Memories

२३. श्रीस्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व

चि. गं. वाघोलीकर

मी असाच एका  ठिकाणी माझ्या काही कामानिमित्त जात होतो. रस्त्यांत एके ठिकाणी खूप गर्दी जमलेली होती, म्हणून सहज तिथे जाऊन बघितले. तो तेथें एक वेडा माणूस मोठमोठयाने शिव्या देत असून, स्वतःलाच मारून घेताना दिसला. सर्वांनाच त्याची दया येत होती. त्याप्रमाणे मलाहि त्याची दया आली व मनात म्हणालो, ‘दुर्दैव त्याचे, दुसरे काय?’ मीहि इतरांप्रमाणे त्याच्याकडे बघत होतो. मनांत श्रीस्वामींचे नामस्मरण चालूच होते, आणि काय चमत्कार? विश्वास ठेवा अगर ठेवू नका. पण तो माणूस हळूहळू शांत होऊ लागला व माझ्याकडे पाहून मला नमस्कार करू लागला. सगळे लोकहि माझ्याकडे पाहू लागल्याने, इकडे तिकडे बघून जसे इतर लोक हळूहळू  जावयास लागले त्या प्रमाणे मीहि तेथून निघालो. थोडेसे पुढे गेल्यावर मागे वळून पाहिले तेव्हा तो वेडा माणूसहि तेथून निघालेला मी पाहिला. अशी आहे माझ्या गुरुमाऊलीच्या नांवातील शक्ति !!

– श्रीधर संदेश (अश्विन १९०७)

सन १९८५

home-last-sec-img