Upasana

प्रातः स्मरण

॥ १ ॥

श्रीधरं परमानन्दं लोकानुग्रहकारकम्।
भक्तहृपद्मखमणिं गुरुराजं नमाम्यहम्॥ १ ॥

वन्दारुजनमन्दारं यतिवृन्दशिखामणिम्।
ब्रह्माविष्णुशिवाभिन्नं गुरुराजं नमाम्यहम्॥ २ ॥

वर्तमानाघविध्वंसकारिणं भाविपुण्यदम् ।
पूर्वपुण्यफलाद् दृष्टं गुरुराजं नमाम्यहम्॥ ३ ॥

सच्चिदानन्ददुग्धाब्धिं निजसत्यहितोक्तिभिः।
लोपयन्तं हृदज्ञानं गुरुराजं नमाम्यहम्॥ ४ ॥

भो गुरे! मन्मनो भृन्गः त्वत्पदाब्जे निलीयते।
त्वदुक्तिमकरन्देन पोषय श्रीधरप्रभो॥ ५ ॥

आदिनारायणं विष्णूं ब्रह्माणं च वसिष्ठकम्।
श्रीरामं मारुतीं वन्दे रामदासं च श्रीधरम्।।६।।

नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे।
स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः।।७।।

आनन्दघनरूपाय नित्यमंगलरूपिणे।
ममाखंडस्वरूपाय नित्यं श्रीगुरवे नमः।।८।।

॥ २ ॥

प्रातःकाली स्मरत मम ते शाश्वतानंदरूप।
जें कां सर्वी असतचि सदा भासतें स्वस्वरुप।।
जागृत्स्वप्नस्थिति मम सदा भान तें एकरुप।
सुप्ती जें कां उरत अवघे लीन होता अरूप।।१।।

वर्णाया ज्या श्रुति वदत ही नेति, जे का उदास।
नाही ज्याला अणुहि कसला भिन्नरूपें विभास।
अद्वैताने सधन सकली ज्या असें नित्य वास।
ज्याच्या ध्यानीं मनचि नुरते व्हावया भिन्नभास।।२।।

जेथोनी कीं सकल प्रगटे, राहटे, आणि आटे।
जें कां सर्वी असतचि सदा एकरूपेचि दाटे।
ऐशा ज्ञानीं मम निरखितां तत्क्षणी सर्व फाटे।
येथें मी हा म्हणुनि नच कीं अल्प भावेंहि वाटे।।३।।

जें कां जलि एकरूप जल तें जातें मिळोनी स्वतां।
तैसें या मम चिद्रसी सकळ की थोडीहि न भिन्नता।
आनंदैकरसें असें सकलि या मीच स्वतां पाहतां।
गेलें मीपण तें विरूनी न कळे आतां असें तत्त्वतां।।४।।

जेवीं का सरिता समुद्रि मिळता तादात्म्य तें पाहतां।
एकत्वेसि अनंतता विलसता नोहें तयी भिन्नता।
तेवीं या मम चिद्रसी सकळ जी जीवादि हे मिनता।
एकत्वेसि अपार मीचि अवघा झालो असे तत्त्वतां।।५।।

जैसें तरंग उठता निमतां न होत। थोडे हि भिन्न जल ते उदधी समस्त।
तैसेंचि कीं जग नि जीव लयस्थितीत। जो एक मी मजसि नाणूही भिन्न मात।।

जैसे क्षार समुद्री मिळतां तें लवण एकरूप तदा ।
तैसा मी चिद्रूपी मिळता विश्वांत मीच एक सदा ।।७।।

अग्निमुखीं निघता तें नाही की कटक नाम सोन्यातें।
तेंवी विवेकि रिघता नाही की जगत नाम अणु मातें ।।८।।

क्षीरी क्षीरचि मिळतां क्षीरचि तें एकरूप होत जसें ।
जीवेश जगति सर्वहि मजमाजी एकरूप होत असे ।।९।।

जैसा कां स्फटिकाचा सुंदर नग सूर्यरश्मि दिसता हे ।
तैंसा चित्स्फटिकाचा नग मी स्वसुखेचि नित्य वसताहे ।।१०।।

अमृतसुखनिधि ऐसा मजमाजी चिद्रसैकरूपी या ।
मत्स्फुरणे मीचि असा उसळुनि मग निमत नान जाणाया ।।११।।

मममाजी मी रमतां मद्रूपी सहज घोष जो उमटे ।
त्यां घोषासी ‘माया’ म्हणत अहंरूपि जी नटे प्रगटे ।।१२।।

जाणीव इजमधी जी ‘मी ब्रह्म ‘ अशी ‘ईश’ हाचि वदताती ।
जाणीवें नेणिव जी होत तिसी नांव ‘जीवेश’ देताती ।।१३।।

मायाऽविद्या यानीं स्मृति विस्मृति जाहली असे म्हणती।
यामधि मी जो भासे, त्याते ‘जीवेश’ नांव हे देती ।। १४ ।।

विस्मृतिरूपे तनु ‘मी’ भासे ज्या म्हणत त्यासि ‘जीव’ सदा ।
यामधि ‘ब्रह्मस्फुरणें स्मृति यासी येत ‘ईश’ नाम तदा ।। १५ ।।

स्मृति-विस्मृति जीवेशा भासे माया करीत वैचित्र ।
त्यातेंच बंध-मोक्षहि सुखदुःखें परि मसी न हे चित्र ।।१६।।

या सर्वां कारण जो मजमाजी मीचि विलसतां सार ।
सहज उठे शब्दचि जो त्यामधि हा अखिल भास निःसार ।।१७।।

जैसा घोष समुद्री होत परी त्या न किमपि तें भान ।
तैसा या शब्दाचे, निःशब्द मज न किमपि हें भान ।।१८।।

सूर्यापासुनि होउनि शुक्ल-कृष्ण ढग तया न आवरिती।
त्यामधि न जेंवि, तेंवि च मायाऽविद्या न झांकती असती ।।१९।।

मिथ्या मृगजलभासी बिजरूपे सूर्य तो असे तैसा ।
प्रिय-अस्ति-भातिरूपे चित्सुखघन-भासि मी असे तैसा ।।२०।।

दोरीवरि सर्प जसा अद्वय निजि सकल भास हा भासे ।
सर्व शून्य दोरी जशि अन्य शून्य मी सदाचि हा विलसे।।२१।।

वध्यासुतापरी हे नित्य निवृत्तचि बळेंच मेळविलें ।
एकी शून्य जयापरि तेवि एक मी दुजें कुठे उरले ।।२२।।

मज या न अणु विकारहि सविशेषत्वेंहि होत या जगती ।
हो भाव निर्विशेषच माझा मज नच विकार ते दिसतीं ।।२३।।

end-content-img