Memories

३. मऊ मेणाहूनी

सौ नागरत्ना कुलकर्णी

मी आपणाला माझ्या वन्संच्या जीवनातील, श्रीधर
स्वामी महाराजांचा, मला माहित असलेला अनुभव सांगणार आहे. . . १९६० सालातील घटना. माझ्या वन्संचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांचे सासर धारवाड जिल्हयातील सिकगाव येथे होते. त्यांचे यजमान शाळेत मास्तर आहेत. घरी सासु सासरे होते. गावाकडे विहीरीचे पाणी असते. त्या घागर घेउन, एका सायंकाळी पाणी आणावयास गेल्या विहीरीला पायऱ्या होत्या. चार दोन पायऱ्या उतरल्या, घागर खाली ठेवली आणि नुसते रडणे, बोलेनात, चालेनात, खाली उतरेनात आणि वरही येईनात. बायकांचा घोळका जमा झाला आणि घरी आणले; घागर ठेवून दिली. गावांतल्या वैद्य, डॉक्टरना बोलाविले. त्यानी तपासून सांगीतले की यांना रोग आजार वगैरे काही झालेले नाही; इतर कांही असल्यास तुम्ही ते पहा. लोक जमले, त्यापैकी एकाने सांगीतले की इथून पाच मैलावर श्रीधर स्वामी उतरले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे न्या निश्चित उपयोग होईल. मग बैलगाडी करुन मास्तरांनी त्यांना स्वामींकडे नेले. स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींनी विभूति दिली, आंघोळ घालावयास सांगितली ती वस्त्र टाकन द्यावयास सांगितले. रोज विभूति लावावयास सांगितली. तेंव्हापासून आतापर्यंत, माझ्या नणंदेला पुन्हा तसा त्रास झाला नाही. अशा रीतीने स्वामीजींच्या कृपेमुळे माझ्या वन्सना विनासायास लाभ झाला हे निश्चित. आता सध्या त्या विजापूरजवळ इरकल येथे आहेत.

सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजकी जय !

home-last-sec-img