Literature

हे जग परमात्म्याचेच

सृष्टीची निर्मिती, सृष्टी उत्पन्न करण्याचे ज्ञान म्हणजेच वेद, असा वेदांचा अर्थ होय, विश्वाची उत्पत्ति, स्थिति, लय इत्यादी कार्याचे परिज्ञान, जीवांच्या अभ्युदय श्रेयसाचे साधन, त्याचे लक्षण, अनेक योनी व अनेक जातींचे नामनिर्देशन आणि त्यांचे धर्म-कर्म इत्यादि सर्व काही वेदामध्ये समाधिष्टित होतात. अशा ह्या वेदांची उत्पत्ति परमात्म्याशिवाय इतर कोणाच्या हातून शक्य होईल ? इतर कोणाला शक्य आहे ? परमात्म्यापासून वेद व वेदापासून अखिल सुष्टि.

‘सर्वेषान्तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक् । वेदशब्देभ्य एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे ॥’

वेदापासून भिन्न भिन्न जाती, त्यांचे भिन्न भिन्न आचार, भिन्न | भिन्न कर्मे निर्माण झाली. आपापले विचार, धर्म-कर्म विचार समजाऊन । ध्यावयाचे असल्यास त्यासाठी वेद हेच केवळ प्रमाण आहेत हे स्पष्ट होते. ।

शब्द इति चेन्नातः प्रभावात् प्रत्यक्षानुमानाभ्याम् ।’ ह्या ब्रह्म मुक्ताद्वारे हेच सिद्ध होते.

‘यथा पूर्वमकल्पयत् द्याव्यापृथिवी जनयन् देव एकः । विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता, य एवैक उद्भवे सम्भवे च य एतद्विदुस्मृतास्ते भवन्ति ॥’ एकमेव परमात्माच. त्याने यथापूर्वक सृष्टी निर्माण केली. त्या एकमेव परेमात्म्यानेच स्वर्ग, मृत्यु, पाताळादि लोकांची उत्पत्ति केली. तो परमात्माच जगत्कर्ता व जगत्पालक होय. सृष्टीच्या उभव संभवात त्या एकमेव परमात्म्याचाच हात आहे असे जे कोणी समजतील ते मृत्युरहित असे परमात्मपद प्राप्त करून घेतील, परमात्मपदांत ऐक्य पावतील.

‘अक्षरात् सम्भपतीह विश्वम् ।’ अविनाशी अशा परमात्म्यापासूनच ह्या विश्वाची उत्पत्ति झालो. ह्या दृष्टीने विश्व उत्पन्न करणारा एकमेव परमात्मा व त्याच्यापासून विश्वाची स्थिती व मोक्षाचा बोध करणारे वेद’ हा एकमेव सर्वांचा धर्मग्रंथ असेहि स्पष्ट होते. ‘वेदन्तीति वेदः।’ जीवांचा अभ्युदय व निश्रेयस ह्या मार्गानी योग्य उपदेश करून त्यांचा उद्धार करणे ही गोष्ट उत्तम प्रकारे जाणणारे वेद होत. ऐहिक जीवन, परलोक प्राप्ति व परमात्मैक्यरूप करणाऱ्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपापल्या यातीनुसार असलेले मार्ग ज्यांच्या पासून देव-पितृ-मनुष्यादि जाणून घेतात त्यास ‘वेद’ असे नांव आहे.

‘आत्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये।’ मोक्षाची इच्छा करणा-या आत्मबुद्धीला उजळणाराच परमात्म्याला शरण जातो. ‘स नो देवः शुभया स्मृत्या संयुनक्तु ।’ तो परमात्मा शुभ अशा स्मृतींनी सर्व केव्हांहि परिपूर्ण असे करो, अशी परमात्म्याची प्रार्थना स्मृतीमधून सांगितली आहे. कोणताहि भिन्न भाव न करता वेद सर्वाना ‘अमृतस्य पुत्रः ।’ अविनाशी अशा परमात्म्याची मुले असे संबोधून हाक मारतात.

