Memories

२०. अपघातातून सुरक्षित

मधु मुळे  

श्रीसदगुरुमाउलींच्या पादुकांचे तीर्थ व मंत्राक्षताचे २-३ दाणे घेतल्याशिवाय बाहेर पडावयाचे नाही असा माझा नियम आहे. एकदा जरूरीच्या कामासाठी मला बाहेर गांवी जावे लागले. प्रवास एस. टी. ने होता. मी गाडीच्या उजव्या बाजूच्या बाकावर खिडकीशेजारी बसलो होतो. गाडी सिन्नरचा घाट चढू लागली व चढतां चढतां ती रस्त्याच्या उजवीकडील संरक्षण दगडाजवळून खाली घसरत असलेली मी पाहिली. तात्काळ ती गाडी आपल्या उजव्या बाजूवर कलंडली. एकदम आरडा ओरडा झाला व झालेल्या घटनेची कल्पना आली. गाडीतील प्रवाशांपैकी २-३ मृतप्राय जखमी झाले, कांही गंभीररित्या जखमी झाले. तसेच माझ्याखेरीज गाडीतील इतर सर्व प्रवाशी, ड्रायव्हर, कंडक्टर हे सुद्धा कमी जास्त प्रमाणांत जखमी झाले. मी खिडकीजवळ बसलेला असूनहि त्या खिडकीच्या फुटलेल्या कांचेचा कणहि मला लागला नाही. शरीरावर साधा ओरखडाहि नव्हता व कपडयावरहि कोणतीच खूण नव्हती. गाडीतून मी प्रथम बाहेर पडून एकेकास बाहेर काढू लागलो.

हया घटनेने मला श्रीगुरुपादुकातीर्थाचे व मंत्राक्षतांचे किती मोठे संरक्षण असते हे पटले व श्रीगुरुमाउलींच्या हया कृपाप्रसादानेच मी सुखरूप राहिलो अशी माझी खात्री झाली.

भगवान सद्गुरु श्रीधरस्वामी महाराजांचा जयजयकार असो !

home-last-sec-img