Memories

३५. चालविती हाती धरोनिया

भिबोकंद वाडे  (ठाणे

मला स्वत:स स्वामीजींचे प्रत्यक्ष दर्शन व अनुग्रह मिळाला नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो. तथापी स्वामीजींचे महान कार्य, त्यांचे वाङ्मय सास-याकडून व इतर भक्त गणाकडून ऐकलेले सत्य अनुभव हे सर्व ऐकून मी प्रभावित झालो. थोर विचारवंतांनी, आचार्य अत्रे सारख्या प्रगाढ पडितानें अग्रलेखाद्वारे स्वामीजींचा केलेला गौरव ऐकून खरोखर माझ्यासारख्या नगण्य माणसास स्वामीजींचे दर्शन झाले नाही याचा अत्यंत खेद वाटतो, परंतु त्यांचा हितोपदेश लक्ष्यांत घेता शरीरे ही बाहयस्वरूपे आहेत. त्यांना अंतःकरणांत बघायचे. त्याप्रमाणे स्वामीजी अजरामर आहेत. ते समाधीमधूनहि दिव्यत्वाचे संदेश अजूनहि देत आहेत व देत राहातीलच.

दोन वर्षांपूर्वी स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेण्याच्या हेतूने वरदपूर येथे जाण्याचे ठरविले, मी, माझी पत्नी व एक मित्र व त्याची पत्नी असे निघालो. तिकडे कन्नड भाषेचा प्रश्न, रात्री सव्वा वाजण्याचे सुमारास सागर येथे पोहोचलो. तेथे मोठी यात्रा भरली होती. आम्ही प्रवासाने खुप थकलों होतो. पण बस स्टॅन्डवर झोपावे अशी परिस्थिती गर्दीमुळे शक्य नव्हती. रात्रीच आश्रमात जावे म्हटले तर सागरपासून जंगलातील रस्त्याने ६-७ कि मि. दूर रात्रीच्यावेळी सहपरिवार जाणे धोक्याचे वाटत होते. त्यांत भाषेचा प्रश्न तर मोठाच होता. शेवटीं दृढ विश्वासाने निर्णय घेतला. आपण स्वामीजींच्या प्रेरणेनेच आलो. आता सर्व काही त्यांच्यावर ! ‘असा विचार करून रिक्शा ठरविली. रिक्शा चालकाने त्यांचा ३-४ वर्षांचा छोटा मुलगा वाटेत गप्पा मारण्यासाठी बरोबर घेतला व आम्ही रात्री अडीचच्या सुमारास आश्रमांत सुखरूप पोहोंचलो. तेथील व्यवस्थाहि त्यानेच लावून दिली व मग तो गेला. हा श्रद्धेचा भाग आहे याचा प्रत्यय प्रत्यक्ष आला.

आदरणीय गरू श्रीमत् सच्चिदानंद स्वामीजींनी वरदपूरचे भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे क्षेत्र अखंड परिश्रमाने विकासमान करण्याचे यशस्वी प्रयत्न चालविले असून त्या कार्यात सर्वांनी सहभागी होऊन देशभर श्री श्रीधरस्वामींचे विचार कार्य प्रसारित करावे अशी नम्र अपेक्षा !

स्वामीजींचे महान कार्य, नव तरूणाना हा संदेश । 

‘धर्मो रक्षति रक्षितः’ सर्वांसाठी हितोपदेश ||

– श्रीधर संदेश (चैत्र १९०८)

सन १९८६

home-last-sec-img