सोऽन्वेष्टव्यः स विजिज्ञासितव्यः । ज्ञात्वा देवं सर्वपाशापहानि । ज्ञात्वा देवं हर्ष शोको जहाति । ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपार्शः। तमात्मस्थं येऽनपश्यन्ति धीरास्तेषां सुखं शाश्वत नेतरेषाम् । तेषा शान्तिः शाश्वती नेतरेषाम् । य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति अर्थ दुःखमेवापियन्ति। तमेवं ज्ञात्वा मृत्युपाशाञ्छिदन्ति । तमेव विदित्वाऽतिमृत्युमेति । नान्याः पन्था किद्यतेऽयनाय ।’ अशा हा परमात्म्याचा शोध केला पाहिजे. त्याला जाणून घेतले पाहिजे त्याच्यामुळे सर्व पाश सुटतात. परमात्म्यास जाणल्यानेच जीव अनित्य अशा संसारातील हर्ष, शोक जिंकतो. परमात्म्यास जाणल्यानेच सर्व पाशातून मुक्तता होते. आपल्या हृदयांत वास करणा-या परमात्म्यास जाणणारास शाश्वत अशा सुखशांतीचा लाभ होतो. इतरांना ते दुर्लभ होते. त्या अविनाशी परमात्मस्वरूपास जाणणारे अमर होतात. पण इतरांना दुःख चुकत नाही. त्याचे स्वरुप जाणण्यानेच मृत्यूचे पाश तुटतात त्याला आत्मस्वरुपाद्वारे ओळखणे ह्या एकमेव साधनामुळे मृत्यु ओलांडता येईल, टाळता येईल. त्याच्याखेरीज जन्ममृत्युरुपी संसार पार करून जाण्यास अन्य उपाय याही. असें श्रुति सर्वाना सर्वसाधारणतः समजाऊन सांगते. ‘सयोह वै तत्परंमं ब्रह्मैव भवति, तरति पापमानं गुहा- ग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतोभवति’ मी तो ब्रह्मरूपी परमात्माच होय असें जाणणारा परमात्माच होतो व देहात्मबुद्धीपासून आपली सुटका करून घेऊन खात्रीने, निश्चितपणे तो अमृतस्वरुप होतो.

‘यथा नद्यः स्यन्चमाता: समुद्रेऽस्तं गच्छन्ति नामरुपे विहाय । तथा विद्वान्नामरूपाद्विमुक्तः परात्परं पुरुषमुपुपैति दिव्यम् ॥

‘निरनिराळ्या नद्या, ओहोळ समुद्रास मिळून आपलें नांव, रुष सोडून देतात त्याप्रमाणेच परमात्म्याचे ज्ञान असणारा ज्ञानी आपल्या नांवरूपापासून मुक्त होऊन स्वप्रभेनें उजळणाया, प्रकाशणाया सर्वातिश्रेष्ठ अशा परमात्म्याच्या स्वरूपांत पूर्णपणे एकरुप होऊन जातो.’ असें श्रुतिमाता सर्वांना वारंवार सांगत आली आहे.’

हातमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमञ्च दैवतम् ।

पति पतीनां परमं परस्ताद्विदाम देवं भुवनेशमीडयम् ॥

ईश्वराहुन महान ईश्वर असणाऱ्या अखिल देवतांचाहि महान देव असणाऱ्या, ब्रह्मा-विष्णु-महेशादि विश्वाच्या प्रभूचाहि प्रभु असणा-या, सर्वश्रेष्ठ व सर्वातीत असणाऱ्या ब्रह्माण्डस्तुत्य सत्य अशा परामेश्वरास आपण सर्वजण जाणून घेऊ या! समजून घेऊ या!’ अशी हांक आपल्या पूर्वज ऋषिमुनीहिं अखिल मानवजातीस दिली आहे.

