Memories

३२. आणि स्वामींनी पुढील भेट निश्चित केली

चिंतामण गंगाधर वाघोलीकर

श्रीमत् . . भगवान श्रीधरस्वामींचा मुक्काम कनकेश्वरला होता. म्हणून मी दिवस गुरुसेवा करण्यासाठी मुद्दाम रहावयास गेलो. रोज रात्री आठच्या सुमारास स्वामीजी झोपण्यासाठी जवळच असलेल्या टेकडीवर, श्रीस्वामींसाठी गु. बं. गुरुपादमूर्तीनी बांधलेल्या लहानशा कुटीत जात असत. तेथे ते जात असतां मीहि श्रींचा कमंडलू व्याघ्रांबर घेऊन त्यांच्याबरोबर जात असे. असेच एकदा रात्री साडेआठ वाजता झोपण्यास जाण्यासाठी निघणार तोच एक वयस्कर बाई हातांत श्रीफल घेऊन स्वामींच्या दर्शनार्थ आली. ती स्वामींकडे पहात होती पण त्यांचे तिच्याकडे लक्ष्य नव्हते. माझें मात्र दोघांकडेहि लक्ष्य होते. म्हणून मी स्वामींना म्हणालो, ‘त्या आई तुमच्याकडे आल्या आहेत. त्या आईंनी आपल्या हातातीलश्रीफळ स्वामीजींना देऊन वाकून नमस्कार केला.  तेव्हा स्वामीजींनी बाईंना विचारले की, ‘आई तूं माझ्याकडे कशासाठी आलीस?’ त्या बोलण्याचा उलगडा त्या बाईंना झाला नाही. त्यावासूनच स्वामींच्याकडे बघत राहिल्या. परत स्वामीजींनी प्रश्न केला की, ‘आई, तुला काय पाहिजे?’ तेंव्हा त्या बाई म्हणाल्या,’माझे मालक स्वभावाने चांगले शांत होते. त्यांना नोकरी पण चांगली होती. ते जाऊन १५१६ वर्षे झाली. मला तीन मुले, ती पण चांगली शिकलेली आहेत. त्यांना चांगल्या नोकया आहेत. तीघांचीहि लग्ने झालीत. त्यांना मुलेबाळे आहेत. सुना, मुले नातवंडेहि माझ्या मताप्रमाणे वागतात. मला कधीहि दुखवत नाहीत. दोन मुली असून त्यांचीहि लग्ने झाली आहेत. जावई पण चांगले शिकलेले, घरंदाज आहेत. मुलींनाहि मुले आहेत. त्यामुळे मला या जन्मी काहीहि कमी पडले नाही. यावेळेपर्यंत सर्वकाही ठीक आहे. या जन्माप्रमाणे पुढील जन्मी पण मला असाच जन्म येवो एवढीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. हे ऐकून स्वामीजी हसले मला मंत्राक्षता आणण्यास सांगितले. मी मंत्राक्षतांचे ताट स्वामीजींना आणून दिल्यावर त्या बाईने दिलेले श्रीफळ मंत्रून तें मंत्राक्षता त्या बाईंना दिले आई सुखी रहाम्हणून आशीर्वाद दिला. तिने स्वामींना नमस्कार केला ती निघून गेली आम्हीहि झोपण्यासाठी निघालो. त्या वृद्ध बाईने मागितलेला आशीर्वाद माझ्या मनांत सारखा घोळत होता. टेकडीवर चढतांना उतरतांना रोज आम्ही निरनिराळया विषयांवर बोलत असू. आज अनायासेच मी त्या वृद्ध बाईच्या आशीर्वादाचा विषय चालू केला. ‘स्वामीजी, माझ्या पुढील आयुष्याचे काय? तुम्ही मला पुढील जन्मी कोठे भेटणार? कां या जन्मीचीच तुमची माझी शेवटची भेट !’ हे ऐकून स्वामीजी मोठ्याने हसले म्हणाले, ‘तुला आता ते काय करावयाचे. बघू या पुढे.’ पण माझे मन शांत राहीना. मी परत तोच प्रश्न स्वामीजींना केला.  ‘स्वामीजी आत्ताच्या आता माझे एवढे काम कराचम्हणून मी आग्रह धरला. तेव्हा स्वामीजीतू वरती आल्यावर तेथील लोकांना तुला माझ्याकडे घेऊन येण्यास सांगेन. कांहीही काळजी करूं नकोसअसे म्हणताचम्हणजे स्वामी आपली पुढील जन्मी अपॉइंटमेंट निश्चित आहे नां?’ असे मी उद्गारलो. त्यावरहोय बाळ, होय. नक्की भेट होईल. काळजी करूं नकोस.’ असे स्वामीजी म्हणाले. तेंव्हा मी म्हटले, ‘स्वामीजी बघा ! ही आपली वरती भेट नक्की ठरली ना?’ तेव्हा स्वामींनी मला जवळ घेतले पाठीवर हात फिरवीतहोय बाळ, नक्की पूढील जन्मी भेट होईल काळजी करू नकोस.’ तो पर्यंत आम्ही वरच्या कूटींत पोहोचलो होतो. तेथे जातांच मी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला पण माझे मलाच कळत नव्हते की मी एका निराळया वातावरणांत होतो. म्हणून स्वामीजींनी मला उठविले बाळ, डोळे पुस, शांत होअसे म्हणून माझ्या पाठीवरून परत हात फिरवून मला शांत केले. तरी पण डोळ्यांतून बराच वेळ पावेतो आनंदाश्रु ओघळत होते. कारण पुढील जन्मी स्वामीजींची भेट निश्चित! स्वामींची अपॉइंटमेंट नक्की झाली. धन्य झालो! माझ्या जन्माचे सार्थक झाले.!!

श्रीधर संदेश (फाल्गुन १९०७)

सन १९८५

home-last-sec-img