Literature

हें सारें देहाभिमानामुळे

नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ नवरीस नवरी नलगे। ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे। ब्रह्मांडबीज ।। नवरीचें मन नवऱ्यावरी । नवऱ्याचे मन नवरीवरी। ऐसी वासनेची परी । मुळींहून पाहावी ॥ वासना मुळींची अभेद । (ब्रह्मप्राप्तीची वासना दोघांनाहि सारखीच आहे, कारण दोषांचेंहि तें मूळरूप आणि खरें आनंदरूप आहे. अज्ञानाने कमाल करून, देह मी ही भावना निर्माण केल्या. नंतर स्त्रीपुरुषांचे जन्मस्थानच परस्परांना खरें आनंदरूप वाटू लागले. अशी आळीव भ्रामक भावना देहाभिमानामुळे झाली.) देहसमंधे जाला भेद । तुटतां देहाचा समंध । भेद गेला ॥‘ (दा.) १७-२-२० ते २३), मी देह नव्हेअसे झाल्यानंतर स्वतःला कोणी पुरुष अथवा स्त्री म्हणून मानणारच जर नाहीं तर मग स्त्रीपुरुष अभिमानानें स्त्रीपुरुषदेहांच्या ठिकाणी भोग्यबुद्धि ही उत्पन्न होईलच कशी ? स्त्रीपुरुषत्वाच्या भिन्नत्वाची देहाची जाणीव जाऊन त्या देहांतले मी भानच एक उरलें व आपल्या अद्वितीय ज्ञानरूपतेनें मुळाचा शोध घेऊन एकदा का तें आनंदघन ब्रह्म झाले की, मग कोण स्त्री, कोण पुरुष, कुठली कामवासना ! यापैकी एकाचाहि नुसता मागमूससुद्धा उरत नाहीं. नरनारीचे बीजकारण । शिवशक्तीमधे (प्रकृतिपुरुषांमध्ये) जाण | देह धरितां प्रमाण । कळो आलें ।। (दा. १७-२-२४) पुरुषास स्त्रीचा विश्वास | स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ||२९|| ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची माहागोडीं । ही मुळींहून चालली रोकडी । विवेके पाहावी ||३१|| मुळी सूक्ष्म निर्माण जालें । पुढे स्पष्ट दिसोन आलें । उत्पत्तीचे कार्य चाले । उभयतांकरितां ॥३२॥ मुळी शिवशक्ती (प्रकृतिपुरुष) खरें । पुढे जालीं वधुवरें। चौरयसिलक्ष विस्तारें। विस्तारली जे॥३३॥ येथे शिवशक्तीचें रूप केलें । श्रोती मनास पाहिजे आणिले । विवरलियांविण बोलिलें । (यांत काही अर्थ नाही म्हणून) तें वेर्थ जाणावें ||३४||’ त्या शब्दांचा काही उपयोग होत नाही म्हणून एवढे विवरण केले.

home-last-sec-img