यतः प्रसूताः जगतः प्रसूतिः । ज्याच्यापासून ह्या जगाची उत्पत्ति झालेली आहे; ‘यत्र विश्वं भवत्येकनीडम् ।’ ज्यामध्ये संपूर्ण जग शेवटी समूळ विलीन होईल, ‘तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत् । जो ह्या सर्व विश्वास उत्पन्न करुन त्या सर्वामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे, ‘न तस्येशे कश्च न तस्य नाम महद्यशः ।’ त्याच्यावर कोणीहि आपले शासन चालवू शकत नाही, सत्ता गाजवू शकत नाही त्याचे यश, कीर्ति, शक्ति, बल पराक्रम इत्यादि सर्वच सर्वापेक्षा अत्याधिक आहेत. ‘न तस्य कश्चित्पतिरस्तिलोके न चेशिता नैव च तस्य लिङ्गम् ॥ स कारणं करणाधिपाधिपो न चास्य कश्चिज्जनिता न चाधिपः।

तो परमात्माच सर्व देवांचा देव, तोच सर्वांचा स्वामी. त्यावर स्वामित्व गाजविणारा दुसरा कोणीहि नाही. सर्वदृष्टीने पाहिल्यास त्याच्या तोडीचा कोणीहि नाही. तो कोणत्याहि तोल मापाने मोजतां येत नाही. तो सर्व जगताचे आद्यकारण आहे. तोच सर्वांचे मूळस्वरुप. तोच मनइंद्रियादि सर्व गोष्टी करणाऱ्या अधिदेवतांचा अधिकारी व त्यांच्यावर शासन करणारी महाशक्ति आहे. त्याचा कोणीहि निर्माता नाही व त्याचा कोणी शास्ताहि नाही ‘आत्मनात्मानमाभिसम्वभूव । तो स्वतःच्या संकल्पामळेच स्वताचे रूप पावलेला असल्याकारणाने त्याला ‘स्वयंभु’ असे म्हणतात. एकमेव तोच ह्या जगाचे नियंत्रण करणारा आहे. ‘तस्मिन लोकाः श्रिताः सर्वे’ त्याच्यामध्येच सर्व लोकांचा अंतर्भाव होतो. त्याच्यापेक्षा वरचढ बनणे, त्याला जिंकणे हे कोणालाच शक्य नाही. ‘तेन कोऽर्हति स्पर्धीतुम् ।’ त्याच्याशी स्पर्धा करणारा, त्याच्याशी बरोबरी करणारा ह्या जगांत कोण आहे ? भूतानामधिपतिः ।’ हा सर्व भूतमात्राचा एकमेव अधिपति आहे. एष भुवनस्य नाथाः ।’ हाच विश्वाचा मालक. ‘एष विश्वाधिपतिः । हाच अखिल विश्वाचा शासनकर्ता स सर्वनेता भुवनस्य गोप्ता। संपूर्ण जगताचा तोच नेता असून रक्षणकर्ताहि आहे. ‘भयादस्याग्निस्तपति भयात्तपतिसूर्यः । भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पञ्चमः ।’ त्याच्या भयाने अग्निदेव आपला प्रकाश, ज्वाला इत्यादि कार्य करतो; सूर्यहि ठराविक वेळी उदय व अस्त पावतो. त्याच्या भीतीने इंद्र आपले अमरावतीचें राज्य चालवून वृष्टि आदि कार्ये नियमितपणे करतो, वारा वाहतो व यमहि योग्यळी प्राण्यांना घेऊन जातो अर्थात ह्यासर्व गोष्टी त्याच्यामुळेच घडत असतात. ‘य ईशे अस्य द्विपदश्च चतुष्पदः।’ द्विषाद व चतुष्पाद अशा मानव, पक्षी, पशु आदींचा हाच शासनकर्ता व त्यांच्यावर ह्याचाच अधिकार. ह्यासाठी तारूण्य, धन, विद्या, शक्ति किंवा शरीरसंपत्ति, अधिकार प्रभुत्व, राज्यमद ह्यांच्यामुळे अविवेकाला बळी न पडतां, हर्षयुक्त न होतां मदमत्त त होता. उमत्त न बनता सदासर्वदा ह्या परमात्म्यासमोर विनीतच राहिले पाहिजे. य ईशोऽस्य जगतो नित्यमेव नान्यो हेतविद्यते ईशनाथ ।’

मी हे केले, ते केले असा गर्व, अभिमान धरू नये. ह्या पर मात्म्याच्या सत्तेमुळेच हे सर्व जग चालते. जगावर राज्य करणाया राजांचा हा राजा आहे. ह्याच्याखेरीज हे विश्वनियंत्रणकार्य दुसरा कोणीहि चालवू शकणार नाही व ह्या जगाला दुसरा कोणीहि कारण नाही. त्याच्या सत्तेशिवाय वाळलेले पानहि हलू शकत नाही. सृष्टि, स्थिति, लय, प्रवेश व नियमन ही परमात्म्याची पांच कार्य आहेत.

