Memories

१५. कनवाळू सद्गुरुमाऊली

नारायण कृष्ण किंकर, कोल्हापूर

ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. वैशाख महिना होता. श्रीस्वामीजी सज्जनगड करून संचारार्थ समर्थ सेवा मंडळाच्या मोटारने बाहेर जावयाचे होते. दुपारी बाराच्या सुमारास गड उतरण्यास सुरवात झाली. शेपन्नास शिष्य भक्तमंडळी सोबत होती. श्रीस्वामीजी अनवाणी होते. तसेच आम्ही सर्व अनवाणीच गड उतरत होतो. पायथ्यालगत मोटार होती. सर्वांनी दर्शन घेतल्यावर श्रीस्वामीजी मोटारमध्ये चढले. मिनिटे झाली तरी मोटार सुरू होईना. तेव्हा श्रीस्वामीजी कळवळून म्हणालेमोटार ताबडतोब सुरू करा. माझ्या पायाला चटके बसत आहेत. मोटार निघाल्या शिवाय ही मंडळी हलणार नाहीत. श्रीस्वामीजींचे हृदय भरून आले होते. त्यांच्या शब्दांत प्रेमाची आर्तता श्रवत होती. हे पाहून माझे डोळे पाणावले क्षणभर पायाला चटके बसत आहेत हे विसरून गेलो.

एक दिवस माझ्या मुलाजवळ माझ्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी केली. तो गडावर स्वामीजींच्या सेवेस राहिला होता. त्याने सांगितलेआई, आँध (पुणे) येथे सरकारी टी. बी. हॉस्पिटलमध्ये आहे.’ स्वामीजींनी मुलास तिला आणण्याची आज्ञा केली. कशी तरी खटपट करून तिने रजा मिळवली. श्रीस्वामीजींनी तिच्या अंगावरच्या बाधा काढून टाकल्या. तिची प्रकृती तत्काळ सुधारली. रजेच्या मुदतीपेक्षा दिवस जाण्यास तिला उशीर झाला. त्यामुळे ती परत गेली तरी तिला तेथे दाखल करून घेईनात. खटपट करून रिऍडमिशन तिने मिळवली. नियमाप्रमाणे पुन्हा तिची शारीरिक तपासणी झाली आश्चर्याची गोष्ट अशी की डॉक्टरनी सांगितलेआतां टी. बी. मुळीच नाही. तुम्ही ताबडतोब येथून जा. नाहीतर दुसऱ्या रोग्यामुळे पुन्हा टी. बी. होईल.’

एका फौजदारी केसमध्ये मी अडकलो होतो. वास्तविक मी निर्दोष होतो. पण पुरावा संपूर्णपणे मला अडकवण्याइतका होता. मी समक्ष श्रीस्वामीजींची गांठ घेवून वस्तुस्थिति सांगितली. ‘काळजी करू नको.’ असे त्यानी सांगितले. मी एकांतात श्रीस्वामींना सतत आळवत असे. इतका तद्रूप मी पूर्वी क्वचितच झालो असेन. आश्चर्य असे की, मी निर्दोषी म्हणून सुलाखून बाहेर पडलो. श्रीस्वामीजींच्या अलौकिकत्वाची आणखी एक प्रचिती गांठीस बांधली.

श्रीस्वामीजींच्या पादुकांचा मुक्काम राधाकृष्ण मंदीरात होता. रामनवमीचा दिवस होता जन्मोत्सव कीर्तन सरू होते. मिनिटांत लय लागला. श्रीस्वामीजींनी अनेक देह धारण केल्याचे दृश्य मंडपांत मग दिसले. पादुकांच्यावर एक दिव्य तेजोमय रूपांत श्रीस्वामीजी दिसत होते. माझे डोळे मिटले होते ते श्रवत होते. जणू त्यांचा अभिषेकच श्रीस्वामीजींच्या चरणांवर सुरू होता.

home-last-sec-img