विचारांचा, सर्वसम,अतिविनयसंपन्न, विश्वव्यापक, सर्वसंग्राहक व सर्वांच्या अंतिम गतीचे सर्वाधिक श्रेष्ट स्थान आहे.” सनातन हिन्दु धर्माची मूर्ति तत्त्वज्ञानानेच घडविली आहे. हा जितका थोर, तितकाच तो विनयान्वित आहे. थोरपणाचा विनय हा अलंकार आहे. अति महान् वस्तूंतहि व्यापून त्याहूनहि हा जसा अत्यंत विशाल म्हणवून घेतो, तसाच अति सूक्ष्म परमाणूंतूनहि व्यापून, त्याहूनहि तो अति सूक्ष्म परमाणू म्हणवून घेतो. इतके झाले तरी तो जशाचा तसा सर्वातहि आपल्या अनंतपानेंच आहे. हा सनातन धर्म सर्वांचा आदिम व अंतिम धर्म आहे. आद्यंती असणारी वस्तु मध्येहि असते, या न्यायाने हा अनंत धर्म सर्वांचे मूळ, सर्वांचे लयस्थान व तसेच सर्वांच्या अस्तित्वाचे मुख्य अधिष्ठान आहे. विश्वांत विखुरलेल्या अखिल उच्च तत्त्वांचे हे सर्वसंग्राहक: मूळस्वरूप आहे. या तत्त्वमहोदधीचेच अणुरेणु जगांत इतस्ततः, आपल्या मूळस्वरूपाची जाणीव देत जीवांचा उद्धार करतात. विश्वांत पसरलेल्या अखिल तत्त्व किरणांना, आपल्यांत समाविष्ट करून हा सूर्याप्रमाणे आपल्या निरतिशय प्रकाशानें सदाचाच देदीप्यमान आहे.

“It is a living religion. It is scientific, carefully elaborated and practically valuable to all extent, not approached by any other religion in the world. “

~~“ केव्हांहि असणारा हा सनातन धर्म आहे. हा स्वतः चेतनरूप असून सर्वांनाहि चैतन्य आणतो. याची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. याची विचारसरणी तात्त्विक आहे. सर्व दृष्टीनेंहि हा परिष्कृत आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत जितकें याचे महत्त्व आहे, त्याचे तितकेंच महत्त्व व्यावहारिक क्षेत्रांतहि पण आहे. जीवनाच्या आखिल कार्यक्षेत्रांत याची तितकीच आवश्यकता आहे. ऐहिक तशा पारलौकिक उन्नतीचा हा उच्चतम कळसच आहे. आखिल जीव कोटीलाच अत्युन्नत अशा त्या ब्रह्मपदाची प्राप्ति करवून देण्यांत याचा हात खंडा आहे. याच्याइतकें उन्नतपद मिळवून देण्याचें, याहून इतर कोणत्याहि धर्माला शक्य होत नाहीं व जगांतला कोणताहि धर्म इतक्या उन्नत स्थितीला पोहोंचलेलाहि नाहीं. “

सर्व धर्मांचा तुलनात्मक दृष्टीनें संपूर्ण विचार करून, व त्याचा खोलवर अभ्यास करून झाल्यावर शेवटीं- ” I have found Hinduism to be the most satisfactory religion in the world ” म्हणूनच प्रत्येक पंडिताने आपलें वैयक्तिक मत दिलें. “ विश्वांतल्या अखिल धर्मांचा विचार आणि अभ्यास करून झाल्यानंतर, हा सनातन हिन्दु धर्मच एक मला अतिशय समाधानकारक असा आढळून आला. “

या सनातन हिन्दु धर्माचा राज्यपद्धति म्हणजेच श्रीराम राज्यपद्धति विस्तारभयानें नमुन्यादाखल याचा आपण थोडक्यांत विचार केला. याच कांहीं तत्त्वे समजून घेतली. वरील आंग्ल पंडितांच्या वचनांनीहि याचे महत्व लक्षांत येईल.

home-last-sec-img