सर्वत्र आश्चर्य करण्यासारखे हे विश्व असून परमात्म्याच्या विचित्र शक्तीचे हे कर्तृत्व पाहिल्यावर त्या प्रभूच्या अचित्य शक्तीचा अतयं विलास कोणालाहि अगदी आश्चर्यचकित करून सोडतो. आकाश, वायु, अग्नि, जल, भूमी ही एकमेकात, एकामध्ये एक असलेली पाहिल्यावर एकापेक्षा एक महदाश्वयं निर्माण होते. एवढे मोठे हे विश्व पाण्यावर तरंगत आहे नाआकाश नावाच्या अमर्याद पोकळीत दिसून येणारा जगद्विलास पाहिल्यावर कोणाचीहि बुद्धि कुंठितच होईल व आश्चर्याने मन चकित होऊन स्तब्ध होईल. ‘सर्वाश्चर्यमयं नभः ।’ सूर्य, चंद्र, लुकलुकणाऱ्या अनंत ताऱ्यांचा विलास, संध्या समयीचे दृष्य, प्रातःकालादि त्या त्या समयींचे वातावरण ही सर्वच एक प्रकारची मृदु-मधुर संवेदना निर्माण करून हृदयाला उचंबळून सोडतात. महाविशाल अशा सागरास कोणी मर्यादा बांधून दिली? डोळयामधील तेज कोणी निर्माण केले? त्यांचा पहाण्याची शक्ति कोणी बरे दिली? देहातील कोणत्याहि भागांत दिसून न येणारे मन, कोठेहि न आढळणारे मन, देहात राहून बाह्य पदार्थांना कसे जाणते ? आपल्या असंख्य विचारासाठी उद्भवणाऱ्या दृश्यांच्या परिज्ञानाचा विचार केला तर किती आश्चर्य वाटते ? एका रजःरेताच्या बिंदूमध्ये करचरणादींचा अंकुर होऊन, प्राणकलांनी भरून, वाढून बाहेर येऊन, मातेचे दूध पिवून शैशव, बाल्य, कौमार्य तारुण्य, प्रौढता, वृद्धत्व इत्यादि अवस्था धारण करणे आणि त्या त्या अवस्थानुसार वागणक, आचार, खेळ, अभ्यास, व्यवहार इत्यादि करणे हा त्या परमात्म्याचा व्याप, खटाटोप, व्यवहार पाहिल्यावर कोणाला आश्चर्य वाटणार नाही ? असा खेळ करून दाखविणे दुसऱ्या कोणाला शक्य आहे ? श्वासोच्छवासरूप असलेल्या प्राणाच्या क्रियेपासून तो इंद्रियांच्या सर्व कार्यापर्यंत सर्वच गोष्टी आश्चर्य निर्माण करीत नाहीत का? देहामध्ये कोणता प्रकाश आहे ? त्यास परिज्ञान कसे होते। खाल्लेले अन्न, प्यालेले पाणी, रसरक्तादि धातूमध्ये कसे काय रूपांतरित होते? एखाद्या गहाळांत गुळ तयार करावयाचा असल्यास त्यासा कितीतरी माणसे, कितीतरी साधनसामुग्री ती मोठी भट्टी, मोठा अनि इत्यादींची आवश्यकता असते. पण ह्या शरीरात तसे काहीहि दिसता घडणाऱ्या सप्तधातूच्या कार्याकडे पाहिल्यास कोणाला बरे आश्चर्य वाटत नाही?

इतर कोणीहि सहकारी किंवा सहाय्यक नसताना आपल्या संकल्पमात्रानेच हे सर्व जग परमात्म्याने रचिले आहे, असे असल्यामुळेच ‘ हे जग त्या परमात्म्याचे, स्वतःचेच, स्वतःच घडविलेले असून आपण सर्वजण त्याच्या अधीनच !!

home-last-sec-img