Memories

५. तस्मै श्री गुरवे नमः

कु. रेखा आलेगांवकर

महाराष्ट्र ही संताची जन्मभूमी आहे. त्यांनी जगाचा उद्धार करुन अमर कीर्ति मिळविली. कलियुगात अधर्म
मातला, धर्ममार्ग लुप्त झाला आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीधर स्वामींच्या रुपात श्रीदत्तप्रभुनी अवतार घेतला.

स्वामी आपल्या भ्रमण मागांत फिरत फिरत . . १९५९ साली श्रीदत्त जयंती उत्सवप्रित्यर्थ भाग्यनगरास आले त्यांचा पुष्कळ अनुभव आम्हाला आलेला आहे.

नारायणबुवांच्या मठात स्वामींनी पदार्पण केले. भक्तमंडळी आपल्या प्रिय स्वामीजीचे प्रवचन ऐकून तृप्त झाली स्वामींचा जयजयकार करीत आपापल्या घरी गेली. माझे मामा मात्र कोपऱ्यात चिंतातूर होउन बसले होते. प्रवचन संपल्याचेही भान त्याना नव्हते स्वामींचे लक्ष मामाकडे गेले आणि त्यांनी आपल्या शिष्याला पाठवून बोलावून घेतले. “बाळा, तूं इतका विचारमग्न राहण्याचे काय कारण आहे ?”

त्याचे निवारण करण्यात येईलमामा म्हणाले, “मी दुःखी आहे, मला नोकरी नाहीबाळा! तु पाच शुक्रवार आणि पाच पोर्णिमेचे उपवास कर. समर्थ तुझी इच्छा पूर्ण करतील. संतांची वाणी कधीतरी असत्य होईल काय? त्याचप्रमाणे माझ्या मामानी उपवास केल्याबरोबर, पाचव्या पोर्णिमेला, सरकारी नोकरी मिळाली त्यांचा परिवार सुखी आहे.

माझी बहिण चित्रा एक वर्षांची होती. ती फार आजारी होती. ती वाचण्याची शक्यता नव्हती त्याच वेळस स्वामीजींचे प्रवचन सोमाजीगुडा येथे होत असे. माझी आजी म्हणाली. ” सोमाजीगुड्यात महाराज आले आहेत. हिची तब्येत गंभीरच आहे; तथापि आपण हिला महाराजांच्या चरणावर घालू. नंतर काहीही होवो. ” आई आणि आजी बहिणीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेल्या. स्वामींची पूजा होऊ लागली. इकडे माझ्या बहिणीचे प्राण खालीवर होऊ लागल. अंतर्यामी स्वामींनी पूजा थांबविली आणि कोपऱ्यात बसलेल्या आईला बोलावून घेतले. स्वामी म्हणाले, ” बाळा ! तुझी मुलगी फार आजारी आहे. तूं सर्वांच्या भीतीमुळे, माझ्याजवळ तिला आणली नाहीस. आता मी हिला तीर्थ अंगारा देतो. या मुलीला कोणी फरशीवर आपटले तरीही, देवाघरचे मरण आल्याशिवाय, कधीही आजारी पडणार नाही.!”

गजानन महाराजांनी जानराव देशमुखाना जसे जीवदान दिले, तसे स्वामींनीही माझ्या बहिणीला तीर्थ अंगारा देऊन प्राणदान दिले. आज तेवीस वर्ष झालेल्या बहिणीचे लग्न होऊन तीला मूलबाळ झाले पण स्वामींच्या आशीर्वादाने ती कधीही आजारी पडली नाही. ती आपल्या संसारात सुखी आहे.

माझे अनुभव वाचून, आणखी कोणाला, स्वामींच्या सेवेची प्रेरणा झाली तर मी धन्य समजेन.

home-last-sec-img