Memories

१. प्रसाद

किशनराव चिंचोलीकर

माझे मामा दासराव तोरम् कर (सोनटक्के) हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी हैद्राबादी आले. महाराजांचा जन्मउत्सव मठात पाहिला आणि त्याचबरोबर मनात संकल्प केला की माझे मनोरथ पूर्ण होवोत, तसे झाल्यास मी अमुक अमुक करीन. गेल्याबरोबर त्यांचे शेतीचे प्रश् सुटले मुलाचे लग्न ठरले. नंतर त्यांनी जो काही संकल्प केला होता तो श्रीक्षेत्र वरदपूरला पूर्ण केला.

दुसरा अनुभव त्यांच्या सुनेच्या बाबतीत आला. सुनेला मूलबाळ होईना या चिंतेत त्यांच्या पत्नी होत्या. त्या वेळेस काही कारणानिमित्त मी तिथे गेलो, त्यांच्याबरोबर बोलण्याची गोष्ट निघाली आणि त्यांना स्वामीजींची पोथीश्रीधर विजयवाचावयास सांगितले एक महिन्यानंतर त्याचे फळ मिळाले त्यांना नातू झाला मुलीचे पण लग्न झाले हे सर्व श्रीधरस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने !

home-last-sec-img