Literature

हिंदू शब्दाच्या व्याख्या

श्रुतिस्मृत्यादिशास्त्रेषु प्रामाण्यबुद्धिमवलंब्य । श्रुत्यादिप्रोक्ते धर्मे विश्वासं निष्ठां च यः करोति स एव वास्तवहिन्दुपदेन वाच्यः । श्रुति स्मृत्यादि शास्त्राच्या ठिकाणीं प्रामाण्यबुद्धि बाळगून त्यांत वर्णिलेल्या धर्मावर जो संपूर्ण विश्वास ठेवतो व त्या निष्ठेनें जो वागतो तोच खरोखर हिन्दु. श्रुत्यादिप्रोक्तानि सर्वाणि दूषणानि हिनस्तीति हिन्दुः । श्रुत्यादि प्रमाण ग्रंथोक्त दूषणांचा ( दोषांचा ) जो विनाश करतो तो हिन्दु. ॐ कारमूल मंत्राढ्यः पुनर्जन्मदृढाशयः । गोभक्तो भारतगुरुर्हिन्दुर्हिसनदूषकः || (माधवादिग्विजय) – ॐ हेच सर्व मंत्रांचे मूल आहे. विषयवासना असेपर्यंत पुनर्जन्म आहे असे मानणारा, गोभक्त असणारा, भारतधर्माचे सिद्धांत गुरुस्थानीं ठेवून वागणारा, हिंसा निंद्य समजणारा हिन्दु होय. हिनास्ति तपसा पापान् दौहिकान् दुष्टमानसान् । हेतिभिः शत्रुवर्ग च स हिंदुराभिधीयते । ( पारि जातहरण नाटक ) – जो तपोबलानें स्वपरपाप व तनमनाचे दोष नष्ट करतो आणि तसेंच तीक्ष्ण शस्त्रांनीं दुष्ट शत्रूंचा नाश करतो तोच हिन्दु, आसिंधु सिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका । पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ।। ( स्त्रा. वीर सावरकर ) सिंधु नदाच्या उगमापासून हिन्दु महा सागरापर्यंत पसरलेल्या विस्तृत भारतभूमीला जो पितृभूमि आणि आपल्या तीर्थक्षेत्रांची पुण्यभूमि मानतो तोच हिन्दु.

यो वर्णाश्रमनिष्ठावान् गोभक्तः श्रुतिमात्रकः ।

मूर्ति च नावजानाति सर्वधर्मसमादरः ।। 

उत्प्रेक्षते पुनर्जन्म तस्मान्मोक्षणमीहते । 

भूतानुकुल्यं भजते स वै हिन्दुरिति स्मृतः ॥

जो वर्णाश्रमाच्या ठिकाणी निष्ठा ठेवतो, जो गोभक्त आहे, जो श्रुति मताचा लोप करीत नाहीं, श्रुतीला जो मातृस्थानी कल्पितो, जो त्या त्या मूर्तीत पाषाणादिकांची भावना न करतां सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाची भावना करतो, मूर्तिपुरताच देव न मानतां जो विश्वव्यापी देव मानतो, सर्व धर्मांचा गौरव राखतो, स्वरूपाच्या अज्ञानानें उत्पन्न होणाऱ्या भ्रामक विषयवासनांमुळे जन्म येतो असें जो मानतो, अज्ञान व अज्ञानोत्पादक विषयवासनांच्या त्यागानें आत्मज्ञान करून घेऊन जन्ममरणापासून मुक्त होण्याची जो इच्छा करतो, भूतमात्राच्या अनुकूलतेकडे लक्ष देऊन जो बागतो तो हिन्दु. हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्परः । वेदगो प्रतिमासेवी स हिंदुर्मुख्यशब्दभाक् ॥ हिंसेच्या अवलोकनार्ने जो दुःखित होतो, जो सदाचारतत्पर असतो, वेदाला जो मानतो, गाय आणि देव यांच्या प्रतिमेची जो पूजा करतो तो हिन्दु. गोषु भक्तिर्भवेद्यस्य प्रणवे च दृढा मतिः। पुनर्जन्मनि विश्वासः स वै हिन्दुरिति स्मृतः॥ गायीच्या ठिकाणी सर्व देवांचा वास आहे असें जो मानतो, सृष्टिस्थितीलयाला, सर्व मंत्रांना, सर्व देवतांना एक प्रणवच आधार आहे, असा ज्याचा दृढ विश्वास असतो, देहबुद्धीनें जन्म येतो असे मानून, आत्मज्ञानानें देहबुध्दीचा निरास करून जो आत्मनिष्ठेनें मोक्ष मिळवितो तो हिन्दु. हीनं दूषयतीति हिन्दुः । ( शब्दकल्पद्रुमकोश: ) – जें जें म्हणून कमी प्रतीचें, हीन, निंद्य व दूषणास्पद असते, त्याला जो त्याज्य मानतो तो हिन्दु. हिन्दुर्हिश्र्व पुंसि द्वौ दुष्टानां च विधर्षणे । रूपशालिनि दैत्यारौ । ( अद्भुतकोश ) – हिन्दु आणि हिन्दू हे दोनहि पुल्लिंगी शब्द दुष्टनाशक या अर्थी व दैत्यांचे शत्रु आणि सुंदर या अर्थी वापरले जातात. हिन्दुर्हि नारायणादिदेवताभक्तः । ( कविकोश – हिन्दु हा नारायणादि देवतांचा भक्त असतो.

