Literature

दासबोध

सकळ जनामध्यें नाम । रामनाम उत्तमोत्तम । श्रम जावोनि विश्राम | चंद्रमौळी पावला ॥ १६ । ८ । ३ ।। कोर्डे सांकडे संकट | नाना संसार खटपट । अवस्था लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ४१३२६. चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७ ॥ नामें संकटें नासती । नामें विघ्ने निवारती । नामस्मरणें पाविजेति । उत्तमपदें ॥ ११ ॥ भूत पिशाच्य नाना छंद । ब्रह्मगिन्हो ब्राह्मण समंध | मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठे नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती नामें चेडे चेटकें नासती । नामें होये उत्तम गती। अंतकाळी ॥ १३ ॥ बाळपणी तारुण्यकाळीं । कठिण काळी वृद्धाप्यकाळी । सर्वकाळी अंतकाळी । नामस्मरण असावें ॥ १४ ॥ नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेसी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामे करूनी ॥ १५ ॥ उफराय्या नामासाठीं ।

वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचे ॥ १६ ॥ नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले । महापापी तेचि जाले| परम पवित्र ॥ १८ ॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्य शरीर। माहांदोषांचे गिरीवर । रामनामें नासती ॥ २२ ॥ अगाध महिमा नवचे बदला । नाम बहुत जन उध्दरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी || २३ ॥ चहूं वर्णां नामांधिकार । नामीं नाहीं लाहान थोर । जडमूढ पैलपार पावती नामें ॥ २४ ॥

महाराष्ट्रांत बहुतेक ठिकाणीं सायंकाळी सर्व मुलेंबाळें देवापुढे  रामरक्षा’ म्हणतात. नयनत्रवणमनोहर वाटते. त्यांतील रामानामासंबंधी येथे आठवलेले दोनच श्लोक देतों. पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥ रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर्मुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२ ॥ वर्गमृत्युपाताळांतून कोठेंहि किती कपटानें देवदानवमानवादिपैक कोणीहि कसेंहि करून कितीहि खटपटी केल्या तरी रामनामानें रक्षित असलेल्याला दुःख देणें राहिलेंच, नुसतें त्याचेकडे बघणेंहि शक्य नाहीं. राम, रामभद्र, रामचंद्र म्हणून जो श्रीरामाचे नामस्मरण करतो, त्याला पाप आणि पाप्यांचा स्पर्शच होत नाहीं, म्हणजे त्याच्या वाटेलाच तें जात नाहीत असा अर्थ.

वेदांतहि नामाचे महत्त्व फार आहे. कांहीं वेदवचनें उद्धृत करितों. ओघानेच एक विषय संपूर्ण होत आहे. वेदांत नाममहिमा नाहीं, नामस्मरण हें वैदिक नव्हे, वेदांत नामाचा उल्लेख नाही, असे म्हणणाऱ्यालाहि ते कळून येईल. मनामहे चारु देवस्य नाम || ( ऋ० ११२४|१) भूरि नाम वन्दमानो दधाति ॥ ( ऋ० ५/३/१०) मर्त्या अमर्त्यस्य ते भूरि नाम मनामहे ॥ (ऋ० ८।११।५) विश्वाहि वो नमस्यानि नामानि (ऋ० १०/६३।१ यस्य नाम महद्यशः ॥ ( यजु० ३२।३) सदा ते नाम स्वयशो विवक्मि || (सामवेद ५०१३।४।२ ) यत् ते नाम सुहवम् ॥ (अथर्व० ७/२०१२१) नाम उपास्व ॥ (छां० ७१११४ )

आजपर्यंत कितीतरी सम्राट झाले असतील, कित्येकांनी तरी या समुद्रवलयांकित पृथ्वीचें राज्य केलें असेल पण श्रीरामाची सर ककोणालाही नाही. श्रीरामाची उपासना अमित कालापासून ज्याप्रमाणे चालत आलेली आहे त्याप्रमाणे कोणत्याहि सम्राटाची उपासना चालू नाही. रामाचे नांव त्याच्या राज्याला प्राप्त झाल्याप्रमाणे कोणत्याहि राजाचे नांव त्याच्या राज्याला प्राप्त झाले नाही. या सर्व दृष्टीनं श्रीरामाचे व त्याच्या राज्यपध्दतीचे महत्त्व पटवून घेतां येईल व त्याचे श्रेष्ठव ओळखता येईल, ‘रामो राजमणिः सदा विजयते’ यांतलें मर्म लक्षांत घेतां येईल.

home-last-sec-img