Memories

४०. मुलगा बरा झाला

. शं. दावलभक्त, पुणे  

॥ श्रीराम समर्थ ।।

एक स्त्री साष्टांग दंडवत घालीत आपल्या लहान मुलास घेऊन येत होती. श्रीगुरुमाऊलींनी’ ती बाई येत आहे तिला वाट द्या, त्रास देऊ नका. अशी आज्ञा केली. बाईला व मुलाला पाहाताच गुरुमाउली म्हणाली, ‘बाई तुझा मुलगा अल्पायुषी आहे. काय करूं? तुझ्या अखेरीपर्यंत आयुष्य मागू का? बाई म्हणाली महाराज, आमच्या वंशात आता एवढाच मुलगा. त्यालाहि फेपरे येते! वंशवेल वाढावा म्हणन बाई रडु लागली.

श्रींनी ब्रह्मदेवाशी बोलणें सूरु केले. १५-२० मिनिटांत कौल मिळाला व सांगितले ‘बाई, तुझ्या मुलाला ब्रह्मदेवाने पुर्णायुषी केलें बरें! तुझ्या अंगणात एका सत्पुरुषाने औदुंबर लावला आहे तो आज १५० वर्षांचा आहे. त्याला पाणी नाही, दिवा नाही काही नाही. तो बाई रडू लागली. मग पाणी,प्रदक्षिणा, दहिभाताचा नैवेद्य रोज दाखवशाल का? असे श्रीनी म्हणताच ‘आम्हाला कल्पना नाही! आपण सांगितल्या प्रमाणे सर्व करीन महाराज! मुलावर लक्ष ठेवा!’ श्रीसद्गुरुमाऊलींनी प्रणवाने त्या मुलास पाणी दिले. त्याचे फेपरे वगैरे सर्व गेले. 

श्रीधर संदेश (शके १९०८ सन १९८६)

home-last-sec-img