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु नियमानामनेकता ।

उपास्यानामनियमो हिन्दुधर्मस्य लक्षणम् ॥ ( लो. टिळक )

-वेदांविषयी प्रामाण्यबुद्धि, इहपर दिव्य जीवनाला कारण असणाऱ्या अनेक नियमांचे परिपालन, अभ्युदय-निःश्रेयसांची प्राप्ति करून देणाऱ्या ऐच्छिक देवतेची उपासना हें हिन्दु धर्माचें लक्षण होय.

निष्कपटता आणि प्रामाणिकता ही हिन्दूंना ओळखण्याची दोन मोठी साधनें आहेत. हिन्दूंनी केव्हांहि अनैतिक वागणूक ठेवतांच कामा नये. हिंदु लोकांचे जीवन अकृत्रिम असले पाहिजे. हिन्दु हा धार्मिक प्रसन्न न्यायप्रिय, सत्यसंध, देवभक्त आणि गुरुभक्त असला पाहिजे. पातिक आणि एकपत्निव या हिन्दूच्या शीलांचा प्रकाश चोहीकडे फांकला पाहिजे. वर्णाश्रम हें हिन्दु संस्कृतीचें मुख्य अंग आहे. आपापले वर्णधर्म अनुष्ठानांत ठेवणारा हिन्दु होय हे लक्षांत ठेवावें. हिन्दुस्थानावर जें सर्वाचें उत्कृष्ट प्रेम आहे, तें खरोखरी त्याच्या अलौकिक गुणांमुळे व असामान्य नीति-न्यायामुळे आहे हे विसरूं नये. सर्व जगाला हिन्दुस्थान आदरणीय आहे तो सर्वचैत्र त्याच्या बौद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक संपत्तीमुळेच, हें हृदयाशी बाळगून असावें. अमृतपानानें आरोग्याची सर्व लक्षणे जशी एकाएकी अंगी बाणतात, त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञानाने सर्व सद्गुण अंगी बाणतात. ही आत्मनिष्ठा हिन्दु संस्कृतीचे मूळ होय, हे कोणत्याहि हिन्दूनें विसरता कामा नये. वेदोपनिषदांवरच ही हिन्दु संस्कृति उभारली आहे, हे हिन्दूनी लक्षांत ठेवले पाहिजे. सद्बुध्दि, सदाचरण, विश्वबंधुत्व, सत्य, अध्यात्मनिष्ठा, समत्व, परस्परप्रेमाची वागणूक, दया-दान-धर्म, उच्चविचार सरणी, उत्कृष्ट नीति इत्यादिकांमुळे ‘हिन्दु’ अखिल विश्वांतच प्रथम स्थान मिळवितात हे जाणून प्रति हिन्दूनें वागावयाला पाहिजे. आपल्या सत्कर्तीला कलंक लागेल असे आचरण प्राणान्तीहि खरा हिन्दु कधी करणार नाही. सत्कर्तिक प्राणापेक्षांहि अधिक प्रेम ठेवणें हें हिन्दूचे एक प्रधान लक्षण आहे. हिन्दुर्दुष्टो न भवति नानार्यो न विदूषकः । सद्धर्मपालको विद्वान श्रौत धर्मपरायणः । ( रामकोश ) हिन्दु हा केव्हांहि दुष्ट, दुर्जन नसतो, अविश्वसनीय नसतो. तो कधीहि हीन होत नाही. तो सज्जनांची निंदा करीत नाही. तो सदैव सध्दर्मपालकच असतो. तो स्वतः विवेक-विचारपूर्ण विद्वान असतो. तो वेदांनी घालून दिलेल्या आपल्या धर्मकर्माच्या ठिकाणी नित्य निरत असतो. हिन्दु लोक परमतसहिष्णु, आश्रितपालक, धर्माविरुध्द कोणी आक्रमण केल्यास त्याचे संरक्षणार्थ प्राण पणाला लावणारे असतात. आपग्रस्तांना शक्य तें साहाय्य करण्यास ते तत्पर असतात. हिनस्ति दुर्वृत्तिः इति हिन्दुः । -आपल्या अथवा दुसऱ्याच्या दुर्वृत्ति समूळ नष्ट करणारा तोच हिन्दु, स्वपर हृदयांत सद्वृत्तीचे वीं पेरून, सर्व दुईत्ति समूळ नाहीशी करणाराच हिन्दु हैं हिन्दूचें ब्रीदवाक्य आहे. हिन्दु लोक अखिल मानवजातीच्या अत्युन्नत हिताची अपेक्षा बाळगून असतात व तदनुकूल तें आचरण ठेवतात. सर्वांच्याबद्दल त्याच्या अंतःकरणांत दया असते. ते विश्वबंधुच असतात. त्यांचे कोणाशीह तत्त्वतः बैर असत नाही. त्यांचा धर्मपालनाचा आग्रह मात्र असतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे हिन्दु संस्कृतीच्या शरीराचे अनुक्रमे मुख, बाहू, मांड्या आणि पाय होत, हे विसरूं नये. शील हा हिन्दूच्या नसानसांदन वाहणारा एक मुख्य धर्म आहे. हिन्दु सभ्यता आखल विश्वांतच नांवाजलेली आहे. तिचा कोणत्याहिं हिन्दूनें लोप करूं नये.

home-last-sec-img