Memories

८. साक्षात्कार

सरोजिनी आपटे

लोक उद्धारासाठी संत अवतीर्ण होत असतात. आपल्या भारतांत अनेक महान संत झाले. भगवान श्रीधर स्वामी महाराज हे असेच एक महान संत आणि दत्तावतारी महापुरुष होते. १९५९ साली स्वामी हैद्राबादेस आले होते. तेव्हा श्रीदत्त आणि श्रीधर जयंतीचा उत्सव मोठ्या थाटांत तुळजाभवन येथे साजरा झाला. मीही ह्या उत्सवाचा आठ दिवस आनंद लुटला. १८ डिसेबर रोजी मी माझे आईवडील ह्यांना अनुग्रह मिळाला. स्वामीजी अत्यंत दयाळू कृपाळू, भक्तवत्सल, शांत, सहनशील असे होते. भाषण अत्यंत मधुर आणि ऐकावेसे वाटणारे असे असे, भलांची कामना पूर्ण तयार करण्यास उत्सुक असे होते. लोक कल्याणासाठी ते भारतभर हिंडले. लोकांना धर्मोपदेश केला. त्याची दुःखे दूर केली. त्यांच्या कामना पूर्ण केल्या. अशी ही आमची गुरुमाउली ! तिची एक आठवण !

स्वामीजी जेव्हा हैद्राबादेस आले होते तेव्हा त्यांना बोलावण्यासारखी आमची परिस्थिति नव्हती. अशी ही इच्छा राहून गेली होती. पुढे दृष्टान्त होउन मी बेळगावला गेले. आणि गुरु सानिध्याचा आनंद लुटला स्वामीजी . . १९७३ मध्ये समाधिस्त झाले त्यानंतरचा अनुभव

स्वप्न असे पडले की सद्गुरुमाउली मोटारीत बसुन आमच्या कॉलनीत आमच्या घराचा नंबर शोधत फिरत आहे. शेजारच्या घरासमोर थांबून नंबर विचारीत आहेत. त्यांनी पणहेच सरोजचे घर असे दाखविले. स्वामी नंतर आमच्या घरांत आले. देव्हायाजवळ जाउन कपाटाचे दार उघडले. नुकतीच पूजा झालेली आहे, फोटोला हार घातलेले आहेत आणि हे पाहून स्वामी आनंदाने नाचू लागले. “स्वामी तुम्ही नाचत का आहात ?” स्वामी म्हणाले, “मला देव्हारा आणि पूजा पाहून अत्यंत आनंद झाला आहेमी त्यांच्या पायावर डोके ठेवले.”

त्यानंतर बरोबर चारच महिन्यानी सच्चिदानंद स्वामी, शिष्यमंडळीसह आमच्या घराचे नंबर शोधित आले. (रात्री १२ वाजता) आम्ही त्याना लक्ष्मणगिरी मठांत उतरविले. दुसरे दिवशी सकाळी आमचेकडे त्यांची रुद्राभिषेक पूजा झाली. त्यांचे लक्ष देव्हाऱ्याकडे होते. तेव्हा गुरूमाउलींच्या पादूकेवर वाहिलेली दोन फुले खाली पडली. तेव्हा स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटलेसरोज, गुरूमाउलीना आज इतका आनंद झाला आहे की, पादूकेवरील फुले खाली पाडून व्यक्त केला आहे.” आरती करताना मला सच्चिदानंद.स्वामीजींच्या ठिकाणी, श्रीगुरूमाउलींच असल्याचा भास झाला. गळा दाटून आला. अश्रु वाहू लागले. आरती करवेना. अशा रीतीने स्वामींनी सच्चिदानंद स्वामींच्या स्वरूपात पूजा करवून घेतली आणि माझी अपूरी इच्छा पूर्ण झाली. घरांत सर्वत्र हिंडून सर्वांना आशीर्वाद दिले. अशी ही आमची भक्तवत्सल गुरूमाउली !

home-last-sec-img